Quail Fry (होला मसाला)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
6 Jan 2013 - 12:18 am

फ्रान्स, जपान, माल्टा, पोर्‍तुगीज, पोलंड तसेच भारतात देखिल आवडीने खाल्ला जाणारा हा पक्षी आकाराने अगदिच लहान, शिजण्यास सोप्पा व चवीला उत्कृष्ट असतो. ह्यालाच भारतात "होला" असेही म्हटले जाते.
मागच्याच महिन्यात इथल्या एका indian shop मधुन मी हा quail घेउन आले आणि एक साधीशी पाकृ try केली. चव एकदम मस्त होती, म्हणुन म्हटले मिपा वर देखील ह्याची पाकृ टाकावी. तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे. ;)

q1

हा पक्षी जास्तकरुन आख्खाच केला जातो. आकारने लहान असल्यामुळे त्याचे तुकडे करणे अवघड जाते. मी सुद्धा ते आख्खेच केले होते. त्यामुळे photo थोडा funny आहे, पण चव मस्त आहे. ;)

साहित्यः

Quail (होला) - २ आख्खे
दहि - १/२ वाटी
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
तेल - २-३ चमचे
लिंबुचा रस - १/२ चमचा
मिठ चवीनुसार

कृती:

१. होले स्वच्छ धुवुन घ्यावे व tissue ने पुसुन घ्यावेत.
२. त्यांना वरतुन थोडेसे मिठ, १ चमचा आले-लसुण पेस्ट, १/२ चमचा हळद व १ चमचा लाल तिखट लावुन १-२ तास marinate करावे.
३. कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात marinate केलेले होले टाकावेत व ३-४ मिनिटे सर्व बाजुने परतुन घ्यावेत.
४. त्यात उरलेली हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ वाटी दही व चवीप्रमाणे मिठ टाकुन ५-१० मिनिटे झाकण ठेवुन शिजवावे. मिठ टाकताना लक्षात ठेवावे, कि marination मधेही मिठ टाकले होते.
५. हे होले पुर्ण कोरडे होई पर्यंत परतावे. सर्वात शेवटी लिंबुचा रस टाकुन निट हलवावे व गॅस बंद करावा.
६. हे होले गरम असतानाच फस्त करावेत. ;)

q2

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Jan 2013 - 8:13 am | गवि

वा. छान.

पण क्वेल म्हणजे होला नव्हे.

क्वेल म्हणजे लावरी .. लावी सुद्धा म्हणतात.

होला म्हणजे जंगलातले (पाळीव पारवा वेगळा) कबुतर. लिटल ब्राउन डव्ह.

स्पॉटेड डव्ह म्हणजे कवडा होला..

होला म्हणजे जंगलातले (पाळीव पारवा वेगळा) कबुतर. लिटल ब्राउन डव्ह.

अगदी बरोबर. मला वाटतं "रिंग नेक डव्ह" देखील होलाच.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2013 - 8:31 am | अत्रुप्त आत्मा

यातला डाविकडचा हाताची घडी घालुन बसलेला,आणी उजवीकडचा बसश्टॉपच्या बाकड्यावर पुढे आलेल्या 2 हतात धरुन पेपर वाचत बसलेला असा दिसतोय. :-) मरणातही जग किती जगतं नै? ;-)

पक पक पक's picture

6 Jan 2013 - 8:37 am | पक पक पक

ऑब्सर्वेशन ..ऑब्सर्वेशन .. म्हण्तात ते हेच.....म्हणुनच हा माणुस आपल्याला फार फार आवड्तो.. ;)

यशोधरा's picture

6 Jan 2013 - 8:59 am | यशोधरा

Mrunalini, ह्या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत. हिमालायन क्वेल तर almost extint व्हायच्या मार्गावर आहे हो :(

खाण्यासाठी अन अंड्यांसाठी पोल्ट्री पैदास केली जाते. शिकार कमीच आहे आताशा.

यशोधरा's picture

6 Jan 2013 - 9:55 am | यशोधरा

हो परवाना आहे खरा. :)

अनुप कुलकर्णी's picture

6 Jan 2013 - 9:08 am | अनुप कुलकर्णी

लई भारी... पण आकार बघून डझनाच्या हिशोबात घ्यायला(खायला) लागेल असं वाटतंय!

दिपक.कुवेत's picture

6 Jan 2013 - 11:34 am | दिपक.कुवेत

जरा वेगळा प्रकार आहे सगळ्याच बाबतीत...चवीला, बघायला आणि वाचायला....पण मांस एवढच असतं का? एनि वे ईथे हा पक्षी मिळणं म्हणजे निव्वळ अशक्यकोटितली गोष्ट आहे.

