विदेशी फोन नंबर बाबत

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
11 Nov 2012 - 5:32 pm
गाभा: 

मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .

काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .

यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Nov 2012 - 5:41 pm | श्री गावसेना प्रमुख

धन्यवाद.माहीती दिल्याबद्दल.

चिरोटा's picture

11 Nov 2012 - 5:41 pm | चिरोटा

आमचे स्वतःचे नंबरच विचित्र,फ्रॉड असल्याने विशेष फरक पडत नाही.

ला परत प्रत्युत्तर देवु नये असे सांगितले आहे.कॉल घ्यायला काही हरकत नाही.मिस कॉल येतो त्यावेळी त्याला परत उत्तर देताना आपल्याला प्रॉब्लेम येतो.

आशु जोग's picture

11 Nov 2012 - 7:39 pm | आशु जोग

एक शंका

कॉल घ्यायला काही हरकत आहे का ?

जेनी...'s picture

11 Nov 2012 - 7:50 pm | जेनी...

अजुन एक शंका .

कॉल घेतलाच तर आणि मिस्स कॉल वर पून्हा फोन केला तर काय होतं ??

क्रुपया विस्कटवुन सांगणे .

(अनभिज्ञ्न निरागस बालिका ) पूजा :)

चिरोटा's picture

11 Nov 2012 - 7:59 pm | चिरोटा

कॉलवर मिस आहे की मिस्टर हे ओळखण्यासाठी मिस्स कॉल दिले जातात्.तेव्हा मिस्स कॉलवर पुन्हा फोन करू नका.

जेनी...'s picture

11 Nov 2012 - 8:09 pm | जेनी...

ओह्ह ... मग तर मी मुळीच परत फोन करणार नाहि :-/
थेन्कु चि रो जी राव :)

तुषार काळभोर's picture

11 Nov 2012 - 8:42 pm | तुषार काळभोर

खोसला का घोसला मध्ये अनुपम खेरच्या थोरल्या पोराचं नाव चिरौंजीलाल होतं..

दादा कोंडके's picture

11 Nov 2012 - 8:47 pm | दादा कोंडके

अत्यंत माहितीपूर्ण धागा आणि अनुरूप प्रतिसाद.

तुषार काळभोर's picture

11 Nov 2012 - 8:47 pm | तुषार काळभोर

सरकार/दूरसंचार मंत्रालय/ट्राय/बीएसएनएल यांपैकी कोणी असं सांगितलंय काय? मला नाही वाटत असं सरकारने/कोणत्याही सरकारी घटकाने अधिकृतरित्या सांगितले असेल.
(स्साला...अमुक नंबरचा फोन रीसिव्ह केल्यावर फोनमध्ये व्हायरस शिरतो नायतर आपल्या नंबरवरून आयएसडी कॉल केले जातात, अशी ढकलपत्रे आता मिपावर यायला लागली!!)

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 8:52 pm | आनंदी गोपाळ

यांच्या ऑफिशियल बल्क मेसेजवरून तो मेसेज आलेला आहे.

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 8:51 pm | आनंदी गोपाळ

कॉल घेतलाच तर आणि मिस्स कॉल वर पून्हा फोन केला तर काय होतं ??
क्रुपया विस्कटवुन सांगणे .

पुन्हा फोन केलात तर तुमचा बॅलन्स ५० रुपयांनी घटतो, असे अनुभवी लोकांनी सांगितले आहे. फोन घेतल्यास काही फरक पडत नाही. नुसता फोन घेतल्याने व्हायरस वगैरे येणार नाही, फक्त कॉलदरम्यान # * इ. असलेले नंबर दाबू नयेत.

आमच्या कंपनीने देखील सर्व कर्मचार्‍यांना मेल पाठवुन या निनावी फोना-फोनी बाबत सतर्क केले होते,तसेच अनेक कर्मचार्‍यांना फोन येत असल्याचे सांगितले होते.
मागच्या आठवड्यातुन मला देखील असाच कॉल आला होता,मग कळले की तो फोन सोमालियातुन आला होता.
आता कसे कळले की तो फोन सोमालियातुन आला ते ? तर... थँक्स टू ShaPlus Caller Info (India) तुमच्याकडे जर अ‍ॅन्ड्रॉइड फोन असेल तर या अ‍ॅप्लीकेशनचा वापर करता येतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2012 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, मला एका नंबरवरुन एसेमेस येतो. [आता एस्सेमेस आला की इथेच डकवतो लंबर] एस्स्मेस असतो '' हा नंबर कुणाचा आहे'' आणि आणखी एका नंबरवरुन एस्स्मेस येतो '' प्लीज कॉल मी बॅक'' एकदा खर्रच कोणी गरजू असेल असे वाटल्यामुळे कॉल बॅक केल्यावर तुमचं नाव काय ? तुम्ही कुठं राहता अशा हिंदी भाषेतून चौकशी सुरु. पक्का मिपाकर असल्यामुळे माझी काय पर्सनल माहिती त्यांना देतो. दिला फोन कट करुन. पण, माझ्या मागे लागलेली साडेसाती अजून काय जाईना. कोणाकडे यावर काही जालीम उपाय असेल तर खरड करावी. :)

-दिलीप बिरुटे

काय हे प्राडॉ. ?
उत्तर तुमच्याकडेच होते की?
मिपाकर असल्याने खरी माहीती नका हो देऊ. पण सांगा त्या तुमच्या चाहत्याला तुम्ही नुसते मिपाकर नाही तर संपादक पण आहात म्हणून. ;)
'टाकू काय ऊडवून' अशी द्या जरा बत्ती. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Nov 2012 - 9:35 am | श्री गावसेना प्रमुख

1
मार दिया जाय की छोड दिया जाये
इंटरनॅशनल आउट्गोईंग बंद करुन द्यावे.कारण ट्राय ने मोबाइल कंपन्यांना असा आदेश दिलेला आहे की.ज्यांना खरच आवश्यकता आहे त्यांनाच ही सुविधा देण्यात यावी,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2012 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मिपाकर नाही तर संपादक पण आहात म्हणून.
हाहाहा.

>>> 'टाकू काय ऊडवून' अशी द्या जरा बत्ती.
लगेच उडवला ना एस्सेमेस. :)

मनातल्या बाता : च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील असे दिसते. ;)

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Nov 2012 - 11:46 am | श्री गावसेना प्रमुख

च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील
तुमच्या संपादक पदाला मानाचा मुजरा.1

मनातल्या बाता : च्यायला, या अभिजितचे एक दोन चांगले मन लावून लिहिलेले प्रतिसाद उडवावेच लागतील असे दिसते.

हिहिहि मी आणि मन लावून प्रतिसाद? कै च्या कै प्राडॉ. :)
ऊडवायसाठी पण तुम्हाला मी मन लावून लिहिलेला प्रतिसाद सापडणार नाही ;)
हे सगळं अवांतर पण खरे म्हणजे मला पण आले होते ४-५ कॉल आणि मेसेज बाहेरून. एका रिटर्न कॉलसाठी १२ रु. उडले. तरी फक्त सेव्ह असलेलेच नंबर ऊचलणे हा माझा ५ वर्षापासून उपाय आहे.

>> च्यायला, मला एका नंबरवरुन एसेमेस येतो. [आता एस्सेमेस आला की इथेच डकवतो लंबर] एस्स्मेस असतो '' हा नंबर कुणाचा आहे''

जस्ट डायलचा आहे का

Ganesh267296's picture

13 Nov 2012 - 3:29 pm | Ganesh267296

नविनच नहिति मिललि