गाजराची मिक्स भाजी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
15 Dec 2012 - 11:20 am

साहित्यः- गाजरे अर्धा कि., कांदे ६-७ मध्यम, बटाटे २ (ऐच्छीक), काजूगर एक वाटी, आले-लसूण पेस्ट (१ इंच आले+१०-१२ लसूण पाकळ्या), खसखस पाव वाटी, पांढरे तीळ पाव वाटी, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट्,तेल पाच चमचे, आमचुर एक छोटा चमचा,मीठ, साखर, ह्ळद, मोहरी, जीरे, कोथिंबिर.
क्रुती:- खसखस, तीळ वेगवेगळे भाजुन पावडर करून घ्यावी. आले-लसूण पेस्ट करावी. गाजराचे छोटे लांबट तुकडे करावे. कांदे पातळ उभे चिरावे. काजुगर कोमट पाण्यात भिजवावे. बटाटे गाजराप्रमाणेच लांबट चिरावे. कोथिबिर धुऊन बारीक चिरावी.
कढईत तेल गरम करावे. मोहरी, जीरे घालावे. मोहरी तडतडली की कांदा घालावा. पाच मिनिटे परतावा. आले लसूण पेस्ट घालून दोन मिनीटे परतावे. लाल तिखट, हळद,गरम मसाला मिक्स करून परतावे. बटाटयाच्या फोडी घालाव्या. परतून झाकण ठेवावे. पाच मिनिटे वाफ काढावी. त्यानंतर गाजराचे तुकडे, भि़जलेले काजूगर घालावे. एक वाफ काढावी. गाजर, बटाटा शिजले की मीठ, आमचुर, एक चमचा साखर, खसखस आणि तीळ पावडर हे सर्व मिक्स करावे. भाजी पुन्हा थोडावेळ परतावी. कोथिंबिरीने सजवावी. गरमागरम पोळी बरोबर वाढावी.

प्रतिक्रिया

वाह, भाजी छानच झालेली दिसतेय. चवीला नक्कीच चांगली असणार.

- पिंगू

दिपक.कुवेत's picture

15 Dec 2012 - 5:28 pm | दिपक.कुवेत

पाक्रु छान आहे...चला आता इथे ओले काजुगर शोधणे आले. काजुगराला पर्याय काय? नाही घातले तर चवीत फरक पडेल काय?

अनन्न्या's picture

15 Dec 2012 - 6:48 pm | अनन्न्या

ओले नाही, मी सुकेच काजूगर भिजवून वापरले. आणि याने चव बदलत नाही, हे तर फक्त जिभेचे चोचले आणि काय आहे रत्नागिरीत राहून काजूगर नुसते पाहणे अशक्य आहे.

अनिल तापकीर's picture

15 Dec 2012 - 7:19 pm | अनिल तापकीर

छान दिसतेय घरि हे सांगुन बघुया

वेगळी भाजी आवडली. फोटोही छान आलाय.

पैसा's picture

15 Dec 2012 - 10:28 pm | पैसा

मस्त पाकृ आणि फोटो! पण तुम्ही लोक आमच्या वजन कमी करायच्या कार्यक्रमाला सुरुंग लावताय याचा निषेध!

ज्योति प्रकाश's picture

16 Dec 2012 - 12:24 pm | ज्योति प्रकाश

भाजी आवडली. नक्की करुन पाहीन.