अँग्री बर्ड's picture

6 Jan 2013 - 11:39 am | अँग्री बर्ड

फोटोत एकदम निरुपद्रवी वाटतो पक्षी, खाली लगेच त्यालाच शिजवलेलं बघून कसनुसं वाटलं, असो ज्याची त्याची आवड.

कोंबडी बकरे पापलेटे तरी उपद्रवी कुठे दिसतात?

अन्न म्हणून पाहिलं की तसं वाटणार नाही.. पाळीव लाडका प्राणी म्हणून पाहिलं तर वाईट वाटेल हे न क्की..

वांगी बटाटे कारली सुद्धा फोटोत किती निरुपद्रवी वाटतात! त्यांना शिजवून खाणार्‍यांचा संताप येतो नुसता :(

आनंदी गोपाळ's picture

6 Jan 2013 - 11:51 am | आनंदी गोपाळ

ही स्पेशल हिवाळ्यात खायची वस्तू आहे. 'गरम' असते. उन्हाळ्यात खाऊ नये.
तसेच पट्टीचे नॉनव्हेज खाणारे नसाल, (उदा. नवशिके 'लेगपिस ब्रॉयलर चिकन'वाले) तर लाव्हरी उग्र लागते फारशी आवडणार नाही.
पण खाणारे असाल, तर पितळी भरून लाव्हरीचा रस्सा पिण्याची मजा दुसरी नाही.

कपिलमुनी's picture

6 Jan 2013 - 12:37 pm | कपिलमुनी

फोटो पाहिल्यावर कसेसेच वाटले ...

गणपा's picture

6 Jan 2013 - 2:21 pm | गणपा

इथे मिळतो, पण येवढुसा कुणाच्या दाढेला पुरणार? या विचाराने कधी आणला नाही.
बाकी फोटो मात्र 'अश्लील' आहे. ;)

:D :D :D सगळ्यांचे धन्यवाद!!! मी आधीच म्हटले होते.. फोटो थोडा funny आहे... ;)

प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2013 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर

हे शिजवलेले (फायनल) होले आहेत?

ह्याना 'तितर-बटेर' सुद्धा म्हणतात असे वाटते.

एकदा, २५ वर्षांपूर्वी, एका पाकिस्तानी उपहारगृहात खाल्ला होता. तेंव्हा तेल खाण्यावर बंधनं नव्हती. तर्रिवाला तित्तर अतिशय चविष्ट होता. आज २५ वर्षांनंतरही ती 'याद' ताजी आहे.

लावरी हा तित्तराच्या वर्गातला पण वेगळा तित्तराहून छोटा पक्षी..

तिन्ही पक्षी खालीलप्रमाणे. चित्रे थेट त्या त्या साईट्सवरुन साभार लिंकवलेली..

१. तित्तर, तीतर, इंग्रजी: पार्ट्रिज. भारतात मुख्यतः ग्रे पार्ट्रिज आणि चुकार /चुकर पार्ट्रिज.
grey partridge

२. लावरी, लावी , क्वेल. भारतात अनेक जाती. त्यापैकी बुश क्वेल, माउंटन क्वेल्स कॉमन. कळपाने राहतात. तित्तराच्या पिल्लांचा ग्रुप असावा असा भास होतो.

Indian Jungle bush quail

तित्तर आणि लावर्‍या दोन्हीही जमिनीवर राहणारे / जमिनीवर अंडी घालणारे पक्षी आहेत.

होला (खालीलप्रमाणे) हा शाखारोही पक्षी आहे..

३. होला, लिटल ब्राउन डव्ह

LBD

ठिपकेवाला होला, कवडा होला, स्पॉटेड डव्हः

spotted dove

हे सर्व पक्षी खाल्ले जातात. पैकी लावर्‍यांचे पोल्ट्री तत्वावर उत्पादन होते. मुंबई ठाण्यातल्या सर्व मुख्य मॉल्समधे क्वेलची अंडी असतात. होले मात्र असेच एअरगनने/बेचकीने मारले जातात. त्यांची पोल्ट्री कोणी काढल्याचं ऐकण्यात नाही. ते इतक्या जनरली खाल्लेही जात नाहीत. लहानपणी खाल्ला होता त्याची चव काही फार वेगळी अशी लक्षात नाही.

