दृष्टीआड सृष्टी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
4 Dec 2012 - 8:07 pm
गाभा: 

दृष्टीआड सृष्टी... हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम.
नेट वर टंगळ चंगळ करताना एक माहिती हाती लागली..
हॉटेल ..टपरी.. ढाब्यावर आपण तंदुरी चिकन ..चिकन टिक्का .तंदुरी रोटी खाल्ली असेलच ..
तंदूर मध्ये वापरला जाणारा कोळसा स्मशानात प्रेत जाळल्यावर जो कोळसा उरतो तो कोळसा हॉटेल ..टपरी.. ढाब्या वाल्याना विकला जातो..
प्रेतावरच्या उरलेले कोळश्यातून ह्या तंदूर भट्या पेटत असतात....
व पब्लिक तंदुरी रोट्या..चिकन..टिक्के चवीने हाणत असतात
मध्ये शवागर मधला बर्फ टपरी ढाबेवाले कोल्ड ड्रिंक व तत्सम पदार्था साठी वापरतात असे वाचनात आले होते...
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे असा एक वाक प्रचार आहे ..आता नवीन वाक प्रचाराची भर मराठी साहित्यात पडणार का????
पुण्यामधे पूना बोर्डिंग म्हणून एक खानावळ तिथल्या मसालेभातासाठी प्रसिद्ध होती...
अनेक वर्षाने जेव्ह तिथला आचारी रिटायर झाला त्यानंतर मसालेभाताची चव बदलली... कुणाला आवडेना...
त्या आच्यार्‍याकडे चौकशी केल्यावर त्याने घाबरत सांगितले की तांदूळ शिजताना तो त्यात सुक्या बोम्बलाचा तुकडा फिरवायचा...त्याची टेस्ट यायची..
अनेक शाकाहारी खवैय्यांची विकेट उडाली होती त्यावेळेस..
काही ठिकाणी बेकरीत पावाचे पीठ पायाने मळले जायचे... कदाचित त्या मुळे च ब्रेडला मराठी /हिंदीत पाव असे म्हणत असावते.
थोडक्यात दृष्टीआड सृष्टी... हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम.

प्रतिक्रिया

सुनील's picture

4 Dec 2012 - 8:12 pm | सुनील

हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम.

मिपावर फिरताना अकुंच्या धाग्यावर न डोकावणे उत्तम ;)

आनन्दा's picture

5 Dec 2012 - 7:38 pm | आनन्दा

हेच म्हणतो

अहो काहीही काय? हॉटेलं किती? त्यांना लागणारा कोळसा किती? स्मशानात उरणारा कोळसा किती? शवागारात मिळू शकणारा बर्फ किती? एकूण टपर्यांवर वगैरे लागणारा बर्फ किती? याचा विचार केलात तरी ही माहिती किती चुकिची आहे हे लक्षात येईल..

मी तर प्राण्यांची प्रेतंच खातो मस्तपैकी मसाले लावून खरपूस भाजून.
प्रेतावरच्या कोळशाचं काय घेऊन बसलात?

तिमा's picture

4 Dec 2012 - 8:42 pm | तिमा

समज, प्रेतावरचा कोळसा असला तरी त्याच्याबरोबर जंतू येऊ शकत नाहीत त्या तापमानाला. आणि वास वा चवही येऊ शकत नाही. मग काय प्रॉब्लेम आहे ? फार लोकसंख्या झाली तर उद्या नरभक्षक खानावळीही निघतील.

वाचकाला जास्तीत जास्त शिसारी आणणे हा जर या लिखाणाचा उद्देश असेल तर तो साध्य झाला आहे. असे धागे काढण्यामागे नक्की काय प्रेरणा असते हे समजत नाही.

रेवती's picture

4 Dec 2012 - 9:03 pm | रेवती

कसला काकू आहे हो अकू! मळमळायला लागलय.

आपले धागे नेहमीच माझ्या ज्ञानात भर घालतात. :)
पुढील पिंकेची धाग्याची वाट पहात आहे.

रेवती's picture

4 Dec 2012 - 9:09 pm | रेवती

हा हा हा. काय रे बाबा! एकापेक्षा एक.

