माझ्यातली चार अंगे..

ह भ प's picture
ह भ प in काथ्याकूट
16 Nov 2012 - 11:11 am
गाभा: 

साधारण दोन वर्षापुर्वी वाचनात आला हा लेख.. कुठुन आला, कसा आला आठवत नाही.. तेव्हा लिहुन ठेवला होता.. ईंग्रजीतून होता, मी माझ्या कुवतीप्रमाणे मराठीत मांडत आहे. तो लेख असा होता -

ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे..

----- त्याच्या पासून दूर रहा.

ज्याला माहित नाही अन त्याला माहित आहे की त्याला माहित नाही - तो सरळमार्गी आहे..

---- त्याला शिकवा.

ज्याला माहित आहे अन त्याला माहित नाही की त्याला माहित आहे - तो निद्रिस्त आहे..

---- त्याला जागवा.

ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे..

---- त्याचं अनुकरण करा.

माणसांचं सरळ सरळ चार विभागात वर्गिकरण केलंय. मला असं वाटतं यातला प्रत्येकी थोडा थोडा भाग आपल्या सगळ्यांत असतो. थोडं स्वतःला विचारून बघितलं तर लक्षात येईल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा..

अन हे लिखाण कुणाचं आहे हे जर कोणी सांगू शकलं तर मग क्या बात है..!!

प्रतिक्रिया

त्याने ना धड आपल्यात देवाचे सगळे गुण दिले ना धड राक्षसाचे सगळे गुण दिले. त्याने ह्या दोघांच्या गुणापासुन तिसरच उत्पन्न केल ते म्हंजे मानव किंवा मनुष्य. बर ह्यात त्याने आपल्याला उत्पन्न तर केलच पण दोघांचेही गुण समप्रमाणात दिले व ते कधी वापरायचे ते त्या त्या मनुष्याच्या स्वभावावर व त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर सोडले.
पण माणसाच्या आयुष्याचा अंतिम निकाल किंवा शेवट त्याने आधिच लिहुन ठेवले आहे. ते म्हंजे मरण. आयुष्याची परिक्षा माणसाने कशीही दिली तरी अंतिम निकाल सगळ्यांचा ऐकच ते म्हंजे मरण.

यसवायजी's picture

16 Nov 2012 - 1:25 pm | यसवायजी

ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे..

या आधी पण हे वाचलं होतं..पण एक शंका..

त्याला माहित नाही म्हणुन त्याच्यापासुन दूर का राहायचं ?.. तो मुर्ख नसेल कदाचित..
उदा: १)लहानांना समजवावे लागते - वयाने किंवा बुद्धिने लहान :-)
२)एखाद्या गोष्टीचे दुष्परीणाम माहित नसतील, तर intervention ची गरज असते..
३) समजा सार्‍या जगाला जर माहिती नाही की, प्रुथ्वि गोल आहे. ते अजुन प्रुथ्विला सपाट आहे असे मानतात.. तर जगाला मुर्ख म्हणुन सोडुन देणार??

*** जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी शिकवावे|शहाणे करुन सोडावे सकल जन ***

सर्वज्ञ's picture

16 Nov 2012 - 1:41 pm | सर्वज्ञ

क्रुपया इथुन पुढे लेखकाने सोप्या भाषेत लेख प्रकाशित करावेत्.हिच माफक अपेक्शा.:)

अभ्या..'s picture

16 Nov 2012 - 4:48 pm | अभ्या..

ज्याला माहित नाही अन त्याला माहित आहे की हे काय आहे - तो धागा आहे इथला.

त्याला प्रतिसाद देत रहा. (काही कळले नाही तरी) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Nov 2012 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा

मी नाही मी नाही मी नाही.... बाजार उठवला =))

तिमा's picture

16 Nov 2012 - 8:40 pm | तिमा

ज्याला माहित नाही की तो माहुत नाही त्याने हत्तीवर बसण्याचा प्रयत्न करु नै!

मैत्र's picture

16 Nov 2012 - 8:48 pm | मैत्र

पार बाजार उठवला तिमा भौ!!

पिवळा डांबिस's picture

16 Nov 2012 - 11:30 pm | पिवळा डांबिस

:)

थोडक्यात एका व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीबाबत, दूर राहणे, शिकवणे, जागवणे आणि अनुकरण करणे, ह्या चारच गोष्टी करू शकते!

म्हणजे, डोळा मारणे, लगट करणे इत्यादि गोष्टी करायला स्कोपच नाही!! ;)

कठीण आहे!!! :(

(ळूच लतीकडे हाणारा) सुनील

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 11:58 pm | १००मित्र

ज्याला हे कळलं, की त्याला माहित आहे किंवा नाही त्यानी घंटापण फरक पडत नाही तो "शहाणा".

कळावे. लोभ आहेच.

