आमच्या गावातील एक आश्चर्य

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
28 Oct 2012 - 5:36 pm
गाभा: 

आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .

लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.

पण गणितात मात्र प्रचंड हुशार! त्याला १ पासून कितीही संख्येचा पाढा विचार, क्षणात उत्तर तयार. १२८७ /१५४८९४ चा पाढा विचारा/, लगेच म्हणून दाखवणार. कितीही संख्येची बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ, वर्ग ,इत्यादी सगळे क्षणात उत्तर तयार. तुम्ही कॅल्क्युलेटर घेवून बसलात तरी तुम्ही कॅल्क्युलेटरवर गणित करण्या आधी त्याचे उत्तर तयार असते.

तुम्ही प्रश्न विचारल्यावर तो एक सेकन्दभर नजर आकाशाकडे करून बघतो. आणि उत्तर सांगतो. संख्या फार मोठी असेल तर फक्त तो आकडे म्हणून दाखवतो. उदा.२५ कोटी १२ लाख ७८ हजार ३९८ ही संख्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल तर तो २५१२७८३९८ असे एकेक आकडे सांगतो. तो जेव्हा आकाशाकडे बघतो, तेव्हा त्याला प्रश्नाचे उत्तर नजरेसमोर दिसते ,असे तो सांगतो.

"स्टार माझा " वाहिनीचे रत्नागिरी प्रतीनिधी सचिन देसाई यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये या बाबू च्या अचाट आणि अतर्क्य चमत्कारावर आधारित एक मुलाखत घेऊन ती प्रसिद्ध केली होती. "स्टार माझा "वर ती प्रसारित ही झाली होती. त्यापूर्वी विविध स्थानिक वृत्तपत्रातून सुद्धा बाबू बद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे

आधुनिक मेंदू-विज्ञानाला आव्हान ठरू शकणार्या आणि अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांना एक चमत्कार म्हणून अभ्यास करण्यासारखे या बाबुकडे नक्की काहीतरी आहे. गरज आहे ती त्याची दाखल घेण्याची! नाहीतर गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेतच!पण खरेच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखे काही असेल,तर संशोधन व्हायला हवे,असे वाटते...................!धन्यवाद!

शिरीष चव्हाण उर्फ बाबू देवरुखकर
मु.पो.चोरवणे ,व्हाया-पाली
नाणीज जवळ- (रत्नागिरी -कोल्हापूर हायवे.)
ता.संगमेश्वर,जिल्हा-रत्नागिरी.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2012 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा आकेमोडीवर आधारित हिष्ट्री वाहिनीवर एक कार्यक्रम होता स्टॅन्लीस सुपरह्युमन त्यात असा एक आकडेबहाद्दर [दुवा युट्युबवर जातो] दाखवलेला होता आणि विज्ञान म्हणतं की काही माणसांमधे मेंदुच्या रचनेत इतरापेंक्षा काही विशिष्ट भाग कमी अधिक प्रमाणात कार्यरत असतो तेव्हा अशी अफाट कर्तुत्त्व म्हणजे विज्ञानाला आव्हान वगैरे वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2012 - 7:04 pm | संजय क्षीरसागर

संगीतात जसे बारा स्वर आहेत आणि सर्व संगीत त्या स्वरांची वेगवेगळी परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत त्याचप्रमाणे अंकगणित हा एक ते नऊ आणि शून्य या दहा अंकांचा खेळ आहे.

तो जेव्हा

२५ कोटी १२ लाख ७८ हजार ३९८ ही संख्या २५१२७८३९८ असे एकेक आकडे सांगतो

तेंव्हा ही गोष्ट क्लिअर होते.

पुढे आणखी मजेशीर गोष्ट तुम्ही नमूद केलीये

तो जेव्हा आकाशाकडे बघतो, तेव्हा त्याला प्रश्नाचे उत्तर नजरेसमोर दिसते,असे तो सांगतो

वास्तविकात संगीत हे निव्वळ श्राव्य माध्यम आहे पण संगीतकार देखील आम्हाला सूर दिसतो म्हणतात.

तुमच्या या पोस्टबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.

मी पत्ता उतरवून घेतला आहे, त्याचा (किंवा नातेवाईकाचा) फोन असेल तर कळवा. हा विषय माझ्या विषयाशी (सीए) संबधित असल्यानं मला यात इंटरेस्ट आहे आणि आमच्या इंस्टीट्यूटतर्फे यावर संशोधनाचा प्रयत्न करता येईल का ते पाहतो. त्याच्या देणगीचा तो योग्य सन्मान होईल. शिवाय त्याच्या या अफलातून क्षमतेचा अंकगणिताचा अभ्यास करायला तुफानी उपयोग होईल आणि तो विषय सोपा आणि मजेचा होईल.

