खोबरे+खसखस पोळी (संक्रात स्पेशल)

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
5 Jan 2013 - 6:10 pm

साहित्यः सारणासाठी: ओल्या नारळाचा चव दोन वाट्या, खसखस अर्धी वाटी, गूळ दीड वाटी, अर्धा चमचा वेलची पावडर.
पारीसाठी: कणिक तीन वाट्या, रवा एक वाटी, तेल पाव वाटी,मीठ.
क्रुती: खसखस भाजून पावडर करून घ्यावी. खोबरे व गूळ एकत्र करुन मोदकाप्रमाणे सारण करावे. सारण तयार झाल्यावर त्यात खसखस पावडर आणि वेलची पावडर मिसळावी.
सारण तयार करण्यापूर्वी कणिक, रवा एकत्र करून त्यात तेल आणि चवीला मीठ घालून घट्टसर कणिक मळावी. सारण तयार होईपर्यंत कणिक भिजत राहू द्यावी. सारण गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यावे. कणिक फूड्प्रोसेसरला मऊ करून घ्यावी. सारणाच्या गोळीच्या दीड्पट (अंदाजे) पिठाची गोळी घ्यावी. पिठाच्या गोळीला वाटीचा आकार देऊन सारणाची गोळी त्यात ठेवून वाटीचे तोंड बंद करावे. मध्यम आचेवर पोळी भाजावी. ही पोळी अजिबात फुटत नाही. मी कोणत्याही पोळीसाठी दोन पाय्रा करत नाही. पोळ्या पटापट होतात्, आणि गुळाच्या पोळीसारख्या टिकतात. खोबरे आणि खसखशीमुळे खमंग होतात.

a

a

a

प्रतिक्रिया

सुरेख दिसतायत पोळ्या. ओल्या नारळाच्या पोळ्याबद्दल पहिल्यांदाच वाचले. त्या टिकाऊ असतात म्हणून आश्चर्य वाटले.

सूड's picture

5 Jan 2013 - 7:33 pm | सूड

अगदी अगदी !! ओल्या नारळाच्या असूनही टिकाऊ असतात याबद्दल आश्चर्य वाटलं.

अनन्न्या's picture

5 Jan 2013 - 7:41 pm | अनन्न्या

नक्की टिकतात. आधी सारण परतले जाते आणि परत पोळी भाजली जाते. अगदी गूळ्पोळी सारखी होते. मी मुलाला ट्रीपसाठी देते. ही त्याची आवडती डीश आहे.

रेवती's picture

5 Jan 2013 - 8:28 pm | रेवती

या पोळ्या गुळाच्या पोळीसारख्या कडक होतात का? म्हणजे चतकोर करून डब्यात भरून ठेवण्यासारख्या. माझ्याही मुलाला आवडतील.

लीलाधर's picture

5 Jan 2013 - 7:16 pm | लीलाधर

सुंदरच फक्कड झालीये पोळी वर तुपाची धार असेल तर मजा काही औरच की ओ :-P

मस्तच आहे... करुन बघायला पाहिजे.

दिपक.कुवेत's picture

6 Jan 2013 - 11:26 am | दिपक.कुवेत

छान दिसतेय पोळि. बायकोला ट्राय करायला सांगतो...सारण पण वेगळच आहे. सुखं खोबर वापरलं तर जास्त टिकतील का? आणि चवीत कितपत फरक पडेल?

अनन्न्या's picture

6 Jan 2013 - 6:26 pm | अनन्न्या

चार पाच दिवस सहज टिकतात.

रुमानी's picture

6 Jan 2013 - 11:26 am | रुमानी

छान...!
मि तिळाच्या पोळीत खोबरे वापरते.पण ह्यावेळेस अशी करुन बघते.

पैसा's picture

6 Jan 2013 - 12:13 pm | पैसा

करून बघायला हव्यात. तसेही ओल्या खोबर्‍याचे पदार्थ जास्त छान लागतातच. उदा. ओल्या नारळाच्या करंज्या. तेव्हा या पोळ्या छान लागतील यात काही शंकाच नाही.

सानिकास्वप्निल's picture

6 Jan 2013 - 8:57 pm | सानिकास्वप्निल

तीळ-गुळाची पोळी अजिबात आवडत नाही त्यामुळे ह्या संक्रांतीला ही पाकृ नक्की ट्राय करून बघणार :)
ओल्या नारळाचे सगळेच गोड पदार्थ खूप खूप आवडतात :)
ह्या पोळया टिकतात म्हणून अजूनच आवडल्या गेल्या आहेत :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2013 - 8:39 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआ...............!

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 6:47 pm | कवितानागेश

मी मागे साउथमध्ये एकदा ओल्या नारळाच्या गोड पोळ्या खाल्या होत्या.
आता या अश्या एकदा करुन बघायला हरकत नाही. :)