गाभा:
गायिका कोण?
गीतकार व संगीतकार कोण?
चित्रपटगीत असल्यास कुठला चित्रपट?
http://www.dhingana.com/rusala-kanha-song-lata-majhi-aavadti-gaani-1-mar...
आठवणीतील गाणी वगैरे नेहमीची स्थळे शोधली पण काही माहिती मिळाली नाही.
ह्या आल्बममधे सगळी गाणी लता मंगेशकरांनी गायली असल्याचे म्हटले आहे पण ते साफ चूक आहे.
हा संग्रह म्हणजे लताबाईंची आवडती गाणी आहेत असे त्याच्य नावावरून वाटते. (हे खरे का खोटे तो मंगेशच जाणे! असो.)
प्रतिक्रिया
28 Nov 2012 - 8:00 am | नितिन थत्ते
आवाज लता मंगेशकर यांचा वाटला नाही.
28 Nov 2012 - 8:54 am | पैसा
शांता आपटे किंवा शांता हुबळीकर असाव्यात बहुतेक.
28 Nov 2012 - 10:09 am | राही
गायिका ओळखता येत नाही. पण याच धर्तीचे एक हिंदी गाणे आठवले. देवर चित्रपटातले 'रूठे सैंया,हमारे सैंया क्यूं रूठे' हे ते गाणे. हे मात्र लता मंगेशकर यांनीच गायले आहे.
अंदाजपंचे मध्ये ज्योत्स्ना भोळे,सरस्वती राणे,शांता आपटे, सुंदराबाई जाधव वगैरेंचा समावेश करता येईल.पण सुंदराबाईंना बहुतेक बाद करता येईल.
रमला कुठे ग कान्हा असेही एक गीत आहे.
कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला माणिक वर्मांची गाण्याची ढब आणि आवाजही थोडासा असाच होता.
28 Nov 2012 - 10:12 am | राही
स्वसंपादनाची सुविधा कधी मिळणार?
6 Dec 2012 - 7:05 pm | गौरीबाई गोवेकर
हा चंपुताईंचा आवाज आहे. म्हणजे हिराबाई बडोदेकर.
6 Dec 2012 - 7:28 pm | अत्रन्गि पाउस
हिराबाइन्चाच अवाज आहे हा!!
7 Dec 2012 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार
ह्या गाण्याच्या गायिका वत्सला कुमठेकर आहेत.
7 Dec 2012 - 2:29 pm | चिंतामणी
ख्ररे आहे. "माझी आवडती गाणि" अशी रेकॉर्ड (हल्लीच्या भाषेत "अलबम") आहे. त्यात लताबाईंच्या आवडीची गाणी आहेत. सगळी त्यांनी गायलेली नाहीत.