साहित्यः
चिकन विंग्स = १०-१२ (ह्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत)
आले = २ चमचे बारीक चिरलेले
लसुण = २ चमचे बारीक चिरलेले
हिरवी मिरची = १ बारीक चिरलेली
काळि मिरी पावडर = २ चमचे
अंडी = २
सोया सॉस = १ चमचा
व्हिनेगर = १ चमचा
चिली सॉस = १ चमचा
कॉर्नफ्लॉवर = ३-४ चमचे
तांदुळाचे पीठ = २ चमचे
खायचा लाल रंग = १/४ चमचा
मिठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
स्टफिंगसाठी :
Mozerella cheese = १/२ कप
पुदिना = ४-५ पाने बारेक चिरुन
काळि मिरी पावडर = १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. चिकन विंग्स स्वच्छ धुवुन घ्यावेत. त्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत.
२. एका बाऊल मधे हे लॉलिपॉप्स घ्यावेत. त्यात २ अंडी, बारीक चिरलेले आले, लसुण व हिरवी मिरची टाकावी. त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकावे. हे सर्व निट मिक्स करावे.
३. त्यात कॉर्नफ्लॉवर, तांदुळाचे पीठ व खायचा लाल रंग टाकुन सगळे मिक्स करुन २-३ तास marination साठी ठेवावे. कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण consistency प्रमाणे कमी जास्त करु शकतो.
४. स्टफिंग साठी एका बाऊल मधे Mozerella cheese, पुदिना, काळि मिरी पावडर व चवीप्रमाणे मिठ टाकुन हाताने एकदम मऊ होई पर्यंत मळुन घ्यावे.
५. Marinate केलेला एक लॉलिपॉप घ्यावा. त्यात वरील स्ट्फिंग भरावे व बाजुला ठेवावे.
६. तळण्यासाठी तेल गरम करावे. ह्यात हे स्ट्फ केलेले लॉलोपॉप्स टाकावेत. साधारण पणे ३-४ मिनिटामधे हे शिजतात. चिकन शिजल्यावर ते बाहेर काढावे व गरम गरम serve करावे.
टिपः
१. चिकन विंग्स चे लॉलिपॉप करण्या साठी आधी त्याचे ३ भाग करुन घ्यावेत.त्यातील २ भागाचे लॉलिपॉप होतात. शेवटच्या भागाचा सुप किंवा स्टॉक करण्यासाठी वापर करु शकतो.
२. लॉलिपॉप घरी करता येत नसल्यास चिकन शॉप मधुन करुन घ्यावेत.
प्रतिक्रिया
25 Jul 2012 - 4:50 am | कौशी
श्रावण संपला कि करून बघेन..
25 Jul 2012 - 4:50 am | कौशी
श्रावण संपला कि करून बघेन..
25 Jul 2012 - 9:21 am | इरसाल
ह्या तैंच्या हाताला एवढी मोठी मेहंदी लागो, कढइला लहानसे होल पडो अनि शेवटी त्या ट्रेलाही एक लहानसा तडा जावो.
कमीत कमी हे अत्याचार तर थांबतील.
25 Jul 2012 - 11:00 am | Mrunalini
lol..... धन्यवाद :)
25 Jul 2012 - 9:49 am | पियुशा
मस्त !
पण चायनिज वाल्यांकडे जे चिकन लॉलिपॉप असतात ते इतके डार्क लालेलाल का असतात की त्यात कलर घातलेला असतो ?
25 Jul 2012 - 11:01 am | Mrunalini
धन्स :) .... हो त्यात रंग घातलेला असतो.
25 Jul 2012 - 10:36 am | आचारी
त्यात कलर घातलेला असतो
25 Jul 2012 - 11:18 am | जाई.
मस्तच
25 Jul 2012 - 3:24 pm | नाना चेंगट
श्रावण चालू आहे.
25 Jul 2012 - 3:34 pm | sneharani
आम्हाला पण कळलयं 'श्रावण चालू आहे' ते.
25 Jul 2012 - 3:36 pm | नाना चेंगट
सगळ्यांनाच माहित आहे "श्रावण चालू आहे"
25 Jul 2012 - 3:40 pm | sneharani
तसही, सगळी दुनियादेखील चालू आहे, काय म्हणतोस?
25 Jul 2012 - 3:43 pm | नाना चेंगट
मी सोडून
25 Jul 2012 - 3:48 pm | sneharani
लई निरागसता डोकावली प्रतिसादातून ;)
लई अवांतर करतोस ब्वा तू ;)
गप्प बसा आता.
25 Jul 2012 - 3:49 pm | नाना चेंगट
संपादक झाल्याबद्दल अभिनंदन ! :)
धागा टाकू का अभिनंदनाचा?
