वाटणासाठी-(प्रमाण 2 व्यक्ति)
3 कांदे
पाव वाटी सुके खोबरे
1 गड्डा लसूण
आल एक पेर
मसाला-
लाल तिखट आवडीप्रमाणे
हळद – पाव चमचा
कांदा लसूण मसाला- 2 चमचे
तंदुरी किवा मटन मसाला- 2 चमचे
कृती-
कांदे बारीक कापून तेलावर फ्राय करावेत. सुक खोबर मिक्सरला लावून नंतर तेलात भाजून घ्यावं(यामुळे नंतर मसाला वाटताना लवकर वाटला जातो व छान पेस्ट होते. शेवटी लसूण व आल भाजून थंड झाल्यावर गंधासारखे वाटावे.
पाटोड्यासाठी साहित्य-
बेसन- दीड वाटी
गव्हाचे पीठ- 3 चमचे
जिरं-पाव पाव चमचा
तेल- 1 चमचा
हे सर्व घट्ट भिजवून शंकरपाळी कापतो तसे कापून ठेवावे.
एका भांड्यात तेल (जरा जास्तच) तापवून हळद टाकावी लगेच वाटलेला मसाला घालावा. मंद गॅस वर टेल सुटे पर्यन्त परतावा. (परतणा थोडे गरम पाणी टाकावे मसाला जळत नाही.) आता लाल तिखट व मसाला घालावा. चांगले परतवून गरम पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की आपण केलेल्या पाटोड्या घालाव्या. मीठ घालावे. 10-15 शिजू द्यावे. गॅस बंद केल्यावर कोथबीर घालावी. खानदेशी पद्धतीची पाटोड्यांची भाजी तयार.
प्रतिक्रिया
8 Dec 2012 - 5:06 pm | इरसाल
पाटोयांस्न बट्ट.
हाई ते गैर्हीच मजा हुयी गई ना .
8 Dec 2012 - 5:13 pm | त्रिवेणी
हव मले लै आवडस. सातपुडण्या पाटोड्यातर लयेच. पण मले जमतत नाहीत अन मंग मी पाटोड्य्स्न बट्ट करस. कालदिन खोबर न खसखस न बट्ट कर्न शे. या जेवाले
8 Dec 2012 - 9:34 pm | पैसा
मस्त प्रकार दिसतोय! बरोबर काय बट्ट्या करतात का?
8 Dec 2012 - 10:09 pm | निवेदिता-ताई
छान दिसतोय हा प्रकार.....आवडला....पण चव कशी असेल,
थोडा थोडा चकोल्यासारखा हा प्रकार दिसतोय?
9 Dec 2012 - 8:42 am | त्रिवेणी
@पैसा ताई,
बट्ट्या नाही, अहिराणी भाषेत रस्साला बट्ट म्हणतात. पोळी किवा भाकरी बरोबर खातात.
@जागूताई,
थोडा मटन किवा चिकेन स्टाइल चव लागेल, खांदेशातील शाकाहारी लोकांचे मटन, चिकेन. करण्याची पद्धत चकोलयांसारखीच आहे फक्त चाकोल्या वरणात करतात या भाजीत.
प्रतिसदाबद्द्ला सर्वांचे खूप आभार.
9 Dec 2012 - 5:25 pm | Mrunalini
खुपच मस्त.... माझी आई पण खानदेशातली आहे.... माझी मामी ह्या पाटवड्या एकदम मस्त करयची. त्याची आठवण झाली. :)
11 Dec 2012 - 4:29 pm | ५० फक्त
ती पोळी अजुन थोडी फुगुन मॉनिटरच्या बाहेर येईल असं वाटतंय...