केजरीवाल ह्यांचा स्वीस बॉम्ब

चिरोटा's picture
चिरोटा in काथ्याकूट
9 Nov 2012 - 6:04 pm
गाभा: 

सलमान खुर्शीद,जावयबापूं,गडकरी ह्यांचे वस्त्रहरण केल्यानंतर केजरीवाल ह्यांनी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील बड्या उद्योगपतींना 'घेतले' आहे.!! भारत सरकारकडे जुलै २०११ मध्ये स्वीस बँकेत खाते असणार्‍या ७०० लोकांची यादी होती.ह्या सर्वांचे खाते जिनिव्हामध्ये HSBC बॅन्केत होते.
१) मुकेश्,अनिल अंबानी- प्रत्येकी १०० कोटी.
२) अंबानींच्या रिलायन्सचे -५०० कोटी. (परमपूज्य धिरूभाईंनी येथे जिनिव्हात खाते उघडले असणार ह्यात शंका नाही)
३)जेट एयरवेजवाले नरेश गोयल- ८० कोटी
४) डाबर कंपनीचे बर्मन - २५ कोटी.
सध्याच्या घोटाळ्यांचे आकडे पाहिले तर वरील रक्कम विशेष वाटत नाही पण सध्यातरी IAC कडे ७०० पैकी ६ खात्यांचीच माहिती आह पण एकूण यादी ७०० असल्याने रक्क्म काही हजार कोटींत नक्की जाईल.
फक्त राजकारणी भ्रष्ट ही भ्रामक समजूत आता नक्की दूर होईल.efficiency,clean governance च्या नावाने ढोल पिटणारी मिडिया आता रिलायन्स्,जेट्,डाबर ह्यांच्या विरोधात कशी लेखणी चालवते ते पाहुया.
http://timesofindia.indiatimes.com/india/Kejriwal-targets-Swiss-bank-acc...

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2012 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> सध्याच्या घोटाळ्यांचे आकडे पाहिले तर वरील रक्कम विशेष वाटत नाही

सहमत. आता ही कोटीची कोटी आकडेवारी वाचुन आणि ऐकुन आपल्याला ती रक्कम लाखा दोन लाखाची वाटायला लागली आहे.

>>> मिडिया आता रिलायन्स्,जेट्,डाबर ह्यांच्या विरोधात कशी लेखणी चालवते ते पाहुया.

कसलं डोंबल्याचा मिडिया विरोधात लेखणी चालवतो. मिडियालाही कोटी कोटी नमस्कार पोहचला की बातम्या बंद होतात [झी आणि जिंदाल प्रकरण आठवा] आणि तुम्हा आम्हा आम पब्लिकला अखेर गौरी भोसले सापडली याच्या जाहिराती पाहाव्या लागतात.

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Nov 2012 - 11:06 am | llपुण्याचे पेशवेll

कसलं डोंबल्याचा मिडिया विरोधात लेखणी चालवतो. मिडियालाही कोटी कोटी नमस्कार पोहचला की बातम्या बंद होतात [झी आणि जिंदाल प्रकरण आठवा] आणि तुम्हा आम्हा आम पब्लिकला अखेर गौरी भोसले सापडली याच्या जाहिराती पाहाव्या लागतात.
सहमत. :)
बरेच दिवसांनी प्राडाँशी सहमत होण्याचा योग आला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2012 - 6:16 pm | निनाद मुक्काम प...

एवढे आकडे पाहून गरगरायला होते.
आता तर ह्या आकड्यांची सवय झाली आहे. मन कोडगे झाले आहे.
भावना गोठल्या आहेत.
राग , संताप , त्वेष , तिडीक , सगळ्याच्या पलीकडे पोहोचलो आहे.
आता मी उरलो फक्त
शेअर , लाईक , कॉमेंट करण्यापुरता

मिहीर's picture

9 Nov 2012 - 6:37 pm | मिहीर

कदाचित शेवटून ६ नाव असतिल

जानु's picture

9 Nov 2012 - 6:46 pm | जानु

हे राम..........

