हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
21 Nov 2012 - 8:35 am
गाभा: 

गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे.

वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे.

आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील".

आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 8:56 am | श्री गावसेना प्रमुख

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.
मला नाही वाटत की काँग्रेस कसाब ला एका राज्याच्या निवडणुकीसाठी फाशी देइल्,कॉंग्रेस ला मुस्लिम मतांची काळजी असते नेहमी तसे नसते तर त्यांनी अफजल ला कधीचेच फासावर लटकविले असते,ते फक्त चर्चेचा झोत कसाब कडे वळवण्याचा प्रयत्न करताहेत.जेणेकरुन शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये जी सहानभुती निर्माण होइल तीला अगोदरच पायबंद घालता येइल.
राहीले बाळासाहेब, बाळासाहेबांच्या आणी मोदींच्या करीश्मा कसाकाय झाकोळला जाइल बरे,कसाब ला इतके दिवस बिर्याणी खाउ घातली आहे ते लोक सहजासहजी नाही विसरनार,
अफजल गुरुचीही फाशी लटकलेली आहेच ना त्याचे काय?

किसन शिंदे's picture

21 Nov 2012 - 8:58 am | किसन शिंदे

नुकतीच मटाच्या इ-आवृत्तीत बातमी वाचण्यात आलीय. त्याला आज सकाळी ७.३० वा फासावर लटकवण्यात आले आहे.

आज करोडो भारतीयांच्या मनाला खर्‍या अर्थाने शांती मिळेल.

वा वा, यातही राजकारण शोधताय. असं एका रात्रीत ठरतं काय हे?
तो मेला, याचा तुम्हाला आनंद नाही झाला काहो?

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Nov 2012 - 9:15 am | llपुण्याचे पेशवेll

कसाबला मारले याचा आनंद आहेच. पण जनता काही लहान बाळे नाहीत की एखादे चॉकलेट दिले की मोठ्ठे खेळणे विसरतो. :)
कसाबला फाशी द्यायचे टायमिंग म्हणजे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळच्या जनसागरावरून लक्ष खेचण्यासाठीच केलेली खेळी आहे.

कसाब नक्की "मेला" कि पाकिस्तानात धाड्ला ??? आनि आपण त्याला असा इतका गुप्ततेने का मारला? आप्ल्या देशात आप्ल्यला कस्ली भिती???

नाझीवाद असता तर अशी वेळच आली नसती.....

चिंतामणी's picture

21 Nov 2012 - 9:38 am | चिंतामणी

अफजल गुरुबद्दल बोला.

आणि कसाब डेंग्युने मेला की फाशी दिल्याने मेला कोणाला माहीत.

पुण्याचे वटवाघूळ's picture

21 Nov 2012 - 1:19 pm | पुण्याचे वटवाघूळ

अफजल गुरुबद्दल बोला.

याविषयी थत्तेचाचांचे मत ऐकायला आवडेल.बाकी मी त्यांच्या लिखाणाचा मोठ्ठा फॅन आहे पण त्यांच्या मिपावरील स्वाक्षरीत एक मजकूर वाचल्याचे आठवते---"अरे तुम्ही आज अफझल गुरूला फाशी द्या ही मागणी केली नाहीत का? मग तुम्हाला राष्ट्रवादी कसे म्हणवते" याच्याशी मात्र सहमत नाही. तेव्हा कसाबच्या मागोमाग अफझल गुरू असावा याविषयी त्यांचे मत वाचायला आवडेल.

नितिन थत्ते's picture

21 Nov 2012 - 2:59 pm | नितिन थत्ते

ती स्वाक्षरी एका दुसर्‍या सदस्याच्या स्वाक्षरीचे विडंबन होते. मला आता आठवत असेल तर राष्ट्रवादी असा शब्द नसून देशभक्त असा शब्द होता.

कसाबला फाशी देण्याबाबत काही प्रश्नच नव्हता. खरे तर तो भारतीय नागरिक नसल्याने त्याच्यावर खटला वगैरे चालवण्याची गरज नाही असे माझे मत वेळोवेळी व्यक्त केले आहे.

अफजल गुरू मात्र भारताचा नागरिक आहे. आणि त्याच्यावरील खटला योग्य पद्धतीने चालवला गेला नाही असे भाजपचे विद्यमान खासदार आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. तरीही न्यायव्यवस्थेने ठोठावलेली शिक्षा (योग्य पुराव्या आधारे ठोठावली असावी असे गृहीत धरून) सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मगच अंमलात आणायला हवी असे माझे मत आहे.

परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे.

आशु जोग's picture

21 Nov 2012 - 8:17 pm | आशु जोग

>>
परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे.
<<

हे म्हणजे अगदी खास.
नेमके मार्मिक आणि मोजके

विकास's picture

22 Nov 2012 - 1:21 am | विकास

जेठमलानींनी इंदीरा गांधी आणि राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची देखील म्हणूनच वकीली केली होती. त्यतील म्हणणे देखील आपल्याला मान्यच असेल अशी आशा करतो.

नितिन थत्ते's picture

22 Nov 2012 - 7:26 am | नितिन थत्ते

त्यांचे म्हणणे मान्य आहे असे कुठे म्हटले आहे? न्यायालयाने अफजल गुरूला दिलेली शिक्षा (योग्य प्रक्रिया पूर्ण करून) अंमलात आणलीच पाहिजे असे मी म्हटले आहे.

मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले.

विकास's picture

22 Nov 2012 - 7:07 pm | विकास

मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले.

म्हणजे भाजपाच्या खासदाराने म्हणले तर ते बरोबर असणार असे आपल्याला म्हणायचे आहे का? ;)

अजून एक अर्थ असा देखील आहे: केवळ आपल्या पक्षाचा खासदार म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीत भाजपा पक्षश्रेष्ठी लक्ष घालत नसावेत.

भाजपा पक्षश्रेष्टी कोण म्हणे? ;)

विकास's picture

24 Nov 2012 - 11:21 am | विकास

काय माहीत! :-)

पण त्यावरून चेपूवर पाहीलेला ही व्हिडीओ अ‍ॅड आठवली. ;)

अमोल केळकर's picture

21 Nov 2012 - 9:04 am | अमोल केळकर

सहमत . बाकी कसाब लटकला हे उत्तमच

अमोल केळकर
मला इथे भेटा

अनामिका's picture

21 Nov 2012 - 12:51 pm | अनामिका

एक सुधारणा "डेंग्युने अर्धमेल्या कसाबला फासावर लटकवला" हे जात्स समर्पक वाटते नाही का?
बाकी काँग्रेसने एक लक्षात ठेवावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Nov 2012 - 9:05 am | llपुण्याचे पेशवेll

झक्कास. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली म्हणायची.

मी_आहे_ना's picture

21 Nov 2012 - 9:11 am | मी_आहे_ना

२०१२ सालातली सर्वांत चांगली बातमी. बाळासाहेब असतानाच हे घडले असते तर अजून छान वाटले असते. असो... प्रणवदांना बाळासाहेबांनी केलेल्या विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

ज्ञानराम's picture

21 Nov 2012 - 9:14 am | ज्ञानराम

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.">>>>>>> चिंतामणी यांच्याशी सहमत..

कसाबला फाशी द्यायची असती तर केव्हाच देता आली असती पण योग्य वेळ साधून हे केलेले आहे...

वा वा, यातही राजकारण शोधताय. असं एका रात्रीत ठरतं काय >>>> मग काय इतके दिवस त्याला ठेऊन लोणचे घालायचा विचार करत होतं का सरकार..!!!!!!

मेला याच आनंद झाला पण इतक्या उशीरा का??? हा च प्रश्न पडतोय..

विटेकर's picture

21 Nov 2012 - 9:16 am | विटेकर

वास्तविक कोणाच्या मरणांवर आनंद व्यक्त करावा अशी आपली संस्कृती नाही.. अश्या हरामखोराला वास्तविक जाहीर फाशी द्यायला हवी होती.
सी. एस . टी . वर नागडा करून उल्टा टांगून पब्लिक कडून त्याला मारवण्याची माझी इच्छा मात्र अपुरी राहीली....थान्कु प्रणव दा !

मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरीकांना आज खर्‍या अर्थाने शांती मिळेल.. भारतीय न्याय संस्थेचा अभिमान व कौतुक वाटावे तेवढे कमीच.. प्रणवजींनी शब्द पाळला...

चौकटराजा's picture

21 Nov 2012 - 9:26 am | चौकटराजा

मला वाटते अशा खेळ्यानी आपले मत बदलावे इतकी भारतीय जनता खुळी नाही. ह्या फाशीला जनतेच्या मते उशीरच झालेला आहे. सबब कॉग्रेसला याचा भावनिक लाभ मिळेल व त्याचे रुपांतर मतात होईल असे वाटत नाही.

बाकी मी तुम्हाला राष्ट्रपति निवडणुकीत पाठबळ देतो तुम्ही माझी ही कसाबला फाशीची विनंति मान्य करा अशी जर अट बाळासाहेबानी टाकली असेल तर त्यांच्या राजकारणाला व देशभक्तीला सलामच केला पाहिजे !

