साहित्यः
१) पाव किलो मिरच्या
२) २ चमचे धणे
३) २ चमचे जिरे
४) २ चमचे बडीशेप
५) १ चमचा राई ची डाळ
६) अर्धा चमचा हळद
७) पाऊण वाटी मिठ
८) अर्धी वाटी तेल
९) ३ लिंबू
पाककृती :
१) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत.
२) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची.
३) हळद थोड्या तेलावर परतायची.
४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.
५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे.
६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे.
हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे.
टिपः
हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.
प्रतिक्रिया
1 Dec 2012 - 12:01 am | जेनी...
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...
तोंडाला पाणी सुटलय ...
खुप न्हारी दिसतय जागुतै ......मस्स्स्स्स्त ...
1 Dec 2012 - 1:05 am | रेवती
छान दिसतय गं जागु. या लोणच्यात आमच्याकडे बहुतेक धणे घालत नाहीत, पण नक्की माहित नाही.
1 Dec 2012 - 4:56 am | सानिकास्वप्निल
छानचं दिसतय जागुताई मिरचीचं लोणचं
मस्तचं :)
1 Dec 2012 - 8:31 am | किसन शिंदे
भारीच.
माझंही खुप आवडतं आहे हे लोणचं.
1 Dec 2012 - 9:56 am | ज्ञानराम
चटका लावून गेली जिभेला...
1 Dec 2012 - 12:56 pm | प्रचेतस
तोंपासू
1 Dec 2012 - 2:15 pm | सस्नेह
हीच पाकृ शोधत होते. अगदी हवी तेव्हा मिळाली.
धन्स जागुतै.
अवांतर : राई म्हणजे मोहरीच ना ?
1 Dec 2012 - 2:16 pm | सूड
आमच्याकडे करतात त्यात धणे, जिरे आणि बडिशेप नसते. निव्वळ मोहरीची डाळ, हळद, मीठ, तेल बस्स!! पण बडीशेप टाकून बरी चव येईलसं दिसतंय.
1 Dec 2012 - 7:09 pm | पैसा
आमच्याकडे पण हे लोणचं मोहरी फेसून करतात. आणि बडिशेप धने जिरे नसते. वेगळा प्रकार म्हणून करून बघायला हराकत नाही.
1 Dec 2012 - 8:39 pm | गणपा
शेम टु शेम असेच बोल्तो.
1 Dec 2012 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटचा फोटू>>>. ऊफ ऊफ मिर्ची,आय हाय मिर्ची,ओय होय मिर्ची
1 Dec 2012 - 3:14 pm | प्रचेतस
कोपा कबाना डोळ्यांसमोर आले.
1 Dec 2012 - 4:28 pm | ज्योति प्रकाश
मस्तच्,तों.पा.सु.
1 Dec 2012 - 5:23 pm | इरसाल
झणझणीत लागते.
सध्या घरात मासे, कोलंबी, आणी लिंबाचे गुजराती प्रकारातले गोडे लोणचे असल्याने हा प्रकार तात्पुरता स्थगित करण्य्यत येत आहे
1 Dec 2012 - 6:45 pm | जयवी
रसरशीत लोणचं बघून तोंडाला सुटलेलं पाणी आवरणं कठीण आहे गं ....... :)
1 Dec 2012 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
जागुतै रॉक्स !
1 Dec 2012 - 7:08 pm | निवेदिता-ताई
अहाहा......तो.पा.सु.
1 Dec 2012 - 7:30 pm | प्राध्यापक
अरारा..........जबराट्,जागुताइ धन्स
2 Dec 2012 - 9:48 am | लीलाधर
अगं सोबत दडपे पोहे असलेल्या डीशचा पण फटू टाक की बाजूबाजूला........ कातिल मर गया...................... मर ही गया.... ;) :)
2 Dec 2012 - 12:15 pm | शिल्पा ब
जबराट !! नक्की करुन बघणार.
2 Dec 2012 - 10:16 pm | पिंगू
मला आजच घरी फ्रिजमध्ये मी करुन ठेवलेले मिरचीचे लोणचे सापडले. ह्या धाग्याने मला त्याची आठवण करुन दिली.. :D
- पिंगू
2 Dec 2012 - 11:04 pm | जागु
सगळ्यांचे धन्यवाद.