वक्तृत्व स्पर्धा. ( मदत हवी आहे )

बन्याबापू's picture
बन्याबापू in काथ्याकूट
31 Dec 2012 - 12:53 pm
गाभा: 

आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत :- स्त्री-भृणहत्या,भारतातील परदेशी गुंतवणूक,बालमजुरी-एक समस्या,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.मला जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल कि मी यातील कोणत्या विषयाची निवड करू ? जेणेकरून परीक्षकांवर प्रभाव पडेल.जो विषय निवडला आहे त्याची सुरुवात कशी करावी.वक्तृत्व कसे असावे ? भाषा कशी असावी ? त्यासंबधी काही सुचना आपण कराव्यात हि विनंती.आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे.

( काही दिवसांनी हा धागा संपादक मंडळींनी उडविला तरी काही हरकत नाही.धन्यवाद )

प्रतिक्रिया

यावर लिहा ,,,नक्की बक्षीस !!

अनुप कुलकर्णी's picture

31 Dec 2012 - 1:48 pm | अनुप कुलकर्णी

तुमचे महाविद्यालय = भारती विद्यापीठ आहे काय? असल्यास, प्रभाव पाडणारा विषय एकच : पतंगराव कदम!

चाणक्य's picture

31 Dec 2012 - 2:10 pm | चाणक्य

त्याशिवाय का हा विषय दिलाय...

बन्याबापू's picture

31 Dec 2012 - 3:36 pm | बन्याबापू

हो ! धन्यवाद :)

रामदास's picture

1 Jan 2013 - 9:38 pm | रामदास

बिघडली होती तेव्हा बसमधून येता जाता फक्त रतीय विद्यापीठ दिसायचं हे पण सांगा .

किसन शिंदे's picture

2 Jan 2013 - 8:46 am | किसन शिंदे

बिघडली होती तेव्हा बसमधून येता जाता फक्त रतीय विद्यापीठ दिसायचं हे पण सांगा .

=))

काका, तुमच्या अचुक निरिक्षण शक्तीला सलाम.

स्पर्धेचे विषय पाहता त्यावर तयारी करणं म्हणजे कष्टच आहेत..
ही स्पर्धा कंपल्सरी असेल आणि हे ज्यु महाविद्यालय असेल तर, ही स्पर्धा हेच तीन नंबरच्या विषयाचं ज्वलंत उदाहरण ठरावं.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 3:42 pm | टवाळ कार्टा

_/|\_ :D

तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात या एकच विषयावर बोलु शकाल.... :bigsmile: तेंव्हा बाजुला बसलेलच बरं :crazy:

बन्याबापू's picture

2 Jan 2013 - 6:47 pm | बन्याबापू

तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात या एकच विषयावर बोलु शकाल.... igsmile: तेंव्हा बाजुला बसलेलच बरं

' मी जिलब्या कशा टाकाव्यात ? ' या विषयावर बोलणारच होतो कि..लगेच तुम्ही 'बाजुला' बसलात ;) :D =)) =)) =))

तुम्ही "डॉ पंतंगराव कदम- एक आदर्श नेतॄत्व" यावर भाषण द्या.
तुमचं तरी कदाचित कल्याण होईल...
फक्त एकच विनंती,
ते भाषण इथे मिपावर लिहायचं मनातही आणू नका!!!
अन्यथा देव तुमचे रक्षण करो!!!!
:)

डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व
हाच विषय भारीये.

,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व - एकदम भारी विषय आहे! अख्ख्या भाषणात फक्त इतकाच जप १० मिनिटे केलात तरी तुम्हांलाच पहिले बक्षीस मिळेल! शुभेच्छा!!

बापू मामा's picture

1 Jan 2013 - 11:36 am | बापू मामा

तुम्ही स्त्री भ्रूण हत्या, भारतातील परदेशी गुंतवणूक्,किंवा बाल मजूरी एक समस्या या पैकी कोणताही विषय निवडा. त्या साठी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त समारोप पतंगरावजी कदम एक आदर्श नेतृत्व याच विषयाने करा.परिक्षकांवर प्रभाव पडेल. पहिल्या तीन विषयाचे वक्तृत्व जोमदार व भाषा शक्यतो शिवराळ ठेवून समारोपाचा विषय नेमस्त व आर्जवी भाषेत
केल्यास पहिला नंबर नक्की येईल.

नमस्कार स्विकारा बापू मामा. ;)

बापू मामा's picture

1 Jan 2013 - 1:59 pm | बापू मामा

नमस्कार रेवतीजी,
नविन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2013 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

@ पहिल्या तीन विषयाचे वक्तृत्व जोमदार व भाषा शक्यतो शिवराळ ठेवून समारोपाचा विषय नेमस्त व आर्जवी भाषेत
केल्यास पहिला नंबर नक्की येईल.>>>=)) __/\__/\__/\__

कायत्री घोळ झालाय .मी विषय स्त्री भ्रूण हत्या, भारतातील परदेशी गुंतवणूक्, बाल मजूरी आणि पतंगराव असा वाचला. नक्कीच काचा बदलायला झाल्यात आधी पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं .

पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं
हॅहॅहॅ ! ;)
बाकी इथे बरेच मामा मंडळी आलेली दिसतायत ! ;)

बन्याबापू's picture

1 Jan 2013 - 11:55 pm | बन्याबापू

नक्कीच काचा बदलायला झाल्यात आधी पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं.

कसल्या काचा खिडकीच्या ? चष्म्याच्या असतील तर मात्र 'डोळे' बदला.बाकी ! या वयात आपल्याला 'पलंग' दिसतोय (काय भाणगड) ;). णशीब ! 'पलंगराव' वाचलत..'पलंगावर' वाचायला नाही.;) :D

वयाचा आणि पलंग दिसण्या-न दिसण्याचा काय संबंध? :D

मृगनयनी's picture

2 Jan 2013 - 8:02 pm | मृगनयनी

णशीब ! 'पलंगराव' वाचलत..'पलंगावर' वाचायला नाही.smileysmiley

बन्या..सुधारलेले दिस्ताय!!... बाकी सुन्दर मुलगी पटवाय'चा पेच सुटला की नाही अजून!!!! ;)

पन्तग्रावान्वरच बोला तुम्ही.... शेवटी आता ते अविनाश भोसल्यान्चे व्याही आहेत!!!!!!! :)

रेवती's picture

2 Jan 2013 - 7:54 am | रेवती

ही ही ही.

निवेदिता-ताई's picture

2 Jan 2013 - 8:10 pm | निवेदिता-ताई

:D

५० फक्त's picture

2 Jan 2013 - 11:24 pm | ५० फक्त

थोडं मागं पुढं करुन

१. भारतातील परदेशी स्त्री किंवा २. पतंगराव कदम - एक आदर्श समस्या

असे विषय चालतील का ? म्हणजे पहा विचारुन.

तस्मात या पर्यायाचा उपयोग होईलसे वाटत नाही