साहित्यः
मैदा - १ कप
Brown sugar - पाऊण कप
बटर - १ कप (room temprature)
बेकिंग पावडर - १ टि स्पुन
अंडी - २
मिक्स्ड ड्राय फ्रुट्स (बदाम, मणुका, आक्रोड, ड्राय प्लम, जर्दाळु, काजु, ऑरेंज पील कँडी, ड्राय चेरी)
चोको चिप्स - २-३ चमचे
रम इसेन्स - १ टि स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १ टि स्पुन
Baking sheet
केक मोल्ड
कृती:
१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र २ वेळा पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे.
२. सर्व ड्राय फ्रुट्स व चोको चिप्स एका भांड्यात घेउन त्यात १-२ चमचे मैदा टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे केक मधे ड्राय फ्रुट्स खाली न बसता सगळीकडे पसरतात.
३. एका भांड्यात बटर, रम इसेन्स, व्हॅनिला इसेन्स व brown sugar एकत्र करुन hand mixer ने साखर dissolve होई पर्यंत फेटुन घ्यावे.
४. त्यात १ अंडे व १/२ कप मैदा टाकुन मिक्स करावे.
५. वरील मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात उरलेले १ अंडे, मैदा, ड्राय फ्रुट्स मिक्स करावे.
६. हे सर्व होई पर्यंत ओव्ह्न २०० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
७. केक मोल्डला आतुन बटर लावावे व त्यावर बेकिंग शिट लावुन घ्यावी.
८. ह्या केक मोल्ड मधे वरील केकचे मिश्रण टाकुन निट पसरुन घ्यावे.
९. आता केक ओव्हन मधे १८० degree celcius ला २०-३० मिनिटे बेक करुन घ्यावा.
१०. २०-३० मिनिटांनी केक मधे toothpick टाकुन केक झाला आहे कि नाही ते बघावे.
११. केक झाल्यावर बाहेर काढुन, १०-१५ मिनिटे गार करावा.
१२. केक गार झाल्यावर त्याचे स्लाईसेस कापुन serve करावा.
प्रतिक्रिया
24 Dec 2012 - 3:44 am | रेवती
अरे वा!! छान दिसतोय केक.
24 Dec 2012 - 5:52 am | कौशी
मस्तच बनला केक
आवडला
24 Dec 2012 - 9:51 am | मदनबाण
मस्त ! :)
24 Dec 2012 - 10:26 am | ऋषिकेश
सुंदर!
24 Dec 2012 - 11:58 am | अनुप कुलकर्णी
कमाल भारी दिसतायत त्या स्लाइस...
एक प्रश्न:
अंडी फेटून नाही का घ्यायची? आमचा केक करायचा उत्साह अंडी फेटण्याच्या कंटाळ्यामुळे मावळतो...
24 Dec 2012 - 4:46 pm | Mrunalini
नाही.. ह्यात अंडी नाही फेटली तरी चालतात.. मी पण अंडी न फेटताच टाकली आहेत.
24 Dec 2012 - 3:01 pm | दिपक.कुवेत
आहे केक...लगेच खावासा वाटतोय...हा प्रांत अजुन कधी ट्राय केला नाहि म्हणुन उत्सुकता जास्त...
24 Dec 2012 - 3:04 pm | दिपक.कुवेत
एक ओव्हन घ्यायचा विचार आहे...पण इलेक्ट्रिक कि गॅसचा चांगला?
24 Dec 2012 - 3:06 pm | गणपा
कुवेतमध्ये काय स्वस्त आहे, गॅस की वीज?
24 Dec 2012 - 4:49 pm | Mrunalini
मला तरी काय एवढे त्यातले समजत नाही... मी गॅसचा ओव्हन कधीच वापरला नाहिये. त्यामुळे नक्की माहित नाही गॅसचा चांगला कि इलेक्ट्रिक..
24 Dec 2012 - 3:10 pm | ज्योति प्रकाश
आवडला.रम ईसेन्स घालणे जरुरीचे आहे का?.
24 Dec 2012 - 4:52 pm | Mrunalini
हा हा हा... गणपा बोलतो ते बरोबर आहे.... ख्रिसमसचा केक रम शिवाय होऊ शकत नाही.. ;)
पण रम ईसेन्स नाही टाकले तरी चालेल..
खरे तर हा केक बनवताना, सगळे ड्राय फ्रुट्स हे १ महिना आधी रम मधे भिजवुन ठेवतात... पण माझ्या कडेही रम नव्हती, म्ह्णुन मी फक्त ईसेन्स वापरले.
24 Dec 2012 - 3:15 pm | गणपा
नाताळ म्हटला की रम-प्लम केक हवाच. त्यासुमारास दुसर्या केकांच काम नाय. :)
मस्त दिसतोय केक.
24 Dec 2012 - 3:35 pm | सूड
कालच प्लमकेकची आठवण आली होती, आज मॉन्जिनीजला भेट देणे आले.
24 Dec 2012 - 3:49 pm | धनुअमिता
मस्त.
नक्की करुन बघणार.
24 Dec 2012 - 4:34 pm | दिपक.कुवेत
स्वस्त आहे...
24 Dec 2012 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्हह्हा.......! :-)
24 Dec 2012 - 8:36 pm | सानिकास्वप्निल
सगळ्यात आवडता केक
छानच दिसत आहे केक मृ :)
25 Dec 2012 - 5:10 pm | त्रिवेणी
मस्तच
31 Dec 2012 - 8:51 am | स्पंदना
मी ब्रँडी घालुन बनवला होता. फार छान लागतो हा केक.
फोटोज मस्त.
3 Jan 2013 - 2:47 pm | अबोलीच-ती
बिन अंड्याचा कसा करणार
10 Jan 2013 - 6:03 pm | मानसी डेळेकर
ओव्हन नसेल तर कसा बेक करायचे? केक तर अप्रतिम आहे ......