आजचा सवाल आणि त्याचे होणारे परिणाम (स्वतःवर आणि त्यामुळे इतरांवर)

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in काथ्याकूट
27 Dec 2012 - 1:15 am
गाभा: 

मी काही वर्षांपासून आयबीएन लोकमतवर आजचा सवाल नियमितपणे पहात आहे. आधी विरंगुळा म्हणून, नंतर माहितीपर कार्यक्रम म्हणून आणि हल्ली तर व्यसन लागल्यासारखं १० वाजता ते पहायला टीव्ही चालू करतो. माझ्या घरचे त्या सूत्रसंचालकावर जाम वैतागतात - किती आक्रस्ताळेपणाने, तावातावाने आणि हातवारे करुन तो बोलतो ह्यावर. घरच्यांना मराठी मालिका, काही हिन्दी मालिका - बडे अच्छे, कुछ तो लोग वगैरे सोबर वाटतात आणि त्यापुढे आजचा सवाल फार जहाल कार्यक्रम वाटतो.

मलाही आजकाल सूत्रसंचालकाबरोबर त्यातली पाहुणे मंडळी आक्रस्ताळी वाटायला लागली आहेत. घरच्यांचं म्हणणं की हे रोज पाहून पाहून मीही (विनाकारण) हातवारे आणि तावातावाने बोलायला लागलो आहे. खरोखरच असा परिणाम होऊ शकतो का? हा कार्यक्रम पाहणं बंद करावं का? तुमचं सगळ्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल :-)

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

27 Dec 2012 - 4:23 am | आनन्दिता

मी तर त्या सुत्रसंचालका ला दाढीवालं वट'वागुळ' च म्हणते... तुमच्या प्रमाणेच माझ्याही घरी या ' आजच्या सवाल' ने बरेच सवाल तयार केले होते...
सुरुवातीला आम्हीसगळेच जण हा कार्यक्रम अगदी चवीने पहायचो.. त्यातल्या काही debate खुप चांगल्या रंगल्या होत्या… अनेकवेळा आमच्या घरातच त्यातल्या वादानुसार दोन दोन गट पडुन आमची तुंबळ जुंपायची सुद्दा…

पण नंतर नंतर मला जाणवु लागलं की बरेच दिवस झाले कुठे काही चांगलं झाल्याची चर्चा आपण ऐकलीच नाहीये.. तिथे बोलायला येणारे दोन गटांचे राजकारणी, तटस्थ (हे सगळे मेले congress धार्जिणेच), यांचं बोलणं ऐकुन कधी कधी इतकं विषण्ण वाटायचं की देशात सगळीकडे अंदाधुंदी च माजलीये हा समज पक्काच होउन बसला… चांगल्या गोष्टींना बातमी म्हणुन कधी स्थानच मिळत नाही आजकाल्… सगळं कसं negative च!

त्यातही तेच तेच वक्ते प्रत्येकवेळी आणले गेल्याने भाई जगताप वगैरे लोकं त्या IBN चे part time employee आहेत की काय अशी शंकाही मला येते =))

स्वत:ला निर्भिड, निपक्षपाती म्हणवणारे सुत्रसंचालक शिवसेना, भाजप वर जितक्या आवेशात तुटुन पड्तात तितक्या सफाइदार पणे राष्ट्रवादी वर congress विरुद्ध का बोलत नाहीत याला उत्तर नाही।
यासगळ्यातून मला तरीइ इतकंच जाणवलं की इतके दिवस मी खर्या स्वरुपातल्या बातम्या ऐकतच नव्हते॥ आप्ल्याला ते ऐकवलं जातं what they want us to listen.

अन् हो ते आक्रस्ताळेपणे वाद घालण्याची 'कला' :) आपल्या अंगी येणे वैग्रे प्रकार आमच्याइथे पण आढळले :) शेवटी मीच " आजपासुन आजचा सवाल बंद" या विषयावर त्या सुत्रसंचालकाला ही लाजवतील अशा तोडीचे हातवारे करुन हा वाद जिंकला.. सध्यातरी आमच्या इथुन आक्रस्ताळे वादविवाद अन् डोकेदुखी हद्द्पार आहे..

