ऍसेट.

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
22 Aug 2008 - 8:35 pm
गाभा: 

Live stock (Poultry mgmt.) research साठी कामशेट मध्ये सहा वर्शे जात होतो. साधारण आठवड्याला दोन दिवस. ठाणे ते लोणावळा प्रवास ट्रेनने. फार्मच्या शेटने गाडी देउ केली होती.पण म्हटलं नको. ही जमात घटकेत सौभाग्यवती तर घटकेत गंगाभारती.मोठमोठी कर्जं काढायची आणि फुगवायची खरीखुरी आजीवन लोन-आवळा क्लब मेंबर्स.
एक चांगला फायदा झाला या अप डाउन चा. तो म्हणजे अफ्फाट जनसंपर्क,साध्याशा गोष्टीवरून चर्चा सुरु व्हायच्या आणि काशीची कावड रामेश्वरापर्यंत पोचायची. हल्ली काय उकाडा आहे अशी सुरु झालेली चर्चा एकमेकांच्या ऍसेट पर्यंत . शेअर्स ,म्युच्युअल फंड ,प्लॉट , सोनं वगैरेच्या चर्चांना जोर यायचा. सगळी मंडळी रोजचीच.
मला प्रश्न विचारला गेला प्रभूसाहेब तुमचे ऍसेट किती?
मी उत्तर दिलं . एक मुलगा.चेहेरे उतरले सगळ्यांचे.
मग हाच प्रश्न पाचशे वेळा मी त्या प्रवासत सगळ्यांना विचारला पण मी दिलेलं उत्तर कुणिच दिलं नाही.
मी माझा ऍसेट जाहीर करून मोकळा झालो आहे.
टॅक्स फ्री ऍसेट. लाँग टर्म गेन टॅक्स नाही. बरोबर मेंटेन केलं तर वृध्दाश्रमाची गरज नाही.
कम ऑन गाईज तुमचे ऍसेट जाहीर करा.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Aug 2008 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते

२ मुली... लाँग टर्म इन्वेस्टमेन्ट आहे, टॅक्स लागेल बहुतेक, वृध्दाश्रम बघावा लागू नये... ;)

टारझन's picture

22 Aug 2008 - 10:36 pm | टारझन

प्रभू साहेबांसारखे आपले काय बी ऍसेट्स नाहीत.. आय-बापानी ज्या ४ चांगल्या गोष्टी सांगितल्या .... त्येच आपले ऍसेट्स .............. बाकी नो कमेंट्स

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

डोमकावळा's picture

25 Aug 2008 - 10:45 am | डोमकावळा

अगदी १००% खरं बोललास टार्‍या..... खरंय...

प्रकाश घाटपांडे's picture

22 Aug 2008 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे

मपल्याला एक पोर हायं. या वर्शी दहावीला. पन ते काय आपल ऍसेट नायं . वृद्धाश्रम पघावा लागनारचं . मानसिक तयारी आहेच. त्याला वृद्धांच होस्ष्टेल म्हनु. पुढचं कुनी पाह्यलयं! सध्या बायको हेच ऍसेट.
कार्येषु मंत्री | करुणेषु दासी|
शयनेषु रंभा | भोजनेषु माता|

( इकड्ची काडी तिकडं न करणारा)
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

23 Aug 2008 - 12:43 am | प्राजु

तुम्हाला एक पोर आहे ना.. मग सगळ्यात चांगलं एसेट आहे तुमच्याक्डे. वृद्धाश्रम वगैरे विसरून जा. मुलापेक्षा सुद्धा सगळ्यात उत्तम ऍसेट आहे ते. कधीही तुम्हाला नुकसानीत नाही जाऊ देणार.. विश्वास ठेवा.
- (सर्वव्यापी, एका मुलाची आई)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

22 Aug 2008 - 9:40 pm | लिखाळ

आजवर जे काही वाचन केले आहे, त्यावर विचार केला आहे ; वावरताना जे काही अनुभव आले आहेत, त्यावर विचार केला आहे ; आणि विचारानुसार वागायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून जो काही स्वभाव बनला आहे तेच ऍसेट आहे असे सध्या वाटते. भौतिक गोष्टींपेक्षा त्यानेच मला विचित्र काळात तगायला मदत केली आहे.
(ऍसेट हे भौतिकच असावे असा संकेत असेल तर आमचे उत्तर चुकले. शुन्य गुण !)
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2008 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळांशी सहमत + आरोग्य.

