साहित्यः
जाडा रवा १ वाटी
दही १ वाटी
मीठ चविनुसार
इनो सॉल्ट १ लहान चमचा.(टी स्पून)
फोडणी साठी:
मोहरी १ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
भिजवलेली चणा डाळ २ मोठे चमचे (टेबल स्पून)
उडीदाची डाळ १ मोठा चमचा
मिरच्या २-३ बारीक चिरुन
कढीलिंबाची पाने ५-६
तेल २ मोठे चमचे.
सजावटः
जाड किसलेले गाजर ४-५ मोठे चमचे
कोथींबिर ४-५ मोठे चमचे
तळलेले काजू तुकडा १५-२० (तुकडे)
वाफवलेले मटार १/४ वाटी
कृती:
दह्यात पाणी मिसळून घट्ट ताक करून घ्या.
रव्यात हे ताक घालून मिसळा. चविनुसार मीठ मिसळा.
तेल तापवून त्यात मोहरी आणि जीरे घाला.
मोहरी जीरे तडतडले की त्यात भिजवलेली चण्याची डाळ, चिरलेली मिरची, उडीदाची डाळ, कढीलिंब घालून चण्याच्या डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतुन घ्या.
आता, ही फोडणी ताकात भिजवलेल्या रव्यावर ओतून नीट मिसळून घ्या.
हे मिश्रण अर्धातास बाजूला ठेऊन द्या.
अर्ध्या तासांनंतर...
इडली पात्रात पाणी तापावयास ठेवून इडल्यांच्या ताटल्यांना तेलाचा पुसट हात लावुन घ्या.
इडली साच्यात थोडे थोडे किसलेले गाजर, कोथींबिर, तळलेले काजू आणि वाफवलेले मटार घालून ठेवा.
ताकात भिजवलेल्या रव्यात इनो सॉल्ट घालून एका दिशेने ढवळून इनो मिसळून घ्या. आता हे रव्याचे मिश्रण साच्यांमध्ये घालून इडली ताटल्या इडली पात्रात वाफावयास ठेवा.
१५-२० चांगल्या वाफवून बाहेर काढा. थंड होण्यासाठी १० मिनिटे ठेवा.
नारळाची चटणी:
किसलेला ओला नारळ १ वाटी
डाळं २-३ मोठे चमचे.
हिरव्या मिरच्या २-३
मोहरी, कढिलिंबं, उडीदाची डाळ, हिंग फोडणी साठी.
तेल
मिक्सरवर नारळ, डाळं, आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.
तेल तापवून मोहरी, कढीलिंब, उडीदाची डाळ आणि हिंग घालून फोडणी करून घ्या. ती फोडणी वाटलेल्या नारळावर टाका. मीठ घालून नीट मिसळून घ्या.
रवा इडली आणि चटणीचा मनसोक्त आस्वाद घ्या.
वरील प्रमाणात १०-१२ इडल्या होतात.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
30 Jul 2012 - 2:51 am | जेनी...
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
काका मस्त ........
चटणीची रेसिपी एकदम मस्त .
30 Jul 2012 - 2:58 am | प्रभाकर पेठकर
चटणीची रेसिपी एकदम मस्त .
हे म्हणजे दिग्गज गायकाच्या मैफिलीत तबलजीलाच टाळ्या मिळण्यासारखे झाले.
30 Jul 2012 - 10:50 am | जेनी...
ही :.....ही :..... ही :
काका :) ...आओ माझा प्रॉब्लेम आहे एक ..मला चटणीच जमत नै नीट :(
अश्या रेसिपी वाचुन करण्याचा प्रयत्न करते ..पण तरीहि जमत नै ..
म्हणुन ईडली वाचलं आणि पहिलं लक्ष चटणीकडेच गेलं :(
5 Aug 2012 - 3:58 pm | पियुशा
जियो काका जियो :)
30 Jul 2012 - 3:20 am | रेवती
इडलीचा हा प्रकारही आवडला.
फोटू अगदी रंगीबेरंगी आला आहे.
30 Jul 2012 - 7:24 am | निवेदिता-ताई
छानच दिसतेय...... करुन पाहिन या रंगीबेरंगी ईडल्या...
