अलख

क्रान्ति's picture
क्रान्ति in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 11:43 am

हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी

झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे

या मूक उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे

ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा

footer

प्रतिक्रिया

कवितेतले शब्दसौंदर्य अतिशय आवडले.

विसुनाना's picture

12 Nov 2012 - 1:19 pm | विसुनाना

सांजगहिरी कविता आवडली.

ही माझी कविता आठवली.

सुहास झेले's picture

12 Nov 2012 - 3:02 pm | सुहास झेले

मस्त गं....

अभ्या..'s picture

18 Nov 2012 - 12:30 am | अभ्या..

वल्लीदादांना सहमत.
खरोखर खूप छान शब्दसौंदर्य.

यशोधरा's picture

18 Nov 2012 - 9:08 am | यशोधरा

सुरेख!

पैसा's picture

20 Nov 2012 - 7:31 pm | पैसा

पण इथे थांबू नको अशी विनंती करते. मिपावर तुझ्या कविता येत राहू देत!

चाफा's picture

21 Nov 2012 - 5:17 pm | चाफा

क्रांतीतै , कविता अप्रतीम
नव्या घटनेनं आणखी पार्श्वभुमी गुढ झाली

क्रांतीताई तुमच्या सार्‍याच कविता अतिशय आवडतात.

चेतन's picture

25 Nov 2012 - 12:17 pm | चेतन

सुंदर कविता

चेतन