जेव्हा खायला घालणारे एक दिवस सोडून गेले आणि हातात किती पैसे आहेत तेही माहित नव्हतं तेव्हा आरोग्य हाच सगळ्यात मोठा ऍसेट वाटला होता, अजूनही आहे!

...द्यायची वेळ माझ्यावर नुकतीच आली. मी अमेरिकेतील सध्याचं राहतं शहर सोडून नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात जाण्याच्या संधीविषयी मित्रमंडळीत विचार व्यक्त करीत असतांना त्यांना हे सांगितलं की आमचा मुलगा मात्र इथेच नोकरी करायचं आणि राह्यचं म्हणतोय. तेंव्हा मला एका परिचयातल्या वहिनींनी विचारलं की 'मग तुम्हाला आमची कंपनी आवडली नाही का?' तेंव्हा मी त्यांना म्हंटलं की 'अहो, तुमची कंपनी आवडली आणि तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा, आमचा एकुलता एक लेक इथे सोडून जायची हिंमत करतोय'. हे इंग्लिश मध्ये बोलतांना मात्र 'ठेवा' चं रुपांतर अनाहुतपणे 'our greatest possession' असं झालं. याविषयी नंतर विचार करतांना मात्र मला ते खटकलं; मुलगा (किंवा मुलगी) आपलं possession नसतं (शब्दच्छल करण्याचा हेतू नाही, पण assett असंही वर्णन चुकीचं असेल असं वाटतं), मला वाटतं की आपण आपल्या अपत्यांकडे फारतर एक 'गुंतवणूक' (investment) म्हणून पहावं, तसा विचार केला तर "बरोबर मेंटेन केलं तर वृध्दाश्रमाची गरज नाही." हे मात्र पटलं.

प्रियाली's picture

22 Aug 2008 - 10:58 pm | प्रियाली

आहे पण ते सोन्याच्या दागिन्यांसारखं. एकदा घेतले की पुन्हा विकायची वेळ येत नाही सहसा तसे. वृद्धाश्रमाची तरतूद व्हावी अशी जबाबदारी घालून त्या ऍसेटला ताठ उभं राहण्याआधीच कमरेत वाकवायचं नाही.

वृद्धाश्रमाची तरतूद व्हावी अशी जबाबदारी घालून त्या ऍसेटला ताठ उभं राहण्याआधीच कमरेत वाकवायचं नाही.

१००% सहमत
माझा आत्मविष्वास ही माझी सर्वात मोठी ऍसेट
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आता गुंतवणूक, मालमत्ता, मौल्यवान ठेवा असेच म्हणायचे असेल व त्यात सजीव लोक पण धरायची असतील तर.....हं...[प्रभु सर विचारात पडलोय हा चेहरा नाही उतरला ;-) ]

गुंतवणूक शास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व भार/जोर एकाच "असेट" क्लास वर ठेवणे इज ए बॅड आयडिया.... मी असेही ऐकले की वाचले आहे, बेस्ट गिफ्ट यु कॅन गिव्ह युअर चाईल्ड इज नॉट बी डिपेंडंट ऑन हिम्/हर इन एनीवे.

खरी आपली एसेट आपण स्व:ताच, आपण जर शेवटच्या क्षणापर्यंत धडधाकट राहू शकलो तर बेस्ट्च!!

बाकी निव्वळ फायनान्शियल प्लॅनिंग किंवा ओव्हरऑल रिटायमेंट लाईफ प्लँनिंग हे दोन्ही मोठे व स्वतंत्र विषय आहेत.

वेताळ's picture

23 Aug 2008 - 10:30 am | वेताळ

आपली भलीबुरी कर्मेच आपली खरी ऍसेट आहेत. जे पेरले तेच उगवणार आहे. चांगली कामे केली असतील तर कोणत्याच आश्रमाची गरज पडणार नाही.
वेताळ

राघव's picture

23 Aug 2008 - 10:57 am | राघव

आपला तर प्रपंच गोंदवल्याचा बुवा चालवतो बॉ. त्यामुळे भविष्याची सोय वगैरेवर अजून फारसा विचार नाही केलेला अन् गरज आहे असेही वाटत नाही, कारण शेवटी तिथेच जाऊन राहणार आहे. जे व्हायचे ते तिथे होईलच.
शेवटपर्यंत कर्तव्य समाधानात नीट पार पाडता यावे एवढी मनापासून ईच्छा आहे. तेवढे मिळवले की झाले.
सध्यातरी काही मूल-बाळ नाही. अन् नंतर झाल्यावरदेखील त्यांच्याकडून काही अपेक्षा असण्याचे कारण नाही.
त्यामुळे माझे ऍसेट म्हणून सांगायचे झाले तर एकच.. श्रीमहाराज. :)

मुमुक्षू.