चटणी मधे डाळे न घालता थोडे खमंग भाजलेले शेंगदाणे व कोथींबीर व आवडत असल्यास दोन - तीन लसुण पाकळ्या घालून पहा..चव अप्रतिम येते.
मिक्सरवर नारळ, शेंगदाणे, कोथींबीर , लसुण आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.
30 Jul 2012 - 7:46 am | स्पंदना
त्या पाहताच इडल्याऽऽ
कलेजा खलास झाला!
30 Jul 2012 - 8:15 am | लीलाधर
आखिर कार मार डाला क्या फोटो आयेला हैय... ए १ और अभी अभी खाके आया था और ये फोटो देखके सच मैं बढीया मजा आया काका :)
ये इडली बडी है मस्त मस्त ये इडली बडी है मस्त !
चलो मिलके करदें फस्त फस्त ये इडली बडी है मस्त ;)
30 Jul 2012 - 8:46 am | पिंगू
लाजवाब आणि पौष्टिक इडली..
30 Jul 2012 - 8:57 am | प्रचेतस
मस्तच झाल्यात इडल्या.
आज आता इडली सांबार खाणे आले.
30 Jul 2012 - 9:14 am | इरसाल
सध्या इडल्यांच्या राज्यात असल्याने तेव्हढेसे दु:ख झाले नाही.
30 Jul 2012 - 10:01 am | मदनबाण
वा.वा.वा काकाश्री... लयं भारी ! :)
जाता जाता :--- ह्म्म्म... रवा इडलींच्या पाकॄ पाहुनच इतकी भुक लागते,तर मग मेदुवड्यांची पाकॄ आली तर काय होईल बरं ! ;)
(खादाड) ;)
30 Jul 2012 - 10:08 am | झकासराव
जबरी दिसतेय.
परत भुक लागली फोटु बघुनच. :)
30 Jul 2012 - 10:27 am | जाई.
झकास !!
30 Jul 2012 - 10:41 am | ऋषिकेश
भुकेला मागतो एक कृती , स्वाती नी पेठकर देतात दोन ;)
या विकांताला नक्की करून बघणार
30 Jul 2012 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
हा प्रकार पण आवडेश.
बघायलाच येवढा सुंदर दिसतो आहे, तर खायला काय बहार येईल.
30 Jul 2012 - 1:33 pm | RUPALI POYEKAR
काका इडल्या एकदम सहीच
30 Jul 2012 - 1:36 pm | स्मिता.
रंगबेरंगी इडल्या अतिशय टेम्टिंग दिसत आहेत. फोटो बघून आता खायलाच सुरुवात करावी असं वाटतंय. (तरी कालच इडल्या खाल्याने जरा कमी मानसिक त्रास झाला.)
30 Jul 2012 - 1:41 pm | सुहास..
आवडेशच आवडेश ओ पेठकर काका !
30 Jul 2012 - 1:58 pm | उदय के'सागर
खूप छान :)
नारळाच्या चटणी बद्दल विशेष आभार... मी अनेकदा ही चटणी करुन पाहिली पण कधीच उडपी हॉटेलात मिळते तशी (किंवा 'अगदी' तश्शीच) बनत नाही... कदाचित तुम्ही दिल्याप्रमाणे केल्यावर तशी बनेल असं मला वाटतंय :)
30 Jul 2012 - 2:02 pm | स्वाती दिनेश
हा प्रकारही आवडतोच, :)
स्वाती
30 Jul 2012 - 2:11 pm | विजुभाऊ
व्वा.पेठकर काका एकदम फॉर्मात.........
30 Jul 2012 - 3:53 pm | प्रेरणा पित्रे
पौष्टिक रवा ईडली ... आणि नारळ चटणी सहीच... नक्कीच करुन बघणार....:)
काका आणखी साउथ इंडियन रेसिपीज येउद्या..... :)
30 Jul 2012 - 6:59 pm | स्वाती२
अय्यो, मिपावर इडली फेस्ट! मस्त पाकृ. आजच करणार.
30 Jul 2012 - 7:24 pm | सानिकास्वप्निल
मला अश्या रवा इडल्या खुप आवडतात पौष्टीक ही असतात :)
धन्यवाद
30 Jul 2012 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा
एकच शब्द.........जब्बरदस्त.!
