http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17248448.cms
मांसाहारी लोक खोटारडे असतात आणि बलात्कारासारखे गुन्हे मांसाहारी लोकांकडूनच जास्त घडतात असा आचरट धडा एन सी ई आर टी च्या पाठ्यपुस्तकात आढळला आहे. हा शोध कुणी आणि कसा लावला आणि तो पाठ्यपुस्तकात नेमावा हे कुण्या विद्वानाच्या भेज्यातून निघाले हे बघणे उद्बोधक ठरेल.
मला वाटते भारतात ५० टक्क्याहून अधिक लोक मांसाहारी असावेत. इतक्या लोकांना खोटारडे आणि बलात्कारी ठरवणे केवळ ते अमुक एक प्रकारचे अन्न खातात म्हणून हे अगदी अचाट आहे. मांसाहार हा काय एका पारड्यात घालून मोजता येतो का? विविध प्रकारचे, विविध प्राण्यांचे, वेगवेगळ्या अवयवांचे मांस, विविध पद्धतीच्या पाककृती, वेगवेगळ्या प्रमाणात सेवन हे सगळे सारखे मानणे हाच मुळी अपमान आहे. आणि त्याचे तथाकथित दुष्परिणाम हे आणखी पुढचे पाऊल!
असले भलते सलते लिहिणार्यांना मिपावरील तरबेज खानसाम्यांच्या सामिष पाककृती वाचायला लावल्या तर ते ताळ्यावर येतील याबद्दल मला तरी शंका नाही!
प्रतिक्रिया
17 Nov 2012 - 8:20 pm | आनंदी गोपाळ
होईन असे वाटले नव्हते. पण या धाग्यातील सर्व मुद्यांशी सहमत.
17 Nov 2012 - 8:22 pm | रेवती
हा पॉपकॉर्नी धागा असेल का? ;)
बाकी सहमत. गणपाला कोणी काही म्हणून तर बघा......;)
18 Nov 2012 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा
हॅ हॅ हॅ... मांसाहारा बद्दलचा अगदी हाच मुद्दा 8 वर्षापूर्वी "शास्त्र असे सांगते" या विनोदि पुस्तकात वाचला होता.त्याची अठवण झाली. :-)
18 Nov 2012 - 11:54 pm | आशु जोग
अत्रुप्त आत्मा,
'शास्त्र असे सांगते' याबद्दल कमेंट लिहिलीत ते बरे झाले.
आम्ही अजून ते वाचलेले नाही, पण काही लोकांकडून ते वाचण्याचा आम्हाला गेली अनेक वर्षे आग्रह होतो आहे.
19 Nov 2012 - 12:46 am | आशु जोग
शाकाहारी गावरान कोंबडी खाणं हे सर्वात चांगलं
असं आम्ही मानतो
19 Nov 2012 - 1:40 am | निनाद मुक्काम प...
आमच्यावेळी अशी शैक्षणिक करमणूक का बरे नव्हती ?
19 Nov 2012 - 9:08 am | श्री गावसेना प्रमुख
त्यांच्याकडुन बहुतेक नॉन व्हेज कॅटेगरीत मांसाहार आणी अॅडल्ट मटेरीयल अशी सरळ मिसळ झाली असावी.जशी मानसीकता तसे विचार