साहित्यः
पापलेट - २
सुक्या लाल मिरच्या - ७-८
ओले खोबरे - १/२ वाटी
धणे - १ चमचा
मेथी दाणे - १/२ चमचा
आले - १ इंच तुकडा
लसुण पाकळ्या - २-३
हिरवे वाटण - १ चमचा (आले, लसुण, हिरवी मिरची व कोथिंबीर)
मोहरी - १/२ चमचा
कडिपत्ता - ३-४ पाने
अमसुल - २
लाल तिखट - २ चमचे
हळद - १ चमचा
हिंग - १ चमचा
लिंबु - १/२
मिठ चवीनुसार
कृती:
१. पापलेट स्वच्छ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावेत. त्याला हिरवे वाटण, १/२ लिंबुचा रस, १/२ चमचा हिंग, १/२ चमचा हळद व थोडे मिठ लावुन ठेवावे.
२. एका वाटीत थोडे गरम पाणी घेउन, त्यात सुक्या लाल मिरच्या, धणे व मेथी दाणे १/२ तास भिजवुन ठेवावेत.
३. मिक्सर मधे, गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, धणे, मेथी दाणे, आले, लसुण व ओले खोबरे ह्याची smooth paste करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम करावे. त्यात १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा हिंग व कडिपत्ता टाकावा.
५. हे थोडे परतल्यावर त्यात वरील पेस्ट, लाल तिखट, १/२ चमचा हळद टाकावी व ४-५ मिनिटे निट परतुन घ्यावे.
६. थोड्या वेळानी त्याचे तेल सुटायला लागेल. तेव्हा त्यात १-२ वाटी पाणी ओतावे.
७. करीला उकळी आल्यावर त्यात marinate केलेले पापलेटचे तुकडे व अमसुल टाकावे. हे सर्व अगदी अलगद हाताने मिक्स करावे.
८. करीवर झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजु द्यावे. पापलेट शिजल्यावर वरतुन कोथिंबीरने सजवावे व गॅस बंद करावा.
९. पापलेट करी तयार आहे. तांदुळाची भाकरी किंवा गरम भातासोबत serve करावे.
* तुमच्या आवडीप्रमाणे करीमधील पाणी कमी-जास्त करु शकता.
प्रतिक्रिया
30 Dec 2012 - 10:39 pm | एस
तोंपासु
30 Dec 2012 - 11:52 pm | पैसा
छान दिसतेय१ कढीपत्ता केरळी पद्धतीच्या माशांच्या आमटीत घालतात ना?
30 Dec 2012 - 11:55 pm | Mrunalini
हो.. केरळी पदार्थात टाकतात... पण मला आवडतो कडिपत्ता टाकायला... मस्त चव लागते.
31 Dec 2012 - 5:28 am | रेवती
इतके भारी फोटू दाखवू नकोस मृणाल.
तू आणि जागुतैनं माझ्यासारख्या अनेक शाकाहार्यांची पंचाईत करून ठेवलीये. ;)
31 Dec 2012 - 5:06 pm | सानिकास्वप्निल
दिल पापलेट पापलेट हो गया ;)
कसली दिसतेय गं ती तुकडी पापलेटची ...तोंपासू
31 Dec 2012 - 6:04 pm | गवि
आहा.. खल्लास...
स्टेप बाय स्टेप फोटो अजून जास्त उपयोगी पडले असते.. नेमकी प्रत्येक पायरी योग्य घडली आहे याची खात्री अशा फोटोंनी होते.
31 Dec 2012 - 6:08 pm | Mrunalini
:)... धन्स गवि... आता next पाकॄ मधे स्टेप बाय स्टेप फोटोज दिले जातील... ;)
31 Dec 2012 - 7:48 pm | स्पंदना
मसाला भिजवुन करायचे हे नव्याने समजले. मी आजवर धणे तरी भाजुनच वापरले. पण आता हे करुन पाहेन.
31 Dec 2012 - 8:07 pm | Mrunalini
हो.... हि निशांतच्या आईची पाकृ आहे... त्यांनीच शिकवली आहे मला..
1 Jan 2013 - 3:10 am | दीपा माने
अगदी चविष्ट पाकृ आहे. नोंद करुन ठेवली आहे.
2 Jan 2013 - 6:15 pm | दिपक.कुवेत
दिसतेय करि....वाफाळत्या भातासोबत हि करि म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...ह्या शुक्रवारि केली पाहिजे
2 Jan 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
बादलीभर लाळ गळल्या गेली आहे.
2 Jan 2013 - 7:05 pm | इरफान
या शुक्रवारचा बेत फिक्स...
4 Jan 2013 - 12:49 am | चित्रा
तुमचे पाककृती सजवण्याचे कौशल्य अफलातून आहे.
4 Jan 2013 - 12:28 pm | आर्णव
मासे बिना खोबर पहिल्यन्दाच असेल माझ्या घरी. पण करुन नक्की बघीन.
4 Jan 2013 - 12:31 pm | आर्णव
अरे ओल खोबर आहे त्यात. निसट्ल नजरेतुन.