गाभा:
मिपाकरहो ,एका जवळच्या मित्राचे पुढच्याच आठवड्यात लग्न आहे.
उखाणे घेण्याच्या बाबतीत त्याने माझ्याकडे मदत मागितली आहे.
मी मिपा शिवाय कोणाकडे मदत मागणार?
मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात.
ह्या बाबतीत मुलांची विकेटच पडते.
तुमची सगळी कल्पनाशक्ती पणाला लावून काहीतरी वेगळे उखाणे सांगा मुलांसाठी.
प्रतिक्रिया
21 Nov 2012 - 10:58 am | श्री गावसेना प्रमुख
उखाणे
उखाणे
हे चालतील का?
21 Nov 2012 - 5:13 pm | स्पंदना
हा घ्या!
आला आला वाघ....खातोय काय?
+++++च नाव घ्यायला भितोय काय?
22 Nov 2012 - 6:16 pm | कपिलमुनी
ट ला ट.. ड ..ढ ..
रस्त्यावर पान खाउन नका थुंकू..
आणि +++ लावते माझ्या नावाचं कुंकू :P
23 Nov 2012 - 12:12 am | काळा पहाड
बगतूस काय माकडा रागानं
*** बरूबर लगीन केलया वागानं
23 Nov 2012 - 12:20 am | सुहास..
काही लिंका आहेतच पण हे माझे दोन पैसै ! ( पण लई कामाचा आहे .)
नावाची काय बिषाद
आणि ** माझ्या खिशात
;)
23 Nov 2012 - 12:31 am | जेनी...
ए मी पण मी पण
इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय
इवल्या इवल्या हरणाचे वाकडे तिकडे पाय
****** अजुन उठली नै , घोरत पडलिय कि काय ... ;)
23 Nov 2012 - 7:21 am | काळा पहाड
१ लंबर
23 Nov 2012 - 8:35 am | श्री गावसेना प्रमुख
23 Nov 2012 - 7:17 am | काळा पहाड
पहिली गंगू दुसरी पारू तिसरी मनी
सोडल्या तिघी नी झालो +++ चा धनी
23 Nov 2012 - 7:24 am | काळा पहाड
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
+++ आहे मोठी लुच्ची
23 Nov 2012 - 10:32 am | ज्ञानराम
१. जर मुलगा Food Industry मधे कामाला असेल तर अस नाव घेऊद्या.....
पार्लेची बिस्किटे , बेडेकरचा मसाला.
****** नाव घ्यायला उशीर लाऊ कशाला...
२. जर मुलगा NRI असेल तर अस नाव घेऊद्या.....
चिनचा कप , अमेरीकेची बशी
***** सोडली तर , बाकी सगळ्या म्हशी ( हे नाव रिस्क पतकरायची असल्यास घेऊ शकतात...)
3. जर मुलगा CA/Accountant असेल तर अस नाव घेऊद्या....
Audit च्या दिवशी भेट आमची झाली ...
******* ला पाहताच balancesheet झाली Tally...
4. जर मुलगा Doctor/Pharmaceutical असेल तर अस नाव घेऊद्या....
धन्वनंतरीच्या आशिर्वादाने , चालूदे जोरात क्लिनीक ...
******* च हास्य म्हणजे , आयुश्यभराच Tonic.
5. जर मुलगा Truck Driver असेल तर अस नाव घेऊद्या....
बुरी नझर वाले , तेरा मूह काला,
मि किशोर आणी ****** माझी मधूबाला...
६. जर मुलगा वकिल असेल तर अस नाव घेऊद्या....
गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही..
****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही
७. जर मुलगा लेखक असेल....
शाईचा पेन त्यात.. Camel ची शाई ...
***** ला पाहीलं , आणी केली लग्नाची घाई .
८. जर तो क्रिकेटर असेल तर...
cricketchya धावपट्टीवर, शतकं सचीनची घडली
****** शी लग्न झालं , आता विकेट माझी पडली...
.....
९. जर मुलगा politics मधला असेल...
आश्वासन देतो आज , खोट कधी बोलणार नाही...
घड्याळयाची शपथ , हात ***** सोडणार नाही....
.....
23 Nov 2012 - 10:37 am | श्री गावसेना प्रमुख
गितेवर हात ठेवतो ... खोट कधी बोलणार नाही..
****** आहे माझी केस , तिला जिंकल्या शिवाय राहणार नाही
23 Nov 2012 - 12:14 pm | बॅटमॅन
आयला एक नंबर उखाणे!!!!
23 Nov 2012 - 11:04 am | अमोल केळकर
यापुढे मी कधीच
मागणार नाही मदत
+++ आली आयुष्यात
अन बदलले माझे दैवत
23 Nov 2012 - 12:11 pm | RUPALI POYEKAR
झक्कास
23 Nov 2012 - 12:21 pm | ज्ञानराम
आयला एक नंबर उखाणे!!!! . .....,?>>>>>> धन्यवाद :)
23 Nov 2012 - 12:22 pm | खटासि खट
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
लग्नात हसतंय, क्षक्षक्षला फसलंय
सांग मी काय करू ?
23 Nov 2012 - 1:50 pm | दादा कोंडके
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....
____चं नाव घेतो माझा नंबर पैला.
26 Nov 2012 - 10:25 am | विजय मुठेकर
ग्रेट पुलं......