किसन शिंदे's picture

5 Dec 2012 - 8:20 am | किसन शिंदे

:D . :D

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2012 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 9:28 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद अकुपीडिया.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

@अकुपीडिया. >>> =))

जेनी...'s picture

5 Dec 2012 - 8:57 am | जेनी...

ए पर्‍या भारी नावे हं ! अकुपिडिया :D

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2012 - 1:24 pm | नगरीनिरंजन

अकुपीडिया! =))

आणि आपण सगळे अकुपीडित! ;-)

बॅटमॅन's picture

5 Dec 2012 - 1:00 pm | बॅटमॅन

अन बाकी सगळे अकुपीडित.

आशु जोग's picture

4 Dec 2012 - 11:04 pm | आशु जोग

कोळसाच कशाला

डायरेक्ट चितेवर जरी रोटी शेकली
तरी परवा नाही आम्हाला

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Dec 2012 - 8:51 am | श्री गावसेना प्रमुख

तंदूर मध्ये वापरला जाणारा कोळसा स्मशानात प्रेत जाळल्यावर जो कोळसा उरतो तो कोळसा हॉटेल ..टपरी.. ढाब्या वाल्याना विकला जातो..

आमच्या कडचे ढाब्यावाले भट्टी साठी ला़कडे वापरतात,एक म्हनजे पाहीजे तितका कोळसा उपलब्ध होत नाही,लाकडे स्वस्त मिळतात त्यामानाने
1हॉट ड्रींक आरोग्यास चांगली असते कारण त्यात प्रेतावरचा बर्फ नसतो

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Dec 2012 - 1:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला, या धाग्याने भूक चाळवली. आता इथे धाबा शोधणे आले आणि मग तिथे जाऊन चवीने तंदुरी रोट्या, चिकन टिक्के हाणणे आले. मुंबईकरांनो, एक impromptu कट्टा करूया का हो आज रात्री ??

अवांतर :- चला अकु, पुढचा धागा काढा. वाट बघतो आहे.

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2012 - 6:54 pm | सुधांशुनूलकर

हम है तैय्यार, चलो!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2012 - 12:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे

very good !!! कालच काही जणांशी बोललो आहे. लवकरच ठरवू.

आपण अकुंच्या नावाने चिकन तंदुरी खाणार ब्वा !!! In fact, सगळे पदार्थ तंदूर भट्टीतलेच खाणार ;-)

नन्दादीप's picture

5 Dec 2012 - 7:01 pm | नन्दादीप

अकुपिडीत!!!!!:)

चाणक्य's picture

5 Dec 2012 - 7:03 pm | चाणक्य

तुमची माहिती जरी खरी असली तरी आमच्या आवडीच्या पुना बोर्डिंग चं नाव दुषित केल्याबद्दल तीव्र निषेध (आणि तिथला मसालेभात आणि रविवारी मिळणारी अळुची भाजी अजुनही फक्कड असते.)

दादा कोंडके's picture

5 Dec 2012 - 7:26 pm | दादा कोंडके

- खूप वर्षापुर्वी मुंबईत मटण थाळीत एका माणसाच्या वाटीत (लहान मुलाची) करंगळी आली होती.

- आजही बहुतेक जनता-रेट मांसाहारी हॉटेलमध्ये खीम्या मध्ये चिकन किंवा मटणच असेल याची शाश्वती नसते. (कौवा बिर्याणीचा सीन आठवत असेलच)

- बंगळुरुत (इलेक्ट्रॉनिक्स सिटीजवळच्या एका कळकट हॉटेलमध्ये) माझ्या मित्राच्या चिकन फ्रायच्या वाटीत लिटरली कोंबडी(ड्या)ची चोच आली होती.

- हैद्रबाद हाउसमध्ये मटण बिर्याणीत आलेले पीस छान शिजलेले नसल्यानं आमच्या गॄपमधल्या एकानं वेटरला बोलून झापलं. आणि त्याला दुसरे पीसेस अणायला सांगितलं. त्याने अगदी नाराजीन (अंमळ रागनेच) एका वाडग्यात भाताची शिते लागलेली दुसरे पिसेस टेबलावर आणून ठेवले.
मी अर्थातच त्याला हात लावला नाही. ;)

चर्चा विभाग अकुंच्या नवाने करुन टाकावा काय?

