संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
18 Dec 2012 - 2:36 am
गाभा: 

pannini
चित्र क्र. १: Giovanni Paolo Pannini
Interior of a Picture Gallery with the Collection of Cardinal Silvio Valenti Gonzaga - 1740

two
चित्र क्र. २: Johann Zoffany: The Tribuna of the Uffizi c.1777.

आपण एकादे मोठे संग्रहालय बघायला जातो, तेंव्हा तिथे अनेक प्रकारच्या कलाकृती बघायला मिळतात. त्यातील काही आपल्याला आवडतात, तर काही तितक्याश्या आवडत नाहीत. काही आवडूनदेखील 'समजत' नाहीत. अर्थात एकाद्या कलाकृतीचे सौदार्यास्वादन करण्यासाठी ती 'समजली'च पाहिजे, असे नसले, तरी विशेषत: जुन्या कलाकृतींमधून अनेक प्रकारची माहिती संग्रहित असल्याने ती समजून घेणे सुद्धा मनोरंजक असते. या लेखात विविध संग्रहालयातील अश्या काही चित्रांबद्दल अशी माहिती करून घेऊया.

पाश्चात्त्य देशांमधील संग्रहालयातून साधारणपणे आपल्याला खालील प्रकारची चित्रे बघायला मिळतात:

धार्मिक कथा-चित्रे .... पौराणिक कथांवर आधारित चित्रे वा प्रतीक-चित्रे .... ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रे ... देवी-देवतांची चित्रे .... निसर्गचित्रे .... रोजच्या जीवनातील सर्वसामान्य विषयांवरील चित्रे .... मनुष्याकृती व व्यक्तिचित्रे .... स्थिर-वस्तु चित्रे ....विविध आधुनिक शैलीतील चित्रे .... केवल (अमूर्त) चित्रे, वगैरे.
या लेखाच्या प्रारंभी दिलेल्या दोन्ही चित्रात अश्या अनेक प्रकारच्या कलाकृती आणि त्या काळच्या मान्यवरांचे चे हुबेहूब चित्रण केलेले दिसते. चित्र क्र.२, Zoffani याचे हे चित्र बनवण्यासाठी इंग्लंड ची राणी शार्लोती हिने १७७२ साली त्याला वार्षिक ३०० पौंड तनखा देउन इटलीतील फ्लोरेंस शहरी पाठवले होते, ही कामगिरी पूर्ण करायला त्याला सहा-सात वर्षे लागली. या एका चित्रात त्याने विविध उंचीवर, विविध कोणातून दिसणारी अनेकानेक चित्रे आणि मूर्ती, त्याकाळी फोटोग्राफीची सोय नसताना ज्या कौशल्याने हुबेहुब चित्रित केलेली आहेत, ते बघून थक्क व्हायला होते. याखेरीज त्याकाळच्या मातब्बर व्यक्तींचे चित्रणही केलेले आहे. असे काही बघितले, की हल्लीच्या चित्रकारांना लाभणारे स्वातंत्र्य जास्त प्रकर्षाने जाणवते.

आता रुबेन्स याचे खालील चित्र बघा:
three

चित्र क्र.३: Peter Paul Rubens: The Consequences of War 1637-38

हे एक 'प्रतीक -चित्र' आहे, अर्थात यातील मनुष्याकृती व अन्य वस्तु या कशाचे तरी प्रतीक वा रूपक म्हणून चित्रित केलेल्या आहेत. या चित्रातून त्याने तत्कालीन युरोपची परिस्थिती दाखवलेली आहे.

हे चित्र रुबेन्सने १६३७-३८ साली रंगवले, त्यावेळी युरोप मध्ये 'तीस वर्षांचे युद्ध' (१६१८-४८)चाललेले होते.या युद्धामुळे संपूर्ण युरोपची दारुण परिस्थिती झालेली होती.
चित्रातील मध्यवर्ती आकृती म्हणजे 'मार्स' (रोमन युद्धदेवता ) असून तो एक पुस्तक व चित्र पायदळी तुडवत (युद्धामुळे कला व साहित्याची होणारी अवनिती) आवेशाने युद्धाला निघालेला आहे. चित्रात डावीकडे 'जानुस' देवतेचे मंदिर असून त्याचे दार अर्धवट उघडलेले आहे. (प्राचीन रोम मध्ये जानुस चे मंदिर शांततेच्या काळात बंद असे, तर युद्धाच्या काळी उघडे)
डावीकडे 'व्हीनस', अर्थात सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य, विजय यांची देवता 'मार्स' ला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे. याउलट 'अकेतो' ही हातात पेटता पलिता घेतलेली रागीट, दुष्ट देवता त्याला युद्धात खेचत आहे. तिच्यासोबत असलेल्या आकाशातील आकृती रोगराई आणि दुष्काळाच्या द्योतक आहेत.