विकास's picture

9 Nov 2012 - 8:44 pm | विकास

आपल्याला (त्यात मी देखील आलो) आवडो अथवा न आवडो, खाजगी उद्योग हे नफेतत्वावर चालतात आणि म्हणून तुमची-माझी पोटं भरतात. :-) खाजगी उद्योग आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी. मालक वगैरे कितीही पैसे करू शकतात. अर्थात, कम्युनिझम अथवा पोथॉनिष्ठ समाजवाद असला तर गोष्ट वेगळी असते पण सुदैवाने तसे १९९१ नंतरच्या भारतात नाही. सरकारी कर्मचार्‍यावर आणि पुढार्‍यांवर मात्र पैसे कुठून आले हे सांगणे अर्थातच भाग पडणारे आहे आणि तसे ते असले पाहीजे.

आता केजरीवाल यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे? करचुकवेगिरी केली असेल तर त्याबद्दल भांडे फोडणे योग्याच आहे. त्याविरुद्ध कडक कायदे, शिक्षा, त्यांचा अंमल वगैरे सगळ्याशी सहमत... पण एखाद्या व्यक्तीचे स्वीस बँकेत खाते आहे का पंजाब नॅशनल मधे आहे का टिंबख्टू सहकारी बँकेत आहे, त्याचा काय संबंध? बरं ज्यांची खाती केवळ भारतातच आहेत त्यांनी सगळ्यांनी काय दिवे लावलेत?

हे काही मी स्वीस बँकेत खाती असणार्‍या उद्योजकांच्या बाजूने बोलायचे म्हणून लिहीत नाही. पण केजरीवालांची गाडी फारच भरकटायला लागली आहे याची खात्री झाली.

सुनील's picture

9 Nov 2012 - 10:32 pm | सुनील

पुढार्‍यांवर मात्र पैसे कुठून आले हे सांगणे अर्थातच भाग पडणारे आहे

पुढारी हा व्यावसायिक वा उद्योजकदेखिल असू शकतो. त्याची संपत्ती ही व्यवसायातून आलेली असू शकते.

अर्थात, त्याच्या व्यवसायाला त्याच्या पुढारीपणाचा फायदा झाला किंवा नाही, हे हुडकणे कठिण आहे खरे. पण म्हणून काही त्याची सगळी संपत्ती लाचबाजीतूनच आली आहे, असे मानणेदेखिल गैरच!

विकास's picture

10 Nov 2012 - 12:20 am | विकास

अर्थात, त्याच्या व्यवसायाला त्याच्या पुढारीपणाचा फायदा झाला किंवा नाही, हे हुडकणे कठिण आहे खरे. पण म्हणून काही त्याची सगळी संपत्ती लाचबाजीतूनच आली आहे, असे मानणेदेखिल गैरच!

सहमतच. कुठल्याही (प्रामाणिक) पुढार्‍चाने केवळ जनतेच्या पैशावर मिळणार्‍या वेतन आणि निवृत्तीवेतनावर जगावे असे माझे म्हणणे नाही. पण उद्या जर केजरीवाल यांनी कुठल्याही पुढार्‍याचे स्वीस बँकेत खाते आहे असे सिद्ध करत ओरडा केला तर त्याला काही अर्थ राहील आणि त्या संदर्भात पुढार्‍याला देखील इतके पैसे नक्की कसे मिळवले हे सांगणे बंधनकारक राहील (रहावे) असे वाटते.

५० फक्त's picture

10 Nov 2012 - 8:21 am | ५० फक्त

+१००, श्री. विकास यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत.

सुनील's picture

9 Nov 2012 - 10:33 pm | सुनील

पण केजरीवालांची गाडी फारच भरकटायला लागली आहे याची खात्री झाली.

सहमत.