मिंटी's picture

23 Aug 2008 - 11:09 am | मिंटी

आपली भलीबुरी कर्मेच आपली खरी ऍसेट आहेत. जे पेरले तेच उगवणार आहे. चांगली कामे केली असतील तर कोणत्याच आश्रमाची गरज पडणार नाही.

सहमत...........

आणि देवाचा,वडिलधार्‍या माणसांचा आशिर्वाद असला की झालं....तेच आपलं ऍसेट... :)

विनायक प्रभू's picture

23 Aug 2008 - 11:52 am | विनायक प्रभू

मनी मनी कुमुदिनी फुलल्या.
वि.प्र.

विनायक प्रभू's picture

23 Aug 2008 - 12:22 pm | विनायक प्रभू

अभिनंदन्.ईश्वर तुम्हाला तुम्ही म्हण्ता आहे ते पुर्ण करायला शक्ति देवो.

पद्मश्री चित्रे's picture

23 Aug 2008 - 1:01 pm | पद्मश्री चित्रे

दोन मुलांची आई असले, तरी ते मला गुंतवणूक वा ऍसेट नाही वाटत..
माझे ऍसेट मला वाटतात. माझी देवावरची श्रध्दा आणि माझा स्वभाव.. जे कुठल्याही परिस्थितीत मला जगण्याचे बळ देईल...

१.५ शहाणा's picture

24 Aug 2008 - 5:42 pm | १.५ शहाणा

तुमचा चिरंजव त्याच्या सख्या बायकोच्या मिठित्..........मुठित गेल्या वर सुनेने तुमची एसेट ताब्यात घेतली व तुम्हाला बाहेचा रस्ता दाखवला तर................?

पद्मश्री चित्रे's picture

24 Aug 2008 - 5:54 pm | पद्मश्री चित्रे

आपण आजुबाजुला, नातेवाईकात पहतोच की.. त्यात नविन काय आहे?
नीट वाचा, मी त्यांना ऍसेट म्हटलच नाही आहे..

विनायक प्रभू's picture

24 Aug 2008 - 6:03 pm | विनायक प्रभू

बहुधा टाइपींग मिस्टेक असावी. मिठित ...........मुठित एसेट चे ऍसेट बद्दल बोलताय का?
आधीच वेगळ घ॑र करुन ठेवल आहे. आव्शिचो घोव त्याच्या. म्हण्जे मी च नाही का? बाहेर काढायला जागाच नाही. हा आता म्हातारी तेव्हा काय करेल त्याचि गॅरंटी नाही. आणि काढ्ल्च तर बर आहे की. नातिचरामी शपथेतुन मोकळा. जमेल तेवढ चरीन.
नि:संकोच वि.प्र.

प्रियाली's picture

24 Aug 2008 - 6:06 pm | प्रियाली

एक गोष्ट लिहावी म्हणते. (खरीखुरी वास्तविक भयकथा) सध्या अजिबात वेळ नाही. पुढील महिन्यात करता येईल.

गणा मास्तर's picture

25 Aug 2008 - 9:42 am | गणा मास्तर

टार्‍याच माझ मत जुळत. आईबापानं शाळत मास्तरान ४ गोष्टी सांगितल्या आन ह्या दुनियेत टक्केटोणपे खाउन अनुभव आले तेच आपले ऍसेट.

आनंदयात्री's picture

25 Aug 2008 - 10:18 am | आनंदयात्री

आजवरच्या अनुभवातुन तरी अनुभव हेच ऍसेट वाटतात, कोण जाणे नविन येणार्‍या अनुभवातुन कदाचित हे मत बदलण्याचा अनुभव पण येइल !

एकलव्य's picture

25 Aug 2008 - 10:29 am | एकलव्य

यांच्या मॅनेजमेन्टमध्ये बिझि आहोत... अर्निंग अथवा नॉनअर्निंग ऍसेटची चिंता तूर्तास नाही.

नॉनपरफॉर्मिंग ऍसेटच्या ओझ्याखाली भल्याभल्या बँका कोसळलेल्या पाहिल्याने वरील अक्कल आलेली आहे.

एकलव्य

मराठी_माणूस's picture

25 Aug 2008 - 10:38 am | मराठी_माणूस

मुलांचा आनंद बघूनच खूप आनंद होतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंद निर्माण करणे हि गोष्ट महत्वाचि वाटते, त्यामुळे त्यांच्या कडे व्यवहारि दॄष्टिकोनातुन (ऍसेट) बघु शकत नाहि.