खुपच छान माहिती साठी धन्यवाद :)

मला खरच नक्की माहित नाही, ह्याला मराठीत काय म्हणतात... internet वर थोडे शोधले तेव्हा ह्याला "होला" म्हणतात असे सापडले. हे बरोबर कि चुक हे जाणकारच सांगु शकतील... मी भारतात तरी हा कधीच खाल्ला नाहिये, त्यामुळे महित नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2013 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहित नाही? तर मग जो कोणी जाणकार असल्यासारखे ठासून सांगेल त्याच्या "होला हो" करा !

पियुशा's picture

6 Jan 2013 - 3:31 pm | पियुशा

सॉरी दी :(
पण मला होला पाहुन हळहळ वाटली बिचारा छोटुसा जीव :(

तसे मला पण खाण्या आधी वाटले होते.पण चव खरच मस्त होती...

दादा कोंडके's picture

6 Jan 2013 - 4:04 pm | दादा कोंडके

कार्टूनशो मध्ये टॉम किंवा तत्सम मांसाहारी पात्रांच्या डोळ्यासमोर जिवंत पक्षी (फोटू क्र. १) एकदम तयार डिश (फोटू क्र. २) दिसू लागतात. त्याप्रमाणे असल्या पाकृ करून करून आसपासचे सगळे जिवंत(खाणेबल)पक्षी-प्राणी तुम्हाला असेच दिसतात का हो तै? :)

:D :D मला नाहि पण माख्या नवर्‍याला नक्कीच दिसतात... तो फक्त मनुष्य, कुत्रा, मांजर आणि घोडा हे ४ प्राणी सोडुन बाकी सर्व गोष्टी खाण्यासाठी काहि विचार करणार नाही.

आयला, एकदा कधीतरी तुमच्या नव-यानं हत्ती मारुन क्रेनला लटकावुन आणलाय असं दृश्य डोळ्यासमोर आलं,

असो, प्रतिसादात हत्ती असला तरी तो हलके घ्याल ही अपेक्षा.

:D :D आहो, ते माझे नशिब चांगले म्हणुन...तो हत्तीचे मांस जर कुठे मिळाले, तर तो तेही आणेल.

साहेब ...या माणसाला मी गुरुस्थानि मानत असल्यामुळे, जगाच्या पाठिवर कुठेहि गेलो तरि काहिहि खाउ शकतो ;) :D
कधि भेट्ताय मग ;) ?

Bear

शुचि's picture

6 Jan 2013 - 9:21 pm | शुचि

हाहा गुड वन ;)

५० फक्त's picture

7 Jan 2013 - 8:13 am | ५० फक्त

हा प्रश्न आहे की धमकी ?

nishant's picture

7 Jan 2013 - 3:03 pm | nishant

आहो हे साध भेट्ण्याचे आमंत्र्ण :)
कारण "खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारे जे असतात ना त्यापॅकी आपण आहोत." ;)

मंग बेस ,पण तुमाला कुटुन येळ मिळाला, आमच्या घरी येयाला.

हे असं सो कोल्ड गारमिण मराठी लिहिलं की कसं फार्फार प्रेमानं लिहिल्यासारखं वाटतं ना.

पुढच्या सुट्टीत नक्कि मिपा कट्टा जमवु.. :)

सानिकास्वप्निल's picture

6 Jan 2013 - 8:53 pm | सानिकास्वप्निल

मी कधीच क्वेल खाऊ नाही शकणार :(
बाकी फोटो छान आहे

वेताळ's picture

7 Jan 2013 - 7:37 pm | वेताळ

त्याला गावात व्हला किंवा व्हलरी म्हणतात. ज्यादा करुन तो गवताळ भागात,खुरट्या गवतात,झुडपात किंवा आमच्या कडे उसात असतात त्याना पटकन उडता येत नाही पण पळायला चपळ असतात.

अशोक सळ्वी's picture

21 Jan 2013 - 4:43 pm | अशोक सळ्वी

आमच्या मेस मध्ये हा पक्षि कधी कधी असतो, पण मला तो रोस्ट केलेल्या उन्दरा सारखा दिसतो! या पेक्षा कोबडी बरी ती तरी डुकरा सारखी दिसत नाही!! डुक्कर प्रेमिनो माफ करा!!

नांदेडीअन's picture

26 Jan 2013 - 12:19 pm | नांदेडीअन

गवि यांनी अतिशय अचूक माहिती सांगितली आहे.

अवांतर :- आमच्या मराठवाड्यात ग्रामीण भागात होला या पक्षाला ‘होल्ली’सुद्धा म्हणतात.