छोटा डॉन's picture

9 Nov 2012 - 10:36 pm | छोटा डॉन

... पण एखाद्या व्यक्तीचे स्वीस बँकेत खाते आहे का पंजाब नॅशनल मधे आहे का टिंबख्टू सहकारी बँकेत आहे, त्याचा काय संबंध? बरं ज्यांची खाती केवळ भारतातच आहेत त्यांनी सगळ्यांनी काय दिवे लावलेत?

+१, हेच म्हणतो.
बाकी ज्यांची खाती आहेत त्यांची नावे वाचल्यावर त्यांना ऑफिशियलीही १००-१२५ करोड कमावणे आणि बँकेत ठेवणे अवघड नसावे असे आम्हाला वाटते, अशी आकडेवारी तोंडावर फेकुन काय मिळते ते देव जाणो.
बाकी केजरीवाल ह्यांचा आठवडी बाजार ( थँक यु दै. सामना) एकंदरीत मजेशीर प्रकरण होत चालले आहे.

- (आंतरजालावर सदर बाबीचे समर्थन करुन HSBC मध्ये लाखो रुपये ठेवल्याचा आरोप येण्याची भिती असलेला) छोटा डॉन ;)

आपल्याला (त्यात मी देखील आलो) आवडो अथवा न आवडो, खाजगी उद्योग हे नफेतत्वावर चालतात आणि म्हणून तुमची-माझी पोटं भरतात. smiley खाजगी उद्योग आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी. मालक वगैरे कितीही पैसे करू शकतात. अर्थात, कम्युनिझम अथवा पोथॉनिष्ठ समाजवाद असला तर गोष्ट वेगळी असते पण सुदैवाने तसे १९९१ नंतरच्या भारतात नाही. सरकारी कर्मचार्‍यावर आणि पुढार्‍यांवर मात्र पैसे कुठून आले हे सांगणे अर्थातच भाग पडणारे आहे आणि तसे ते असले पाहीजे. >>>

१००% सहमत!

चिरोटा's picture

9 Nov 2012 - 11:01 pm | चिरोटा

आवडो अथवा न आवडो, खाजगी उद्योग हे नफेतत्वावर चालतात आणि म्हणून तुमची-माझी पोटं भरतात.

भारतात खाजगी उद्योगधंदे अमाप आहेत. त्यात प्रामाणिकपणे काम करून नफा मिळवणारेही अनेक आहेत.पैसे चारून्,काळा पैसा करूनच उद्योग उभारता येतो हा(काही अंशी खरे असले) तरी गैरसमज आहे.
पैसा जर प्रामाणिकपणे मिळवला असेल तर स्वीस बॅन्केत ठेवायची काय गरज आहे ?सरकारने गेल्या वर्षी ७०० जणांची यादी असल्याचे सांगितले होते.स्वीस परराष्ट्र खात्याने भारतिय नागरिकांचे एकूण ९००० कोटी रुपये असल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.(http://en.wikipedia.org/wiki/Indian_black_money )

अमोल खरे's picture

10 Nov 2012 - 6:33 pm | अमोल खरे

फक्त केजरीवाल बोलत आहेत म्हणुन जर मिपावर भ्रष्ट राजकारणी व उद्योगपतींना वाचवायला एवढी लोकं येतात तर अख्ख्या भारतात किती येतील. शेवटी लोकांना ते जसे असतात तसेच राज्यकर्ते मिळतात हेच खरे, म्हणुन काँग्रेस आणि भाजपा दोघेही करप्ट असुन निवडुन येतात आणि स्वछ चारित्र्याची लोकं राजकारणात अभावानेच दिसतात. जाता जाता, ह्याच रिलायन्स वर कृष्णा गोदावरी खो-यात अमाप पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप झाला होता. ह्याच मुकेश अंबानींवर आत्ता पण आरोप झाला आहे. आता तो त्यांचा पैसा, मग पंजाब नॅशनल मध्ये ठेवावा कि टुंबक्तु मध्ये असेच बोलायचे असेल तर बोलणेच खुंटले.

