साहीत्य
१०/१२ मोठे झिंगे(कोळंबी)
१/२ चमचा हळद
१ लिंबु
१ वाटी घट्ट फेटलेल दही.
३ ते ४ चमचे मिठ
३/४ चमचे आल लसुन पेस्ट
१०/१५ काजु
३ लाल टोमॅटो
४/५ कांदे
पुदिना
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या ४/५
१०० मि.ली. तेल
४ चमचे साजुक तुप
लाल ति़खट आवडीप्रमाणे
सुमारे ३०/४० मिनीटे भिजवलेला ३ वाट्या तांदुळ (बासमती असल्यास उत्तम)
खडा मसाला ७/८ काळी मिरी, १ मोठी वेलची, तमालपत्र, ५/६ लवंगा.
गरम पाणि अंदाजे ६/७ वाट्या.
झिंगे/कोलंबी धागे काढुन स्वच्छ धूउन घ्या. त्यांना हळद,मिठ व ३/४ चमचे लिंबुरस लाऊन बाजुला ठेवा.
एका जाडबुडाच्या कढईत जाडसर उभा चिरलेला कांदा टाकुन ब्राऊन होई पर्यंत परतुन घ्या.
घरात उपलब्ध असल्याने मी मिक्स भाजी पण घेतली आहे.
कांदा सोनेरी दिसायला लागला की त्या मधे सगळा खडा मसला+काजु+आल लसुण पेस्ट+१/२ हळद+लाल तिखट + हिरव्या मिरच्या टाका आणि थोडावेल परतउन घ्या. खमंग वास यायला लागला की टोमॅटो + मिक्स भाजी घालुन परत एकदा २ मिनिटे परता.
ह्या मिश्रणात दही घालुन १ मिनिट परता आणि बाजुला ठेवलेली कोळंबी घालुन पुन्हा ३/४ मिनिटे परतवुन घ्या.
वरील मिश्रणात भिजवुन ठेवलेला तांदुळ घाला आणि परत एकदा ३/४ मिनिटे परता. या मधे गरम पाणि घाला.
झाकण लाउन भात शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
भात शिजल्यावर सर्व बाजुंनी तुप सोडुन परत झाकण लाउन ३/४ मिनिटे ठेवा.
आणि मनपसंत सजावट करुन सर्व्ह करा.
राज की बात - खर म्हणजे हा माझा फसलेला बिर्यानिचा प्रयोग आहे. भात सुटा न होता गिचका झाला म्हणुन खिचडी नाव दिल पण हा प्रयोग चवित यशस्वि झाला होता एवढ नक्की.
प्रतिक्रिया
22 Dec 2012 - 9:03 pm | त्रिवेणी
चवीला छान झाल्यावर बिर्याणी म्हणून खाल्ले काय किवा खिचडी म्हणून खाल्ले काय भात खाण्याशी मतलब.
शेवटचा फोटू मस्तच
भातप्रेमी
22 Dec 2012 - 9:37 pm | शैलेंद्रसिंह
खुपच छान दिसतेय खिचडी..काजु टाकायची आयडीया भारीच..आज-उद्याच ट्राय करतो बनवायचा.
मी मागच्या आठवड्यात केली होती...त्याचीही खिचडीच झाली. मग मी युट्युब वर रेसिप्या पाहिल्या. त्यानुसार नुसती बिर्याणी किंवा फ्राईड राईस सारखी खायची असेल तर भात भरपुर पाण्यात ९०% शिजवावा..पाणी फेकुन द्यावे..अगदी ड्राय करावा...आणि मग तुम्ही जो मसाला आणि कोळंबी आधी परतुन घेतलीय त्यात टाकुन मग वाफ़ेवर मंद आचेवर शिजवावा...जर स्टर फ़्राईड राईस खायचा असेल तर खुप जास्त फ़्लेम वर झाकण न ठेवता परतवावा.
22 Dec 2012 - 10:12 pm | पैसा
फटु लै भारी! आणि बिर्याणी फसून खिचडी झाल्याचा कबुलीजबाब देण्याचा प्रामाणिकपणा त्याहून भारी. आता कधीतरी माझ्या पोरांसाठी अशी खिचडी फसून बिर्याणी करता येते का ते बघते!
23 Dec 2012 - 4:20 am | दीपा माने
पाकृ फारच आवडली. असेच करता करताच शिकता येते. आणखी पाकृ तुमच्याकडून येवोत.