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 9:27 am | ऋषिकेश

हे वृत्त अधिकृत नाही तेव्हा त्यावर प्रतिक्रीया देणे किंचित घाईचे ठरावे ..
मात्र जर हे खरे असेल तर या प्रकरणात सद्य कायद्यानुसार - भारतीय घटनेनुसार- सदर आरोपी दोषी ठरण्यासाठी भरपूर कष्ट उपसून साक्षी-पुरावे गोळा करून भक्कम केस उभी करणार्‍या पोलिस पथकाचे, निर्भिड साक्षी देणार्‍या नागरीकांचे, जबाबदार वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांचे, समर्थपणे केस उभी करणार्‍या वकील मंडळींचे, अतिशय वेगाने व खास लक्ष देऊन पाठपुरावा करणार्‍या न्याययंत्रणेचे, संयमी प्रतिक्रीया देणार्‍या राजकीय पक्षांचे/नेत्यांचे आणि कसाबलाही आपले म्हणणे मांडायची संधी मिळण्यासाठी त्याची वकीली करणार्‍या वकिलांचेही आभार आणि अभिनंदन करणे अधिक अगत्याचे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2012 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दहशतवादी कसाबला सकाळी साडेसातला फाशी दिली ही अधिकृत बातमी आहे. विविध वाहिन्यांवर सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती दिली. मटाची बातमी

सतत घुसखोरी करुन भारतीय नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा मृत्युच असेल असा एक संदेश जावा.

-दिलीप बिरुटे

अफजल गुरु नै हो कसाब :) तुम्ही अजून आशा वाढवली बघा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2012 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसाब असे दुरुस्त करत होतो तर प्रतिसाद टाकलाच का ! विशेषाधिकारात दुरुस्ती केली आहे. :)

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 10:00 am | श्री गावसेना प्रमुख

माझाही प्रतीसाद उडवा की ,मला वाटले नव्हते की,ते असे करतील.

बॅटमॅन's picture

21 Nov 2012 - 10:05 am | बॅटमॅन

काय करू, जरा अचपळ मन साले, नावरे आवरीता :)

चिंतामणी's picture

21 Nov 2012 - 11:40 am | चिंतामणी

थोडेसे अवांतर- हा अधीकार सगळ्यांना होता. तो "विषेषाधिकार" का झाला? मिपामध्येसुध्दा घटनेचे ३०७वे कलम आहे वाटते. :P

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2012 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> हा अधीकार सगळ्यांना होता.
अंहं. लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता. पुढे तो अधिकार काढुन टाकण्यात आला. प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही. विशेषाधिकार यासाठी वापरावा लागला की बातमीचा दुवा आणि मसुदा कसाबचा आणि प्रतिसादाचे शीर्षक अफजल गुरुचे झाले होते. :) गोंधळ नको म्हणुन प्रतिसाद संपादित केला. अन्य कोणी सदस्यांनी अशी विनंती केली असती तर असा बदल केलाच असता.

घटनेत ३०७ वे कलम काय आहे बॉ ?

-दिलीप बिरुटे

जम्मु आणि काश्मीर राज्याला विषेशाधीकार देणारे घटनेतील कलम.

या बद्दल अजून माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा.

नितिन थत्ते's picture

22 Nov 2012 - 7:28 am | नितिन थत्ते

>>प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही.

सध्या असे बूच मारले नसतानाही प्रतिसाद संपादन करता येत नाही. :(

श्रीरंग_जोशी's picture

23 Nov 2012 - 1:15 am | श्रीरंग_जोशी

सदस्य म्हणून वावरत असताना संपादक म्हणून मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करणे बरे नव्हे.
म्हणजे सरकारी नोकरीत सरकारी कामासाठी मिळालेल्या वाहनाचा वापर वैयक्तिक कामासाठी करणे.
;-)

बघा पटते का?

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 9:57 am | ऋषिकेश

बातमी बद्दल आभार.. सकाळी घरातून निघताना सगळीकडे 'सुत्राकडून' इतकेच सांगितले जात होते म्हणून तसे लिहिले होते.

आता तसे असल्याने मी वर उल्लेख केलेल्या सगळ्या संबंधितांचे आभार आणि अभिनंदन!

आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्रणवदांचे, सुशीलकुमार शिंदे व आर आर पाटील ह्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन.

मृगनयनी's picture

21 Nov 2012 - 12:19 pm | मृगनयनी

अभिनन्दन!!.. कसाब'ला फाशी दिली गेली.... :) :) :)

____________________________________

बाळासाहेबांनी "वरती" देखील आपली हुकुमत चालवायला सुरुवात केलेली दिसतेय... ;) . 'यमदूत' तरी काय करणार..
शेवटी "बाळासाहेबां"चाच्च शब्द अन्तिम असतो...!! इथेही.. आणि तिथेही... किंवा कुठेही!!!..... अभिनन्दन पुन्हा एकदा !!!!!

यन्ग्या डाकु's picture

21 Nov 2012 - 9:35 am | यन्ग्या डाकु

सरकारने वेळेतच हुकुमाचा एक्का टाकला आहे.

बॅटमॅन's picture

21 Nov 2012 - 9:41 am | बॅटमॅन

मेला एकदाचा!!!!!!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 9:51 am | श्रीरंग_जोशी

२६/११/२००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामधील एक अतिरेकी अजमल कसाब याला मे २०१० मध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावर त्याचे अपील उच्च (फेब्रू २०११) व सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले. परकीय नागरिकाला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावण्याचे हे उदाहरण कदाचित पहिलेच असावे. ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यावर कसाबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.

नियमाप्रमाणे राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यावर मत (अहवालाच्या रूपाने) मागवले व केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचे मत मागवले. दोन्हीकडून दयेचा अर्ज फेटाळण्याची विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली. ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतींनी या अर्जावर नकारात्मक निर्णय घेतल्यावर २ दिवसांत कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेवर निर्णय घेण्यात आला. २१ नोव्हेंबर हि तारीख ठरवण्यात आली.

या हल्ल्यांतील मृतांना व शहिदांना यामुळे थोड्या प्रमाणात का होईना न्याय मिळाला. या हल्यांचे खरे सूत्रधार अजूनही सीमेपलीकडे मोकळे असल्याने पूर्ण न्याय झाला असे म्हणता येणार नाही.

एवढा क्लिष्ट व मोठ्या आकारमानाचा खटला विशेष सत्र न्यायालयाने केवळ १ वर्षांत संपवला हि नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे दया दाखवली जाण्याची कुठलीही शक्यता नव्हती. कसाब भारताच्या शत्रुराष्ट्राचा नागरिक असल्याने त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात कुठल्याही पातळीवर वेळखाऊपणा दाखवला गेला नाही. तरीही कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही हे पण महत्त्वाचे. याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे व शिक्षेची प्रक्रीया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

हल्ल्यांना ४ वर्षे पूर्ण होण्याअगोदर हि शिक्षा देण्यात आली हे बरेच झाले. कारण जखमांवरच्या खपल्या पुन्हा एकदा निघाल्या असत्या.

आता या सर्व घडामोडींमागे (निवडणुकांचे अथवा मतांचे) राजकारण असल्याचे म्हणणे पूर्णपणे असंयुक्तिक आहे. कारण वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात, हे एका प्रगल्भ समाजाचे घटक म्हणून शोभनीय नाही.

मी_आहे_ना's picture

21 Nov 2012 - 10:18 am | मी_आहे_ना

५ नोव्हें.ला राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला म्हणजे मला आपली एक वेडी आशा, "बाळासाहेबांना ते जाण्यापूर्वी हे माहित असेल की दया अर्ज फेटाळलाय आणि लवकरच फाशी होणार. प्रणवदांनी शब्द पाळला."

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 10:31 am | श्रीरंग_जोशी

दोन्ही सरकारमधील निवडक व्यक्तीनांच व अधिकाऱ्यांनाच या गोष्टीची माहिती असणार...

कमालीची गुप्तता पाळली गेली जे अपेक्षितच होते. २००४ मध्ये कोलकाता येथे या अगोदरची फाशीची शिक्षा अमलात आणली होती तेव्हा मानवाधिकारवाल्यांनी मोर्चे वगैरे काढले होते.

या बाबतीत तसे नसते घडले तरी अतिरेक्यांनी अपहरण, घातपात असे काही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती...

अर्धवटराव's picture

21 Nov 2012 - 10:25 am | अर्धवटराव

असेच म्हणतो.
कसाबला फाशी दिली नाहि तर ते मुस्लीमांचे लांगुलचालन (शब्द बरोबर आहे का हो?), दिली तर गुजरात निवडणुका वगैरे... (मुस्लीम लांगुलचालन होत नाहि असं नाहि...पण कसाबला फाशी दिल्यास भरतीय मुस्लीम समाजास दु:ख वगैरे अजीबात होणार नाहि हे नक्की... तेंव्हा या प्रकरणात व्होटबँकचं लॉजीक बसत नाहि)

अर्धवटराव

चिंतामणी's picture

21 Nov 2012 - 10:32 pm | चिंतामणी

तुम्ही विषय निट वाचला नसावा असे वाटते. धाग्यात कुठेही मुस्लीम अनुनयाविषयी (तुमच्या भाषेत "लांगुलचालन") म्हणलेले नाही.

महत्वाचा मुद्दा जी वेळ साधली याबद्दल आहे.