मराठी_माणूस's picture

10 Nov 2012 - 11:25 am | मराठी_माणूस

किति पैसे आहेत त्याला महत्व नसुन तो तिथे कसा पोहचला हे महत्वाचे आहे. हे सर्व हवाला तर्फे झाले आहे असे म्ह्टले आहे. हा सर्व प्रकार गंभीर आहे. "आठवडी बाजार" वगैरे हिणवण्यात काही अर्थ नाही.

चिरोटा's picture

10 Nov 2012 - 11:55 am | चिरोटा

(गडकरींचे वस्त्रहरण झाल्याने)ज्यांच्याकडून विरोध व्ह्यायला हवा तेच सरकारची तळी उचलून धरत आहेत.जेट एयरवेजचे उदाहरण घ्या- २००१/२००२ साली आय्.बी.च्या अहवलात नरेश गोयल बद्दल पुरावे होते. दावूद/छोटा शकील ह्यांकडून जेट एयरवेजला फंडींग होतेय असे अहवालात म्हंटले होते. ( http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-04-13/india-business/27... ) ही दहा वर्षापूर्वीची बातमी आहे. अहवाल त्यांनी त्यावेळचे मंत्री शहनवाज हुसेन ह्यांच्याकडे पाठवण्यात आला होता.अपेक्षेप्रमाणे काहीच झाले नाही.!ह्यामुळे जेट एयरवेजचा स्वीस बॅन्केत बराच पैसा आहे ह्या केजरीवाल ह्यांच्या आरोपात तथ्य असावे.रिलायन्सबद्दल काय बोलणार? ह्यांची Mo Tech सॉफ्टवेयर नामक कंपनी अंधेरीला होती(अजूनही असावी). ह्यांनी कुठले सॉफ्टवेयर बनवले माहित नाही पण कंपनीला वर्षानुवर्षे फायदा होत असावा.ह्या कंपनीच्या नावेही स्वीस बँकेत खाते आहे.२१०० कोटी ह्या कंपनीच्या नावावर आहेत.Corporate Social Responsibility वर लेक्चर देणार्‍या मुकेश/अनिल अंबानींनी हाच पैसा भारतात का नाही ठेवला?
देशाचा पंतप्रधान्/मंत्री बदलायची आर्थिक ताकद ह्या चोरांमध्ये असल्याने सरकार ह्या बड्या धेंडाना हात लावणार नाही.
mukesh

विनायक प्रभू's picture

10 Nov 2012 - 11:32 am | विनायक प्रभू

आयला कमाल आहे?
मुकेश कडे आहेत.
ठेवतो.
विनायक कडे नाहीत.
तर काय ठेवणार?

तिमा's picture

10 Nov 2012 - 1:15 pm | तिमा

केजरीवालांचे आरोप जर खोटे आहेत तर कोणीच कोर्टात का जात नाही त्यांच्याविरुद्ध ?

नितिन थत्ते's picture

10 Nov 2012 - 1:20 pm | नितिन थत्ते

सौ खुर्शीद कोर्टात गेल्या आहेत असे कळते.

कपिलमुनी's picture

10 Nov 2012 - 1:49 pm | कपिलमुनी

केजरीवालांचे आरोप जर खरे आहेत तर तेच कोर्टात का जात नाही भ्रष्टाचाराविरुद्ध ?

यशोधरा's picture

10 Nov 2012 - 6:39 pm | यशोधरा

ज्या प्रकारे केजरीवाल सगळ्यांना दे माय धरणी ठाय करत आहेत, काही वर्षांतच केजरीवाल ह्यांच्या नावानेही स्विस बँकेत खाते दिसले तर ते सुसंगतच असेल.

चौकटराजा's picture

10 Nov 2012 - 6:42 pm | चौकटराजा

trong>खाजगी उद्योग हे नफेतत्वावर चालतात आणि म्हणून तुमची-माझी पोटं
भरतात. हे पूर्ण सत्य नाही. मी सहा वर्षे सरकारी मालकीच्या पण
नफ्याचे सूत्र असलेल्या ठिकाणी काम केले. व २२ वर्षे एका खाजगी कंपनीत
नंतर काम केले. माझे बरोबर सरकारी ठिकाणी नोकरीत असलेल्याना पे कमिशन
मुळे पगार वाढत गेले. की आपण झक मारली व खाजगी त आलो असे मला झाले.