चौकटराजा's picture

6 Dec 2012 - 6:59 am | चौकटराजा

याच शीर्षकाखाली खरे तर एक महत्वाचा धागा आपल्या जीवनासंबंधी काढता आला असता . उदा दाखल माझ्या आयुष्यातील एक प्रसंग देतो.
दहाएक वर्षापूर्वी माझ्या भावाचा मृत्यू जवळ आला आहे असे डॉ नी फोनवर सांगितले.मनस्वी शोक ,अनावर अश्रू वगैरे तर झालेच पण एक काळजी मला होती. त्याचे अंतिम सोपस्कार मला करावयाचे होते व माझ्या गळ्यात जानवे नव्हते.
मी जिथे कामाला होतो तिथे ते विकत मिळणे शक्य नव्हते. मी डोके लढविले. जवळच एक टपरीवजा दुकान होते. त्याकडून पुडीचा दोरा घेतला. ओफिसात जाऊन रेस्टरूम मधे जानवे तयार केले. शर्ट काढ्ला जानवे घातले. तिथेच दहा वेळा गायत्री मंत्र म्हटला. व नंतर भावाचा अंतिम संस्कार केला. कोणाच्याजी लक्शात आले नाही दृष्टीआड सृष्टी ने अशी वेळ भागवून नेली.

आनन्दा's picture

6 Dec 2012 - 12:58 pm | आनन्दा

बिचार्‍या अकुकाकांचा तुम्ही पार खिमा करून टाकलात... काय करतील ते बिचारे आता?
जाता जाता,
अकुकाका, आता तुम्हाला "मिसळपावात पडलेले खिम्याचे तुकडे" यावर अजून एक काकु काढायला हरकत नाही.

गवि's picture

6 Dec 2012 - 1:18 pm | गवि

लहानपणी शाळेला जाताना रस्त्यात चक्क वीस रुपयांची नोट सापडली. तेव्हा सोबतचा मित्र म्हणाला, उचलू नको, प्रेतावर टाकलेली असेल. (??)

मग काही वर्षांपूर्वी सरबते, ज्यूस वगैरेंचा बर्फ शवागार ऊर्फ मॉर्ग मधला असतो असं ऐकत होतो.

सिग्नलला विकायला आलेली फुलं प्रेतांवरची काढलेली असतात असंही ऐकलं.

त्यानंतर तयार विकतच्या गाद्यांमधे वापरला जाणारा कापूस हॉस्पिटलच्या गाद्यांमधला रक्तरंजित, जंतुयुक्त कापूस.. रुग्ण दीर्घकाळ गादीवर काढून मृत झाल्यावर गाद्या डिसकार्ड करतात (??) त्यातला री-युज्ड कापूस असतो, असं ऐकलं..

आता तंदुरीतले कोळसेही प्रेतावरचे असतात म्हणताहेत.

प्रेतविरहीत सुरक्षित पदार्थांची यादी कोणी देईल का?

दुकानात घेतलेली फळं प्रेतांशी संबंधित असू शकतील का?

डोसा किंवा बटाटावडा तळण्यासाठी तेलाऐवजी स्वस्त पर्याय म्हणून कसलीशी चरबी असेल का?

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2012 - 1:26 pm | नगरीनिरंजन

आपण श्वास घेतो त्या हवेतही प्रेतं जाळून केलेला धूर मिसळतात म्हणे!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 2:42 pm | परिकथेतील राजकुमार

आणि लिंबू सरबतवाले टाकून दिलेल्या लिंबू मिर्चीतली लिंबे वापरतात हे राहिले की.

मिरच्यांचं लोणचं घालतात का रे भाऊ?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

बहूदा वडापाववाले वापरत असावेत.

बाळ सप्रे's picture

6 Dec 2012 - 2:43 pm | बाळ सप्रे

कॉन्स्पिरसी थिअरीजचा धागा आठवला !!

राही's picture

6 Dec 2012 - 2:58 pm | राही

कुणालाही ठाण्याची पाणीपुरी कशी काय आठवली नाही बुवा अजूनपर्यंत!/?

नितिन थत्ते's picture

6 Dec 2012 - 3:01 pm | नितिन थत्ते

ती दॄष्टीआड नव्हती ना.....

नितिन थत्ते's picture

6 Dec 2012 - 3:01 pm | नितिन थत्ते

खार्‍या बिस्किटांत खाटिकखान्यातली चरबी वापरतात अशी जुनी थिअरी होती.
(स्वगत: म्हणूनच १००% प्युअर व्हेज असं लिहिलेली खारी बिस्किटं खुसखुशीत नसतात का?)