१. सफरचंद आणि लाल भोपळा सुप
२. भोपळ्याच्या सालींची (उरलेल्या) चटणी
नमस्कार मंडळी,
थंडि / पावसाळा सुरु झाला की हे सुप करा आणि धुंद वातावरणाचा मस्त लुफ्त घ्या.
साहित्यः १. सुप साठि
१. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम
२. तमालपत्र - १ ते २ छोटी
३. किसलेला लाल भोपळा - १/२ वाटि
४. किसलेलं किंवा बारीक फोडी केलेलं सफरचंद - १ मध्यम
५. पाणी - गरजेप्रमाणे दाटपणासाठि
६. चवीनुसार मीठ / मीरपुड
७. तेल - १ पळि
८. कोथिंबिर / पुदीना - सजावटीसाठि
कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन त्यात तमालपत्र व कांदा घालावा
२. कांदा परतुन मउ झाला की कीसलेला लाल भोपळा घालावा
२. भोपळा चांगला परतला की किसलेलं / बारिक फोडी केलेलं सफरचंद घालावं
३. गरजेपुरतं पाणी घालुन वाफ आणावी
४. मीश्रण थंड झालं की मीक्सर मधे मुलायम वाटुन घ्यावं (तमालपत्र काढावे)
५. आता त्याच कढईत वाटलेलं मीश्रण घेउन, घनतेप्रमाणे पाणी घालुन एक उकळि आणावी
६. चवीनुसार मीठ / मीरपुड घालुन गॅस बंद करावा
७. तयार सुप बाउल मधे काढुन कोथिंबिर / पुदीना घालुन सजवावे आणि अजीबात वेळ न दवडता गट्ट्म करावे...
कॉम्बिनेशन थोडं वेगेळ आहे पण जरा हटके आणि चवीष्ट आहे...
टिपा:
१. सफरचंदाची सालं काढलीत तर उत्तम नाहीतर सुप पीताना कचकच लागण्याची शक्यता आहे
२. सफरचंद अगदी घालायच्या वेळेस कीसावे/कापावे म्हणजे काळे पडणार नाही
२. भोपळ्याच्या (उरलेल्या) सालींची चटणी
साहित्यः
१. किसलेल्या भोपळ्याच्या साली - सुप केल्यावर उरतील त्या किंवा १/२ वाटी
२. तीळ - २ चमचे
३. ओलं खोबरं - २ चमचे
४. चवीनुसार मीठ / साखर / हीरव्या मीरच्या
५. तेल - २ पळि
६. कोथिंबिर / पुदीना
७. मोहरी / जीरं - फोडणी साठि
कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन भोपळ्याच्या साली परताव्या
२. साली कुरकुरीत झाल्या कि ओलं खोबरं आणि तीळ टाकुन परतावं
३. सतत परतावे म्हणजे खोबरं खाली लागणार नाही
४. ५ मी. गॅस बंद करावा
५. मीश्रण थंड झालं की मीक्सर मधे चवीनुसार मीठ, साखर, हीरव्या मीरच्या, कोथिंबिर / पुदिना घालुन वाटावं
६. गरज लागल्यास वाटताना पाणी घालावे नाहीतर खोबर्याचा ओलसरपणा पुरतो
७. मोहरी / जीर्याची फोडणी तयार चटणीला द्यावी आणि झक्कास तोंडिलावणे तय्यार!
टिपा:
१. कोथिंबिर / पुदिना अगदी थोडा घालावा म्हणजे तीळाची चव जाणार नाही
चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!
प्रतिक्रिया
11 Dec 2012 - 3:01 pm | जयवी
अरे वा.......एकदम वेगळ्या रेसीपीज........नक्की करुन बघेन :)
फोटो तर एकदम मस्त :)
11 Dec 2012 - 3:33 pm | गणपा
मस्त दिसतंय सूप.
11 Dec 2012 - 3:42 pm | इरसाल
सजावट लै भारी करतात.
11 Dec 2012 - 3:49 pm | पियुशा
अरे वेगळच आहे हे कॉम्बो :)
ट्राय करुन बघेन
11 Dec 2012 - 3:59 pm | स्मिता.
वा, मस्तच दिसतंय सुप! लाल भोपळा मिळाला की नक्की करून बघणार.
11 Dec 2012 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
हे सूप वाजवलं पायजे एकदा... :-)
11 Dec 2012 - 6:26 pm | दिपक.कुवेत
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद्...सुप आणि चटणी दोन्ही करुन बघा.
11 Dec 2012 - 6:27 pm | अनन्न्या
चटणी केली जाते, अशीच दुधी भोपळ्याची पण छान होते. सूप मात्र ह्टके आहे.
11 Dec 2012 - 6:39 pm | पैसा
भोपळा आणि सफरचंद हे कॉम्बिनेशन एकदम वेगळंच आहे. निदान दिसतंय छान!
11 Dec 2012 - 7:37 pm | गौरीबाई गोवेकर
छानच दिसतय सूप. भोपळ्याच्या सालींची चटणी मी करते. पण सूप नविनच आहे. मध्यांनीच्या सारंगासारख छान रंगलय. सूपाच्या पृष्ठभागावर तरंगत रेंगाळणारी पुदिन्याची पाने म्हणजे सारंगातला ठसठशीत लावलेला रिषभच वाटतो. आणि बाऊल, पार्श्वभूमी म्हणजे संवादी पंचमच. एकंदर छान रंगलाय रागरंग. :)
11 Dec 2012 - 7:50 pm | दिपक.कुवेत
तुमच्या प्रतीसादामुळे सूप एकदम सूरमयी होउन गेलं...
11 Dec 2012 - 8:09 pm | रेवती
अगदी छान पाकृ. फोटू तर झकासच!