माझी बाईक भ्रमंती - दक्षिण भारत

नानबा's picture
नानबा in भटकंती
13 Dec 2012 - 12:01 am

आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.

दिवस १ / रात्र १ : मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव-मेल्लोम-सावर्डे-कारवार-गोकर्ण.

आमचे २ riders मुंबईवरून संध्याकाळी ५ च्या सुमारास निघाले आणि आम्हाला रात्री ८.३० च्या आसपास NH4 वर कात्रज च्या पुढे खेड शिवापूर टोल नाक्याला भेटले. Plan नुसार आम्ही रात्रभर प्रवास करून दुस-या दिवशी सकाळी ११-१२ पर्यंत कर्नाटकात दांडेली ला थांबणार होतो. ठरल्या प्रमाणे जेवणं आटपल्यावर रात्री ११ वाजता आम्ही NH4 वरून पुढे कुच केले आणि पुढील ठिकाणं ठरवल्याप्रमाणे गाठली. (सातारा रात्री १२.३०, थोड्या वेळ थांबून पुढे कोल्हापूर MacDonald’s ला रात्री २.४५ वाजता). MacDonald’s ला तासभर खानपान आणि थोडा आराम करून पुढे बेळगावकडे निघालो. वाटेत निपाणीजवळ एका कोल्हे महाशयांनी माझ्या गाडीला धडक दिली. सुमारे १००-११० चा वेग असल्यामुळे कोल्ह्यासारख्या लहानशा प्राण्याची धडकसुद्धा इतकी जोरदार बसली की पायातलं ब्रेक लिव्हर वाकडं झालं. त्या प्रकरणामध्ये निष्कारण अर्धा पाऊण तास गेला, आणि आम्ही बेळगावला पहाटे ५.३० च्या सुमारास पोहोचलो.
आणि इथून "आपण ठरवल्याप्रमाणे नशिब आपल्याला चालू देत नाही" हा धडा आम्हाला मिळाला. बेळगावमधल्या एका पेट्रोल पंपावरच्या माणसाने दांडेलीमध्ये पाहण्यासारखे नाही, आणि तिकडे जाण्यात आमचा वेळ व्यर्थ जाईल, तरी जाणे टाळा असा सल्ला (फ़ुकटचा) दिला. तो स्थानिक असल्यामुळे त्याच्या सांगण्यात तथ्य असेल असा समज(?) करून आम्ही plan मध्ये बदल केला, आणि गोवामार्गे गोकर्णला जायचा बेत केला.
मध्ये मध्ये लहान लहान फोटोग्राफी ब्रेक्स घेत घेत आम्ही गोव्यात सावर्डेला दुपारी १२.३०-१ ला पोहोचलो. जेवणं आटोपली, आणि कारवार मार्गे संध्याकाळी ४.३० ला गोकर्णला आमचा काफ़िला अखेरीस पोहोचला. जवळपास रात्रभर जागरण करून २०-२१ तास बाईक चालवल्यामुळे सगळेच जण अतिशय थकले होते. त्यामुळे दुसरं काही न करता सर्वांनी आराम करणं पसंद केलं. तरी संध्याकाळी समुद्रावर जाण्याचा मोह कोणालाच आवरला नाही. त्यापाठोपाठ जेवण करून परत येऊन निद्राधीन झालो, आणि २१ तास ६१० किमी नंतर पहिला दिवस संपला.

आमचे रथ - Bullet आणि Pulsar 220F
आमचे रथ - Bullet आणि Pulsar 220F

बेळगावहून गोव्याकडे..
बेळगावहून गोव्याकडे..

आम्ही Riders (डावीकडून) - निखील, प्रथमेश (मी), सागर, जयेश.
आम्ही Riders (डावीकडून) - निखील, प्रथमेश (मी), सागर, जयेश.

कर्नाटक प्रवेश - मार्गे कारवार..
कर्नाटक प्रवेश - मार्गे कारवार..

गोकर्ण किना-यावरून सूर्यास्त.
गोकर्ण किना-यावरून सूर्यास्त.

दिवस २ : गोकर्ण-याना-जोग-सागर-तिर्थहळ्ळी.

दुसरा दिवस उजाडला तो "कुणाचाही सल्ला न मानता आपण ठरल्याप्रमाणेच पुढे जायचं" हा निर्णय घेऊनच. त्या साठी plan मध्ये थोडेफ़ार बदल करून आम्ही सकाळी ८ ला याना साठी प्रयाण केलं. याना हे ठिकाण उत्तर कन्नड जिल्ह्यातील unusual rock formations साठी प्रसिद्ध आहे. यानाकडे जाणारा रस्ता मात्र अत्यंत कठीण, खराब आणि तीव्र चढाईचा असल्यामुळे ५५ किमी जायला २.५-३ तास लागले.
याना झाल्यानंतर पुढे जोग धबधबा पाहण्यासाठी निघालो आणि दुपारी १२.३० ला जोग ला पोहोचलो. मनमुराद फ़ोटोग्राफ़ी करून ठरल्याप्रमाणे अगुंबेला जाण्यासाठी आम्ही निघालो. सुमारे २५-३० किमी वर सागर नावाच्या गावात जेवणासाठी थांबलो. आणि अचानक तुफ़ान पावसाला सुरूवात झाली. २ तास वाट बघूनही थांबत नाही म्हटल्यावर आम्ही निघायचं ठरवलं. कॅमेरा, मोबाईल लॅपटॉप वगैरे वस्तूंना वाचवत आम्ही मार्गस्थ झालो. पण पुढील रस्त्याच्या दुर्दशेमुळे पुन्हा plan मध्ये बदल करण्याचा निर्णय झाला, आणि रात्री ८.३० वाजता तिर्थहळ्ळी ला १२ तास २६० किमी नंतर थांबलो.