25 Jul 2012 - 3:56 pm | sneharani
हट ए, उगाच संपादक पद गळ्यात नको टाकू. मी काय संपादक नाहीये करूही नको, तेव्हा अभिनंदनाचे कष्ट वाचले तुमचे :)
अवांतर : घालवतोस की काय मला इथून ;)
25 Jul 2012 - 6:24 pm | नाना चेंगट
>>>अवांतर : घालवतोस की काय मला इथून Wink
ऑ ! सदस्य ==> संपादक ==> गच्छंती असा प्रवास असतो की काय ?
26 Jul 2012 - 12:14 pm | sneharani
ते तुलाच माहित!!
25 Jul 2012 - 3:57 pm | चिंतामणी
श्रावण चालू असल्याने गरीब बिचा-या कोंबड्या जरा मुक्त श्वास घेत होत्या. हे असले पाहून कोणाच्या मनावर परीणाम झाल्यास जबाबदार कोण? आणि त्या कोंबड्यांचे काय? त्यांचा जीव श्रावणातच जाणार.
असो.
शेवटचा फोटो विषेश कातील आहे.
25 Jul 2012 - 6:02 pm | Mrunalini
धन्यवाद :)
इथल्या कोंबड्यांना श्रावण नसतो. ;)
29 Jul 2012 - 11:24 am | चिंतामणी
तुझा मुक्काम परदेशात असतो तो.
पण ह्या धाग्याचा आणि विषेशत: फटुंचा परीणाम आमच्या देशात होणार ना. म्हणून म्हणले.
25 Jul 2012 - 5:33 pm | सानिकास्वप्निल
लॉलिपॉप कसले दिसतायेत ...पाहूनचं खावेसे वाटत आहेत गं :)
जबरदस्त :)
25 Jul 2012 - 6:03 pm | Mrunalini
:) मंडळ आपले आभारी आहे. ;)
25 Jul 2012 - 6:13 pm | बॅटमॅन
ऐच्या गावात!!!मस्त लॉलीपॉप मृणालिनीतै!
26 Jul 2012 - 5:27 am | वीणा३
मस्त. बघूनच खावेसे वाटतायत :)
26 Jul 2012 - 7:30 am | स्पंदना
हंम्म्म!
कर बाई कर. अन खा तुच. उद्या शुक्रवार जिवती पुजन, सोमवार. मंगळवार्....नाही . पण एक कर धागा पुन्हा एकदा टाक अमावस्येनंतर. गणपती नंतर.
27 Jul 2012 - 9:34 am | प्रभाकर पेठकर
एक धागा सुखाचा, शंभर धागे........
27 Jul 2012 - 10:54 am | शिल्पा ब
हं ! दिसतंय छान पण आजकाल असं तळलेलं, तिखट, मसालेदार काही आवडत नाही. कच्च्या भाज्यांच सँडविच वगैरेच बरं वाटतं. असो.
27 Jul 2012 - 11:26 am | प्यारे१
अभिनंदन हो...! :)
जुलै म्हणून सातवा की श्रावण म्हणून पाचवा ? ;)
हलकं घ्यालच. (जड असं पण अलाऊड नसेल नै ;) )
बाकी आम्ही लॉली पॉप खात नाही तरी कढईला भोक पडेल इ.इ.... आहेच.
27 Jul 2012 - 2:02 pm | अन्तु बर्वा
ऐन श्रावणात असले फोटु टाकताय... कुठे फेडाल हे पाप! :)
22 Aug 2012 - 4:24 pm | स्पंदना
२० तारखेला मुलाचा वाढदिवस होता म्हणुन करुन पाहिले . फार चविष्ट झाले. नशिबाने एका दुकानात लॉलीपॉप करुन मिळाले. मस्त ! मुलाने तर फक्त तेव्हढेच हादडले बाकीचे पदार्थ तस्सेच राहुन गेले.
22 Aug 2012 - 4:42 pm | इरसाल
२० लाच माझ्या मुली चा आणी भावाचा वाढ दिवस होता.
22 Aug 2012 - 5:03 pm | स्पंदना
अहो आमच्या एका अतिशय प्रिय मित्राचा वाढदिवस पण २०लाच आहे. त्यामुळे माझा मुलगा अन तो एकमेकाला फोन करुन "हॅप्पीबर्थडे टु अस " अस गातात.
चला आता तुमच्या मुलाची अन भावाची सुद्धा आठवण येइल मला २०ला.
9 Dec 2012 - 8:44 am | भोसले.अतुल
kute aahe receipe???
9 Dec 2012 - 9:03 am | त्रिवेणी
मला रेसीपी दिसत नाही आणि प्रतिसादाचे फक्त शीर्षक दिसते आहे.
9 Dec 2012 - 11:00 am | स्पंदना
अपडेट केली आहे रेसिपी.
करुन झाल्यावर खायच्या आधी दक्षिणेला तोंड करुन नैवेद्य दाखवा. (मी ऑस्ट्रेलियात असते ना म्हणुन)