'ल्यूट' हे वाद्य घेतलेली स्त्री म्हणजे शांती, सामंजस्य, सुख-समृद्धीचे प्रतीक. ती जमिनीवर पडलेली असून तिचे वाद्य तुटलेले आहे. हातात बाळ घेतलेली स्त्री हे वंशवृद्धी, करुणा यांचे प्रतीक असून तीही संकटात आहे. जमिनीवर कोसळलेला माणूस हा वास्तुविद आहे, यातून युद्धामुळे होणारा शहरांचा, संस्कृतीचा विनाश, नवनिर्मितीची शक्यता संपणे, या गोष्टी दर्शवल्या आहेत.

डावीकडे जमिनीवर पडलेला सर्पदंड, विखुरलेला बाणांचा भाता हे भंग झालेली शांती व ऐक्य दर्शवतात, तर अगदी डावीकडील कृष्ण-वस्त्रातील स्त्री ही युरोपचे प्रतीक असून तिची भाव-मुद्रा विनाश, हाहाकार दर्शवते. देवदूत-बालकाच्या हातातील स्फटिक गोल हा ख्रिस्ती जगताचे प्रतीक आहे (हे तीस वर्षांचे युध्द कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात चाललेले होते)

पाब्लो पिकासो याचे बहुचर्चित चित्र 'गुअर्निका' हे सुद्धा युद्धाची विभीषीका दर्शवणारे चित्र म्हणून प्रसिध्द आहे.

बव्हेरियाचा राजा लुडविग प्रथम याने १८२७ ते १८५० या काळात खास बनवून घेतलेल्या 'गॅलरी ऑफ ब्यूटीज' मधील ही चित्रे बघा.
म्युनिख शहरातील तात्कालिन सुंदर स्त्रियांची ही ३६ चित्रे मुख्यतः Joseph Karl Stieler या चित्रकाराने बनवली आहेत.

g1 g2
g3 g4

g5 g6

संग्रहालये बघणे: एकाद्या मोठ्या संग्रहालयाला आपण जेंव्हा भेट देतो, तेंव्हा तेथे शेकडो-हजारो कलाकृती व अन्य वस्तू असल्याने घाई-घाईत सर्वकाही बघण्याच्या प्रयत्नात निवांतपणे काहीच बघता येत नाही. खरेतर एक संग्रहालय नीटपणे बघायला अनेक दिवस वा महिनेसुद्धा लागतात. संग्रहालयात शिरण्यापूर्वी थोडासा पूर्वाभ्यास करून गेल्यास त्यातल्या त्यात वेळेचा नीट उपयोग करून घेता येतो.
एकादे संग्रहालय बघायला जाण्यापूर्वी त्याविषयी खाली माहिती मिळवावी:

१. संग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी, वार्षिक सुट्ट्या व उघडे असण्याच्या वेळा. (बहुतेक संग्रहालये आठवड्यातील काही दिवस रात्री नऊ -दहापर्यंत उघडी असतात, त्या दिवशी जाणे बरे पडते).
२. तिथे खाण्या-पिण्याची काय सोय आहे, घरून नेलेले खाद्य-पदार्थ आत नेऊ देतात का? (विशेषत: शाकाहारी लोकांसाठी महत्वाचे)
३. संग्रहालयाचे तिकीट कितीचे आहे.
काही संग्रहालये खरेतर निशुल्क वा 'डोनेशन' स्वीकारणारी - 'pay as you wish' असतात, पण तिथे गेल्यावर प्रवेश-शुल्क म्हणून बरीच मोठी रक्कम लिहिलेली असते, तरी मी इतकेच देऊ इच्छितो, असे सांगून अत्यल्प शुल्क देउन प्रवेश घेता येतो, उदाहरणार्थ: न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटन म्युझियम मधे पंचवीस डॉलर लिहिलेले असूनही मी पाच डॉलर देउन प्रवेश मिळवला. हल्ली बरेच लोक क्रेडीट कार्ड वापरत असल्याने तिकडे मोठी लाईन असते, तर रोख घेणारे काउंटर रिकामे असतात.
४. संग्रहालयाची मुख्य प्रवेश-द्वारे कुठकुठे आहेत, कुठे कमी गर्दी असते, व तेथपर्यंत कसे पोचावे, हे आधीच माहित करून घ्यावे.
५. काही विशेष सवलती आहेत का ? उदा. जेष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थी वा लहान मुले, कलावंत इ. साठी असलेल्या सवलती, महिन्याच्या अमूक दिवशी निशुल्क प्रवेश असणे, वगैरे.
६. तिथे कोणकोणते विभाग आहेत, व त्यापैकी आपल्याला कोण-कोणते बघायचे आहेत, त्यासाठी कोणकोणत्या प्रवेश-द्वारातून शिरावे, लिफ्ट व जिने कुठे आहेत, वगैरे नकाशा बघून ठरवावे.
७. तेथील वस्तु, कलाकृतीं, त्यांचा इतिहास व अन्य माहिती इ. बद्दल वाचन करून जावे.
८. संग्रहालयात शिरल्यावर सोबतचे सामान, कोट वगैरे ठेवण्याची सोय असते, त्याचा जरूर फायदा घ्यावा, कारण आतल्या आत चालून सुद्धा खूप थकवा येतो. वाचण्याचा चष्मा लागत असेल, तर त्याखेरीज साधारणत: तीन-चार फुटावरून वस्तूचे वा चित्राचे बारकावे दिसतील, असाही एक चष्माही बरोबर घ्यावा. अगदी लहान वस्तूंचे बारकावे बघण्यासाठी सूक्ष्म-दर्शक भिंगही घेउन जावे.