मंदार कात्रे's picture

28 Oct 2012 - 11:46 pm | मंदार कात्रे

धन्यवाद संजयजी ,तुमच्या खरडवहीत त्याच्या भावाचा नंबर दिलेला आहे .

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2012 - 10:58 am | संजय क्षीरसागर

व्य. नि. पाठवलाय

तर्री's picture

28 Oct 2012 - 8:53 pm | तर्री

कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते हया अर्थाचा " योकाज तत्र दुर्लभ:" असा शेवट असलेला एक संस्कृत श्लोक अंधुक आठवतो.
संजयजी ,आपला प्रतिसाद वाचला त्याची आठवण झाली.
अश्या उपेक्षितांना उजेडात आणण्याचे मंदारजी व संजयजी प्रयत्न कौतुकास्पद !

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2012 - 9:13 pm | संजय क्षीरसागर

आपण निर्बुद्ध चमत्कारांना सहज देवत्व बहाल करतो (सत्यसाईबाबा, गणपतीनं दूध पीणं, ज्योतिष, देवाला नवस बोलणं, वगैरे) पण इतक्या उघड गोष्टीला, जिचा अवघड गोष्टी सोपी करायला उपयोग होईल, अव्हेरतो.

बाबू देवरुखकर गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2012 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> अश्या उपेक्षितांना उजेडात आणण्याचे .............. कौतुकास्पद !

साहेबलोकहो, उपेक्षितांची माहिती उजेडात आणल्याबद्दल आभार.
फक्त त्यांना देवत्त्व बहाल करु नका. अशिक्षित आणि श्रद्धाळु लोकांची दर्शनासाठी रांग लागेल त्यांच्या घरासमोर.

-दिलीप बिरुटे
(सावध)

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2012 - 9:38 pm | संजय क्षीरसागर

तिथे उत्तर एकतर चूक किंवा बरोबर.

भक्तांना श्रद्धा लागते, तिथे संशोधनाला स्कोप नाही, निर्बुद्ध चमत्कार दाखवावे लागतात. आणि भक्त देवत्व बहाल करतात त्यामुळे बाबू देवरुखकरला देवत्व बहाल होणार नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2012 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बाबू देवरुखकरला देवत्व बहाल होणार नाही
मन:पूर्वक आभार.

माझ्या पाहण्यातली एक स्त्री व्यक्ती. कोणते मंत्र बिंत्र म्हणले की काय करायची कोणास ठाऊक. हात जोडले की हातातुन कुंकु पडायचे. हात जोडले की चांदीच्या वस्तु (करंडा वगैरे) काढायची. खेड्यातुन दर गुरुवारी वगैरे शे पाचशे आरतीला जमायचे. हळुहळु पुढे लोकांना काय बुद्धी झाली कोणास ठाऊक. हळुहळु गर्दी कमी झाली. आता कुत्रही तिकडे फटकत नाही. मला अशा चमत्काराचा बाजार भरायची भीती वाटते, इतकेच.

-दिलीप बिरुटे

राजोपाध्ये's picture

28 Oct 2012 - 11:37 pm | राजोपाध्ये

ऑटिस्टिक साव्हन्ट असलेल्या रुग्णांची अंकगणित आणि पाठांतरातलीं झेप अमानवी असते.
डस्टिन हॉफमन / टॉम क्रूझ चा रेन-मंन आठवतो का?

एफ वाय आयः
ती व्यक्तिरेखा किम पीक ह्या अमेरिकन माणसावर बेतलेली आहे. http://en.wikipedia.org/wiki/Kim_Peek

सांजसंध्या's picture

29 Oct 2012 - 7:43 am | सांजसंध्या

लहानपणी केलेल्या पाठांतराचा संबंध असावा का ? तथाकथित मंदबुद्धी या शब्दाने ओळखल्या गेलेल्या व्यक्तीमधे इतर जबाबदा-यांमधे मेंदूचा वापर होत नसल्याने लहानपणाच्या पाठांतराकडे खेळ किंवा चाळा म्हणून बुद्धीचा वापर जास्त प्रमाणात झाला असेल का ? कुणी याबाबत सांगू शकेल का ?

गणपा's picture

29 Oct 2012 - 1:24 pm | गणपा
चिरोटा's picture

29 Oct 2012 - 4:26 pm | चिरोटा

स्तुत्य प्रयत्न मंदारजी. Zacharias Dase नावाचा एक जर्मन अशाच आकडेमोडीबद्दल १९व्या शतकात प्रसिद्ध होता.दोन १०० आकडी संख्यांचा गुणाकार तो ८ तास ४५ मिनिटात करायचा. अनेक संख्यांचे arcTan(Tan inverrse),logarithm वगैरेही तो तोंडी सांगे.गणिती कार्ल गाउझ ह्याने त्याच्याकडून Log tables/त्रिकोणमितीची काही कामे करून घेतली होती.