गाभा:
नवीन सरकारी नियमानुसार एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक जोड असल्यास ते अवैध ठरतील.
अधिक गॅसजोड परत न केल्यास पहिला जोडदेखिल ब्लॉक केला जाईल.
गॅस गीझरधारकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. आंघोळीचे पाणी गॅसवर तापवले काय आणि गॅसगीझर मध्ये तापवले काय गॅसचा वापर तेवढाच होणार. आणि हा घरगुती वापरच आहे ज्यावर सरकारी सवलत आहे. खरंतर वीजेचा प्रश्न त्याहून गंभीर असल्याने खरंतर गॅस वापराला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तो वेगळा विषय आहे.. सध्या यावर उपाय काय? सरकारी सवलत न वापरता जास्त दराने (पण कायदेशीर) सिलेन्डर मिळण्याचा विकल्प अस्तित्वात आहे का? २ सिलेंडर हा विकल्प होउ शकत नाही कारण नोंदवल्यानंतर दुसरा सिलेंडर मिळण्याचा कालवधी फार जास्त असतो.
प्रतिक्रिया
31 Oct 2012 - 5:35 pm | sagarpdy
नरकचतुर्दशी सोडून अन्य सर्व दिवशी थंड पाण्याने आंघोळ करावी (गरज असेलच तर, अन्यथा डीओडरन्ट चा वापर वाढवावा).
31 Oct 2012 - 5:37 pm | पाटव
अन्यथा डीओडरन्ट चा वापर वाढवावा
म्हण्जे खर्च वाढणार हो........
31 Oct 2012 - 5:52 pm | कान्होबा
त्यापेक्षा गोळी घ्या म्हणजे फार खर्च हि होणार नाही
3 Nov 2012 - 9:22 am | श्री गावसेना प्रमुख
तुम्ही आंघोळीच्या गोळ्या वापरता का?
31 Oct 2012 - 7:01 pm | रेवती
प्रश्न फक्त सिलींडरवर गिझर चालवण्याचा असेल तर स्वयंपाकघरातून एक फाटा फोडून बाथरूमपर्यंत पाईप नेऊ द्यावा. त्या जोडणीचे वेगळे पैसे आकारावेत म्हणजे सिलींडरने आधीच लहान असलेल्या बाथरूमातील जागा अडणार नाही. शिवाय ते दिसायलाही फारसे बरे दिसत नाही. जितकी बाथरूम्स असतील तितक्यांमध्ये जोडणी करून जादा आकार घ्यावा. वापर होईल तेवढेच बील येणार शेवटी. नाहीतर सरळ बिल्डींगींवर सोलर प्यानल्स बसवावीत (सोसायटीतील मेंबरांनी). विजेचा गंभीर असलेला प्रश्न सोडवण्याचे काम केवळ सरकारचे नाही.
31 Oct 2012 - 7:26 pm | ५० फक्त
आज सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार, दोन कंपन्यांचे गॅसजोड ठेवता येतील मात्र सहा स्वस्त सिलेंडर एकाच कंपनीचे मिळतील दुस-या कंपनीचे सगळे बाजारभावानं घ्यावे लागतील आणि पहिल्याचे सहा नंतरचे सुद्धा.
3 Nov 2012 - 9:21 am | अनन्न्या
आम्ही तर घरात १५ माणसे आहोत. त्यामुळे भातासाठी राइस कुकर,चहा,आमटी, दूध यासाठी ( लोड शेडींग नाही तोवर) इंड्क्शन आणि पाण्यासाठी सोलरची व्यवस्था मार्गी आहे. यातून महिन्याच्या सिलेंडर मध्ये थोडा फरक पडला आहे. सोलरने आण़खी फरक पडेल. एकत्र कुटुंबासाठी वेगळा आदेश आला आहे. सध्या तरी रोजचा दिवस गॅसवरच!!
त्यामुळे नवीन पाकक्रुती बंद.
