साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्,मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती:पाऊण ली. दूध+पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा,बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे.फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटानी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.
मी हा केक ओव्हन नसल्यामुळे फ्राय पॅनमध्ये करते. त्यामुळे ओव्हनमध्ये किती वेळ लागेल ते मला माहीत नाही. मिपाकरांनी मार्गदर्शन करावे.
काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यानी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते.
केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर गुगलून त्याची क्रुती मिळाली.
प्रतिक्रिया
5 Dec 2012 - 7:01 pm | गणपा
एकदम खासच.
5 Dec 2012 - 7:11 pm | पैसा
सध्या कॅलरीजना घाबरत असल्यामुळे फक्त बघून छान म्हणण्यात येत आहे.
5 Dec 2012 - 10:19 pm | ५० फक्त
कॅलरीना घाबरणं सोडलं की हा केक करा आणि मला खायला बोलवा, जोपर्यंत घाबरताय तोपर्यंत मी आमंत्रण देत जाइन तुम्हाला.
6 Dec 2012 - 5:47 pm | पैसा
कधी येऊ?
5 Dec 2012 - 7:17 pm | जयवी
सही दिसतोय :)
5 Dec 2012 - 7:38 pm | स्मिता.
अंडं आणि ओव्हन न वापरता केकची पाकृ मस्तच आहे. माझ्या आईसारख्या लोकांकरता फारच उपयोगी!
5 Dec 2012 - 7:51 pm | रेवती
आवडला. फ्रायपॅनमुळे कृती साधी सोपी वाटली.
5 Dec 2012 - 8:02 pm | शिद
झकास्....एकदम tempting दिसतोय केक.
5 Dec 2012 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा
आम्ची गवताळांची सोय केल्या बद्दल....
धण्यवाद्स :-)
5 Dec 2012 - 8:35 pm | सानिकास्वप्निल
केक खूपचं छान आहे आणी कृती तर एकदम सोपी.
करुन बघायला नक्की आवडेल. मिल्कमेड तयार करण्याऐवजी डायरेक्ट कंडेन्सड मिल्क वापरले तर चालेल का??
केकवर नाव ही छान आहे ;)
5 Dec 2012 - 8:51 pm | अनन्न्या
हो, २५० ग्रॅम कंडेन्सड मिल्क वापरा.
6 Dec 2012 - 5:22 am | स्पंदना
खुपच सोप्प करुन सांगितलस अनन्न्या.
धन्यवाद.
6 Dec 2012 - 9:42 am | इरसाल
कितनी सानिका हय रे मिपापर हां !
6 Dec 2012 - 10:21 am | पिंगू
मस्तच आहे केक. कोणी हा केक बनवणार असेल तर आमंत्रण द्यायला विसरु नका..
- पिंगू
6 Dec 2012 - 11:10 am | ऋषिकेश
अरे वा.. ओव्हन न वापरता कृती आहे हे मस्त.. करून बघता येईल
6 Dec 2012 - 11:14 am | पियुशा
एक मिनिट एक मिनिट अनन्न्या
नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटानी
मी याधी कुकरमध्ये केक बनवला आहे पण तो तळाला एक वाटी जाड मिठ पसरवुन मग एका भांड्यात ते मिश्रण ओतुन २५ मिनिट मंद आचेवर शिट्टी न लावता बेक केला होता मस्त झाला होता तो
पण ह्यात डायरेक्ट फ्राय पॅनमध्ये मिश्रण ओतायचे का ? केक जळ्नार नाही का ? प्लिज कन्फ्युजन दुर कर कारण ही फारच सोप्पी पद्धत दिसतेय तुझी ,तेव्ह्डेच माझे कुकरमध्ये केक बनवण्याचे कष्ट वाचतील :)
6 Dec 2012 - 6:11 pm | अनन्न्या
खोलगट नॉनस्टीक फ्रायपॅन येतो ना तो मी डायरेक्ट्च वापरते केक अजिबात जळत नाही.गॅस मात्र मंदच ठेवावा. रव्याचा केक पण मी असाच करते. आधी मी पण वाळू तव्यावर पसरून त्यावर केक भाजत असे. हा फोटो आहे तो केक फ्रायपॅन मध्येच केलाय. नक्की करून पहा.
6 Dec 2012 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
केकावली आवडली.
6 Dec 2012 - 5:48 pm | स्वातीश्रीबापट
केक मस्त आहे
11 Dec 2012 - 7:41 pm | गौरीबाई गोवेकर
हे असल सुंदर सुंदर खायला मनाई आहे ग.. काय करू. कित्ती छान सजवलायस तो केक खाण्याचा मोहच होतो. सध्या.....भूपातल्या मध्यमासारखा वर्ज्य ग बाई....