'लूव्र' म्यूझियमचा खालील नकाशा बघा, यात पाच बाजूंनी संग्रहालयात प्रवेश करता येतो, हे स्पष्ट होते.
http://www.louvre.fr/en/plan

तसेच खालील नकाशात तिथे कोणकोणते विभाग कुठेकुठे आहेत हे दर्शवलेले आहे:
louvre

इजिप्त, इराण, ग्रीस, रोम इ. ची प्राचीन कला, आफ्रिका व अन्य देशातील आदिवासी कला, युरोपियन, अमेरिकन, भारतीय, चीनी इ. चित्रकला, मूर्तीकला, वाद्ययंत्रे, शस्त्रास्त्रे, इ.पैकी काय-काय बघायचे हे ठरवून त्याप्रमाणे योग्य त्या द्वाराने प्रवेश करावा.
----------------------------------------------------
क्रमशः .... पुढील भागात आणखी काही विषयांवरील कलाकृती.

प्रतिक्रिया

उत्तमोत्तम चित्रपट दर वेळी नव्याने काही सांगतात, तसा झाला आहे हा लेख.
पहिली दोन चित्रं बघूनच थक्क व्हायला झालं. केवढे ते तपशील, काय तो जिवंतपणा.

भाग्यवान आहात तुम्ही, की ही कला तुम्हाला अशी साधली आहे.
आणि भाग्यवान आहोत आम्ही, की तुम्हाला त्यावर इथे लिहावेसे वाटते.

इरसाल's picture

18 Dec 2012 - 10:30 am | इरसाल

हे आणी असेच बरेच फोटो मी लुव्र मधे पाहीले आहेत.
तुम्ही दिलेले फोटो आणी माहिती छानच

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मनमोहक पोस्ट, धन्यवाद!

(म्युनिख शहरातील तात्कालिन सुंदर स्त्रियांची ही ३६ चित्रे....बाकीची तीस कुठे आहेत?)

पैसा's picture

18 Dec 2012 - 9:19 pm | पैसा

आणि तितकीच सुंदर ओळख. वस्तुसंग्रहालय बघणे हा खराच मस्त छंद आहे!

चित्रा's picture

19 Dec 2012 - 5:50 am | चित्रा

अप्रतिम चित्रे आणि तितकीच सुंदर ओळख. वस्तुसंग्रहालय बघणे हा खराच मस्त छंद आहे!

+१.

इष्टुर फाकडा's picture

18 Dec 2012 - 11:02 pm | इष्टुर फाकडा

हत्तीचं चित्र काढायला निघाले कि उंदीर दिसणार इतकंच आमचं या विषयातलं ज्ञान. सुंदर सुंदर चित्रेही संग्रहालयात मी सर्पोद्यानात माकड बघावं इतक्याच उत्सुकतेने बघतो. पण तुमच्या वर्णनामुळे चित्रातली सुंदरता, त्यातल्या गहिरेपणाचा छान प्रत्यय आला. शिवाय संग्रहालयात चित्रेही इतकी असतात कि प्रत्येक चित्राचा आधी अभ्यास करून जाणे अवघड व्हावे. म्हणूनच तुमच्या जाणकारीतून उतरलेले अजून वाचयला आवडेल.