अर्धवटराव's picture

22 Nov 2012 - 12:42 am | अर्धवटराव

मी कुठे म्हटलय कि धाग्यात मुस्लीम अनुयय आला आहे म्हणुन?? मी केवळ नाण्याच्या दोन बाजु दाखवल्या.

अर्धवटराव

जेनी...'s picture

22 Nov 2012 - 12:55 am | जेनी...

अर्धवटराव +१

वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात,

मला वाटते असे हवे होते.
वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन उशीरा का होइना, पण केली तर त्यामागे राजकारण शोधतात

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 12:35 pm | श्रीरंग_जोशी

कसाबला लौकरात लौकर फाशी दिले जावे हि लक्षावधी किंवा कोट्यावधी लोकांची भावना असू शकते.

पण इतक्या मोठ्या आकारमानाचा व क्लिष्ट स्वरूपाचा खटला कुठलीही कायदेशीर तडजोड न करता या वेळेत त्याच्या शेवटापर्यंत नेणे हे कौतुक करण्यासारखेच आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांनाही यापेक्षा अधिक उशीराने फाशी दिली गेली होती. त्या खटल्याचे आकारमान निश्चितच यापेक्षा लहान होते.

अशा प्रकारचे खटले जर घिसाडघाईने खटले चालवून मृत्युदंडाची शिक्षा दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या विश्वासहर्तेला धक्का पोचू शकतो.

अनेक देश गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात भारताला सहकार्य करतात त्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

आनन्दा's picture

22 Nov 2012 - 1:37 pm | आनन्दा

१६८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या आणि ज्याची प्रत्येक हालचाल कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे अश्या माणसाला खरे तर विशेष न्यायालय स्थापन करून जलदगती न्याय मिळवून द्यायला होता.

५० फक्त's picture

21 Nov 2012 - 10:22 am | ५० फक्त

हा हुकुमाचा एक्का असेल तर हुकुमाचे राजे,राणीं, गुलाम ते दुर्री कोण अशा विचारात पडलोय.
असो, मारलं ते बरंच झालं. आनंद आहे.

चिंतामणी's picture

21 Nov 2012 - 11:43 am | चिंतामणी

सगळ्या कैदेतील अतीरेक्यांची लिस्ट नाही माझ्याकडे. नाहीतर राणी, गोटु, दश्शी, नश्शी........................... सगळे सांगीतले असते.

पण हुकुमाचा राजा माहीत आहे ना. "अफजल गुरू".

जो सध्या फारुक अब्दुल्लांनी धरून ठेवला आहे.

विकास's picture

22 Nov 2012 - 1:26 am | विकास

राष्ट्रपतींनी अफझल गुरूचा दया अर्ज परत गृहमंत्रालयाकडे फेरविचारासाठी पाठवलेला आहे. आज गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत; " “Afzal Guru’s file will not be kept pending for long. I will clear Afzal Guru’s file within 48 hours of its receipt.”

वास्तवीक गृहमंत्रालयाने तो आधीच नाकारला होता आणि तसे राष्ट्रपतींना कळवले होते. पण मध्यंतरी गृहमंत्री बदलले म्हणून परत विचारासाठी पाठवला. ही नेहमीची पद्धत आहे असे संबंधीत अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

हुश्श... अ‍ॅट लास्ट.. शेवटी झालं एकदाचं...सरकारी प्रलंबित ख्यालामधे शेवटी कार्यवाही झाली हेही थोडं नाही.

शिल्पा ब's picture

21 Nov 2012 - 10:29 am | शिल्पा ब

अफजल गुरुला का ठेवलाय म्हणे?

मृत्युन्जय's picture

21 Nov 2012 - 10:36 am | मृत्युन्जय

बाकीचे जाऊ दे. भडवा मेला ते खुप बरे झाले. आणि माणूस मेल्यावर शत्रुत्व संपते वगैरे म्हणणर्‍यांना इथे नको त्या जागी मारण्यात आले आहे हे सामजुन घ्या,

टुकुल's picture

21 Nov 2012 - 10:54 am | टुकुल

आज सकाळी हि बातमी चहा टपरीवर ऐकायला आली, आधी वाटल अफवाच असेल पण नंतर खात्री केली आणी आनंद झाला.

--टुकुल

सन्दीप's picture

21 Nov 2012 - 11:39 am | सन्दीप

आनंद झाला.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Nov 2012 - 1:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

सकाळी सकाळी हि बातमी वाचुन परम संतोष जाहला

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2012 - 1:06 pm | अविनाशकुलकर्णी

डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या कसबाला फाशी देऊन हरामी कॉंग्रेस ने अचूक वेळ साधली आहे.एरवी फाशीच्या पूर्ततेसाठी महिनाभर तयारी करत असतात...गुन्हेगाराच्या मापाचा दोर तयार करणे,त्याची एका डमी पुतळ्या बरोबर चाचणी घेणे ई. पण ह्या वेळी मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मात्र माफीचा अर्ज फेटाळून ८ दिवसाच्या आताच त्याला फाशी दिली? कॉंग्रेस ने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
१) कसाब तसाही मरणारच होता,पण डासाला क्रेडीट मिळू नये म्हणून घाई करून त्याला फाशी दिली गेली.
२)बाळासाहेबांच्या महानिर्वानामुळे शिवसेना बद्दलची सहन्भूतीची लाट थोडी दूर ढकलली जाईल.
३)२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हा मुद्दा जोरदारपणे वापरता येईल.
४) सध्या भ्रष्टाचाराच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेल्या कॉंग्रेसला लोकांचे लक्ष दूर करता येणे सहन शक्य होईल.

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 1:12 pm | ऋषिकेश

प्रतिसादाशी असहमत आहे.
१. राष्ट्रपतींनी परवानगी ५ तारखेला दिली. तेव्हा ८ दिवसात फाशी दिली ही माहिती चुकीची आहे
२. कसाबला काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या सरकारने फाशी दिलेली नाही. भारतीय न्याय व्य्वस्थेने फाशी दिली आहे ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे.

काथ्याकूटप्रेमापोटी निव्वळ तांत्रिक मुद्दा काढतो आहे.. ;) :-

डेंग्यूने अर्धमेला नसावा. पूर्ण बरा झाला असावा. कारण फाशी देण्याच्या नियमानुसार (ऐकीव / वाचीव माहिती) ज्याला फाशी द्यायची तो कैदी फाशी देतेवेळी सर्वसाधारण दृष्ट्या रोगग्रस्त नसावा, अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे.

(अर्थात पूर्वीपासूनचे विकार, मधुमेह, रक्तदाब, एड्स वगैरे यात धरले जात नसणार, केवळ अ‍ॅक्यूट प्रकारचे इन्फेक्शन, सर्दीताप, जखमा आदि रोग धरले जात असणार असा अंदाज आहे.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Nov 2012 - 2:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सगळे नियम नेहमी पाळले जातात असे सुचवायचे आहे का तुम्हाला ? ;-)

अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे.

असं असताना माझाही एक भाबडा पण तांत्रीक प्रश्न. :)

एखाद्या एड्स ग्रस्त अपराध्याला (ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे असा) लटकवणार की तो बरा होई पर्यंत वाट पहाणार?

गवि's picture

21 Nov 2012 - 5:29 pm | गवि

सर्व मिसळपावीय शंका गृहीत धरुनच आम्ही प्रतिसाद लिहीतो.. ;)

माझ्या मूळ कमेंटीतला खालचा कंस वाचा..

धन्यवाद..

गणपा's picture

21 Nov 2012 - 8:50 pm | गणपा

गडबडीत कंस वाचलाच नाही. :P

प्रदीप's picture

22 Nov 2012 - 7:53 pm | प्रदीप

डेंग्यू नि [डंगीने] अर्धमेला झालेल्या कसबाला [कसाबला]

तो डंगीने अर्धमेला झाला नव्हता तर त्यातून तो बाहेर पडला होता, हे आपण तूर्तास सोडून देऊ. पण तो डंगीग्रस्त होता असे वादासाठी जरी मान्य केले, तरी त्यामुळे नक्की सरकारचा काय फायदा झाला असे आपणास म्हणायचे आहे? म्हणजे तो डंगीग्रस्त नसता तर 'कौन माई का लाल मुझे फाँसी पे चढाता है बे?' असे म्हणून त्याने जेलमध्ये धुमाकूळ घातला असता, तेव्हा घाबरून सरकारने त्याच्या डंगीचा फायदा उठवला,जेणेकरून त्याला असे काही करता आले नाही, असे ह्यातून ध्वनित होते आहे!

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2012 - 1:21 pm | अविनाशकुलकर्णी

कसाबची फाशी एक गौडबंगाल .......

१. कोणालाही फाशी देताना सूर्योदयापूर्वी फाशी दिली जाते पण कसाब ला सूर्योदय होवून एक दीड तासाने फाशी देण्याचे कारण काय ?

२.कसाब च्या आधी ७/८ लोकांनी दयेचा अर्ज केला होता त्यांच्या अर्जावर सुनावणी न होता अचानक कसाब च्या अर्जावर निर्णय कसा ?

३.दया अर्ज फेटाळल्याची बातमी गुप्त ठेवण्याचे कारण काय कि अर्ज फेटाळलाच नाही

४.सुर्योदयानंतर फाशी देऊन सुद्धा त्याचा मृतदेह घाईगडबडीत दफन करण्याचे काय कि पुरावे नष्ट करायचे होते ?