23 Dec 2012 - 10:14 am | सुहास..
लपलप !
23 Dec 2012 - 10:37 am | पियुशा
व्वा झिंगा खिचडी आवडली :)
वरुन ३ र्या नं च्या फोटुत ते काड्यासद्रुश काय आहे ?दालचिनी आहे का ? अन असेल तर ती इतक्या प्रमाणात घालायची ? स्ट्रॉंग नाही का होणार टॅस्ट ?
23 Dec 2012 - 1:25 pm | पिंगू
पिवशे, मला तरी ते आल्याचे लांब तुकडे वाटताहेत..
23 Dec 2012 - 3:12 pm | पियुशा
नै रे पिंगु ते आलं नै वाटत ,तुमरे चस्मा का नं बढ गवा क्या ? ;)
23 Dec 2012 - 3:59 pm | कवितानागेश
ते 'आलं' च आहे.
majority wins!! ;)
पिवशे, खर्र खर्र सांग, तुला स्वैपाकातलं कै कळत नै नं?? :D
23 Dec 2012 - 4:03 pm | पियुशा
ए माउ ...बेट लावते का माझ्याशी ५० ची क्याडबरी ;)
कॉलींग .....जयपाल अंकल ;)क्याडबरी का सवाल है ;)
23 Dec 2012 - 6:55 pm | jaypal
मेजॉरीटी विन्स. पियुशा ते आल (ज्युलीअन्स) आहे.
23 Dec 2012 - 9:14 pm | पिंगू
पिवशे, आता दोन क्याडबर्या पाठवून दे..
- पिंगू
23 Dec 2012 - 11:42 am | स्पंदना
कदाचित ते तांदूळ जे चार पाच तास भिजवले ना त्यामूळे खिचडी झाली असावी. असो फसलेला का असेना पण या प्रयोगा निमित्त्याने गृहीणीला निवांतपणा मिळाला असावा अशी अपेक्षा.
23 Dec 2012 - 6:58 pm | jaypal
मी तर ३०/४० मिनीटे लिहल आहे आणि तेवढ्याच वेळ भिजवले होते :-(
23 Dec 2012 - 1:27 pm | पिंगू
जयपालशेठ, मानलं तुम्हाला. झिंगा खिचडी छानच झालेली दिसतेय..
- पिंगू
23 Dec 2012 - 1:46 pm | दिपक.कुवेत
खिचडि कतिल लग रहि है...बघुनच भुख लागली
23 Dec 2012 - 6:54 pm | Mrunalini
tempting आहे एकदम... आता २-३ दिवस सुट्टी आहे... तेव्हा नक्की ट्राय करुन बघते.
23 Dec 2012 - 10:21 pm | कौशी
रेसिपी आवड्ली.
24 Dec 2012 - 9:39 pm | अत्रन्गि पाउस
चव उत्तम आलि कि पदार्थाचे नाव काही का असेना...
आणि वरच्या फोटो वरून...हा प्रकार म्हणजे जमलेला तानपुरा वाटतो....लयीच भारी....
3 Jan 2013 - 10:26 am | प्रभाकर पेठकर
तिन वाट्या तांदूळात फक्त १०-१२ कोलंब्या फार कमी वाटताहेत. तसही, छायाचित्रात कोलंब्या दुप्पट दिसताहेत. २२ ते २४ असाव्यात.
तांदूळ भिजवलेले असतील तर पाणी दिडपट घ्यावे आणि अगदी मंद आंचेवर बिर्याणी शिजवावी. जेवढ्यास तेवढे पाणी घेऊनही भात शिजतो पण फार फडफडीत होतो. दिडपट पाणी योग्य होतं. आणि प्रत्येक तांदूळाच्या प्रतीला पाण्याचे प्रमाण वेगवेगळे लागते. त्यामुळे बिर्याणीसारखा पदार्थ करताना तांदूळ 'माहितीतला' असावा.
कोलंबी जास्त शिजता कामा नये. जास्त शिजल्यास 'रबरी' होते. कमी शिजल्यास पचनास जड होते. कोलंबीच्या आकारमानानुसार एक वाफ घेऊन तांदूळ मिसळल्यास कोलंबी व्यवस्थित शिजते. कोलंबी लहान असेल तर एक वाफ घ्यायचीही गरज नाही, भाताबरोबर शिजते.
ताजी कोलंबी, बासमती तांदूळ आणि साजूक तुप (वापरल्यास) बिर्याणी अप्रतिम होते.