दुसरे असे की नफा मिळविणे व नफेखोरी यात फरक केलाच पाहिजे. डोणजे गावातील
ताकाचा ग्लास व सिंहगडावरील ताकाचा ग्लास यातील किंमतीत फरक असणारच ! तो
नफ्यात असता कामा नये.

आता केजरीवाल यांच्या वर्तणुकीविषयी- सरकार ( वा राजकीय क्षेत्राकडून)
कोर्टात जा असे सांगितले जाते. कारण कोर्टात अंधेर नही लेकिन देर है हे
वास्तव आहे ) आतापर्यत एकानेही केजरीवाल यांचे विरोधी मानहानीची केस
लावलेली नाही. अगदी पंतप्रधानानीही नाही. कारण त्यात दोन गोष्टी असतात
.१) त्यालाही विलम्ब लागतो @) त्यातून सत्य बाहेर येण्याची भिती
असते.२०१४ पर्यंत जनलोकपाल तरी पदरात टाका नाहीतर आठवड्याचा बदनामी
नौटंकीला तयार रहा हा इशारा केजरीवाल उदद्योगपति नोकरशहा व राजकारण्याना
देत वातावरण तापत ठेवणार .

१०० कोटी ते हजार कोटी इतके पैशे घेवुन हे लोक करतात तरी काय? अंबानी इतका बेढब आणि ओंगळवाणा आहे कि बोलुच नका. त्याची बायको आपली द अफ्रिका आणि विंडीजच्या खेलाडुना उठसुट मिठ्या मारीत असते.
माणसाने कितीही आयुष्यभर चैन केली तर किती दिवस तो करु शकतो? चैन ती नेमकी काय दारु,बाई आणि गाड्या,सोन्याचे दागिने, अजुन काय? इतिहासातील इतकी लोभी लोकाची उदाहरणे बघुन देखिल ह्या लोकांना अक्कल ती कशी येत नाही ह्याचे आश्च्रर्य वाटते.

मदनबाण's picture

11 Nov 2012 - 11:03 am | मदनबाण

करलो दुनिया मुठ्ठी में... अजुन काय ! ;)
बाकी केजरीवाल यांचा हा काही बॉम्ब वगरै वाटला नाही,उलट फुसकी लंवगी किंवा फुसका आपट बार म्हणा हवं तर ! ;)
हे जर असेच वागत राहिले तर काही दिवसांनी मिडीयावालेच त्यांना वेडे ठरवतील आणि काडीचाही कव्हरेज देणार नाहीत.

याची बायको आपली द अफ्रिका आणि विंडीजच्या खेलाडुना उठसुट मिठ्या मारीत असते.
ख्या.ख्या.ख्या... खी.खी.खी ! मुकेश अंबानीच्या बायडीला भज्जीने लिलया उचलले होते, ते दॄष्य डोळ्या समोर आले माझ्या ! ;)
काय म्हणता ? तुम्हालाही पाहायचे आहे? ;)
खालच्या इडियोत ती सोय केलेली आहे... पाहण्याचे कष्ट घ्या आता... ;)

चिरोटा's picture

11 Nov 2012 - 12:24 pm | चिरोटा

बिचारे मुकेशभाई मान खाली घालून टाळ्या वाजवत आहेत.

दादा कोंडके's picture

11 Nov 2012 - 4:03 pm | दादा कोंडके

अरारारा...

बॉलीवूड आणि क्रिकेट गटार आहेत.
एव्हड्या मोठ्या लोकांनीतरी यात उतरून हसं करून घेउ नये.

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 8:55 pm | आनंदी गोपाळ

काही जळतंय का तिकडे? ग्यासवर राहून गेलंय काहीतरी बहुतेक..