५. CAG चे रिपोर्ट लिक करणारी कॉंग्रेस ची रखेल असणाऱ्या भारतीय मिडिया ला दया अर्ज फेटाळल्याची बातमी कशी काय मिळाली नाही ?

६.कसाब ला डेंगू झाला होता मग त्याचे पुढे काय झाले ?

७.यश चोप्रा सारखा कोट्यावधी माणूस लीलावती मध्ये उपचार घेऊन सुद्धा मृत्युमुखी पडतो तर वैद्यकीय सुविधा नसताना कसाब बरा कसा झाला ?

८.कोणत्याही आजारी व्यक्तीला फाशी देता येत नाही मग कसाब ला फाशी कशी काय दिली ?

९.कसाब ला फाशी देणार आहेत हि बातमी पाकिस्तान ला जर पत्राने आणि फ्याक्स ने दिली होती तर पाकिस्तान च्या मिडिया मध्ये तशी बातमी का आली नाही ?

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?
.
. मित्रांनो कॉंग्रेस जनतेला जनतेला मूर्ख बनवत आहे, उद्या जर कोणी माहितीच्या अधिकारात कसाब च्या मृत्यूचे रिपोर्ट मागितले तर ते सुरक्षेचे कारण सांगून माहिती नाकारली जाईल आणि कसाब च्या मृत्यू चे खरे कारण कसाब सोबतच दफन होऊन जाईल —

एकच आणि शेवटची विनंती करतो आहे:
कसाबला काँग्रेसने मारले असा बोभाटा करून त्याचे श्रेय एकट्या काँग्रेसला देऊन उगाच काँग्रेसला मोठे आणि भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाला लहान करू नका. वर म्हटल्याप्रमाणे कसाबला भारतीय न्यायप्रणालीने फाशी सुनावली होती कारण तो दोषी होता हे सप्रमाण सिद्ध झाले होते. राष्ट्र्पतींनी (जे पक्षनिरपेक्ष पद आहे)या निर्णयावर शिकामोर्तब केले.

मग असे असताना काँग्रेसला श्रेय का द्यावे? श्रेय द्यायचेच असेल भारतीय संघराज्याला द्यावे लागेल

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 1:31 pm | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

शंका कशावरही घेतली जाऊ शकते म्हणून प्रत्येक ठिकाणी शंकाच घेत राहणे योग्य वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

21 Nov 2012 - 2:22 pm | नितिन थत्ते

ऋषिकेशभौ,

रोज सकाळ संध्याकाळ जप करण्याचा मंत्र इनव्हॅलिड झाल्यामुळे होत असलेली चिडचिड बाहेर येत असावी.
कदाचित या काहींची कसाब फाशी जावा अशी इच्छा नसेल. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Nov 2012 - 3:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काय सुचवू पाहत आहात ? कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, हे? कसाब जिवंत राहिल्यास काँग्रेस वर टीका करता आली असती म्हणून त्याला फाशी झाल्याचे दु:ख येथील कुणाला वाटत असेल ?
कसाबच्या फाशीने दु:खी होण्यासाठी आम्ही काय काँग्रेसचे समर्थक आहोत काय हो ?

फॉर द रेकॉर्ड्स, काँग्रेसला शिव्या देण्यासाठी अजूनही अनेक विषय तयार करून ठेवले आहेत त्यांनीच. मी काय म्हणतो, अफझल गुरु ला तत्काळ फाशी देऊन आणि सगळ्या घोटाळ्यांची पूर्ण चौकशी करून आणि दोषींना शिक्षा देऊन तुमचे कॉंग्रेस येथील विरोधक मिपाकरांना पूर्ण नि:शस्त्र का नाही करून टाकत ? सुचवून बघा जरा...

एक्झॅक्टली हेच सुचवायचे आहे.

हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे.

सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन तो डेंग्यूनेच मेला असावा; डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत.

[बाळासाहेबांनी प्रणवमुखर्जींशी डील केले होते वगैरे प्रतिसादांबाबत वरील प्रतिपादन नाही. ते प्रतिसाद मला ओके वाटतात].

मृत्युन्जय's picture

21 Nov 2012 - 3:51 pm | मृत्युन्जय

सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन

सुखद धक्का बसला आहे हो लोकांना. एवढ्या अपेक्षा नव्हत्या सरकारकडुन लोकांच्या. बादवे अफझल गुरु निर्दोष आहे काय? नाही म्हणजे कसाब आधी सुप्रीम कोर्टाकडुन फाशीवर शिक्कामोर्तब होउन देखील अजुन राष्ट्रपती त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करत नाहीत म्हणुन विचारले. बाकी कसाबला डेंग्यु झाला आणि मग त्याला फाशी झाली हा योगायोग असु शकतो. पण मग काय आता गुरुलाही डेंग्यु होण्याची वाट बघत बसावी की काय? परत असा गोड योगायोग जुळुन यावा म्हणुन?

बाकी मी काय म्हणतो. या धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया "बघा आमच्या सरकारने कसाबला फाशी देउन दाखविली आणि तरीही देशद्रोही शंका काढतात" या छापाच्या आहेत ते बघुन आश्चर्य वाटले. जणु काही कसाबला फाशी देउन सरकारने लोकांवर फार मोठे उपकार केले आहेत. ही म्हणजे " बघा सरकारी अधिकार्‍याने पैसे न खाता काम केले तरी त्याने एक दुसरे काम पैशासाठी अडवुन ठेवले आहे म्हणुन कपाळकरंटे उर बडवत आहेत " अश्या छापाची प्रतिक्रिया वाटते. अहो त्याने पैसे खाउन काम करु नये हे त्याचे कर्तव्यच आहे. फार अवाजवी अपेक्षा नाही ही.

बाकी तुम्ही लक्ष नका हो देउ. मिपावरच्या करंट्यांना आपल्या काँग्रेसला शिव्या देण्याची वाइइट्ट सवय आहे. खुप खुप वाइट्ट लोक आहेत ही.

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 3:55 pm | श्री गावसेना प्रमुख

डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत.
1
हे घ्या थत्ते चाचा डांस
कुणी का मारेना डास किंवा सरकार किंवा न्यायपालीका आपल्याला काय, मेला एकदाचा सा...

चिंतामणी's picture

21 Nov 2012 - 10:39 pm | चिंतामणी

हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे.

प्रथमतः नम्रपणे सांगु इच्छीतो की आपल्या संस्कृतीमुळे, संस्कारामुळे कोणाच्याही मृत्युबद्दल आनंद व्यक्त करणे जड जाते.

दुसरी महत्वाची गोष्ट. ताकाला जाउन भांडे लपवणे असा प्रकार येथे केला नाही. लेखनविषय:: राजकारण असे धागा टाकताना स्पष्टपणे म्हणले आहे. त्यामुळे मजकुराची दिशा तीच असणार यात चुकीचे काय.

प्रदीप's picture

22 Nov 2012 - 11:07 am | प्रदीप

लोकसत्तेचा ह्याच विषयावरील अग्रलेख आवडला:

प्रदीप's picture

22 Nov 2012 - 8:24 pm | प्रदीप

सकाळी घाईत हा दुवा फक्त दिला. आता सविस्तर लिहीतो आहे (मूळ प्रतिसादावर इतर कुठलीही प्रतिक्रिया नसतांना देखील, आता येथे प्रतिसाद संपादित करता येत नाही, सबब हे उत्तर लिहीत आहे).

ऋषिकेशने इतरस्त्र कसाबच्या तात्काळ फाशीचे श्रेय केवळा एकट्या काँग्रेसचे नाही, तर त्यात भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाचेही महत्वाचे वाटे आहेत हे बजावले आहे. पण इथे थोडी गल्लत आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते. बाकी न्यायव्यवस्था, पोलिस, सरकारी यंत्रणेचे ह्या कमी लागलेले सर्व घटक निर्णयाचे फक्त execution करत होते, ते त्यांनी कसोशीने केले व उत्तम प्रकारे पार पाडले, हे व इतकेच काय ते ह्यातील त्यांचे 'योगदान' होय.

लोकसत्तेचा अग्रलेख काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करतो.

* कसाब परकीय नागरीक असल्याने त्याच्या फाशीमुळे देशातील कुठल्याही भागात काही विपरीत होण्याची शक्यता शून्य होती.

* आंतरराष्ट्रीय स्तरावरही ह्यात काहीच धोका नव्हता. पाकिस्तानलाही खरे तर ह्यामुळे आता हायसे वाटले असावे, कारण एकार्थी ह्यामुळे २६/११ च्या दुर्घटनेवर पडदा पडला आहे. The event has been brought to a closure असे जागतिक स्तरावर समजले जावे.

* कसाबच्या दयेच्या अर्जाच्याही अगोदर तीन महत्वाचे अर्ज दाखल झालेले आहेत -- (१) अफझल गुरू (२) राजीव गांधींच्या हत्येत कटात सामिल असलेले संथान, मुरूगन व पेरारीवेलन हे श्रीलंकन तामिळ (३)पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग ह्यांचा मारेकरी बलवंत सिंग रोजाना.