याना कडे जाणारा खडतर रस्ता..
याना कडे जाणारा खडतर रस्ता..

चाके ही चालती, याना ची वाट..
Attitude फोटु..
Attitude

याना चा मार्ग.
on the way

याच साठी केला होता अट्टाहास. याना मधील Unsual Stone Formations.
yana stones

जोग फ़ॉल्स.
jog falls.

हे आपलं सहजच, फ़ोटुग्राफ़ीची हौस भागवायला..
photo

दिवस ३ : तिर्थहळ्ळी-मुडिगेरी-बेल्लुर-हळेबिडु-हसन-सोमवारपेट-मणिकेरी (कुर्ग)

सकाळी सकाळी ७ ला तिर्थहळ्ळीचा निरोप घेऊन निघालो, आणि मुडिगेरीच्या चहा कॉफ़ीच्या मळ्यातून जाणा-या हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत दुपारी १२.३०-१ ला हळेबिडुला पोहोचलो. तेथील प्रसिद्ध श्री केदारेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन म्हैसूरला जाण्याच्या हेतूने २.३०-३ ला निघालो. पण म्हैसूरला पोहोचेपर्यंत रात्र होईल आणि तेथील वृंदावन गार्डन पाहता येणार नाही याची जाणीव झाल्यावर आम्ही सोमवारपेटला पोहोचल्यावर पुनश्च एकदा plan बदलून कुर्ग ला जायचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय आमच्या संपुर्ण ride मधला सर्वात thrilling निर्णय ठरला. सोमवारपेट ते कुर्ग हा सगळा रस्ता हत्तींसाठी राखीव असणा-या अभयारण्यातून जातो. अभयारण्यातून जाणारा सुनसान खराब रस्ता, आदल्या दिवशीच्या पावसामुळे त्यातला चिखल, रात्रीचा मिट्ट काळोख आणि त्यातून वाट काढणा-या आमच्या बाईक्स, अशा अवस्थेत आम्ही ९०-१०० किमी चा पल्ला २.५-३ तासात गाठून १० ल कुर्ग ला पोहोचलो आणि १४ तास ४२० किमी नंतर थांबलो.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा.
चहाचे मळे, मुडिगेरी.

tea ways

मळ्यात थोडा आराम.
relax

हळेबिडू मंदिर.
temple

दिवस ४ : कुर्ग-कासरगोड-मंगलोर-उडुपी-मालपे.

हा दिवस उजाडला आणि कुर्ग मधील प्रसिद्ध ऍबी फ़ॉल्स बघून नाष्टापाणी करून ९.३० ला पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. उडुपी ला पोहोचण्यासाठी NH17 ला लागण्यासाठी Google maps च्या मदतीने कासरगोड ला जायचा निर्णय झाला. कुर्ग ते कासरगोड हा ८० किमीचा घाटातला पट्टा अप्रतिम रस्त्यामुळे केवळ १.५ तासात आटपला आणि ११ ला आम्ही कासरगोड गाठलं.
ब-याच दिवसांनी मिळालेल्या चांगल्या रस्त्यामुळे झालेल्या आनंदात भर पडली ती कासरगोड केरळात असल्याचं कळल्यावर. केरळाला आमचे पाय लागतील असं आमच्या मनातसुद्धा नव्हतं. त्यामुळे, plan च्या पुर्ण बाहेर येऊन १५०-१६० किमी केरळसारख्या अतिशय निसर्गरम्य आणि नितांतसुंदर रस्त्यांच्या राज्यात बाईक चालवायचा आनंद घेतला. भारतातील सगळ्यात सुशिक्षीत राज्य कसं आहे, आणि शिक्षणाचा परिणाम कसा असतो हे त्या वेळात आम्हाला खूप जवळून अनुभवता आलं. जिथे आधी कर्नाटकामध्ये लेन मार्किंग नसलेले खराब रस्ते, कन्नड भाषेतले बोर्ड्स आणि हिंदी इंग्लीशचा गंध नसणारे लोक होते, आणि त्याच्या उलट केरळातील दृश्य होतं. व्यवस्थित लेन मार्किंग केलेले गुळगुळीत रस्ते, मल्याळमसोबत इंग्लिश भाषेत असणारे बोर्ड्स आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलणारे लोक यामुळे त्या राज्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.
कासरगोड वरून NH17 पकडून आम्ही उत्तरेकडे मार्गस्थ झालो, आणि ४.३० ला मंगलोर, ५ ला उडुपी आणि ५.३० ला मालपे ला ११ तास २६० किमी नंतर थांबलो.