मानवी मनाच्या चार अवस्था दर्शवतं

१) ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे
२) ज्याला माहित नाही अन त्याला माहित आहे की त्याला माहित नाही - तो सरळमार्गी आहे
३) ज्याला माहित आहे अन त्याला माहित नाही की त्याला माहित आहे - तो निद्रिस्त आहे..
४) ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे..

१) मृत्यू निश्चित आहे पण ती घटना जणू घडणारच नाही ही मूढ मानसिकता आहे. मूढचा अर्थ मूर्ख नाही, ज्याला वेळ निघून गेल्यावर समजतं असा. प्राणी या मानसिकतेत जगतात `ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही' त्यामुळे ते निवांत दिसतात. अशा मानसिकतेत जगणारा माणूस वरकरणी मजेत दिसतो पण ती मूढता आहे. मृत्यू आल्यावर काहीही उपाय रहात नाही.

२) मृत्यूची अनिवार्यता जाणणारा `जीवंत आहोत हीच काय मेहेरबानी आहे' या जाणीवेनं कृतज्ञ होतो. त्याचं आचरण बदलून जातं. त्याला सत्य सापडलेलं नसतं पण मृत्यू बेदखल करत जगता येणार नाही हे माहिती होतं. तो सरळ आणि साधं जगायला लागतो.

३) आपण सर्व मुळात सत्य आहोत, आपल्याला मृत्यू नाही पण जोपर्यंत आपण देहापासून वेगळे आहोत हा आपला अनुभव होत नाही तोपर्यंत आपली अवस्था : `ज्याला माहित आहे अन त्याला माहित नाही की त्याला माहित आहे' अशी असते. ही सर्व प्राणीमात्रांची सहज स्थिती आहे कारण `कुठे तरी खोलवर आपण मरणार नाही' हे आपल्याला माहिती आहे. आकार विलीन होतो, निराकाराला काहीही होत नाही. पण जोपर्यंत आपण निराकार आहोत हा आपला अनुभव होत नाही तोपर्यंत भीती आणि चिंता सुटत नाही. `स्वतः स्वरूप असून स्वरूपाचा बोध नसणं' ही निद्रिस्त अवस्था आहे.

४) आपण सत्य आहोत हा उलगडा ज्याला झाला त्याची मानसिकता : `ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे' अशी होते. तो चिंता मुक्त आणि स्वच्छंद होतो.

१००मित्र's picture

18 Nov 2012 - 4:21 pm | १००मित्र

प्रिय संजय भाऊ,

४) आपण सत्य आहोत हा उलगडा ज्याला झाला त्याची मानसिकता : `ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे' अशी होते. तो चिंता मुक्त आणि स्वच्छंद होतो.

ह्याचाच अर्थ "घंटापण फरक पडत नाही"

ह भ प's picture

19 Nov 2012 - 8:46 am | ह भ प

अजुन खोलवर चर्चा अपेक्षीत..

ह भ प's picture

19 Nov 2012 - 8:48 am | ह भ प

संजयजी..त्रिवार सलाम..

पण आपल्या दैनंदीन आयुष्यात आपण निरिक्षण केलं तर या चार गोष्टी आपल्या आजुबाजुला आढळतील.. उदाहरणार्थः
१. ७२ / २४ किती असं एखाद्याला विचारलं न त्या व्यक्तीला उत्तर काढण्यासाठी 'भागाकार' ही गणिती प्रक्रिया माहिती नसेल (म्हणजे ती व्यक्ती बेरजा, वजाबाक्या, गुणाकार करु शकतो.. भागाकार माहिती आहे पण करता येत नाही असा अर्थ येथे अपेक्षीत आहे) न त्याला हे ही माहिती नसेल की उत्तर काढण्यासाठी 'भागाकार' नावाचं काहीतरी जगात अस्तित्वात आहे.. तर अशा व्यक्ती पासुन आपण काय अपेक्षा ठेवणार??
म्हणजेच-
ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे----- त्याच्या पासून दूर रहा.

आता उरलेल्या तीन अवस्था ज्या आहेत.. त्यांची काही प्रातिनिधिक उदाहरणं सुचतायत का (आपल्या दैनंदिन आयुष्यातली)?

विकास's picture

21 Nov 2012 - 12:03 am | विकास

वरील चार विधानांमध्ये कुणाही (स्व सोडून) त्रयस्थ व्यक्तीबद्दल निरीक्षण करून त्याच्याशी कसे वागावे हे सांगितलेले आहे. पण त्यात नक्की तसे वागणारी ("स्व") व्यक्ती स्वतःबद्दल काय गृहीतक करत असते? तर वरील विधानांकडे परत पाहीले तर वाटेलः "ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे.."

आता यात प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकालाच असे वाटत असते की स्वतः "ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे.." म्हणून आणि समोरचा, "ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे.." म्हणून. :-)