ह्या तिन्ही केसेसमधे राजकारण गुंतलेले आहे. पहिल्या केसमधे जम्मू-काश्मिर, दुसर्‍या केसमधे तामिळनाडू (काँग्रेसच्या सध्याच्या आघाडीतील भागिदार द्रमुक दुखावला जाईल ही भीति) आणि तिसर्‍या केसमध्ये पंजाबचे राजकारण (काँग्रेस तसेच भाजपाचेही).

तेव्हा, अग्रलेख पुढे म्हणतो की, अशा तर्‍हेने ह्या तिन्ही केसेसबाबत चालढकल करत राहून पण कसाबची झटपट विल्हेवाट लावून आपले सरकार (आपली सरकारे, असे म्हणणे जास्त इष्ट ठरावे)एक अत्यंत घातक संदेश दहशतवाद्यांना देत आहे-- तुम्ही भारतीय दहशतवादी असाल, तर तुमचा निकाल लावला जाणार नाही. परदेशस्थ दहशतवादी ह्याचा फायदा उचलण्याची भीति अग्रलेखात पुढे व्यक्त करण्यात आलेली आहे.

बर्‍याच दिवसांनी भारतीय वर्तमानपत्रात चांगला, मुद्देसूद व माहितीचा नीट वापर करून लिहीलेला अग्रलेख वाचावयास मिळाला.

अग्रलेख वाचनीय आहे. सर्वथा पटला नसला तरीही बहुतांश मुद्दे ग्राह्य आहेत.

बाकी,

केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते.

हे चुकीचे आहे. राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर फाशीची तारीख न्यायालयाने ठरविली आहे असे वाचले (शोधून दुवा देतो). राष्ट्रपतींनी कोणाचा अर्ज कधी फेटाळावा हा त्यांचा विषेशाधिकार आहे. यावर इतक्या जलद कायवाई होण्याचे कारण जनतेने हळू कारवाईवर वेळोवेळी दाखवलेला असंतोष, पत्रकारांनी या प्रकरणाचा सतत केलेला पाठपुरावा, पोलिसांनी तयार केलेली बर्‍यापैकी 'गॅपलेस' केस आहे असे दिसते. तेव्हा भारताने जलद न्याय दिल्यावरही तो केवळ काँग्रेसच्या कारकिर्दीत दिला गेला म्हणून त्याचा निषेध करणे मला न्यायव्यवस्थेचा, त्या घटनेतील बळींचा आणि नागरीकांचाही अपमान केल्यासारखे वाटते

शिवाय कसाब हा अगदी 'तळातील' मोहरा असल्याने त्याच्याकडून हवी ती माहिती मिळवून झाली होती. इतर वरील व्यक्ती त्या त्यासंघटनांमधे इतक्या खालच्या दर्जाचे नाहित तेव्हा त्यांचा उपयोग साक्षीदार म्हणून होऊ शकतो याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. (राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर जर त्यांच्यावर त्वरीत कारवाई झाली नाही तर सरकारला थेट दोष देता येईल.. इतर तिघांचेही अर्ज राष्ट्रपतींनी आपल्याकडेच ठेवले होते)

इरसाल's picture

21 Nov 2012 - 2:07 pm | इरसाल

५ मुद्दा लैच व्होल्टचा दिस्तोय.

वामन देशमुख's picture

21 Nov 2012 - 2:18 pm | वामन देशमुख

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?

हेच म्हणतो.
फाशी खरंच "कसाब"ला झाली का?
फाशी खरंच "कसाब"ला झाली की त्याच्या प्रेताला?
तो डेंग्यू तापीने मेला आणि म्हणून त्याला फाशी दिली असे घाईघाईने जाहीर करण्यात आले असावे असे वाटते.

नितिन थत्ते's picture

21 Nov 2012 - 2:25 pm | नितिन थत्ते

इकडे लक्ष वेधू इच्छितो. यात कसाबकडून त्याच्या डेथ वॉरंटवर सही घेण्यात आली असे म्हटले आहे. (अर्थात शंकाच घ्यायची तर कशावरही घेता येऊ शकते).

नितिन थत्ते's picture

21 Nov 2012 - 2:26 pm | नितिन थत्ते

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 4:42 pm | ऋषिकेश

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.

+१ अगदी हेच म्हणायचे होते.
काँग्रेसला विरोध करणे/न करणे हे वैयक्तीक राजकीय मत झाले. पण कॉग्रेसद्वेषाने (किंवा कोणाच्याही द्वेषाने) इतकेही आंधळे होऊ नये की आपण एखाद्या पक्षाचा द्वेष व्यक्त करण्यासाठी देशालाही बदनाम करत आहोत याचे भान सुटावे.

बाकी, रेडीफच्या लाईव्ह बातम्यांच्या पानावरील १५:४४च्या अपडेट नूसार गृहमंत्री श्री. शिंदे म्हणाले आहेत "The government is working quickly on everything, but we want to say that the government will not take credit or claim political mileage for the hanging."
हे मला स्वागतार्ह वाटते

विकास's picture

22 Nov 2012 - 1:16 am | विकास

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, श्री. दिग्विजय सिंग यांच्या खालील ट्वीट केलेल्या वाक्यातून पॉलीटीकल मायलेज घेत नसल्याचे स्पष्टच होते. ;)

Will Modi and BJP tell us why NDA Govt. didn't carry out death sentence to Rajiv Gandhi's killers, who were sentenced in 1998.

दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे ऐकत नाहीत असे वाटते ;)
(आणि ऐकत असल्यास अगदी तांत्रिक आधारावरच बोलायचे तर श्री सिंग 'Government मध्ये कुठायत? ;) )
ह घेणे.

बाकी, माझा मुद्दा लक्षात आला असेलच. हा निर्णय पक्षाधारित नाहीत.. एका पक्षाल्;आ त्याचे श्रेय/अपश्रेय देण्यात काहीच हशील नाही. त्यावरील मत समजल्यास अधिक उत्तम!

विकास's picture

22 Nov 2012 - 7:10 pm | विकास

म्हणजे उद्या काँग्रेसच्या प्रचारसभेत राहूल-सोनीया आदी त्याचे श्रेय घ्यायला लागल्यावर म्हणणार, ते काँग्रेस घेत आहे, सरकारने घेतलेले नाही :-)

आनन्दा's picture

22 Nov 2012 - 1:41 pm | आनन्दा

राजीव गंधींवरील हल्ला जरी दहशतवादी असला, तरी तो धोरणांवरील हल्ला होता.
हा देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान होते.
लिट्टेपेक्षा ह्या हल्ल्याचे गांभीर्य नक्कीच जास्त होते.

चिंतामणी's picture

22 Nov 2012 - 2:16 pm | चिंतामणी

सर्वात महत्वाची गोष्ट दिग्गीराजांना माहीत नाही का न्यायालयीन प्रक्रीया अजून चालू आहे आहे. आणि त्यांची दैवते असणा-या प्रियांकाने काय प्रतिक्रीया दिली होती त्या खुन्यांबद्दल.

सुधीर काळे's picture

21 Nov 2012 - 2:24 pm | सुधीर काळे

प्रणब मुकर्जींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची बातमी काल (किंवा परवा) मी वाचली होती. कुठे ते आता आठवत नाही! (म्हणजे टाइम्स कीं डॉन ते आठवत नाहीं)
पण सरकारकडून इतका "तडफदार" निर्णय होईल असे मात्र वाटले नव्हते! दालमें कुछ काला जरूर है!

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 4:01 pm | श्री गावसेना प्रमुख

दालमें कुछ काला जरूर है!नही पुरी दालहीच काली है
काळे अंकल पार जर्जर झालेय हो हे,थोडा डोस घेताहेत ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2012 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑपरेशन x इज ओव्हर.

१] सूर्योदयापूर्वी फाशी दिली.
२] अनुक्रमे फाशी दिली पाहिजे, असं काही असल्याचे माहित नाही.
३] दया अर्ज अजिबात गुप्त ठेवला नाही. कार्यवाही चालूच होती. [बातमी]
४] सूर्यास्तापूर्वी येरवड्यातच दफन केले गेले आहे. [वृत्त वाहिन्या]
५] काँग्रेसची रखेल अशा शब्दप्रयोगाची काका आपल्याकडून अपेक्षित नाही. दया अर्ज फेटाळल्याची बातमी होती.
६] कसाबचा डेंग्यु बरा झाला असावा. 'फाशीची माहिती आईला द्यावी,असं कसाबनं म्हटलं होतं. [वृत्त वाहिन्या]
७] डॉक्टरांचं पथक त्याच्या आरोग्याची काळजी घेत होतेच.
८] डेंग्यु बरा झाला असावा.
९] पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी भारतानं कसाबच्या फाशीबाबत कळवलं होतं असं म्हटलं आहे.
१०] तळागाळातील लोक आता काँग्रेसलाच मतदान करतील असं काही नाही.