23 Nov 2012 - 2:24 pm | इष्टुर फाकडा
काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा...
काळा काळा माठ, माठात चंदनी वाळा...
आणि क्ष्क्ष चं नाव घेतो,
पाणी गाळा आणि नारू टाळा :)
23 Nov 2012 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
देवगडचा अंबा,गोव्याचा काजू
------चं नाव घ्यायला मी कशाला लाजू...? ;-)
23 Nov 2012 - 2:53 pm | सूड
देवगडचा 'अंबा' ?
आंबा म्हणायचंय का गुर्जी? बाकी लाजू नका. चांगला मोठ्यांदा घ्या उखाणा.
23 Nov 2012 - 2:48 pm | ज्ञानराम
मग नका लाजू . .;)
23 Nov 2012 - 2:49 pm | ज्ञानराम
मग नका लाजू . .:;)
आमच्या वहिनीच नाव घेऊन टाका चला
23 Nov 2012 - 2:54 pm | मृत्युन्जय
१.
माठावर माठ बशीवर बशी,
माझी ****** सोडुन बाकी सगळ्या म्हशी
२.
बाटलीवर बाटली खोक्यावर खोका
********** माझी मांजर मी तिचा बोका
23 Nov 2012 - 3:00 pm | श्री गावसेना प्रमुख
सोडुन बाकी सगळ्या म्हशी
माझी मांजर मी तिचा बोका
23 Nov 2012 - 2:56 pm | श्री गावसेना प्रमुख
देवगडचा रवा,गोव्याचा खवा
नाव नाय घ्यायच आता तुम्ही जावा
23 Nov 2012 - 3:03 pm | सूड
चौसोपी वाडा
वाड्याच्या मागं ओढा
ओढ्यात मासोळ्या
सोनेरी निळ्या
एक मासोळी गावली
हसत हसत म्हणाली
"काय तुला देऊ?"
म्हणलं,"दिपीका गेलीय दौर्यावर
आता कुणाकडं पाहू?"
-(अगदी खरे)
23 Nov 2012 - 4:17 pm | ज्ञानराम
मस्तच...
26 Nov 2012 - 9:37 am | लीलाधर
!!! गणपतीला वाहतो चांदीच्या २१ दूर्वा,
........ चं नाव घेतो पूढचा उखाणा ठरवा !!! :)
26 Nov 2012 - 10:45 am | अमितसांगली
अग माझ्या लाडाची ...
तुला देतो लॉटरीचा पैसा
पैश्याने गोव्याला जायच
जाताना दोघ, येताना तिघ..
26 Nov 2012 - 12:49 pm | श्री गावसेना प्रमुख
लॉटरी किती लाखाची लागलीय नाही म्हणजे वर्षभर रहाव लागेल ना तिथे.
दत्तकच घेणार बाळाला
कि असतांनाच जाणार गोव्याला
26 Nov 2012 - 11:11 am | भिकापाटील
सोन्याची सायकल
तिला चांदीची किटली
***** कितीही नटली
तरी मला नाही पटली...
;)
26 Nov 2012 - 6:04 pm | शैलेन्द्र
दिवसोंदीवस वाढत चाल्लीये महागाई;
__ ल म्हणाव, संसार नीट कर बाई..
28 Nov 2012 - 2:55 pm | सुकामेवा
मिसळी बरोबर खावा नेहमी पाव,
**** चे नाव घ्यायला लाजू कशाला राव.......................
28 Nov 2012 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार
मित्राला उखाण्या पुरतीच मदत हवी आहे का ?
28 Nov 2012 - 3:10 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांच्या मित्राच लग्न एव्हाना झालही असेल कारण त्यांनी पुढच्या आठवड्यात आहे असे सांगीतले होते ना(मा.पंखा साहेब काय बर नाव घेतलय तुमच्या मित्रान)
29 Nov 2012 - 1:43 am | अभ्या..
हा बघा मग अस्सल मराठी वानवळा
फक्त नवरीने असला एखादा उखाना घेतला तरच तुमच्या मित्राला मदत करा
नायतर हायेच की ट ला ट.
सारवून सुरवून केला पोळा
पंचमीनं उघडला डोळा
पंचमीची काढते चितरं
आली म्हाळाची पितरं
म्हाळाची निवडते डाळ
आली घटाची माळ
घटाचे घेते सोनं
पाडव्याने केलं येणं
पाडवा घेतो झोंबी
शिमगा देतो लोंबी
शिमग्याची करते खीर
शिंपण्याला नाही धीर
दिवाळीची घेते पणती
संक्रांत आली नेणती
संक्रातीला पुजते करा
---------नांव घेते
बेंदरापत्तुर धीर धरा.
29 Nov 2012 - 1:54 am | तिरकीट
आयुष्य खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवणार
या पूढचे सगळे उखाणे माझ्यावतीने ------घेणार
29 Nov 2012 - 9:05 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्ही तुमच्या परीने मदत केली...
मी माझ्याकडून उखाणे लिहून पाठवले...
आजच मित्राचे शुभमंगल झाले....आम्ही जेवण चेपले....
पण त्याने उखाणे घ्यायच्या ऐन वेळी माती खाल्ली....
असो.....दैव देते आणि कर्म नेते.....दुसरे काय?