साहित्य : पाव किलो मटार (वाफवून घ्यावेत), २ उकड्लेले बटाटे, आल लसूण मिरची पेस्ट, कोथींबीर्,तेल, मीठ्, लिंबू रस थोडासा, कणीक व थोडा मैदा.
क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा. वरील मिश्रणावे गोळे करुन , कणकेमध्ये पारीमध्ये भरावे व परोठा लाटून, तव्यावर तूप टाकून परतावा. आवडत असल्यास मिश्रणात थोडे चीज किसून घालावे.
( आता मटार चांगले यायला लागले आहेत बाजारात तेव्हा हा पदार्थ जरुर करुन पहा. मटारची भाजी मुलं खात नाहीत, पण हा परोठा नक्कीच खातील. डब्यात सुध्दा देता येईल. फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे.)
प्रतिक्रिया
25 Nov 2012 - 12:19 pm | पियुशा
गुड !!
मटारचे सर्व आयटम आवडतात हे ही करुन बघण्यात येइल फोटु ड्कवल्याबद्द्ल +१
पण यात फायनल पदार्थाचा फोटुच नैय्ये ,असेल तर लोड्वा की :)
25 Nov 2012 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा
@फायनल पदार्थाचा फोटुच नैय्ये ,असेल तर लोड्वा की >>> +++१११ तोच तर हवा,,, बाकिच्यां आधी ;-)
25 Nov 2012 - 1:19 pm | neeta
ही ट्रायल होती. धन्यवाद.
6 Dec 2012 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही तर बटाटे व्यवस्थीत किसून घेतलेले दिसत आहेत.
6 Dec 2012 - 6:03 pm | गणपा
ज्यांना कीसायला* आवडतं त्यांनी कीसावे.
व्हाईस व्हर्सा.
हा का ना का?
*की दीर्घ आहे याची नोंद घ्यावी,