त्यातुनही एखाद्या घटनेची बाजु समजावुन घ्याविशी वाटली तर paper मधली अभ्यासपुर्ण सदरे वाचते.. ज्यांची perticular विषयावर बोलायची खरंच योग्यता आहे त्यांच्या comments वाचते..internet बाबा दिमतीला असल्याने हे सगळं जास्त कष्ट न घेता होतय ही माझ्यासारख्या आळशी व्यक्तिसाठी आणखी एक जमेची बाजु आहे…

कधीमधी हा कार्यक्रम ही मी पाहते. सुरुवातीचे काही मुद्दे ऐकले की एकंदरीतच चर्चेच स्वरूप कळून जातं.. बोले तो आपुन भी स्मार्ट बननेका... वादविवादाचा मुद्दा समजेपर्यंन्त च फक्त चर्चा ऐकायची...स्पर्धका मधली नंतरची 'बाचबाची' अन् वट'वागुळ' ची पोपट्पंची ऐकायचीच नाही..:)

चिर्कुट's picture

27 Dec 2012 - 9:38 am | चिर्कुट

अगदी हेच आणि हेच होत होतं आमच्याकडेही..बंद करुन टाकलं तो चॅनल पाहाणं..

तो निखील वागळे अत्यंत पक्षपाती आहे हे पक्कं समजलं आहे आता सगळ्यांना..

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Dec 2012 - 10:05 am | श्री गावसेना प्रमुख

अहो चिर्कुट राव ते चायनलच कॉन्ग्रेस धार्जिण आहे,त्यामुळे वागळे काय अन दुसरा आला काय सारखेच आहे,

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2012 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

शेवटी मीच " आजपासुन आजचा सवाल बंद" या विषयावर त्या सुत्रसंचालकाला ही लाजवतील अशा तोडीचे हातवारे करुन हा वाद जिंकला..

सांगण्याची पद्धत एकदम लाजबाब ! +D

आनन्दिता's picture

30 Dec 2012 - 9:45 am | आनन्दिता

काय करणार घरातली ९९% लोक नाही म्हणत होती ना :)

आनंदिता , चिर्कुट , तुम्ही थांबा. मी तुमच्याकडे परत येतोय.

गावसेना प्रमुख यांना बोलू द्या.. गावसेनाप्रमुख साहेब, मला प्रश्नाचं थेट उत्तर हवं आहे..

हो किंवा नाही .. .. हो किंवा नाही ?

तुम्ही उत्तर देण्याचं टाळताय.. प्रश्न असा आहे "हा कार्यक्रम पाहणं बंद करावं का?"

आनंदिता यांनी म्हटलंय की त्यांनी हा कार्यक्रम पाहणं थांबवलंय.

"सुचेल तसं" यांनी या कार्यक्रमावर आक्रस्ताळेपणाचा थेट आरोप केला आहे. हा गंभीर आरोप आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा कार्यक्रम पाहणं थांबवावं की नाही? तुम्ही उत्तर द्या...

लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. एका वाक्यात उत्तर द्या..

प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..

Dhananjay Borgaonkar's picture

27 Dec 2012 - 11:26 am | Dhananjay Borgaonkar

:D :D :D गवि बगळे

बाळ सप्रे's picture

27 Dec 2012 - 11:42 am | बाळ सप्रे

आता हात्वार्‍यांची व्हिडीओ क्लिप येउद्या !! :-)

बॅटमॅन's picture

27 Dec 2012 - 11:51 am | बॅटमॅन

एकदम पर्फेक्ट!!!!!!!!

