इलेक्ट्रॉनिक दिवाळी अंक

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in काथ्याकूट
11 Nov 2007 - 11:02 am
गाभा: 

मराठी साहित्यातील दिवाळी अंकांच्या परंपरेला १०० वर्षे लवकरच पूर्ण होत असताना मायबोली या आद्य व अग्रगण्य संकेतस्थळांने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याची त्यांची पद्धत यंदाही सुरु ठेवली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रकाशित केलेला मनोगत संकतेस्थळाचा दिवाळी अंकही अतिशय देखणा आहे.

दोन्ही दिवाळी सादर करणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटते?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Nov 2007 - 11:13 am | विसोबा खेचर

दोन्ही दिवाळी सादर करणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन.

कर्णा, तुझ्या वेलणकरशेठला आमच्यातर्फेही अभिनंदन कळव बरं का!:)

अवांतर -

बाय द वे कर्णा, उद्या आमच्या मिसळपावने समजा होळीविशेषांक काढला तर त्याबद्दलचा बरावाईट अभिप्राय तू मनोगतावर लिहू शकणार आहेस का? मनोगतवर तो छापला जाईल असं तुला वाटतं का? :)

असो, आमच्या मिसळपावला कुठल्याही संकेतस्थळाबद्दल आणि त्यांच्या दिवाळी मासिकांबद्दल केलेले लेखन वर्ज्य नाही! :)

तुम्हाला याबाबत काय वाटते?

तुझे मुद्दे बरेचसे पटण्याजोगे आहेत तरीदेखील प्रत्यक्ष दिवाळीअंक हातात घेऊन वाचण्याची मजा काही औरच, असे माझे मत आहे.

तात्या.

आजानुकर्ण's picture

11 Nov 2007 - 11:18 am | आजानुकर्ण

मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. ;)

(ह. घ्या. )

आपला,
(होळीप्रेमी) आजानुकर्ण

मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही.

आपला,
(मिसळपावप्रेमी) आजानुकर्ण

प्रत्यक्ष दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्याची मजा और हे मान्य. पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल.

आपला,
(नवतंत्रज्ञानप्रेमी) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

11 Nov 2007 - 11:24 am | विसोबा खेचर

मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही.

हा हा हा, हे बाकी सहीच बोललास...:)))

मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही.

धन्यवाद शेठ! अहो आपल्यासारखी जिंदादील माणसं पंचायतीवर असल्यामुळे मिसळपाववरील अभिव्यक्तिस्वातंत्र्य असेच अबाधित राहील असे वाटते!

पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल.

हा मुद्दा मलाही मान्य आहे...

आपला,
(थोडाथोडा इलेक्ट्रॉनिक!) तात्या.

चित्तरंजन भट's picture

12 Nov 2007 - 6:52 pm | चित्तरंजन भट

पावलावर पाऊल ठेवण्याबाबत कुणी काही करू शकत नाही. 'रामूचा जन्म शामूच्या आधी झाला म्हणून त्याला दाढी मिशाही आधी आल्या' अशा प्रकारची ही उपलब्धी आहे. असो.

"इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटते? "

१. इलेक्ट्रॉनिक अंकात ध्वनिमुद्रणे असल्यास उत्तमच. पण वेबस्पेस , बँडविड्थ ह्या गोष्टींचा विचार केलेला बरा.

२. छापील अंकाची सजावट करताना बँडविड्थ आदी गोष्टींचा विचार करावा लागत नाही. तसेच मजकुराच्या मांडणी करतानाही मर्यादा नसतात. पार्श्वसंगीत, ऍनिमेशन ह्या गोष्टी काही जणांसाठी आकर्षक आणि वाचनीय असू शकतात. पण मला तरी ते 'डिस्ट्रॅक्शन' वाटते.
अंकातील अक्षरेच वाचनीय नसतील तर कितीही पार्श्वसंगीत, ऍनिमेशन करा, काही उपेगाचे नाही.

आजानुकर्ण's picture

12 Nov 2007 - 7:19 pm | आजानुकर्ण

१. वेबस्पेस व बँडविड्थ यांचा विचार केला तरी दिवाळी अंकांमध्ये केवळ लेखन या एकाच गुणाला वाव देण्याऐवजी गायन/नृत्य यांचाही समावेश करता येईल.