ऍबी फ़ॉल्स, कुर्ग.
abbey

कर्नाटक च्या सीमेवर.
kerala

आणि हे शिरलो केरळात.
in kerala

केरळमधला लय भारी रस्ता.
road in KL.

अशा रस्त्यावर cornering चा मोह कसा आवरावा?
cornering

दिवस ५ : मालपे-मुरुडेश्वर-मडगाव-पणजी-पोर्वरीम.

चवथ्या दिवशी उत्तम रस्त्यांवरून कमी प्रवास झाल्यामुळे पाचव्या दिवशी सकाळी सगळे अगदी फ़्रेश होते. सकाळी ९.३० ला आम्ही मालपे सोडलं, आणि NH 17 वरून वर सरकत ११.३० वाजता कर्नाटकातील प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिर ला पोहोचलो. मनमुराद फोटोग्राफ़ी आणि तुडुंब पेटपूजा केली. आमच्या plan प्रमाणे आम्ही मुरुडेश्वर ला थांबणार होतो. पण हातात जवळपास अर्धा दिवस असल्याने आणि पुढच्या दिवशीचा प्रवास थोडा कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला. गोवा आमच्या plan मध्ये अचानक आल्यामुळे आमचे सगळ्यांचे "दिल गार्डन गार्डन" झाले होते. १.३० ला मुरुडेश्वर चा निरोप घेतला, आणि कानकोंड, मडगाव, पणजी मार्गे संध्याकाळी ७.३० वाजता पोर्वरीम ला पोहोचलो.
माझा स्थानिक मित्र Aldrin आणि त्याचे भाऊ Angelo आणि Jason ना भेटलो, आणि १० तास ३७० किमी नंतर पाचवा दिवस संपवला.

मुरुडेश्वरचे २५० फ़ूट उंच गोपुरम.
murudeshwar

मुरुडेश्वरातील शंकराची भव्य मुर्ती..
shankar

मुरुडेश्वरचा किनारा..
beach

मुरुडेश्वरमधील पेटपूजेची भारी जागा, नवीन बीच रेस्टॉरंट.
hotel

पुन्हा एकदा गोव्याच्या भूमीत.
in goa

दिवस ६ : पोर्वरीम-NH17-पनवेल-डोंबिवली.

अखेरची सकाळ अनपेक्षितपणे गोव्यात मिळाल्यामुळे आम्ही अख्खी सकाळ बागा बीच वर घालवली. दुपारी सामानाची शेवटची बांधाबांध करून, मनात कित्येक दिवस रूळतील अशा आठवणी सोबत घेऊन आणि गोवनिज मित्रांचा निरोप घेऊन १ च्या सुमारास गोवा सोडलं. NH 17 वरून कुडाळ, कणकवली, राजापूर, चिपळूण मार्गे रात्री ८.३० ला खेड ला पोहोचलो. आता सगळ्यांनाच घरी जाण्याची एवढी ओढ लागली होती, की NH 17 वरचा सर्वात कठीण समजला जाणारा कशेडी घाटसुद्धा रात्री ९ च्या मिट्ट काळोखात अर्ध्या पाऊण तासात उतरून आम्ही पोलादपूर ला पोहोचलो होतो. त्या पुढचा प्रवास कसाबसा संपवत शेवटी रात्री १.३० ला डोंबिवलीला टेकलो, आणि ride मधले शेवटचे १२ तास ५८० किमी पार करून आमची दक्षिण भारत यात्रा संपवली.

Ride चे Details:-
• एकूण प्रवास - २५६० किमी.
• प्रत्येकी खर्च - जवळपास ५००० रू. (जेवण, राहणं, पेट्रोल सगळं धरून)
• सोबत नेलेली Gadgets :

1) कॅमेरे -
a) Canon 60D
b) Canon 550D
c) Kodak Z990
d) Nikon Coolpix L24

2) लॅपटॉप - Sony Vaio (फोटो ट्रान्सफ़र करण्यासाठी)
3) ट्रायपॉड, मिनी ट्रायपॉड, गोरिलापॉड.
4) नोकिया N8 (GPS मार्गदर्शक)

प्रतिक्रिया

इरसाल's picture

13 Dec 2012 - 9:09 am | इरसाल

द फटु

इरसाल's picture

13 Dec 2012 - 9:25 am | इरसाल

आणी त्याबद्दल थोडी माहिती लिहुन ६ दिवसांचे सहा भाग लिहु शकला असतात.

चिंतामणी's picture

13 Dec 2012 - 9:37 am | चिंतामणी

विस्तार करून, फोटो टाकुन अजून लिहायला हरकत नाही.