चिर्कुट's picture

27 Dec 2012 - 12:02 pm | चिर्कुट

या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करुन दाखविल्याबद्दल गविंचे आभार्स.. :D

>>प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? <<यामध्ये बॅकग्राउंड्ला, अर्रे किती मेसेज आले? ४? ओके.. :) >> (प्रगट) पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..

विजय नरवडे's picture

27 Dec 2012 - 1:53 pm | विजय नरवडे

हा हा हा !!!!!!!

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Dec 2012 - 2:05 pm | श्री गावसेना प्रमुख

प्रत्येक प्रश्नाच थेट उत्तर देता येइलच असे होइल काय्,बाकी कार्यक्रम बघणे किंवा न बघणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे किंवा असावा,मी असे म्हटलोच नाही कि हा कार्यक्रम बघु नका,मी
फक्त एव्हढेच म्हणालो की अहो चिर्कुट राव ते चायनलच कॉन्ग्रेस धार्जिण आहे,त्यामुळे वागळे काय अन दुसरा आला काय सारखेच आहे, आता सांगा मि काय बघु नका असे थोडेच म्हणालो,
राहीली वागळ्यांची बात
वागळे किंवा तत्सम मंडळी किंवा त्यांच्या जागी आलेले दुसरी मंडळी हि मालकाच्या(दर्डांच्या) इच्छेनुसारच चॅनल चालवतात किंवा चालवीत असावीत त्यामुळे त्यांचा ( आय बी एन )कार्यक्रम निरंतर चालतच राहणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2012 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक. :)

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

27 Dec 2012 - 8:02 pm | दादा कोंडके

सहमत!
मानलं गवि तुम्हाला. :)

पण वरती त्यावर श्री गावसेना प्रमुख यांची प्रतिक्रिया वाचून हहपुवा झाली. ;)

पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..

याचा एकच अर्थ असू शकतो.. इतर ५ टक्के लोकं शिवसैनिक आहेत, किंवा ५% लोकांना प्रश्नच नीट समजला नाहिये.. आपण इथे एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर मी श्री गावसेना प्रमुख यांच्याकडे येणार आहे..पाहत रहा (तुम्ही ५% पैकी नसाल तर).. फक्त..

किसन शिंदे's picture

27 Dec 2012 - 11:15 pm | किसन शिंदे

=)) =))

रमेश आठवले's picture

27 Dec 2012 - 11:15 am | रमेश आठवले

वट'वागुळ' चा कार्यक्रम आवडत नसेल तर खालील कार्यक्रमांची फर्माईश करत आहे.
१.सोम-मंगळ -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत - गौरव महाराष्ट्राचा- इ टी.व्ही. मराठी.
२.बुध-गुरु -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत- अवधूत गुप्तेंचे खुपते तिथे गुप्ते - झी मराठी.
३.शुक्रवार -रात्री साडेनौपासून साडेदहा पर्यंत-सलिल कुलकर्णी यांची मधली सुट्टी- झी मराठी
४..शनि-रवि -रात्री नौ पासून साडेदहा पर्यंत- झी टी.व्ही वर . सा रे ग म प हिंदी - या कार्यक्रमातील संगीताचा दर्जा फार चांगला आहे. जसराज जोशी व विश्वजित बोरवणकर यां मराठी मुलांचा समावेश आता उरलेल्या सात स्पर्धकात आहे.

