राम राम मंडळी,
मिसळपाव पंचायत समितीचे काम सध्या खालील मंडळींनी पाहायचे मान्य केले आहे, त्याकरता ह्या सर्वांचे मनापासून आभार..
१) नीलकांत
२) प्रियाली
३) आजानुकर्ण
४) कोलबेर
५) विकास
मिसळपाव ग्रामपंचायतीमधील लेखनाचा आणि प्रतिसादांचा दैनंदिन कारभार कसा चालावा, कसा चालू नये हे सर्व ठरवण्याचा संपूर्ण अधिकार या मंडळींचा आहे! खुद्द विसोबा खेचर हा इसमही याला अपवाद असणार नाही/असू नये असे वाटते!
सदर पंचायत समिती ही तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीकरता काळजीवाहू किंवा हंगामी म्हणून काम पाहील. त्यानंतर निवडणुका होऊन पुढची पंचायत समिती अस्तित्वात येईल. निवडणुकीतून कुणाला निवडून द्यायचे किंवा नाही हे मिसळपावची ग्रामस्थ मंडळी ठरवतीलंच!
तो पर्यंत मात्र वरील पंचायत समितीचा निर्णय सर्वांना 'पाचामुखी परमेश्वर' या न्यायाने बंधनकारक राहील. ग्रामस्थांनी आपल्या सर्व शंकाकुशंका, कंप्लेन्टी वरीलपैकी कुणाहीकडे कराव्यात!
जय खंडोबा!
जय अंबाबाई!
जय रवळनाथ!
कळावे,
सरपंच,
मिसळपाव बुद्रुक,
तालुका - ड्रुपल
जिल्हा - आंतरजाल!
प्रतिक्रिया
18 Sep 2007 - 1:34 pm | सहज
श्री. कोलबेर यांना सोडून बाकीच्या मंडळीची बरोबर कल्पना होती. खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते.
-----------------------------------------------
"हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-)
18 Sep 2007 - 2:04 pm | विसोबा खेचर
खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते.
कदाचित, ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे सरपंचांनी त्यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप होऊ नये याकरता त्यांची नांवे गाळली असतील! :)
सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही! एकदा आमच्या देवगडात येऊन राहा ८ दिवस! :) किंवा चला आमच्यासोबत शरदरावांच्या बारामतीला! :)
18 Sep 2007 - 2:22 pm | सहज
>>ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे
हे लय भारी बघा तात्या, आता तुम्हाला कोणी म्हणाल की राव आपल्याला का नाही विचारल तर म्हणायच "असो तुम्ही आमचे एकदम खास म्हणुन...."
गूड वन. राजकारण नाही शिवाय गावात नाही म्हणून तर सूखी आहे, सदरा पाहीजे असल्यास कळवा.
18 Sep 2007 - 2:10 pm | प्रकाश घाटपांडे
"हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-)
आमच्याकं कुस्त्याच्या फडाला ' हगामा' म्हन्त्यात. कुनिबी जिकल तरि रेवडी भेटतिये.
प्रकाश घाटपांडे
18 Sep 2007 - 6:31 pm | विसोबा खेचर
प्रकाशराव,
या हंगाम्याची पुरेशी रेवडी भेटली की नाही? की हव्ये अजून? :))
बाकी मिसळपाववर आल्या आल्या सगळ्यांना रेवड्यांचा प्रसाद बाकी छानच मिळाला नाही?! :)
आपला,
(रेवडीखाऊ व रेवडीउडवू!) तात्या.
18 Sep 2007 - 4:08 pm | प्रियाली
>>सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही!
हे राजकारण असेल तर स्त्रियांना ३३% आरक्षण पाहिजे बॉ! - ह. घ्या.
एक खुलासा: पंचायत समितीत मी पोलिसपाटील या आयडीचा उपयोग करते. प्रियाली या आयडीकडे कोणतेही विशेषाधिकार नाहीत याची कृपया नोंद घेणे. निवडणूक झाल्यावर निवडून आलेल्या सदस्यांना पोलिसपाटील ही आयडी बहाल करता येईल अशी कल्पना आहे.
18 Sep 2007 - 4:16 pm | सहज
प्रियालीताईंचा दराराच आहे एवढा की "पोलिसपाटील" शिवाय काही वेगळे नाव असूच शकत नाही.
मला तर त्या तडफदार , कर्तव्यदक्ष, चकाचक युनीफॉर्ममधील विजयाशांतीच अस काही तरी डोळ्यासमोर येते. आवडल नसेल पण जाउ दे आपण किरण बेदी मॅड्म नी फेस रिप्लेस करु :-) ह. घ्या.
18 Sep 2007 - 5:33 pm | प्रियाली
या दोन्हीही मला आवडतात. ;-) पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते.
- प्रियाली होम्स.
19 Sep 2007 - 5:27 am | गुंडोपंत
पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते.
धन्यवाद!
आपली ती काळी गोल टोपी व भिंग राखण्याची हातोटी आहेच यात शंका नाही! :))
आपला
गुंडोपंत
18 Sep 2007 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हंगामी/काळजीवाहू पंचायत समितीतील वरील सर्व सद्स्य उत्तम प्रशासन (उत्तम हॉटेल) चालवतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
सहजराव,आपण जो आमच्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल आभारी !
( पण तात्या जे म्हणतात ते १०० % खरं आहे )
18 Sep 2007 - 5:29 pm | राजीव अनंत भिडे
बोलल्याप्रमाणे सरपंचांनी पंचायत समितीतल्या लोकांची नांवे इथे जाहीर करून प्रशासकीय पारदर्शकताच सिद्ध केलेली आहे असे म्हणावे लागेल. इतर संकेतस्थळांवर वावरताना प्रशासनात कोण कोण मंडळी आहेत याबाबतचा इतका पारदर्शक आणि स्पष्ट खुलासा मला तरी कुठे पाहावयास मिळाला नाही. विशेष करून मनोगताचा कारभार कोण मंडळी पाहतात याबाबतचे लोकाभिमूख असलेले जाहीर निवेदन मी शोधले परंतु मला सापडले नाही. कदाचित विनायक योग्य तो दुवा देऊन मला या कामात मदत करू शकेल असे वाटते! ;)
असो!
सरपंचांच्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पंचायत समितीला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! लोकशाहीचा विजय असो!
अवांतर - 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!' असं काहीसं संतवचन आहे. कुणा संताचं आहे हे माहिती नाही, कृपया संतसाहित्याच्या अभ्यासकांनी खुलासा करावा! ;)
(मिसळपाव ग्रामस्थ) राजीव अनंत भिडे.
19 Sep 2007 - 6:28 am | सर्किट (not verified)
वरील पांचांपैकी तीन लोकांची नावे मी एका जुन्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांना सुचवली होती. आणि त्यांना ती मान्य होती. चौथी व्यक्ती त्यावेळी भारत दौर्यावर होती, त्यामुळे ते नाव मनात असूनही सुचवायला शक्य झाले नाही. पाचवी व्यक्ती माझ्या नित्य संपर्कात असल्याने तिचे नाव मनात असूनही सुचवणे मला योग्य वाटले नाही. असो.
पण ही नावे ठरवण्याबद्दल तात्या आणि माझी काहीही चर्चा झालेली नाही. आणि तरीही आमचे मत इतके जुळले, हे बघून आनंद झाला. (अत्यानंद झाला, असे लिहिणार होतो, पण ते व्यक्तिगत ठरले असते.)
जेव्हा निवडणुकीची वेळ येईल, तेव्हा मी ह्याच पाचही लोकांना नॉमिनेट करणार आहे.
- सर्किट
7 Oct 2007 - 5:25 pm | राजे (not verified)
काळजीवाहू,
माझा प्रतिसाद कोठे आहे हे सांगा पहिल्यांदा..... ब-याबोलाने नाहीतर..... अजून एक प्रतिसाद लिहीन तुमच्या नावाने ;}
मी येथे "भूलनगरी" प्रतीसाद दिला होता काल ... त्यात काहीच वाईट, अभद्र, शिव्या तसेच पुरातन कालीन शब्दामध्ये लिहले नव्हते फक्त वा ... छान... मस्तच असा प्रतिसाद [ह्या पध्दतीचा] दिला होता पण तो सध्या गायब आहे का ?
मागे देवांनी देखील माझ्या विभागीय लेखनाला [सफर ..... १/२/३/४/५/६/.............] ला कोठेतरी प्रतीसाद दिला होता तो देखील गायब आहे असे त्यांचे म्हणणे आहे [ मी त्याना शक्यतो भुताटकी आहे असे सांगून गप्प केले होते, पण मला शंकाच नाहीतर विश्वास आहे ही मिसळ बरोबर तुम्ही लोक भुताटकी देखील वाढता / सर्व करता]
लवकर सांगा माझा प्रतिसाद कोठे आहे तो......... नाहीतर प्रियाली ह्यांना नवीन भयकथा लिहण्यासाठी सांगेन....... नाहीतर टिकाकार, टिकाकार-१ अश्या महान सदस्यांना पुन्हा आपले लेखन चालू करण्यासाठी सांगेन.
[बाबा, निलकांता... लवकर मार्ग शोध रे नाहीतर आम्ही व तात्या काळे निळे होऊ रे जरुर]
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
8 Oct 2007 - 5:21 pm | विकास
नमस्कार राज साहेब,
पंचायत समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आले आहे की आपला प्रतिसाद कोणी उडवलेला नव्हता. तसेच प्रमोदरावांच्या बाबतीतपण तसे कोणी केले नसल्याचे लक्षात आले. तेंव्हा काहीतरी ही तांत्रीक गडबड असावी पण नक्की काय ते आम्हाला पण समजलेले नाही.
थोडक्यात गैरसमज नसावा ही विनंती.
मिसळपाव हंगामी पंचायतीच्या वतीने
विकास
8 Oct 2007 - 7:29 pm | राजे (not verified)
अहो हे मला देखील उमगल होते पण वरील प्रतिसाद मिसळपाव वर प्रेमाचे एकदमच उचंबळून आले व लिहला गेला... बाकी माझ्या कडून काही हरकत नाही माझ्या एक्-एक प्रतिसादाची कॉपी माझ्या कडे असतेच ;}
गैर -समज करुन घेण्या ईतका मी समजदार नाही आहे, पण तुम्ही प्रेमाने लिहले आहे तर तुमचे मन का मोडा ..ठीक आहे विनंती मान्य ;}}
हा घ्या ह. [ह.घ्या.]
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....