प्रचेतस's picture

13 Dec 2012 - 9:09 am | प्रचेतस

1) कॅमेरे -
a) Canon 60D
b) Canon 550D
c) Kodak Z990
d) Nikon Coolpix L24

2) लॅपटॉप - Sony Vaio (फोटो ट्रान्सफ़र करण्यासाठी)
3) ट्रायपॉड, मिनी ट्रायपॉड, गोरिलापॉड.

इतके सर्व असून एकही फोटो नाही?

मालोजीराव's picture

13 Dec 2012 - 12:07 pm | मालोजीराव

D.S.L.R. असून नो फटू !

मालोजीराव's picture

13 Dec 2012 - 12:09 pm | मालोजीराव

फोटो झक्कासच आहेत
वरील प्रतिक्रिया मागे येत आहे :P

चौकटराजा's picture

13 Dec 2012 - 9:18 am | चौकटराजा

तुमचा मार्ग पाहून हेवा अति हेवा ! याना हे ठिकाण मला पाह्यचे आहे. बेलूर हळेबीडचे फटू टाका राव. ही फक्त ओरिएंटेशन टूर झाली. आपण निवडलेल्या यात्रेत सांगण्यासारखे बरेच काही आहे.जंगले , किनारे, शिल्पे सगळेच !

सुकामेवा's picture

13 Dec 2012 - 9:23 am | सुकामेवा

पण त्याला जरा चांगले फोटू जोडले आणि लेखमाला वाढवली असती तरी चालले असते.

लीलाधर's picture

13 Dec 2012 - 9:49 am | लीलाधर

कॅमेर्र्याने हवेत फोटो काढलेत काय राव ?????????????

ट्रीप झक्कास.....पण जरा अजुन तपशील आणि अनुभवासकट, लेख काही भागांमधे टाकला असता तर बरं झालं असत.........
असो.. "लेह"वारी चे भाग संपले कि दक्षिण प्रवासाचे भाग टाकेनच... तेवढच मिपाकरांना आणखी एक रुट कळेल....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Dec 2012 - 10:05 pm | निनाद मुक्काम प...

अजूनही लिहा की
प्रवासात आलेले चांगले वाईट अनुभव त्यामुळे वाचकांना सल्ले
खानपान संस्कृती ,
फोटो सोबत थोडे स्थळ महात्म्य
चांगला ६ भागाची लेखमाला होण्याचे सामर्थ्य आहे

नानबा's picture

13 Dec 2012 - 11:26 am | नानबा

फोटो तर लै काढलेत हो भौ... पण हिकडं टाकत्यात कसे?

फक्त सहा दिवसात एवढा प्रवास केलात हे एक साहसवीर म्हणून प्रशंसेस पात्र आहे. पण सर्व वर्णन वाचताना भोज्याला शिवल्यासारखे आणि फक्त भोज्ज्या शिवण्यासाठीच / पुरतेच तुम्ही फिरलात असं वाटत राहिलं. त्यामुळे मुशाफिरी, प्रवास, पर्यटन या स्केलवर स्कोअर कमी झाला असं वाटतं.

सहा दिवसांत अमुक इतकी राज्यं, किंवा इतके किलोमीटर असं ध्येय असेल तर खूप उत्तमरित्या पार पाडलं आहेत.

इतका वेळ बाईक राईड हे साधं काम नव्हे.

इतरांनी म्हटलंय तसे फोटो हवेतच. कुठे पिकासावर वगैरे असतील तर मला व्यक्तिगत निरोपाने लिंका पाठवा. लेखात चढवतो. तोपर्यंत फोटो चढवण्याविषयी मार्गदर्शन आणखी इतरजण करतीलच.

साधारण फ्लिकर, पिकासा अशा आल्बम्समधे फोटो अपलोड करुन त्याची थेट लिंक कॉपी करुन घ्या आणि पाठवा.

नानबा's picture

13 Dec 2012 - 12:07 pm | नानबा

फ़ोटु टाकलेत.
गवि, होय आमचा मूळ उद्देश बाईकवरून भ्रमंती हाच होता. त्यामुळे जास्त ठिकाणांना भेट दिली नाही.

प्रचेतस's picture

13 Dec 2012 - 12:15 pm | प्रचेतस

फोटो जाम भारी आलेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Dec 2012 - 12:16 pm | श्री गावसेना प्रमुख

लै भारी हायेती फटु हो राव कॉर्नर चे तर सुपर

मदनबाण's picture

13 Dec 2012 - 12:21 pm | मदनबाण

मस्त ! :)

बाबा पाटील's picture

13 Dec 2012 - 12:49 pm | बाबा पाटील

१ नंबर....

आता फोटो आहेत, पण लेखाची लांबी रुंदी लहान वाटत आहे, पण फोटो फार सुंदर, आजुन २-३ भाग चालले असते.

बॅटमॅन's picture

13 Dec 2012 - 12:53 pm | बॅटमॅन

हाण्ण तिच्यायला.........एकच नंबर!!!!

