साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती)
तीन मोठे बारीक चिरलेले कांदे.
एक मोठी वाटी लसूण.
अर्धी वाटी चिरलेले आलं.
मीठ.
दोन चमचे हळद.
एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार)
एक चमचा धणे.
५-६ लवंग.
८-१० काळी मिरी.
एक मध्यम उभा चिरलेला कांदा.
तेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले.
कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट
करत ठेवावे.भांड्यात तेल घालून तापले की त्यात बारीक चिरलेला कांदाघालून मऊ होईपर्यंत परतावा. नंतर
त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे.त्यातच मालवणी मसाला घालून चांगले परतावे.पाणी घालून चांगले शिजू
द्यावे.कढईत थोडे तेल घलून त्यात प्रथम धणे,लवंग्व मिरी परतून घ्यावे त्यातच उभा चिरलेला कांदा लालसर
होईपर्यंत परतावा.नंतर त्यात खवलेले खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.
चिकन शिजले की त्यात हा वाटलेला खोबर्याचा मसाला घालावा.पाहिजे तेव्हडे पातळ करून चांगली उकळी
येऊ द्यावी.त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.सर्व्ह करतांना वरून सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालावी.
चपाती,ब्रेड किंवा भाकरी बरोबर खायला द्यावे.
प्रतिक्रिया
26 Nov 2012 - 4:12 pm | सस्नेह
मालवणी मसाला कसा बनवावा ?
26 Nov 2012 - 4:15 pm | ज्योति प्रकाश
गणपाभौ मी दिलेली मालवणी मसाल्याची रेशिपी जरा डकवा कि राव हिथं.
26 Nov 2012 - 4:48 pm | गणपा
मालवणी मसाला इथे पहावा.
अवांतर : टोंपासू :)
3 Dec 2012 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार
गणपा शेठ.
आता इकडे रवांडात शहाजिरे शोधणे आले.
बाकी ही पाककृती कोंबडी न घालता कशी बनवता येईल ?
26 Nov 2012 - 4:15 pm | इरसाल
एकदम जबरदस्त असेल यात शंकाच नाही
पण...... एक सांगा
एक वाटी लसुण ... ठीक आहे
अर्धी वाटी आलं ....आलं अर्धी वाटी ??????????
26 Nov 2012 - 4:17 pm | ज्योति प्रकाश
जरा चमचमीत लागतं हो. नाहितर एकदमच मिळमिळीत होतं.
26 Nov 2012 - 4:21 pm | इरसाल
ते ही खरचं म्हणा.
पण ह्या आल्यामुळे " आलं" आणी "गेलं" अस नाही ना होत ;)
26 Nov 2012 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा
@" आलं" आणी "गेलं" अस नाही ना होत ...>>>
26 Nov 2012 - 7:14 pm | पक पक पक
ते खाउन झाल्यवरच समजेल... :) बाकी तुम्हाला धोका नाही.. :bigsmile:
26 Nov 2012 - 7:57 pm | निनाद मुक्काम प...
देवा मी मालवणी घरात का नाही जन्मलो
म्हणजे तारुण्यात प्रवेश करेपर्यंत ह्या उदर भरणाच्या मालवणी स्वर्गीय सुखाला मला मुकावे लागले नसते.
26 Nov 2012 - 9:49 pm | सानिकास्वप्निल
अप्रतिम दिसतयं चिकनः)
27 Nov 2012 - 6:44 am | दीपा माने
चिकन अनेक प्रकारे करता येते. तुमची पध्दत आवडली. जनरली तयार केलेला कुठल्याही रश्याच्या चिकनला दुसर्या दिवशी आणखीनच चव येते-उरल्यास.
27 Nov 2012 - 1:31 pm | भाग्यश्री अमित
मसाला पण एक वाटि आहो तुमचि वाटि किति मोठि आहे ते तरि लिहा.
27 Nov 2012 - 1:36 pm | नगरीनिरंजन
सुंदर आणि चवदार दिसतंय!
या रविवारी हेच करणार!
27 Nov 2012 - 2:48 pm | जयवी
अहा..... एकदम झक्कास दिसतंय :)
27 Nov 2012 - 10:59 pm | पैसा
आधी केले, मग सांगितले!
3 Dec 2012 - 4:08 pm | स्पंदना
बाई ग! प्रत्येकवेळी प्रतिसाद द्यायला आले की गेल्यासारख होउन रहातय त्या इरसालरावांमुळे.
पण आज अजिबात वर न बघता टंकते.
लय भारी. करुन पाहेन अन कळवेन.
3 Dec 2012 - 4:52 pm | नंदन
मस्त दिसतासा चिकन. एकदम साग्रसंगीत मसाले-वाटण-घाटणासकट!
4 Dec 2012 - 4:14 pm | ज्योति प्रकाश
धन्यवाद मंडळींनु.