खमंग व खुसखुशीत थालिपीठ.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
11 Nov 2012 - 4:27 pm

नमस्कार मंडळी.सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.
खरेतर आज मस्त गोडाची पाकृ टाकायला हवी होती.पण काय करणार काल पाहुण्यांनी व्हिजीट दिली आणि भात,
आमटी,भाजी थोडं थोडं उरलं.मग काय धनत्रयोदशीच्या दिवशी नाश्त्याला शीळासप्तमी साजरी केली.चला आता
साहित्य व पाककृतीकडे वळूया.

साहित्यः-दोन वाट्या उरलेला भात.
एक वाटी उरलेली आमटी.
भाजी उरली असल्यास.
एक वाटी बेसन्(पाहीजे असल्यास थोडे जास्त घेतले तरी चालेल)
अर्धी वाटी तांदुळाचे पीठ.
ज्वारीचे पीठ असल्यास.
मिरची पूड.
धणे-जिरे पूड.
मीठ.
तेल.
कृती:- वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे.थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवावे.खुप पातळ किंवा खुप घट्ट
भिजवू नये. एका प्लास्टीकवर थालिपीठ थापून घ्यावे.मध्ये तेल सोडण्यासाठी बोटानी भोक पाडावे.तव्यावर
तेल सोडून त्यावर थालिपीठ घालावे.बाजुने व भोक पडले त्यात तेल सोडावे.दोन्ही बाजुने खरपूस भाजून
घ्यावे व गरम गरम थालिपीठ लोण्याबरोबर खायला द्यावे.

काय मग मंडळी येताय न शिळासप्तमी साजरी करायला?

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

11 Nov 2012 - 8:40 pm | तुषार काळभोर

लोणी घरचं दिसतंय..

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2012 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

हाय...हाय...लै कातिल चव लागते या असल्या थालपिठाची http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2012 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> हाय...हाय...लै कातिल चव लागते या असल्या थालपिठाची....
आत्म्याशी जीव सहमत आहे. मला अशा थालपिठाचा वरचा कडक (पापडीवजा) भाग लैच आवडतो.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

11 Nov 2012 - 10:56 pm | पैसा

पाकृ आणि फोटो दोन्ही लै आवडले!

दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करून झाल्यावर माझ्या थकल्याभागल्या जिवाला तुम्ही हे थालीपिठ दिलं असतं तर मस्त झालय असं सांगितलं असतं .;) आता दिवाळीच्या भाजण्या घरात असतातच तर बेसनाऐवजी भाजणी का नाही वापरलीत असं वाटलं. :)

ज्योति प्रकाश's picture

12 Nov 2012 - 3:21 pm | ज्योति प्रकाश

चकल्या करून भाजणी संपलेली असल्याने बेसन घालावे लागले.

आता दिवाळीच्या भाजण्या घरात असतातच तर बेसनाऐवजी भाजणी का नाही वापरलीत असं वाटलं.

+१ खास याच्यासाठीच आईला डबाभर भाजणीचं पीठ बाजुला काढुन ठेवायला लावतो. :)

बाकी थालपीठ खमंग दिसतंच आहेत.

पिशी अबोली's picture

12 Nov 2012 - 1:01 am | पिशी अबोली

त्यासोबत ओलं खोबरं अप्रतीम लागतं.. फोटो कसला मस्त आहे..एकदम घरचा फील देतोय..

अभ्या..'s picture

12 Nov 2012 - 3:10 am | अभ्या..

जीवाला त्रास उगीच. ;)
नको तो फराळ वगैरे.
असले दोन तीन थालपीठे लावा जरा.
बास्स्स्स.

ज्ञानराम's picture

12 Nov 2012 - 9:26 am | ज्ञानराम

मस्तच... लोण्याबरोबर काय... चहा , लोणचे... कशा बरोबरही हे थालीपीठ फस्त होईल....
शीळा भात उरल्यावर खूप कंटाळा येतो खायचा ...आता हेच करेन ...

अनन्न्या's picture

12 Nov 2012 - 2:40 pm | अनन्न्या

मस्त आलाय फोटो. पण भाजणी शिवाय थालिपीठाला मजा नाही. आमच्याकडे कोकणात तर बारा महिने असते भाजणी!!

सुहास झेले's picture

12 Nov 2012 - 2:57 pm | सुहास झेले

वाह... एकदम मस्त :)

दिपक.कुवेत's picture

12 Nov 2012 - 3:42 pm | दिपक.कुवेत

वा लगेच उचलुन खावसं लागेल...मला वाटत ह्यात १ चमचा तीळ घातले तर अजुन रुचकर लागेल...

एक लंबर....बाकी "मराठा पराठा" किंवा असे कैतरि ढिंचाक नाव ठेवून हा पदार्थ महाराष्ट्राबाहेर नक्की फेमस होऊ शकतो असे आपले येक फारा दिवसांपासूनचे मत आहे. इथल्या बल्लवाचार्यांचे मत काये, विशेषतः पेठकर काकांचे?

मस्त मस्त आहे हा प्रकार. फक्त धागाकर्त्यांनी / किंवा ' आम्ही नेहमीच करतो' असे फंडे देणा-यांनी, एकदा प्रत्यक्ष खाण्याची संधी उपलब्ध करुन दिली तर फार बरं होईल.

RUPALI POYEKAR's picture

20 Nov 2012 - 4:05 pm | RUPALI POYEKAR

छान पाक्रु, मस्तच