बातम्यांमधुन असे दिसते महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या २५ सप्टेंबरच्या कार्यवाहीनंतर, राष्ट्रपतीनी कसाबचा दयेचा अर्ज ५/७ नोव्हेंबरला फेटाळला. सुशीलकुमार शिंदे यांनी ८ नोव्हेंबरला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला माहिती दिली. राज्याच्या गृह मंत्रालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेची तयारी पूर्ण करुन त्याला १९ नोव्हेंबरला रात्री येरवडा जेलमध्ये हलविण्यात आले होते. एकुणच काय कसाबला फाशी देण्यापूर्वी सर्व नियमांचे पालन करुन येरवड्यात ही प्रक्रिया पार पाड्ण्यात आली. आपण राजकीय पक्षांवर शंका व्यक्त करतांना व्यवस्थेवर संशय व्यक्त करत आहोत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

21 Nov 2012 - 1:42 pm | नगरीनिरंजन

पालीचं शेपूट वळवळायचं थांबलं म्हणायचं.

बाळ सप्रे's picture

21 Nov 2012 - 1:48 pm | बाळ सप्रे

डेग्युने मेला असला तर कायदा हातात घेतल्याबद्दल डासांना अटक व्हायला हवी :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Nov 2012 - 1:58 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. डासांना अटक करून ते कारवाई पूर्ण होईपर्यंत डेंग्यूने मरू नयेत यासाठी त्याना ओडोमॉस लावण्यात यावे.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2012 - 2:01 pm | अविनाशकुलकर्णी

.

सुधीर काळे's picture

21 Nov 2012 - 2:15 pm | सुधीर काळे

सगळ्यात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा, पठ्ठे!!
तसेच 'एअर इंडिया'चे आणखी एक विमान अपहृत करण्याआधीच तो लटकला हे बरे झाले. आता अफजल गुरूला (कुणाचा?) लटकवा!

सुधीर काळे's picture

21 Nov 2012 - 2:18 pm | सुधीर काळे

सर्वात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा पठ्ठे!!
शिवाय एअर इण्डियाचे आणखी एक विमान अपहृत होण्याआधी कसाब लटकला हे बरे झाले! आता पाळी अफजल गुरूची! (हा कुणाचा गुरू?)

नक्शत्त्रा's picture

21 Nov 2012 - 2:30 pm | नक्शत्त्रा

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?

चला पाकड्यांनी पाठवलेला आणि इतके दिवस आपण पोसलेल्या ह्या सापड्याला लटकवला एकदाचे ! :)
आता नंबर अफजल्याचा ! बघुया त्याच्या गळ्यात फाशीचा फंदा कधी अडकतो ते !

पाकडे आणि त्यांनी पोसलेले हे असे आणि अगणित सापडे आपण ठेचुन ठेचुन मारले पाहिजेत.अजुन किती निरपराध नागरिकांचे आणि सैनिकांचे बळी आपण देणार आहोत ?

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2012 - 3:55 pm | प्रभाकर पेठकर

आता समस्या आहे ती पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या आणि हेरगिरीच्या आरोपांसाठी शिक्षा भोगत असलेल्या सरबजित सिंग ह्यांच्या भविष्याबद्दल.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2012 - 4:38 pm | प्रकाश घाटपांडे

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता.
खर तर दहशतवाद हा आपला खरा शत्रू आहे; दहशतवादी नव्हे. तो तर भारवाही आहे. कसाब हे फक्त प्याद त्याचा बोलविता धनी पाकिस्तानात आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Nov 2012 - 6:33 pm | llपुण्याचे पेशवेll

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता.

सहमत. आणि प्रश्नं विचारायची परवानगी दिली असती तर त्याला "कसं वाटतंय फासावर जाताना?" असे प्रश्न पण विचारले असते.

अनुरोध's picture

21 Nov 2012 - 4:48 pm | अनुरोध

काहिहि म्हणा बातमी चे हेडिंग आवड्ल्या गेले आहे.... :)

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Nov 2012 - 5:13 pm | माम्लेदारचा पन्खा

बाळासाहेब लागले कामाला

आदेश दिला यमाला

आधी पळत जा आणि

घेऊन ये पहिले कसाबला !!

पण खूपच स्वस्त मरण मिळाले त्याला..एखाद्या संध्याकाळी छ शि ट स्थानकात लोकांच्या पायात आणून टाकायला हवे होते...असो.....

तिमा's picture

21 Nov 2012 - 6:24 pm | तिमा

हे ठरलेल्या वेळेलाच येणार, एक दिवस आधी नाही की नंतर नाही!

अनामिका's picture

21 Nov 2012 - 8:04 pm | अनामिका

अजमल आमीर कसाब नावाच्या इस्लामी दहशतवाद्याला सरकारने गुपचुप का होईना पण फाशी दिले(नक्की फाशी दिले कि तो डँग्युने मेला हा संशोधनाचा विषय आहे) याचा आनंद मानावा कि इस्लामी दहशतवादाच्या जागतिक इतिहासात पकडल्या गेलेला एकमेव जिवंत दहशतवाद्याला संपवून भारताने इस्लामी दहशतवादाचे जागतिक केंद्रस्थान असणार्‍या पाकिस्तान विरुद्धचा सबळ पुरावा नष्ट केल्याचे दु:ख करावे....च्यामारी !हा प्रकार म्हणजे धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय असाच आहे कि?बाकी सोलापूरच्या शिंदेंनी राणा भिमदेवी थाटात कसाबला फाशी देऊन फार मोठी मर्दुमकी गाजवल्याचा माध्यमांसमोर आणि देशासमोर आव आणला खरा! पण आता हा फाशी फाशी चा खेळ त्यांच्याच अंगाशी आलाय ...अफजल गुरुचा निकाल कधी लावताय? ते बोला असे विचारताच यांची बोलती बंद झाली...करा म्हणाव अजून राजकारण?काँग्रेसने ६० वर्षात इतकी घाण घालून ठेवली आहे या देशात कि ती निस्तरायला यांना किती कसाब आणि किती गुरू हलाल करावे लागतील याची मोजदादच करता येऊ शकत नाही...शिंदेची स्मरणशक्ती जरी अगदीच माफक असली तरी जनतेची स्मरणशक्ती एकदम चांगली आहे....काँग्रेसने एकच लक्षात घ्यावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"..."आधी बाप दाखवा आणि मग श्राद्ध घाला "या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी..

या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी..
मला उगाच चाचांचा कॉन्स्पिरसी थिअरीज हा धागा आठवला ! ;)
मी उगाच माझे टाळके चालवुन काही थिअरीज / शक्यता मांडुन पाहतो... ;)

१)कसाब डेंग्यूच्या तापाने फणफणला होता आणि थंडी भरुन कुडकुक्डुन मेला,त्याला फासावर लटकवले हे जाणुन बुजुन सांगण्यात आले.
२)मेला तो कसाब नव्हताच ! मग खरा कसाब कुठे आहे ?
३)खर्‍या कसाबच्या बदल्यात सरबजित सिंगची सुटका अशी मांडवली झालेली आहे,त्यामुळे ज्या बोटीतुन कसाब आला होता त्या बोटीतुनच त्याला गुपचुप्पणे परत पाठवण्यात आले.
४)कसाब अजुन जिवंत असावा... मग येरवड्याला नक्की कोणाला नेण्यात आले ?
५)काय म्हणे तर ऑपरेशन X, नावा वरुनच हे ऑपरेशन बोगस वाटते.

( हे वरील ५ पर्याय टिपी म्हणुन लिहले आहेत, उद्या यातील एक जरी चुकुन खरा ठरला तर मला खरड/व्यनी करु नये.);)

राही's picture

21 Nov 2012 - 8:31 pm | राही

अफ्झल गुरूला आम्ही कधी,कुठे,कशा रीतीने मारणार आहोत हे सर्व सुशीलकुमार शिंदे यांनी डिट्टेलवार जागतिक मीडिया समोर एक्ष्प्लेन करावे अशी आमची रिक्वेस्टडिमांड आहे.

विकास's picture

21 Nov 2012 - 8:20 pm | विकास

उत्तम बातमी. इथे अनेकांना त्यात राजकीय वास आला. त्यात काही आश्चर्य नाही. राजकारणी व्यक्तीने श्वास घेतला तरी त्यात राजकारणाचा विचार असू शकतो, त्यामुळे कसाबला फाशी देण्याच्या टाईमिंग मधे तसे काही नाही असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल. तरी देखील याचा अर्थ यात सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महत्व कमी होत नाही. मुख्यत्वे जेंव्हा प्रमुख पक्ष काँग्रेस असलेले सरकार असते तेंव्हा. त्यांनी तो का घेतला असावा याच्याशी काही देणेघेणे तुर्तास कुणाला नसावे, यशस्वीरीत्या अमलात आणला हे महत्वाचे. मात्र असा निर्णय घेतल्याने काही राजकीय उपाय ठरला नाही, तरी अपाय होत नाही, इतके जर काँग्रेसनेतृत्वास समजले तर ते त्या पक्षासाठी आणि देशासाठी चांगलेच ठरेल अशी आशा आहे.

बाकी या सर्व प्रकरणात खालील व्यक्ती.संस्थांचे (उलट क्रमाने) मनःपूर्वक अभिनंदन !

७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते

६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा

५. कसाबचे काय हे सातत्याने दबाव ठेवणारे पब्लीक, काही अंशी माध्यमे आणि राजकीय नेते

४. कसाबचे गुन्हे कितीही जगजाहीर असले आणि फाशीची शिक्षा होणे अटळ असले, तरी त्यासाठी कुठल्याही इतर खटल्याप्रमाणेच गांभिर्याने खटला चालवणारे अ‍ॅड. उज्वल निकम आणि त्यांची टीम (हे एकाच व्यक्तीचे काम नसते!)

