माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा.
बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूप खूष होते.
साहित्यः १ कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल)
कृती:
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता.
२) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या.
३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या.
४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा. असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार :-)
प्रतिक्रिया
6 Nov 2012 - 12:47 pm | गणपा
मस्त दिसतायत लाडू. :)
6 Nov 2012 - 12:59 pm | सविता००१
यात पिठिसाखरेऐवजी गूळ घालून पण करतात. ते जास्त खमंग लागतात. अर्थात हे पण छानच आहेत.
6 Nov 2012 - 1:23 pm | पियुशा
माझी एक शंका
गव्हाच पिठ किती चिकट असते हे लाडुपण चिकट बणतात का ?की बेसनलाडुसारखे खमंग बनतात?
6 Nov 2012 - 2:27 pm | स्मिता.
पिवशे, गव्हाचं पीठ मंद आचेवर पण बराच वेळ खमंग भाजलं तर त्याचा चिकटपणा बराच कमी होतो.
6 Nov 2012 - 9:07 pm | कवितानागेश
गव्हाचा तयार आटा वापरायचा. तो भरभरीत असतो, चिकट्पणा बिल्कुल नसतो.
10 Nov 2012 - 8:52 am | Pearl
मी विकतच्या कणकेचे (सुजाता चक्की आटा) केले होते. ते चिकट झाले नाहीत. खमंग होतात.
6 Nov 2012 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा
लै झ्याक दिसायलेत लड्डू :-)
6 Nov 2012 - 2:18 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो
6 Nov 2012 - 2:24 pm | प्रकाश घाटपांडे
मला आवडतात हे कणकेचे लाडू. मस्तच रेशीपी
6 Nov 2012 - 2:29 pm | स्मिता.
साधे, सोपे आणि पौष्टिक लाडू आवडले.
6 Nov 2012 - 5:28 pm | अनन्न्या
सुंदर आहेत. गहू आधी खमंग भाजून रवाळ द्ळ्ले तर हे लाडू अजिबात चिकट होत नाहीत. पौष्टीक होण्यासाठी त्यात थोडा डींक तळून आणि खारीक पावडर घालावी.
6 Nov 2012 - 5:58 pm | रेवती
छान.
6 Nov 2012 - 8:31 pm | Mrunalini
मस्त. नक्की करुन बघणार ह्या दिवाळीत.
6 Nov 2012 - 8:37 pm | जेनी...
दिवाळी जवळ आली कि वजन वाढतं :-/
लाडु मला फार आवडतात :)
कणकेचे लाडु छान दिसतायत .:)
6 Nov 2012 - 8:54 pm | मदनबाण
लाडुचा फोटो पाहुन क्षणभर मला ते बेसनाचे वाटले... ;)
पण खरचं हे चांगले लागत असतील का ?
(लाडु प्रेमी);)
6 Nov 2012 - 8:56 pm | राही
कणीक भाजण्यापूर्वी तुपावर थोडा(दोनास एक या आकारमानात)बारीक रवा साधारण भाजून घेऊन मग त्यात कणीक घालून चांगले भाजल्यास लाडू अजिबात चिकट होत नाहीत.
6 Nov 2012 - 9:13 pm | सस्नेह
छान. बेसन लाडूसारखेच दिसताहेत.
पण बेसन सारखे जड नाहीत पोटाला. लहानपणी शेजारी खाल्ले होते एकदा.
7 Nov 2012 - 10:48 pm | प्रास
धागा वाचला.
फोटो पाहिला.
8 Nov 2012 - 12:15 am | संजय क्षीरसागर
उद्या करून बघीन (म्हंजे करायला मदत करीन)
10 Nov 2012 - 1:37 am | दीपा माने
चविष्ट आआआआअ
10 Nov 2012 - 1:40 am | दीपा माने
चविष्ट आणि सोपे लाडु आवडले. आधीच्या प्रतिसादातली चुक माझ्या कंप्युटरची!
10 Nov 2012 - 4:07 am | मृदुला सूर्यवंशी
@पर्ल, परवाच हे लाडू करुन पाहिले...फार मस्तं झाले. कणिक वापरुन केले आहेत यावर कोणाचा विश्वास बसला नाही. तुमचे खुप खुप आभार :)
10 Nov 2012 - 8:39 am | कच्ची कैरी
मस्त दिसतायेत लाडू
http://mejwani.in/
10 Nov 2012 - 3:10 pm | पैसा
कणकेचे असल्यामुळे पचायला बेसनाइतके जड नाहीत. अशाच पण गूळ घालून केलेल्यांना गूळपापडीचे लाडू म्हणतात का?
14 Nov 2012 - 2:14 am | Pearl
हो. पैसाताई,
गूळ घालून केलेल्या याच लाडवांना गूळपापडीचे लाडू असं म्हणतात.
आणि पा.कृ. मध्ये प्रमाण देताना गडबडीत कप आणि वाटी दोन्ही दिले आहे.
ते खरं तर असे हवे,
१ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर
किंवा
१ वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर
जमलं तर प्रमाण दूरूस्त करशील का, हे असं
१ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल)