स्ट्रॉबेरि - बनाना स्मुदि...

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
17 Dec 2012 - 1:43 pm

Smoothie

उन्हाने अंगाची काहीली झाल्यावर ह्या थंडगार स्मुदिचा आस्वाद घ्या आणि मोठे/बच्चे कंपनीला खुश करा...

साहित्यः

१. स्ट्रॉबेरि - ८ ते १०
२. पीकलेली केळि - २
३. दहि - १/२ कप
४. साखर - २ ते ४ चमचे
५. बर्फ - ६ ते ८ तुकडे

कॄती:

१. स्मुदि करण्याआधि १/२ तास सर्विंग ग्लास (रिकामे) फ्रिजर मधे ठेवेणे
२. ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे
३. स्मुदि सर्विंग ग्लास मधे ओतुन पुदिन्याची पानं कींवा मधुन चीरलेल्या स्ट्रॉबेरि ने सजवावे

टिपा:
१. ग्लास फ्रॉस्ट केल्याने स्मुदि थंड राहण्याचा काळ वाढतो
२. केल्यानंतर लगेच सर्व करावी म्हणजे बर्फाचं पाणि होउन स्मुदि पानचट होणार नाही
३. साखरेचं प्रमाण स्ट्रॉबेरि / दह्याच्या आंबटपणानुसार ठरवावे
४. बर्फ घालणे एच्छीक आहे...पण क्रश्ड बर्फाचे तुकडे स्मुदिची चव अजुन वाढवतात
५. मी साधं दहि वापरलं आहे पण जर आवडत असेल आणि मीळालं तर फ्लेवर्ड दहि पण वापरु शकता
६. हेल्थ / डाएट कॉन्शस वाल्यांनी लो फॅट दहि व साखरे एवजी मध घालावे

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

17 Dec 2012 - 1:47 pm | कपिलमुनी

मस्त आहे ..उद्या करून पहातो

पैसा's picture

17 Dec 2012 - 6:22 pm | पैसा

पण तरी नाही खाणार!

खल्लास. महाबळेश्वरला फार छान मिळते. खुप पुर्वी खाल्ली होती.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2012 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा

@ ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे>>> पेयाकृतीला सोकूनानांचा वास येतो आहे. ;-)

जयवी's picture

18 Dec 2012 - 1:04 pm | जयवी

अहा रे....... काय सही फोटू आहेत !!
चवीला सुद्धा नक्कीच चांगलं लागत असणार :)
शेफ दीपक.......एकदम किचन मोड मधे आहात :)

दिपक.कुवेत's picture

18 Dec 2012 - 1:15 pm | दिपक.कुवेत

सगळयांचे मनापासुन धन्यवाद्...क्रश्ड बर्फ आणि स्ट्रॉबेरिच्या तुकडयांची चव जीभेवर रेंगाळत राहते...पहिलाच प्रयत्न होता आणि यशस्वी झाला :)

मस्त!! ट्राय करुन बघायला हरकत नाही.

अनन्न्या's picture

18 Dec 2012 - 6:01 pm | अनन्न्या

ग्लास लगेच संपवावा असे वाटतेय.