२. पार्श्वसंगीत व ऍनिमेशन जर योग्य रीतीने केले तर ते अधिक पूरक ठरेल असे मला वैयक्तिक वाटते. पण अंकातील अक्षरे अधिक वाचनीय असावीत या मुद्द्याशी सहमत.

प्रमोद देव's picture

12 Nov 2007 - 7:07 pm | प्रमोद देव

मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही.

तरीही शिमगा अंक काढण्याची कल्पना चांगली आहे.
सद्याचे आपले विशेषतः शहरी मध्यमवर्गाचे जीवनमान पाहिल्यास इथे रोजच दिवाळी साजरी केली जाते असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. इथे बारा महिने आणि तेरा काळ दिवाळिच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असते. तसेच खरेदीसाठी आसुसलेल्या लोकांचीही कमी नसते. इतके असूनही आपण "दिवाळीचा सण" अतिशय जोशात साजरा करतोच की नाही?
त्याच चालीवर मी म्हणेन की इथे रोजच "शिमगा" होत असला तरी शिमग्याचा विशेषांक काढायला काहीही हरकत नाही. तेव्हढाच सामुदायिक शिमगा साजरा करता येईल. "अमूक तमूकच्या बैलाला घो" किंवा "होळी रे होळी,पुरणाची पोळी आणि अमूक अमूकच्या *** बंदूकीची(की आणखी कसली?)गोळी" वगैरे बोंबा मारायला तितकीच मोकळीक मिळेल.

काय गाववाल्यानु मी म्हनतोय ते बराबर हाय का नाय?
आपला (नव्याने बारसे झालेला) नित्यानंदकाका

आजानुकर्ण's picture

12 Nov 2007 - 7:17 pm | आजानुकर्ण

शिमगा अंकाऐवजी "वासंतिक अंक" कसा वाटतो?

सर्किट's picture

12 Nov 2007 - 11:27 pm | सर्किट (not verified)

आमच्याकडे होळीच्या सुमारास चैत्रधून नावाची संगीतस्पर्धा महाराष्ट्र मंडळ आयोजित करते. ज्यांना बक्षीस मिळत नाही ते नंतर परीक्षकांच्या नावाने शिमगा करतात :-) तेव्हा वासंतिक अंक म्हटले, तरी शिमगा होणारच !

- सर्किट

चित्तरंजन भट's picture

13 Nov 2007 - 12:07 am | चित्तरंजन भट

उगाच आगाऊपणा करू नकोस. तू काय बोलला आहेस हे मला कळले आहे. मला तुझ्याबद्दल काय करायचे आहे हे मला कळले आहे. सो, कीप क्वायट.

सर्किट's picture

13 Nov 2007 - 12:28 am | सर्किट (not verified)

चित्तरबुवा,

सर्किटाने आगाऊपणा केला नाही, तर आणखी कोण करणार ?
आणि आम्हाला कीप क्वायट करायचा प्रयत्न आजवर भल्याभल्यांनी केलाय. तुम्ही पण एकदा करून बघा.

- सर्किट

सर्किट's picture

13 Nov 2007 - 3:12 am | सर्किट (not verified)

मला मनोगत आणि मायबोली हे दोन्ही दिवाळी अंक आवडले. ऍमॅच्युअर लोकांनीही मनःपूर्वक प्रयत्न केला, तर चांगले काही घडू शकते. त्यासाठी प्रोफेशनल असण्याची गरज नाही, हेच पदोपदी जाणवत होते.

साहित्य प्रकाशनाचे भविष्यातील एकमेव माध्यम म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे मी बघतो. मला ह्या माध्यमांकडून खूप आशा आहेत. मायबोली, मनोगत आणि तदनुषंगाने तयार झालेली इतर मराठी संकेतस्थळे अद्यापही बाल्यावस्थेत आहेत. (गुटेनबर्गचे बायबल हे आजच्या प्रिंट मीडियाचे आद्य रूप. मायबोलीला मी मराठी संकेतस्थळांबद्दल तोच दर्जा देतो.) पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच मला ह्या माध्यमाचे भविष्य उज्ज्वल आहे ह्याबद्दल कोणतीही शंका नाही.

- सर्किट

मुद्रित साहित्य प्रकाशकांना या ईलेक्त्रॉनिक माध्यमाची भिति वाटते काय?
कारण ईलेक्त्रॉनिक माध्यमात बरेच साहित्य निर्माण होत आहे. त्याची चर्चा यांना वर्ज का ?