छोटा डॉन's picture

27 Dec 2012 - 11:21 am | छोटा डॉन

असे कार्यक्रम बंद व्हावेत किंवा आपण ते पहाणे थांबवावे असे मला वाटत नाही.
इन्फॅक्ट मला असे कार्यक्रम पाहताना मज्जा येते (असे कार्यक्रम सोडले तर फुटबॉल मॅचेस सोडुन इतर काय पाहण्यासारखे असते टिव्हीवर ? ;) )
काही मुद्दे व्हॅलिड आहेत, उदाहरणार्थ एकच पॅनेल पुन्हा पुन्हा बोलावणे. पण त्याला पर्याय नाही कारण त्या त्या व्यक्ती त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणुन येत असतात, फार तर प्रवक्ते म्हणु आपण, हे पद लिमिटेडच असावे लागते.
दुसरा मुद्दा असा की "स्वत:ला निर्भिड, निपक्षपाती म्हणवणारे सुत्रसंचालक शिवसेना, भाजप वर जितक्या आवेशात तुटुन पड्तात तितक्या सफाइदार पणे राष्ट्रवादी वर congress विरुद्ध का बोलत नाहीत याला उत्तर नाही". हे खरे आहे, पण माझ्या नजरेत हे वागळेंच्या बाबतीत तसे कमीच घडते. इतर चॅनेल्सवरचे महान सुत्रसंचालक जणु रामशास्त्री किंवा गेलाबाजार न्या.काटजुंचा आव आणुन इतरांना हाणत असतात. वागळे निदान त्या बाबतीत बरेच सुसंगत आणि सुसह्य आहेत.
'एबीपी माझा'वर जेव्हा त्यांचे संपादक राजीव खांडेकर येतात तेव्हा चर्चा उत्तम होते.

मला अजुन एक वाटते ते असे की काही राजकिय विषय बाजुला ठेवले तर अशा मंचावर बर्‍याचदा अत्यंत उत्तम म्हणावी अशी चर्चा झाली आहे.
असे कार्यक्रम चालु रहाणे हे उत्तमच आहे (फक्त काही सुचसंचालकांना आता नारळ द्यायला हवा).
भिती फक्त एवढ्याचीच आहे की ही चर्चा त्याचा सुत्रसंचालकाच्या नावावे चालते, उदा. जेव्हा वागळे सुट्टीवर असतात आणि दुसरा कोणी 'आजचा सवाल' विचारत असतो तेव्हा कार्यक्रम बेचव होतो. इथे वागळ्यांच्या आरडाओरड्याला हायलाईट न करता मी त्यांचे सर्व वक्त्यांकडुन वदवुन घेण्याचे स्कील आणि चर्चेवर त्यांचा असणारा कंट्रोल इत्यादी बाबी अधोरेखीत करतो.

- छोटा डॉन

तो वागळे भांडण लावयच काम भारी करतो. कळीचा नारद आहे तो.
"त्यांनी तुमच्यावर उघड उघ्ड आरोप केलाय, तुम्ही याला उत्तर दिल पाहिजे"
"सेनेची भुमिका अमुक आहे, मनसेची काय भुमिका आहे यावर"

आणि परत सगळी कडे मी, मी, मी जणु काही याचाच चॅनल आहे. "आता मी या ठिकाणी एक ब्रेक घेणार आहे"
शिवसेनेने त्याला एकदा मस्त ठोकला होता. तोंडाला काळं देखील फासलं होत तरी पण सुधरल नाही ते.

त्यापेक्षा मग तो ABP माझा वरचा प्रसन्न जरा बरा आहे.

पिंपातला उंदीर's picture

27 Dec 2012 - 11:35 am | पिंपातला उंदीर

इतर मराठी चानल वरील चर्चांपेक्षा वागलेन्चा कार्यक्रम त्यातल्या त्यात उजवा आहे असे माझे मत.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2012 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार

लोकं अजून टिव्ही पाहतात ?

मी-सौरभ's picture

27 Dec 2012 - 7:43 pm | मी-सौरभ

प.रा शेट,
कुठली चॅनेल आणि वेबसाईट कधी पहाव्या यावर एकदा आपल्याशी चर्चा करावयाची आहे बरं....
आजचा सवाल मधे हा विषय चर्चेला घेता येइल का?

(नवपुणेकर)सौरभ

अनुप कुलकर्णी's picture

27 Dec 2012 - 12:31 pm | अनुप कुलकर्णी

हिंदी मध्ये देखील हाच प्रकार आहे. Times Now वरच्या अर्णब गोस्वामी ची चर्चासत्रं ऐकल्यावर निखिल वागळे बरा म्हणायची वेळ येते

दुसर्याचं मत ऐकून घेणं ही Group Discussion/Debate मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं सांगण्यात आलं होतं आणि बर्याचदा चर्चेत भाग घेणारे लोक हे पाळतही असतात, पण वागळे आणि गोस्वामी सारखे होस्ट मुद्दामच चर्चा एकांगी करवतात असं माझं मत आहे.