नि३सोलपुरकर's picture

13 Dec 2012 - 1:38 pm | नि३सोलपुरकर

प्रथम,
सर्वप्रथम तुम्हा सार्‍यांचे अभिनंदन, झक्कास ट्रीप आणी फोटो पण १ नंबर ...लै भारी !!!!

बाकी मणिकेरी म्हणजे "मडिकेरी" ....बरोब्बर ना. एकदम अप्रतिम स्थळ आहे.

हेवा ...वाटतोय राव,तुमचा आणी त्या मनरावांचा... काय ट्रीप केलीत मित्रांनो एकदम झक्कास .(इनो घेतला आहे)

लई भारी फोटो, बाकी कॉर्नरचे फोटो खासच.

अवांतर - तुमची ट्रिप निर्मनुष्य रस्त्यावर अनोळखी देवासारख्या माणसांनी मदत न करता , रात्री बेरात्री हॉटेलं बंद झाल्यावर,हॉटेलवाल्याच्या म्हाता-या आईनं भात कालवण शिजवुन न देता कशी काय पुर्ण झाली, याबद्दल फार आश्चर्य वाटले. असो.

किसन शिंदे's picture

13 Dec 2012 - 3:22 pm | किसन शिंदे

वरील पहिल्या ३-४ प्रतिक्रिया वाचून थोडासा चक्रावलो होतो.

फोटो एकापेक्षा एक भारी आले आहेत.

३-४ भागांची एक मालिका नक्कीच होऊ शकली असती.

शित्रेउमेश's picture

15 Dec 2012 - 12:18 pm | शित्रेउमेश

मस्त मस्त मस्त.....

क्या बात है?

पैसा's picture

16 Dec 2012 - 9:47 pm | पैसा

फोटो सुंदर आलेत. पण असं वाघ मागे लागल्यासारखं पळून वाटेतली सगळी ठिकाणे नीट पाहिली जात नाहीत. परत कधीतरी वेळ काढून भटकंती करा.

मोदक's picture

16 Dec 2012 - 10:28 pm | मोदक

भारी फोटो...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Dec 2012 - 10:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो मस्त आलेत.
मी आज्पर्यन्त कधी बाईक वर एवढा लाम्ब प्रवास केलेला नाही. ह्या ३१ तार्खेला बाईक वर पुणे-तारकर्ली असा ३ दिवस ट्रिप चा बेत आहे.
जरा गाडी विशयी शन्का होति. युनीकोर्न १५० सी.सी. गाड्या आहेत. एवढा लाम्ब प्रवासात एन्गिन साठि काय कलजी घेतलि होती? एअर कुल्ड एन्गिन आहे माझ्या गाडीच. पल्सर ला लि॑क्वीड कुल्ड आहे. जरा मार्गदर्शन केलत तर बर होईल.

५० फक्त's picture

17 Dec 2012 - 11:16 pm | ५० फक्त

सिंगल रन मध्ये १५०-१७५ किमीपेक्षा जास्त जाउ नका,एवढं झालं की ५-१० मिनिटांचा ब्रेक घ्या. प्रवास स्रुरु करायच्या आधी किंवा केल्या केल्या एखाद्या टायर पंक्चर वाल्याकडुन इंजिनवर विशेषतः इंजिन फिन्सवर प्रेशरनं हवा मारुन घ्या, त्यावरची धुळ काढण्यासाठी, येत असेल आणि सहज शक्य असेल तर ऐअर फिल्टर सुद्धा प्रेशरनं स्वच्छ करा. पण आधी शिकुन घेउन, उगा ट्रिपमध्ये प्रयोग नको. प्रत्येक ब्रेकला गाडी रस्त्याला काटकोनात उभी करा, मागची बाजु रस्त्याकडं करुन, समांतर नको, यानं इंजिनचं नैसर्गिकरीत्या गार होणं जास्त सहज होतं.

गिअर खाली वर करायचा कंटाळा करु नका, वरच्या गिअरला कमी स्पिडला गाडी चालणं आणि खालच्या गिअरला जास्त स्पिडनं,इंजिनला कधीही आवडत नाही. त्याला जे आवडत नाही ते तुम्ही करु नका, तुम्हाला जे आवडते ते तो तुम्हाला करु देईल.

टायरमध्ये हवा व्यवस्थित भरा, कमी अजिबात नको, हवा कमी भरल्यानं पंक्चर होण्याची शक्यता ३०% कमी होते पण तसं करणं जास्त धोकादायक आहे, धोक्याबद्दल तुम्ही परत आल्यावर बोलु.

आणि सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही उतारावर गाडी न्युट्रलमध्ये चालवु नका, पेट्रोल वाचवायचं असेल तर गाडीवरुन खाली उतरुन ढकलत न्या पण न्युट्रलमध्ये नको. आणि यापेक्षाही महत्वाचं हेल्मेट,ग्लोव्हज आणि नो मोबाईल, नो दारु किमान गाडी चालवताना. जिपिएस वापरणार असलात तरी व्यवस्थित थांबुन मगच पहा, दोन चार किमी पुढं मागं झाल्यानं काही बिघडत नाही.