30 Jul 2012 - 10:30 pm | पैसा
मस्त दिसतायत!
30 Jul 2012 - 10:30 pm | पैसा
मस्त दिसतायत!
31 Jul 2012 - 8:41 am | सहज
नारळाच्या चटणीबद्दल विशेष धन्यवाद!!
31 Jul 2012 - 1:25 pm | हसरी
मला फोटो दिसत नाहीये :-( पण पाककृती मस्त आहे.
यात, जाडा रवा आणि शेवया (खिरीला वापरतो त्या) दोन्ही निम्मं निम्मं घेऊन थोड्या तुपावर खमंग भाजून कोमट झाल्यावर त्यात दही मिसळून बाकी मालमसाला मिसळून इडल्या करायच्या. त्याही भारी लागतात.
31 Jul 2012 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर
पूजा पवार, रेवती, निवेदिता-ताई, aparna akshay, लीलाधर, पिंगू, वल्ली, इरसाल, मदनबाण, झकासराव, जाई, ऋषिकेश, परिकथेतील राजकुमार, RUPALI POYEKAR, स्मिता, सुहास.., अधाशी उदय, स्वाती दिनेश, विजुभाऊ, प्रेरणा पित्रे, स्वाती२, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, पैसा, सहज आणि हसरी तुम्हा सर्वांचे अत्यंत आभार आणि मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादांनी नवनविन पाककृती टाकण्यासाठी पौष्टीक प्रोत्साहन मिळते.
2 Aug 2012 - 7:38 pm | गणपा
वाह! एकदम भारी दिसतायत इडल्या चवीलाही तेवढ्याच छान असणार. :)
2 Aug 2012 - 7:50 pm | आंबोळी
इडली मस्तच....
मी पण खुप दिवस ही चटणी शोधत होतो...
धन्यवाद
4 Aug 2012 - 6:25 pm | प्रभाकर पेठकर
गणपा आणि आंबोळी,
दोघांसही मनःपूर्वक धन्यवाद.
गणपा, चवीला तर ह्या इडल्या मस्तं लागतातच पण ज्यांना तांदूळ खायला मनाई असते (मघुमेही रुग्ण) त्यांना सुद्धा इडल्यांचा आस्वाद घेता येतो. शिवाय, उडिडाची डाळ आणि तांदूळ आधी भिजवा आणि मग फुगुन येण्यासाठी ८-१० तासे आंबविण्यास ठेवा हे सर्व टाळले जाते. ४५ मिनिटांत लुसलुशीत इडल्या आणि चटणी तयार होते.
आंबोळी,
'आंबोळ्यां'बरोबरही ही चटणी मस्तं लागते.
6 Aug 2012 - 12:22 am | ज्योति प्रकाश
आजच स्वातीतै ने दिल्याप्रमाणे ईडल्या करून बघितल्या.छानच झाल्या.आता अश्यापण करून बघेन्.चटणी रेसीपी मस्तच.
8 Aug 2012 - 12:59 pm | रश्मि दाते
केल्या होत्या, म्स्त झाल्या होत्या,धन्यवाद.
8 Aug 2012 - 1:30 pm | कुंदन
कालच केल्या होत्या, आवडल्या.
उडीद डाळ न तांदळाच्या नेहमीच्या इडल्यांपेक्षा रव्याच्या आवडल्या.
10 Aug 2012 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर
ज्योति प्रकाश, रश्मि दाते आणि कुंदन अनेक धन्यवाद.
30 Nov 2012 - 9:24 am | ह भ प
ही पाकृ मित्राला प्रिंटाउट काढून दिली काल. आज सकाळी सकाळी खाउन सदेह स्वर्ग अनुभवला..
30 Nov 2012 - 9:28 am | सर्वज्ञ
ही पाकृ मित्राला प्रिंटाउट काढली आणि त्याने करुन आनलि पाकृ प्रिंटाउट अनि ओरिजनल फरक च कळला नाहि अप्रतिम मित्रा तोड्लस.............
1 Dec 2012 - 10:49 am | जयवी
सही.....चटणीची कृती पण मस्तच .....करुन बघावंच लागणार :)