एस's picture

18 Dec 2012 - 11:38 pm | एस

Helene Sedlmayr च्या अप्रतीम व्यक्तिचित्राची माहिती या धाग्यामुळे मिळाली.. धन्यवाद.

अतिशय सुंदर धागा आणि माहिती, खुप खुप धन्यवाद.

यातील सुंदर स्त्रिया खरोखरच फार देखण्या आहेत. ( एकही नकटी नाही ) .
नेटवर युरोपातील फुकटात पहाता येणारी संगग्रहालये अशी एक साईट पाहिल्याचे आठवते.अर्थात फ्रान्समधे त्यांचे प्रमाण कमी आहे. ब्रिटन व जर्मनीत मुक्तद्वार संग्रहालये जास्त असावीत बहुदा !
सल्ला टीपांमधील शेवटचे दोन तीन सल्ल्ले फारच उपयुक्त.
धन्यवाद !

इष्टुर फाकडा's picture

19 Dec 2012 - 3:16 pm | इष्टुर फाकडा

माझ्यातरी पाहण्यात/माहितीत नाहीत. पण जी आहेत ती पैसे सार्थकी लावणारी आहेत हे नक्की. विशेष करून ड्रेस्डेन मधील Gruenes Gewoelbe (हरित तळघर) तुफान आहे.

jaypal's picture

19 Dec 2012 - 10:49 am | jaypal

खजिना ऊघडलात. खुप खुप धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2012 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा

क्लासिकल... :-)

स्मिता.'s picture

19 Dec 2012 - 3:35 pm | स्मिता.

पहिली दोन चित्रं तर शब्दांच्या पलिकडे आहेत. आतापर्यंत ते राज्याभिषेकाचं चित्र पाहून वाटत होतं की त्यात सगळ्यात जास्त बारकावे आहेत असं वाटत होतं. पण ही दोन चित्र त्याहून अधिक तपशील असलेली वाटत आहेत.

तिसर्‍या चित्राचे वर्णन वाचून चित्र कशी 'बघावी' ते कळलं. तुम्ही नियमीत लिहीत रहा आणि आम्हाला चित्र-साक्षर बनवा.

सस्नेह's picture

19 Dec 2012 - 3:38 pm | सस्नेह

अन सौंदर्यवतींची चित्रे तर अप्रतिम.

बायडी's picture

19 Dec 2012 - 4:06 pm | बायडी

अप्रतिम चित्रे आणि वर्णन सुद्धा खूपच सुंदर...
धन्यवाद.

सामान्य वाचक's picture

20 Dec 2012 - 6:41 pm | सामान्य वाचक

चित्रे कशी पहावी, ही खरेच एक कला आहे.

तसेच शिल्पे पाहणे सुद्धा.

नव्याने पाहताना प्रत्येक वेळी नवीन बारकावे, नवीन अर्थ उलगडत जातात.

अनन्न्या's picture

20 Dec 2012 - 7:13 pm | अनन्न्या

लेख आणि चित्र दोन्हीही निव्व्ळ अप्रतिम!!

मराठे's picture

20 Dec 2012 - 8:48 pm | मराठे

डेट्रोईट्चं -डेट्रॉईट इंस्टीट्युट ऑफ आर्ट्स- हे संग्रहालय इथे राहणार्‍यांसाठी फुकट आहे. आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलोय पण अजूनही पूर्ण पाहून झालं नाहिये.पण आम्ही दुर्दैवीच! कारण इतकं चांगलं संग्रहालय असूनही चित्र कशी बघायची याची अक्कल आम्हाला नाही. त्यातून तिथला 'मॉडर्न आर्ट' चा विभाग बघून तर आणखीनच न्युनगंड येतो. एका मोठा कागद चिखलात टाकून त्यावरून गाडी फिरवल्यावर उमटलेले टायरचे ट्रॅक सारखं एक 'चित्र' तिथे आहे. त्यात 'कला' कुठेय ते मला अजून समजलं नाहिये!

मागच्या वेळेला 'फब्रुजे' चं प्रदर्शन होतं; त्यातल्या एक एक कलाकृती बघून डोळ्याचं पारणं फिटलं!

चित्रगुप्त's picture

21 Dec 2012 - 8:04 pm | चित्रगुप्त

@मराठे साहेब
... layer_embedded&v=o0sRCPKAufI#!">फब्रुजे' चं प्रदर्शन...
हे काय आहे, याचा दुवा द्याल का? वरील प्रमाणे गुगलून काही मिळाले नाही.