३. परदेशी अतिरेक्यास जिवंत पकडले असताना देखील त्याला लोकशाही तत्वाने संपूर्ण न्यायालयीन निर्णयातून नेणारी भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायाधिश

२. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा

आणि सर्वात शेवटी, सगळ्यात महत्वाचे,

१. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!

________________________________
आज २६/११ च्या खालील मोहर्‍यांना आणि इतर निनावी हुतात्म्यांना तसेच त्यात हत्या झालेल्या निरापराधी सामान्य जनतेला खरी श्रद्धांजली मिळाली.

1.Sri Hemant Karkare, Joint Commissioner of Police, ATS, Mumbai
2.Sri Ashok Kamte, ACP, Mumbai East
3.Sri Jaywant Patil, Police Constable
4.Sri Yogesh Patil, Police Constable
5.Sri Ambadas Pawar, Police Constable
6.Sri Mukesh B.Jadhav, Home Guard
7.Sri Rahul Shinde, Constable, State Reserve Police Force
8.Sri M.Chowdhary, Constable, Railway Police Force
9.Sri Arun Chitte, Police Constable
10.Sri Balasaheb Bhosale, Asst. Police Sub-Inspector
11.Sri Tukaram G.Omble, Asst. Police Sub-Inspector, D.B.Marg PS
12.Sri Bapusaheb Durugade, Asst.Police Sub-Inspector, Naigaon PS
13.Sri Prakash P.More, Police Sub-Inspector,L.T.Marg PS
14.Sri Shashank Shinde, CST Railway PS
15.Sri Vijay Saluskar, Police Inspector, Anti-extortion cell, Mumbai
16.Major Sandeep Unnikrishnan, NSG Commando
17.Sri Gajendraji, NSG Commando

विकास च्या पूर्ण मताशी सहमत .

अ‍ॅडव्होकेट उज्वल निकम यांचं अभिनंदन .
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कर्तुत्वाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली .

सुनील's picture

21 Nov 2012 - 9:50 pm | सुनील

१. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!

१००% सहमत.

७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते

ठीक.

२. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा
६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा

पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?

पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?

तसे सगळेच म्हणजे राज्य-केंद्र सरकारे, पोलीस-सुरक्षा यंत्रणा वगैरे घटनेत सांगितल्याप्रमाणे कामे करतात. किंबहूना तसे करायला हेव. तसे होतेच असे नाही...

त्याच पद्धतीने, या यंत्रणा जरी राज्य-केंद्राच्या अख्त्यारीत असल्या तरी जोखिम सांभाळताना, त्याचे प्लॅनिंग करताना आणि नंतर नियंत्रण करताना स्वतंत्रपणेच करतात, भले ते वर रीपोर्ट देत असले (असावेत) तरी. नाहीतर काय पालघर प्रकरणात पोलीसांवर ठपका ठेवण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवरच ठेवला असता की!

सुनील's picture

22 Nov 2012 - 7:51 am | सुनील

ठीक आहे.

आता त्या यंत्रणांकडून चोख काम झाले हे उत्तमच. पण जर का कुठे ढिसाळपणा झाला असता तर, ते अपश्रेय कुणाचे?

जर अपश्रेयदेखिल फक्त त्या-त्या यंत्रणांचेच (सरकारांचे नाही) असे म्हणणे असेल तर, फक्त श्रेय त्यांचेच हे ठीक. पण जर अपश्रेयाचे धनी सरकारदेखिल ठरणार असेल तर, श्रेयात त्यांचा वाटा का नाही?

सरकारला जिथे प्रत्यक्ष श्रेय देयचे आहे तिथे दिले आहे. पण जेंव्हा एखादी सरकारी यंत्रणा असते तेंव्हा ती यंत्रणा (तिच्या हक्कांतर्गत) स्वतंत्रपणे कशी काम करते याला देखील महत्व असतेच. , न्यायाधिश, अ‍ॅड उज्वल निकम (पब्लीक प्रॉसिक्यूटर म्हणून) सगळेस सरकारी आहेत. अजून ताणून म्हणायचे झाले तर, तुकाराम ओंबळे पण सरकारी पोलीसच होते, त्यामुळे कसाबला सरकारनेच पकडले असे म्हणता येईल... तिथे पण तुम्ही म्हण्ता तसे म्हणता येईल.

जेंव्हा "जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा" असे म्हणतो तेंव्हा जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने पार पाडणारे या अर्थी म्हणतो. कसाबला पकडल्यावर त्याला अँब्यूलन्समधून नेत असल्यापासून गेली चार वर्षे ज्या पद्धतीने सांभाळले गेले, ते देखील मुंबईसारख्या गजबजलेल्या भागात त्याचे श्रेय हे त्या यंत्रणेचेच असते. सुदैवानी काही घडले नाही पण, जर अघटीत घडून तो पळाला असता, पळवला गेला असता किंवा अगदी त्याने स्वतःला गळफास लावून आधीच मारून घेतले असते, तरी त्यासंदर्भात टिका (अपश्रेय) ही त्या सुरक्षा यंत्रणेवरच झाली असती. अगदी त्या संदर्भात विधानसभा/संसदेत प्रश्न विचारताना देखील तेच घडले असते. अपश्रेय / टिका सरकारवर झालीच असती तर त्यांनी (कायद्याची आणि वास्तव) योग्य शस्त्रे हातात दिली नसती तर...

२६/११ हल्ल्याच्या वेळेस पण टिका ही (राष्ट्रीय) गृहमंत्रालयावर होण्यापेक्षा ती अधिक सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेवरच झाली होती. (आणि देशावरील गंभीर हल्ला असताना सतत फॅन्सीड्रेस सारखे कपडे बदलण्यावर झाली). महाराष्ट्र गृहमंत्रालयावर आणि मुख्यमंत्र्यांवर झालेली टीका ही बुलेटप्रूफ जॅकेट्स न देणे पासून ते फिल्मी दिग्दर्शकांना ताज चा अ‍ॅक्सेस देणे यावर झाली.

तेच अगदी इंदीरा गांधीच्या हत्येच्या वेळेसही झाले होते. असो.

आज सकाळी ११ ला विकिपेडियावर कसाबचे पान पाहीले.
त्यात मॄत्यूचे कारण डेंगू होते.
नंतर बदललेले दिसले.

पण डेंगूच खरा
कारण बडे बडे शहरो मे...

आपण जाणताच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Nov 2012 - 8:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरच फाशी दिली की सरकार काही लपवायचा प्रयत्न करतय?

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2012 - 9:24 pm | अविनाशकुलकर्णी

सांगलीतील ४ मशिदीत आज नमाज झाला नाही अशी बातमी समजतीय. अजुन कन्फर्म नाही..

फेबु मित्र मंडळ

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Nov 2012 - 9:34 pm | निनाद मुक्काम प...

तो मेला आणि पाकिस्तानात शहीद झाला.
आता त्यांचे उदाहरण देऊन अजून बेरोजगार पोरांना धर्मांध केले जाईन.
ये तो मोहरा था. वजीर अभी जिंदा हे,
आणी हो
हे अजून जिवंत आहेत.

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे

हुकुमाचा एक्का (एकाकडून) टाकण्यात आला आहे की हुकुमाचा एक्का (दुसर्‍याच्या) हातातून गेला आहे!

वरील बर्‍याच प्रतिक्रिया वाचून असेच वाटते आहे!! ;)

जानु's picture

21 Nov 2012 - 10:01 pm | जानु

यावर आपल्या 'एका समुहाची' प्रतिक्रिया काय हे पाहणे फार महत्वाचे...........

आशु जोग's picture

21 Nov 2012 - 10:19 pm | आशु जोग

http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab

हे पहावे

यात अगदी वरती काय लिहीले आहे ते महत्वाचे

This article is about a person who has recently died. Some information, such as that pertaining to the circumstances of the person's death and surrounding events, may change as more facts become known.

हुप्प्या's picture

21 Nov 2012 - 10:27 pm | हुप्प्या

सरकारची एक मुख्य जवावदारी असते ती म्हणजे सामान्य लोकांच्या संरक्षणाची. २६/११ ला सरकारने सिद्ध केले की ते त्या कामात कमकुवत आहे. हेरखाते व अन्य विभागांना काही कळले नाही.
एक नराधम अतिरेकी जिवंत सापडला तर त्याच्या फाशीचे घोंगडे इतके भिजत ठेवले. इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो तर बाकी बाबतीत काय आनंद असेल ते विचार करण्याजोगे आहे.
सरकारने आपले कर्तव्य केले आहे आणि त्यात अनाकलनीय दिरंगाई केली आहे. त्याबद्दल जल्लोष करण्याजोगे काही आहे असे मला वाटत नाही.
ज्या करता सरकारला नेमले आहे ते काम त्यांनी बर्‍याच विलंबाने केले.
सुप्रीम कोर्टाने फाशी निश्चित केल्यावर इतका वेळ का गेला आणि संबंधित मंडळींनी त्यावर काय विचार विनिमय केला ह्याचा तपशील माहिती अधिकाराखाली मिळाला तर बरे होईल.
एका गरीब तरूणाला रानटी तत्वज्ञान शिकवून, क्रूर अतिरेकी बनवून शेकडो मैल दूर जाऊन शेकडो निरपराध लोकांना थंडपणे ठार करण्याची प्रेरणा देणारे इस्लामी अतिरेक्यांचे म्होरके ह्यांना कोण आणि कसे संपवणार हा एक प्रश्न आहेच. एव्हाना आणखी डझनभर कसाब पाकिस्तानात तयार होऊन संधीची वाट बघत असतील.

