आपण सामन्यपणे इंग्लंड, नायजेरिया इत्यादी देशांतून येणार्या स्कॅम इ-मेल सोबत परिचित आहोत. पण काल मी असा फ्रॉड बघितला की माझे डोळेच पांढरे झाले.
मी सध्या गृहकर्जाच्या शोधात आहे, त्यामुळे तुम्हाला कर्ज हवे आहे का असे विचारणारा कोणताही फोने कॉल मला हवाहवासा वाटतो. तर सांगायच्रे असे की, मला काल एका दिल्लीस्थित कंपनीतून कॉल आला. त्याने मला पर्सनल लोन ची ऑफर दिली.
त्याचे म्हणणे थोडक्यात असे की.
१. तुम्ही रिलायन्स मनी मल्टिप्लायर चा प्लॅन घ्यायचा.
२. त्या इंशुरन्स च्या बदल्यात रिलायन्स तुम्हाला त्याच्या १० पट कर्ज देणार.
३. कर्ज ०% दराने असेल. तुम्ही १० वर्षात हे कर्ज फेडु शकता.
थोडी माहिती काढल्यावर कळले की हा एक फ्रॉड आहे, आणि, पॉलिसी काढल्यावर हा पुन्हा माझ्याकडे पाहणार ही नाही. अर्थात मी त्याला ** दाखवणारच आहे. पण इतरांना सावध करावे म्हणून इथे पण लिहिले.
याबद्दल मला पुढील प्रश्न आहेत.
१. हा कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे का? असेल तर याला शिक्षा काय?
२. तक्रार करायची असेल तर कुठे करायची? आणि अशा परिस्थितीत गुन्हेगार पकडला जऊ शकतो का?
अधिक माहिती -
ग्राहक सेवा
फोन क्रमांक - ०११-४८७८४८००
प्रतिक्रिया
23 Nov 2012 - 4:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे
If something sounds too good to be true, most of the time, it is not true :-)
23 Nov 2012 - 5:50 pm | श्री गावसेना प्रमुख
http://www.bankbazaar.com/personal-loan.html?Short=Yes&M=Reqd&WT.mc_id=T...
23 Nov 2012 - 6:10 pm | मस्त कलंदर
तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये नांव, इमेल आयडी आणि फोन नंबर देणं अनिवार्य आहे. कशावरून ते हा विदा विकणार नाहीत आणि तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये आणखी कॉल्सची भर पडणार नाही?
23 Nov 2012 - 6:17 pm | श्री गावसेना प्रमुख
इमेल आयडी व फोन नंबर, ह्यावरुन आपण पाहीजे त्याला ब्लॉक करु शकतो .
मला तर एकही कर्ज घ्या म्हणुन फोन येत नाही.
अशा वेळेस डुपल असु द्यावे.
आणी कर्ज घेणारा गरजवंत असतो तो कशाला ह्या कडे लक्ष देइल
23 Nov 2012 - 10:22 pm | utkarsh shah
मला देखिल असा फोन आला होता. २० मिनीट बोलण्यानंतर मला देखिल हे जाणवले की हा फसवणूकीचा प्रकार आहे.
त्या फोनवाल्या स्त्रीने website देखील Reliance ची साईट सांगितली तेव्हा तिचा उच्चार ऐकुन थोडी शंका आलीच.
तिचा उच्चार .com यासाठी डॉट कॉम असा न करता डॉट कोम असा केला. चला वाचलो म्हणायचो एकंदरीत...
24 Nov 2012 - 12:37 am | टिल्लू
http://www.consumercourt.in/life-insurance/43055-reliance-life-money-mul...
24 Nov 2012 - 6:50 am | खटासि खट
विमा लोकपाल नावाचा प्रकार असतो. त्यांच्याकडे तक्रार द्यावी. विमा कंपन्यांवर नियंत्रणांसाठीही एक संस्था आहे त्यांच्याकडेही तक्रार देता येते. इन्शुरन्स रेग्य्लेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (आयआरडीए) असे काहीसे नाव आहे. त्याचबरोबर मोबाईल सेवेचा व्यावसायिक कारणासाठी केलेल्या उपयोगाबद्दल आता तक्रार देता येते. कन्झ्युमर कोर्टाची लिंक वर दिलेली आहेच. सायबर लॉ खाली हा गुन्हा होऊ शकतो का ते पहायला हवे.
तुम्ही कृती करताय याबद्दल अभिनंदन !