3 Nov 2012 - 9:53 am | नितिन थत्ते
आमच्या घरी पाइप गॅस आल्याने एलपीजी जोडणी सरेंडर करण्याचा आदेश मिळाला. अन्यथा पाइप गॅसची जोडणी बंद करण्याची धमकी मिळाली. त्यानुसार एलपीजी जोडणी सरेंडर केली असता ती सरेंडर करून न घेता सेफ कस्टडी म्हणून घेतली आहे. म्हणजे आम्ही दुसर्या शहरात (जिथे पाईप गॅस जोडणी नाही अश्या शहरात) बदली निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणाने गेल्यास तेथे ताबडतोब गॅस कनेक्शन मिळेल असा वायदा आहे.
महत्त्वाची सूचना:
वर रेवतीताईंनी सुचवल्याप्रमाणे कॉपरची ब्रँच लाईन टाकून घेतल्यास.....
१. ती एलपीजी पाइपिंग करण्याचे लायन्स धारक असलेल्या तंत्रज्ञाकडूनच करून घ्यावी.
२. तांब्याचा पाईप कालांतराने काळा पडल्यास पीतांबरी/प्रिल किंवा तत्सम रसायने किंवा कोणत्या खरखरीत पावडरीने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये. तो पाईप काळा पडू द्यावा. वाईट दिसले तरी चालेल.
3 Nov 2012 - 11:59 am | सर्वसाक्षी
१) एल पी जी मध्ये प्रोपेन ब्युटेनचे मिश्रण असते, यामध्ये जमीनीला चिकटायची प्रवृती असते त्यामुळे पुरवठा अनवधानाने सुरू राहीला तर कालांतराने खोलीतील या वायुची घनता वाढत जाते व जर खोली बंद असेल तर एखादी बारीक ठिणगी (विजेच्या बटणातुन येउ शकणारी) अनर्थ करायला पुरेशी असते. नळाचा पुरवठा म्हणजे मिथेन९५% व हाय्ड्रोकार्बन जे हलके असतात व पुरवठा अनवधानाने सुरू राहील तरी हवेत उडुन जातात
२) वायु नळकांड्यात भरताना प्रचंड दाबाखाली द्रायुरुपात भरला जातो - १००बार दाब. यामुळे स्फोट व परिणामतः प्रचंड हानी होण्याची शक्यता असते. नळाचा पुरवठा १ बार म्हणजे सामान्य हवेच्या दाबाइतकाच असल्याने स्फोटाचा धोका नसतो.
हे सगळे असले तरी नळाद्वारे पुरवठा सगळीकडे पोचलेला नाही. नळाची जोडणी घेताना एक भीती निश्चित होती. आपल्याकडे एक अलिखित नियम आहे आणि तो म्हणजे रस्त्याचे काम करताना दुरध्वनी, पेय जल व सांडपाणी यांचे नळ फोडणे.रस्ते रुंद वा दुरुस्त करताना खोदायचे काम अप्रिशिक्षित कामगारांकडुन यांत्रिक रित्या केले जाते, शिवाय रस्त्याच्या पोटाचे नकाशे वगरे असतात हे आपल्याला मान्य नसते. अशा परिस्थितीत जर वायुचे नळ उध्वस्त झाले आणि नळकांडे परत केलेले म्हणताना चूल थंड पडली तर? मात्र हा शोका लक्षात घेता महानगर गॅस वाल्यांनी दोन दिशांनी पर्यायी व्यवस्था केली आहे आणि पुरवठा अबाधित असल्याची ग्वाही दिली आहे. सुदैवाने गेल्या सहा-सात वर्षात पुरवठा एकदाही खंडीत झाला नाही तेव्हा बर्यापैकी काळजी घेतलेली असावी हे मान्य करावे लागेल.
4 Nov 2012 - 5:20 pm | तुषार काळभोर
अशा परिस्थितीत जर वायुचे नळ उध्वस्त झाले आणि नळकांडे परत केलेले म्हणताना चूल थंड पडली तर?
अहो,
त्या उध्वस्त नळातून गॅस बाहेर येऊन लागणार्या आगीची/स्फोटाची चिंता करावी का चूल थंड पडण्याची?
4 Nov 2012 - 6:44 pm | अन्या दातार
घरात तुम्हाला पहिले काय दिसणार? कुठेतरी लागलेली आग कि थंड पडलेली चूल?
(फायर एक्स्टींग्विशर)
अन्या