सर्व मुद्द्यांशी दणदणीत सहमती. विशेषतः उतारावर न्यूट्रल न करणं आणि मद्यपान याविषयी..

फक्त प्रवासातील ब्रेक दरम्यान कूलिंग होण्यामधे (बाईक स्थिर असल्याकारणाने) त्या ठिकाणची वार्‍याची दिशा कारणीभूत ठरत असावी. रस्त्याची नव्हे. तेव्हा वाहन "रस्त्या"ला पॅरेलल आहे किंवा काटकोनात यापेक्षाही वाहत्या वार्‍याच्या दिशेशी काटकोनात असं म्हणायचं आहे का?

मूळ रचनेनुसार समोरुन वारा येणार असं गृहीत धरुन एअरकूल्ड इंजिन्सचे फिन बसवलेले असतात. अशा वेळी गाडी थांबलेली असताना हे लॉजिक काटकोनात अधिक चांगलं कसं चालेल?

मी अभियंता नाही, तरी आपली तार्किक शंका आली इतकंच.. :)

५० फक्त's picture

18 Dec 2012 - 3:46 pm | ५० फक्त

मूळ रचनेनुसार समोरुन वारा येणार असं गृहीत धरुन एअरकूल्ड इंजिन्सचे फिन बसवलेले असतात. अशा वेळी गाडी थांबलेली असताना हे लॉजिक काटकोनात अधिक चांगलं कसं चालेल?

यामागं रस्त्यावरुन जाणा-या इतर गाड्यांच्या वेगामुळं जी हवेची वेगवान हालचाल होते त्याचा फायदा घेणं हा हेतु आहे, कारण काटकोनात असल्यानं जास्त सरफेस एरिया मिळतो इंजिन गार होण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे इंजिन बंद झाल्यानंतर एक ते दोन मिनिटात आतलं गरम झालेलं ऑइल बॉटमला आलेलं असतं, त्यामुळं मुळातच उष्ण्तावहनासाठी मिळणारा सरफेस एरिया कमी झालेला असतो.

दुसरी बाजु म्हणजे, विशेषत: कोकणातल्या छोट्या रस्त्यावर गाडी आडवी लावली असेल तर ती उठुन दिसते आणि मागुन पुढुन येणारा व्यवस्थित कट मारु शकतो, गाडी रस्त्याला समांतर असेल आणि कट मारणा-याचा अंदाज चुकला की बोंब होते (स्वानुभव - एकुण फटका र. १५००)

ओके...पटण्यासारखं स्पष्टीकरण..

ज्यांना बाईक प्रवास झेपणार नाही पण कारची उपलब्धता आहे त्यांनी कारमधून अशी लांब भ्रमंती करण्याविषयी काही विचार करता येईल का? तो ही एक वेगळा अनुभव ठरु शकतो. बाईकइतका खडतर नसला तरी त्यातले च्यालेंज वेगळे असू शकतात. एका दिवसात अधिक अंतर जाता येऊ शकेल का?

धागा भरकटवण्याचा हेतू नाही. मनापासून विचारणा करतो आहे.

रात्री १२ पर्यंत तरी सेफ ड्राएव्ह करता येते ..
थ्रिल कमी असला तरी सुरक्षितता जास्त असते ..आणि ओपन जीप असेल तर दुधात साखर-केशर !!

कधी जायचं बोला ? तुमची इंडिका माझी इंडिका, आठ जण सुखात दहा जण कोंबुन कधी जायचं बोला,?

आमची पण स्विफ्ट काढु ... ४ +.

नोव्हेंबर ला राजस्थानला जायचा प्लॅन आहे ... जाने का क्या ?

५०राव, गणेशा आणि अन्य..
कारमधून (३-४ कारचा ताफा = १० ते १५ जण) मुंबईपासून समुद्राची कोस्टलाईन पकडून पार दक्षिण टोकापर्यंत जावं अशी इच्छा आहे. व्यवस्थित १५ दिवस हाती ठेवून. नीटपणे निरीक्षण करत. केवळ अंतर किंवा किमीचं डेली टार्गेट न ठेवता (काही मर्यादेत तेही ठेवावं लागेलच..).

समुद्रकिनार्‍यावर वाट काढत जायचं. कोंकण, गोवा, कारवार, कर्नाटक कोस्ट, मेंगलोर, कोची इत्यादि जितकं बसेल १५ दिवसांत तितकं. नवव्या दहाव्या दिवशी जिथे पोहोचू तिथून परतीचा प्रवास.

ऑल बॅचलर्स ओन्ली. जिथे जाऊ तिथे ऐनवेळी मुक्काम शोधणे (अतएव ऑफसीझनमधे जाणे)

आपले मत द्या..

फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा कसा वाटतोय, मध्ये आख्खा दीड महिना आहे, रजा बिजा अ‍ॅडजेस्ट करायला. सिझन तर पुर्ण्पणे ऑफच, त्यामुळं निवांत फक्त काही ठिकाणी रस्ते जरा खराब भेटणार एवढंच. माझी ७५% तयारी आहे, बाकीचे आले की लगेच कार या लयात रजेचें सांगुन टाकतो, १७ रविवार ते २८ गुरुवार फेब्रुवारी २०१२. अजुन एक महत्वाचे येणा-यांपैकी किमान निम्मे लोक गाडी व्यवस्थित चालवु शकणारे असले पाहिजेत,गेला बाजार २-३ वर्षे भारतात स्वताची गाडी चालविण्याचा अनुभव आवश्यक.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2012 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला फक्त इन्जिन चच टेन्शन होत.बहुतेक सर्व प्रवास रात्री १२.०० नन्तरच होणार आहे. आणि थन्डी आहे त्यामुळे अजुन मदत होइल हिट एक्स्चेन्ग ला. ( थर्मोडाय्नमिक्स ची आठ्वण झाली.) ;)
नो मोबाईल ओन बाईक आणि दारू नेव्हर एव्हर आहे सो त्याची चिन्ता नाही. :).
तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद :).

कपिलमुनी's picture

18 Dec 2012 - 3:39 pm | कपिलमुनी

सॅक पाठीला न लावता मागे बांधा..
जर्र्किन, ग्लोव्ह् , उच्च प्रतिचे गॉगल ग्लास नसलेले हेल्मेट , बूट आणि दर १०० किमी अंतरामधले मित्रांचे , ओळखेच्या लोंकाचे नंबर, एक बी एस एन एल चे कार्ड , स्वताची संपूर्ण माहिती लिहिलेला कागद (सॅक ला चिकटवा, एक खिशात) ज्यामधे ब्लड ग्रुप इत्यदी माहिती असेल , हेल्मेट ला रेफ्लेक्टर असलास उत्तम !!
एक दोरी, स्विस नाइफ बरोबर असल्यास चांगले ..
डिस्क ब्रेक असल्यास त्यचे ऑइल चेक करा.. विरिन्ग तपासून पहा .. इंडिकेटर च्या वायर कधितरी हलतात ,,त्य कशा दुरुस्त करायच्या ते माहित असल्यास उत्तम..

ऑल द बेस्ट !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2012 - 8:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ डीस्क ब्रेक ओइल सुचना.

डबल सिट जावच लागणारे. नाहीतर परत ट्रिप ला जाता येणार नाही :)

त्यात प्रत्येकी खर्च - जवळपास ५००० रू. (जेवण, राहणं, पेट्रोल सगळं धरून)
९ नोव्हेंबरला आम्ही निघालो...दिवस ६ : पोर्वरीम-NH17-पनवेल-डोंबिवली...शेवटी रात्री १.३० ला डोंबिवलीला टेकलो!

हनिमूनला स्कूटरवर गोव्याला जायच म्हणून निघालो... स्टेशनवरनं स्कूटर घरी पाठवून दिली आणि रेल्वेतल्या कुपेनं गोव्याला गेलो त्याची आठवण झाली!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2012 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

जोरदार कारवाई....दमदार फोटू :-)

स्पंदना's picture

18 Dec 2012 - 5:59 pm | स्पंदना

पाडसांच्या कानात वार शिराव तसे उधळलात राव!
फोटोज फारच छान आलेत. विषेशतः कॉर्नरींग! मी झटक्यात शिव्या द्यायला लागले. जणु पुन्हा मी माग बसलेय अन त्या वेगात जाणार्‍या गाडीन वळणावर अस काही तिरक वळण घेतलय की मी पडते की काय झाल मला.

५० फक्त फार छान सूचना.

नानबा's picture

18 Dec 2012 - 9:50 pm | नानबा

मउवा,
बिंधास प्रवास करा हो. युनिकॉर्न आहेत ना? होंडाच्या बाईक्स विश्वासू असतात. नीट Maitenance केलेल्या असतील तर काही त्रास देणार नाहीत. आणि प्रवास म्हणाल तर फ़ार लांब नाहीये. पुणे ते तारकर्ली मार्गे कोल्हापूर-कणकवली गेलात तर अंदाजे ४०० किमी पडेल. तेवढा प्रवास ब्रेक घेत घेत १२-१४ तासात सहज करता येईल, आणि जास्त शिणवटा पण जाणवणार नाही.

आता गाडीच्या काळजीबद्दल थोडंसं. निघण्यापूर्वी सर्विसींग करून पुढील गोष्टींची खातरजमा करा.

१. इंजिन ऑईल बदलून घ्या.

२. डिस्क ब्रेक ऑईल चेक करा, कमी असल्यास रिफ़ील करा.