इरसाल's picture

27 Dec 2012 - 1:13 pm | इरसाल

आता इथुन हिंदी-मराठी सुरु................ चालु द्या

माझा एक मित्र इंग्रजी सुधारण्यासाठी 'कॉफी विथ करन' बघायचा. :)

मी पण बघावं म्हणून वेळ लक्षात ठेउन लावला टिवी. त्यात पहिल्याच भागात कुठल्याश्या उठवळ बाईबरोबर गॉसिपबद्दल तो नाटकी, बायकी चर्चा करत होता. ते बघून, 'बालिश बहु बायकात बडबडला' ही ओळ त्यासाठीच आहे असं वाटलं होतं. लोकं कशातून काय शिकतील याचा भरवसा नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Dec 2012 - 6:35 pm | प्रकाश घाटपांडे

मला प्रसन्न जोशी चे एबीपी माझा वर चे अँकरिंग आवडते. असे कार्यक्रम पहायला मला आवडतात. जर बोअर व्हायला लागल तर रिमोट आहेच आपल्या हातात. कुठलाही अँकर कमी अधिक प्रमाणात बायस्ड असतोच. कारण प्रत्येकाचा संदर्भबिंदू वेगळा आहे. बॉलिवूड च्या गॉसिपिंग पेक्षा हे चांगलच आहे.

आनंदी गोपाळ's picture

27 Dec 2012 - 11:51 pm | आनंदी गोपाळ

प्रश्न असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..

प्रॉब्लेम असा आहे.. हा कार्यक्रम बघणं थांबवावं का? पंचाण्णव टक्के लोक म्हणताहेत "नाही"..

आशु जोग's picture

27 Dec 2012 - 11:51 pm | आशु जोग

अलिकडे बोलायला काही विषय नसला की फावला वेळ कसा घालवावा असा अनेकांना प्रश्न पडतो.

अशावेळी दिग्विजयसिंग, निखिल वागळे, राखी सावंत मदतीला धावतात.

त्यांच्याबद्दल बोलताना, त्यांना शिव्या देताना वेळ कसा छान जातो कळतच नाही

नवे नवे विषय दिल्याबद्दल या तिघांचेही आभार.

पैसा's picture

30 Dec 2012 - 9:03 am | पैसा

दृष्टी बदला हो! फालतू विषय असेल तर विनोदी कार्यक्रम म्हणून बघा. हाकानाका!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2012 - 4:57 pm | अत्रुप्त आत्मा

@घरच्यांचं म्हणणं की हे रोज पाहून पाहून मीही (विनाकारण) हातवारे आणि तावातावाने बोलायला लागलो आहे. खरोखरच असा परिणाम होऊ शकतो का? >>> मग हा धागा काय उगीच निघाला काय? ;-) तुमच्याकडुन :-b

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Dec 2012 - 5:14 pm | निनाद मुक्काम प...
  • मिपा मध्ये आजच सवाल ,
  • प्रतिसादाची धमाल ,
  • मिपा इफेक्टचा चा कमाल
  • असे सदर चालू करावे का अशी विनंती वजा आगाऊ विचारपूस करत आहे.
  • ह्यामुळे आभासी जगतात का होईना लोकशाही जागृत असल्याचा फील येईल.
आशु जोग's picture

30 Dec 2012 - 11:13 pm | आशु जोग

आवडत नाही तू टी वी बंद कर
इतका साधा उपाय आहे.

असे असताना मिपावरचा एक धागा का वाया घालवावा
मिसळीच्या संपादकांना विनंती अशा टी पी विषयांना घरची वाट दाखवावी