साहित्यः
१. हिरवी सफरचंद - २
२. कांदा - १ (पातळ उभा कापुन)
३. लसुण पाकळ्या - २ (पातळ कापुन)
४. सुख्या लाल मिरच्या - ३
५. आख्खे धणे - १ चमचा
६. बडिशेप पावडर - १ चमचा
७. आमचुर पावडर - १/२ चमचा
८. तिळाचि पावडर - १ चमचा
९. हळद - १/२ चमचा
१०. हिंग / मीठ / मोहरि - चवीनुसार
११. तेल - १ पळि
१२. कोथिंबिर
कृती:
१. सुख्या लाल मिरच्या आणि आख्खे धणे कोरडेच भाजुन मिक्सरमधे भरडसर वाटुन घ्या
२. तिळ सुध्धा कोरडेच बाजुन बारिक पुड करा (पाणि न घालता)
३. रेडिमेड बडिशेप पावडर असेल तर ठिक नाहितर बडिशेप पण कोरडिच भाजुन बारिक पुड करा
४. हि तयारि झाली कि कांदा / लसुण पातळ उभा चिरुन घ्या
५. आता सफरचंदाचे मध्यम तुकडे करुन घ्या
६. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाका
७. तेल तापले कि मोहरि, हिंग, हळद टाकुन फोडणी करा
८. मोहरी तडतडली कि कांदा / लसुण घालुन परता
९. कांदा / लसुण मोठया आचेवार परता...थोडेसं जळलं तरि हरकत नाहि...नव्हे तसं कराच कारण नंतर त्याच्यामुळे भाजी मस्त खमंग लागते
१०. आता सफरचंदाच्या फोडि टाकुन परता व वाफेवर शिजवा
११. मधे मधे हलक्या हाताने परता म्हणजे फोडि मोडणार नाहित
१२. आता सफरचंदाची साल मउ झाली कि अनुक्रमे मिरची-धणे पुड, बडिशेप, आमचुर, तिळाचि पावडर, चविनुसार मिठ टाकुन हलकेसे परता
१३. ५ मि. गॅस बंद करुन बारिक चिरलेली कोथिंबीर पेरा
१४. गरमा गरम चटपटित भाजी पोळि, गर्लिक नान, फुलक्या सोबत सर्व करा...:)
प्रतिक्रिया
27 Dec 2012 - 2:38 pm | गणपा
तुमच्या पाककृती नेहमी हटके असतात. :)
27 Dec 2012 - 3:03 pm | गवि
सहमत. वेगळीच पाकृ. सफरचंदाची भाजी.
27 Dec 2012 - 3:06 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
सफरचंदाचे फूल काय देखणे झालेय.
12 Jan 2013 - 9:15 am | शुचि
तसं सफरचंद कापायचे एक यंत्र मिळते. कॉमन आहे.
27 Dec 2012 - 3:06 pm | Mrunalini
अरे वा... सहिच.... पण मग ही भाजी गोडसर लागेल ना????
27 Dec 2012 - 3:32 pm | सूड
हटके रेशिपी आहे.
27 Dec 2012 - 3:41 pm | वामन देशमुख
मस्तच पाकृ; खरंच चटपटीत असणार!
अशीच मी एकदा द्राक्षांची आंबटगोड भाजी केली होती.
27 Dec 2012 - 4:12 pm | दिपक.कुवेत
धन्यवाद.
मृणालिनि: हि सफरचंद जरा अगोडच असतात. नेहमीच्या लाल सफरचंदाची केली तर कदाचीत गोड लागेल.
27 Dec 2012 - 5:30 pm | पैसा
आणि फोटो पण फारच देखणे आलेत. सफरचंद हिरवी म्हणजे कच्ची आहेत की त्यांचा रंग असाच असतो? जरा आंबटसर असणार बहुतेक चवीला.
27 Dec 2012 - 6:46 pm | वेताळ
जरा तुरट लागतात. टिकायलाही उत्तम आहेत. शीतपेटीत १/२ महिने अगदीच टवटवीत राहतात.
27 Dec 2012 - 7:02 pm | रेवती
अगदी वेगळी भाजी. फोटो आवडला.
30 Dec 2012 - 11:20 am | ५० फक्त
लई भारी, अशीच भाजी हल्ली मिळणा-या बिन चवीच्या बटाट्याएवढ्या बोरांची करता येईल ना ?
30 Dec 2012 - 5:59 pm | सानिकास्वप्निल
वेगळीच पाककृती
सफरचंदाची भाजी एकदम छान दिसतेय.
31 Dec 2012 - 8:47 am | स्पंदना
हटके. हिरवी सफरचंद आहेत घरात करुन पहाते.
31 Dec 2012 - 7:49 pm | मीनल
मस्त असेल. कधी इमॅजिन ही केले नव्हते.
पण छान असेल असे वाटते. करून पाहेन.
1 Jan 2013 - 3:32 am | दीपा माने
कल्पक आणि चविष्ट पाकृ करण्यात येईल.
1 Jan 2013 - 8:26 am | निवेदिता-ताई
:)
1 Jan 2013 - 8:29 am | स्पंदना
मी केली होती आज. मला तरी मसाला आवडला. घरचे अॅपल? अॅपल करी? अशी टिका टिप्पणी करत होते.
1 Jan 2013 - 9:57 pm | मदनबाण
अरे वा... एकदम हटके पाकॄ दिसतेय ! :)
10 Jan 2013 - 6:49 am | धनंजय
आताच बनवली. मस्त आहे. धन्यवाद.
12 Jan 2013 - 9:41 am | पाषाणभेद
थंड व्हायच्या आता वाढा हो! लय भुका लागल्यात.