३. सर्वात महत्वाचं म्हणजे टायर्स चेक करा. पंक्चर्स असल्यास काढून घ्या. माझ्या मते युनिकॉर्नला ट्युबलेस टायर आहेत ना? असल्यास अत्युत्तम. फ़क्त २-३ दिवस आधी हवेऐवजी नायट्रोजन भरून घ्या. साधारणपणे पहिल्यांदा भरताना ५०-६० रूपये एका टायरमागे लागतात. पण नंतर खूप फ़ायदा होतो. एक तर पंक्चर होण्याचा धोका ब-याच प्रमाणात कमी होतो. दुसरं म्हणजे उष्णतेमुळे हवा प्रसरण होऊन टायर फ़ुटणे हा धोका पण जवळपास संपतो.

४. इंजिनबद्दल म्हणाल तर १५० सी.सी. (युनिकॉर्न १४ हॉर्सपॉवर) भरपूर आहे. शक्यतो एकटे एकटे जा. (म्हणजे एका बाईकवर एक). इंजिनवर ताण येणार नाही. (विशेषत: घाटरस्ते आणि खराब रस्त्यांवर), आणि सामान मागे बांधता येईल. पाठीवर सामान घेऊ नका. परत आल्यावर पाठ फ़ार त्रास देते. (स्वानुभव). पहिल्यांदाच मोठी राईड करणार असाल तर ठराविक अंतरानंतर ५-१० मिनीटांचे ब्रेक्स घ्या. (साधारण ९०-१०० किमी नंतर). त्याने तुम्हाला पाठ दुखणे, मांड्या भरून येणे असले त्रास होणार नाहीत. (अजून एक स्वानुभव.) आणि थंडीचे दिवस असल्यामुळे इंजिनसुद्धा लगेच गार होईल. एयर कुल्ड इंजिनामुळे काही त्रास होणार नाही. (लोकं १०० सी.सी. च्या स्प्लेंडरवर लडाख ला जातात.)

५. जर एखादा मोठा पॅच राईड झाली, (मोठा घाट वगैरे, जिथे इंजिनवर ताण आलाय असं तुम्हाला वाटत असेल), तर त्यानंतरच्या ब्रेक मध्ये इंजिनच्या फ़िन्सवर थोडं पाणी टाका. (मॅन्युअल लिक्वीड कुलींग!)

आणि हो, शक्य असल्यास, (शक्य कराच.) Riding Gears घालून जा. (नी गार्ड्स ,एल्बो गार्ड्स आणि Riding ग्लोव्हज). खूप protection मिळतं.

बाकी राईड उत्तम होईलच. शुभेच्छा. काही मदत लागल्यास सांगा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2012 - 10:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गरम फिन्स वर पाणी टाकलं तर क्वेंचिंग होउन क्र्याक्स जाऊ शकतात. त्यापेक्शा थोडा वेळ वाट पाहिलेली बरी. प्रोब्लेम एकच आहे, डबल सीट जावच लाग्नारे. तशी २५० किमि. प्रावासाचा अनुभव आहे. पण तेव्हा पावसाळा होता. आणि वाटेत चिक्कार थाम्बात थाम्बत गेलो होतो. :).

नानबा's picture

18 Dec 2012 - 9:51 pm | नानबा

आणि कपिलमुनींचा सल्ला पण एक नंबर..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2012 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खत्रा फोटो.

-दिलीप बिरुटे

नानबा's picture

19 Dec 2012 - 9:12 pm | नानबा

मउवा,
डबल सीट जाणं क्रमप्राप्तच असेल तर सामान कमीत कमी करा. नाहीतर पिलीयन ला सामान घेऊन बसावं लागतं आणि त्याचा फ़ार प्रचंड त्रास होतो...

केदार-मिसळपाव's picture

19 Dec 2012 - 10:18 pm | केदार-मिसळपाव

कर्नाटक प्रवेश विशेष आवडला....

रोहित पवार's picture

26 Dec 2012 - 3:20 pm | रोहित पवार

लय भारी
खुपच आवडले लोन्ग राईड्स मजाच येते पण तसे सहाकारी हि पाहिजेत........

वामन देशमुख's picture

26 Dec 2012 - 4:00 pm | वामन देशमुख

प्रथम फडणीस आणी कंपनीचे अभिनंदन!
आजकाल मिपावर बाईक वरच्या मोठ्या प्रवासाचे अनेक धागे दिसतात.
असा प्रवास करण्यासाठी लागणारी साधने, घ्यावयाची काळजी, मुक्कामाची योग्य ठिकाणे, संभाव्य धोके, बजेट नियंत्रण इ बाबींवर मिपावरील तज्ज्ञ लोकांनी चर्चा/ लेख लिहावा.
त्याचा, असा बाईक प्रवास करू इच्छिणाऱ्या अननुभवी लोकांना संदर्भ म्हणून उपयोग होईल आणि कदाचित प्रेरणाही मिळेल.

पैसा's picture

27 Dec 2012 - 9:30 pm | पैसा

वर्णन चांगलंच आहे, पण तुम्ही मंडळींनी फक्त बाईकवरचा थरार अनुभवायला ही ट्रिप केली होती बहुधा. पुढच्या वेळी नीट सगळे पहात आरामात सफर करा.