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 11:36 pm | श्रीरंग_जोशी

इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो

कारण भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला संपूर्ण जगात मान मिळतो. जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे भारताबरोबर प्रत्यार्पण करतात.

याविषयी मी वर अधिक लिहिलेच आहे.

चीन किंवा अरब राष्ट्रांमध्ये एवढा वेळ लागला असता तर ती आश्चर्याची बाब असती. पण आपल्याबाबतीत इतर अनेक प्रकरणांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाला पूर्णत्वाकडे पोचवले गेले.

हुप्प्या's picture

22 Nov 2012 - 1:35 am | हुप्प्या

लोकशाहीत न्यायदानात विलंब व्हावा असा संकेत आहे का? का बरे? उशिराने दिलेला न्याय हा अन्यायाच्या तोडीचा असतो असे म्हणतात ते का? की ते लोकशाहीत लागू नाही?
झाले ते उत्तम झाले पण हा सरकारने फार पराक्रम केला आहे असे नाही.

श्रीरंग_जोशी's picture

22 Nov 2012 - 2:13 am | श्रीरंग_जोशी

प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली आजवरची सर्व प्रकरणे बघा...
त्यापैकी एखादेच यापेक्षा अधिक वेगाने पूर्णत्वाला पोचले आहे.

न्यायालयात खटल्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरू व्हायलाच घटनेनंतरचे ६ महिने गेले. सर्व साक्षी, पुरावे गोळा करणे त्यांचे विश्लेषण करून तार्किक क्रमाने त्यांची मांडणी करणे. दोन्ही बाजूंचे वकील,विशेष सत्र न्यायालयाचे स्वतः न्यायमूर्ती व त्यांचे कर्मचारी या सर्वांनी नेहमीपेक्षा अधिक तास काम करून वर्षाच्या आत खटला संपवला होता.

समजा घिसाडघाईने एखादा खटला चालवून प्रत्यक्ष दोषी नसणार्‍याला मृत्यूदंड दिला गेला तर?

न्यायदेवता आंधळी असते अन ती तशीच असावी कारण आपण स्वतः अथवा आपल्या जवळचा कुणीही फौजदारी शिक्षा होऊ शकेल अशा प्रकरणात अडकला तर स्वतःला वाचवायची संधी नाही मिळाली तरी चालेल पण काही आठवड्यात वा काही महिन्यांत खटला पूर्णत्वाला पोचवलाच पाहिजे असा आग्रह आपण धरू का?

जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मग आपला आक्षेप संयुक्तिक आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 9:12 am | श्री गावसेना प्रमुख

इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण नाहीये इथे देशाविरुद्ध युद्ध पुकारणे असा आरोप होता वाटते,
त्यामुळे त्याला फाशी लवकर झाली पाहीजे हे देशवासीयांना वाटने स्वाभावीकच आहे ना.

श्रीरंग_जोशी's picture

22 Nov 2012 - 9:53 am | श्रीरंग_जोशी

# गासेप्र - हो हा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता म्हणूनच इतर कुठल्याहीपेक्षा अधिक वेगाने कार्यवाही होऊन फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या बाबतीत धोका बघता विशेष सत्र न्यायालय तुरुंगाच्या आवारातच चालवले गेले. ते या खटल्यासाठीच स्थापन केले गेले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयांनीही प्राधान्य देऊन नेहमीपेक्षा वेगाने निकाल दिले. सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यापासून केवळ ३ महिन्यांच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. त्यादरम्यान राष्ट्रपतींचे कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य सरकार या तीनही घटकांनी कुठलीही चालढकल केली नाही व दयेचा अर्ज निकाली निघाला.

याच खटल्यात विशेष सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी इतर दोन आरोपी - फहीम + १ (भारतीय नागरिक) यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवून मुक्त केली. कदाचित पोलिसांना अधिक वेळ मिळाला असता तर असे झाले नसते.

नागरिकांच्या भावनांचा आदर करूनच लोकशाहीच्या दोन स्तंभांनी (सरकार व न्यायालय) यांनी प्राधान्यक्रमाने हे प्रकरण तडीस नेले आहे.

भावनांच्या आधारे न्यायालय व सरकारने काम करू नये व ते केलेही जात नाहीच (काही अपवाद वगळता).

समंजस's picture

21 Nov 2012 - 10:35 pm | समंजस

कसाबला फाशी दिली. योग्य तेच झालं.
न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्या बद्दल अर्थातच राजकारण्यांनी (राज्य सरकार + केन्द्र सरकार) चढाओढ करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. फार छान. श्रेय घेणे चांगलेच. या कसाब बाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे श्रेय घेण्या सोबतच अफजल गुरूशी संबंधित न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्या बद्दलचे श्रेय सुद्धा तेव्हढ्याच चढाओढीने घेतील ही आशा ठेवतो.

अवांतर : कसाब हा दुर्दैवी होता. पाकिस्तान ऐवजी भारतात जन्मला असता तर आणखी बरीच वर्षे जगू शकला असता (तुरूंगात राहून का होईना) :)

बातमी वाचून विचित्र वाटतय हे खरं. असल्या मनुष्याला झाली ती शिक्षा बरोबर आहे पण कोणीतरी मेल्यावर काहीतरीच वाटत राहतं.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 9:49 am | श्री गावसेना प्रमुख

आक्का तो कोनीतरी नव्हता,तो अजमल कसाब होता,
त्याने त्याच्या साथीदारांनी मिळुन १६६ लोकांना मारले होते
त्यामुळे त्याच्याबद्दल काहीतरीच वाटायला नको.

ऋषिकेश's picture

22 Nov 2012 - 12:07 pm | ऋषिकेश

यानिमित्ताने (कोणत्याही) फाशीला सातत्याने विरोध करणारे वृत्तपत्र 'द हिंदू' मधील संपादकीय वाचनीय आहे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Nov 2012 - 1:57 am | निनाद मुक्काम प...

कसाब ला फाशी देण्यामागे राजकारण आहे ,
असा आरोप अनेक जण करत आहेत.
पण आजच्या काळात सगळेच पक्ष आपल्या सोयीचे राजकारण करतात. आणि कोणत्याही घटनेतून राजकीय फायदा घ्यायला टपले असतात.
लादेन व कसाब ह्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक तर्क वितर्क करण्यात आले , त्यामागे अनेक थिअरी मांडण्यात आल्या. ह्याचे कारण भारत व अमेरिकेने ही कारवाई अत्यंत गुप्ततेने उरकली.
आता कसाब कसा मेला ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे
तो फासावर चढला ही जगात अधिकृत बातमी आहे. आज समजा भाजपाचे सरकार सत्तेवर आले व मोदी ह्यांनी पंत प्रधान झाल्यावर लगेच कसाब ला फाशी दिली असती तर ह्याचे भांडवल केले नसते का ?
येथे आभासी जगतात आपण आपली लाल करायची ,चमकोगिरी करायची एकही संधी सोडत नाही
राजकारणी तर १ नंबरचे संधी साधू
तो मोहरा होता , वजीर अजून जिवंत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Nov 2012 - 2:02 am | निनाद मुक्काम प...

संयुक्त राष्ट्रे, दि. २० (वृत्तसंस्था) - मृत्युदंड-ाची शिक्षा कायमस्वरूपी हद्दपार करावी अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्र सभेत (युनो) मांडलेल्या प्रस्तावाला हिंदुस्थानसह ३९ देशांनी कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक देशाला आपापले कायदे ठरविण्याचा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद हिंदुस्थानने युनोच्या आमसभेत केला. या प्रस्तावाला ११० देशांनी पाठिंबा दर्शविला असून ३६ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे. आताच्या प्रगत युगात गुन्हेगारांना मृत्युदंडासारखी रानटी शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द करावी असा ठराव युनोच्या आमसभेत आज मांडण्यात आला. ११० विरुद्ध ३९ अशा मतांनी तो मंजूरही केला. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी बंधनकारक नसून स्वैच्छिक असली तरी त्याच्यासाठी जागतिक जनमताचा दबाव विरोध करणार्‍या देशांवर पडणार आहे.............................. ही कालच्या सामन्या मधे बातमी आली आहे ,

आणि लगेच कसाब ला फाशी देण्यामागे काही संबंध असू शकेल का
आणि नसला तरी जगात समोर आपले म्हणणे ठामपणे मांडून ते जगातील प्रगत देशांच्या मताची पर्वा न करता प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या आपल्या सरकारचे अभिनंदन

पैसा's picture

24 Nov 2012 - 9:03 pm | पैसा

आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा कसाब मेला. आणि शहीद हेमंत करकरे,विजय साळस्कर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन आणि मुंबई हल्ल्यात शहीद झालेले इतर निरपराध नागरिक यांच्या आत्म्यांना काही प्रमाणात न्याय मिळाला.

कसाब गेला तो गेला आणि कुणाला घेऊन गेला

ते पहा
.
.