एक आदमी मच्छर को ......... बना देता है !
माणूस आणि मच्छर यांच्या मधलं नातं तसं युगा युगांचं आहे , ज्या दिवसा पासून माणूस झोपला , त्याच दिवसा पासून मछरांनी माणसाच्या डोक्यावर फिरून गुणगुणत त्याची झोप खराब करून त्याला चावायला सुरवात केली , माणूस हि गाढ झोपेत असल्यामुळे त्याला कळलेच नाही कि किती आणि कधी मच्छरांनी आपले रक्त शोषले , माणसाने मछरांना कंटाळून शेवटी जंगल सोडून शहर गाठलं , तर मच्छर शहरात पण येऊन धडकले , आत्ता मात्र माणसाने त्यांना संपवायला अनेक प्रकारचे , स्प्रे, मच्छर कोईल ,अंगाला लावायच्या ट्यूब, मच्छरदाणी शोधून काढल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, या उलट ह्या सगळयांन विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवून मच्छर अधिक धीट झाले , शेवटी माणसाने कंटाळून त्यांना आपल्या घरातील सदस्य बनवून घेतले , ह्याचा परिणाम असा झाला कि म्हणतात ना जर दोन प्राणी एकत्र राहू लागले तर त्यांच्यात बऱ्याच गोष्टींची आणि विचारांची देवाण घेवाण होते आणि काही कालांतराने दोघांमध्ये खूप काही साम्य येते , त्याच प्रमाणे मच्छर आणि माणसात हि दीर्घ काळ एकत्र राहिल्याने अनेक साम्य आले .माणूस मच्छर कडून रक्त शोषण करायला शिकला , मालक नोकराचे, श्रीमंत गरीबाचे, शक्तिशाली निर्ब्लाचे ,नेता जनतेचे आणि लोक्तांत्राचे , ज्याला जिथे संधी मिळाली लागला रक्त शोषण करायला ,हा गुण होता जो माणसाला मच्छर कडून मिळाला .
आत्ता आपण मच्छरांबद्दल बोलूया, मच्छरांनी हि माणसाकडून काही गुण ( अवगुण ) शिकले आहेत ,बस त्या दिवसापासून मच्छर जगतात हि हाहाकार माजला .मच्छरांची एकता भंग झाली , काही मच्छर दलबदलू नेते लोकांचे रक्त पिऊन आले आणि त्यांच्यात दलबदलू पणाचे गुण आलेआत्ता ते परत येऊन मच्छरांच्या पंतप्रधानाचे सरकार पाडायचा प्रयत्न करायला लागले,पंतप्रधान समजून गेला कि हे मच्छर दलबदलू नेते लोकांच रक्त पिऊन आले आहेत म्हणून तो वैतागला , मच्छर पंतप्रधानाने त्या त्या दलबदलू मच्छरांना वैदकीय तपासणीसाठी डॉ. मच्छर कडे पाठवले, डॉ.मच्छर पण भ्रष्ट डॉ. चं रक्त पिऊन आला होता आणि त्याच्यात पण तसेच गुण होते , तो पण आत्ता इलाजाच करून जास्त पैसे उकळत होता आणि पोटात दुखत असेल तर शस्त्रक्रिया करून किडनी काढून विकत होता , दलबदलू मच्छरां मध्ये आत्ता पर्यंत दलबदलू नेते लोकांचे सगळे गुण आले होते, त्यांनी डॉ.मच्छर बरोबर सेटिंग केली, त्याला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आणि पंतप्रधानाला वेडा असल्याचे घोषित कर म्हणून सांगितले, जेणे करून त्याचे सरकार खाली पडेल , पण मच्छरांच्या पी.एम. ने पण पोचलेला जुगाडू नेत्याचे रक्त प्यायले होते ,ते मच्छर काही करण्यां अगोदरच ह्या पीएम मच्छर ने त्या दलबदलू नेत्यांना आणि त्या डॉ. ला ठीकाण्यावर लावले आणि आपले सरकार वाचवायला त्या मच्छर पार्टी सोबत हात मिळवणी केली ज्यांचे चेहरे पण त्याला बघायला आवडत न्हवते . जुगाडू नेत्याचे रक्त पिऊन पिऊन तो पण खुर्चीच्या राजनीती मध्ये माहीर झाला होता .
आत्ता महिला मच्छरांची कथा बघा , महिला मछरांनी सासू सुनेच्या मालिकेत काम करणाऱ्या नट्यांचे रक्त प्यायले होते, म्हणून त्या पण कट रचण्यात माहीर झाल्या होत्या ,आत्ता माणसाचे रक्त पिण्यात त्यांना रस राहिला न्हवता, आत्ता त्या एकमेकींचे रक्त प्यायला लागल्या होत्या ,मच्छर सासू मच्छर सुनेला कसे कमी दाखवेन ह्या नादात होती, तर मच्छर सून सासूला देवाघरी कशी पाठवू ह्या प्रयत्नात होती .
मच्छर वर्गात मानवीय गुण ( अवगुण ) आल्यापासून हा समाज पण उध्वस्त झाला. उच्च वर्ग कनिष्ठ वर्गाचे हक्क मारण्यात मग्न झाला , पण कनिष्ठ मच्छर वर्ग पण कमी न्हवता , कनिष्ठ मच्छर वर्ग पण आत्ता आरक्षणाचे आंदोलन करण्यात मग्न झाला , पूर्वी मच्छर स्वतंत्रपणे रक्त पीत होते पण आत्ता काय झालं आरक्षणाच्या कोत्या मधून रक्त प्यायला लागले ,भ्रष्ट म्छ्रांनी ह्याच्यात पण लाच घेणे चालू केले . आत्ता रक्त पिण्यासाठी ह्या मछरांना लाच द्यावी लागत होती . मच्छरां मध्ये पण जलौ वृतीई, चीड, राग इर्ष्या अश्या भावना आल्या होत्या आणि ते आत्ता एकमेकांचे रक्त प्यायला लागले होते .आत्ता मच्छरां मध्ये पण काही चोर उच्क्के, गुंड ,मवाली , भाई टाईप मच्छर जन्माला आले होते , हे मच्छर " रक्त जमा केंद्रातून " रक्ताच्या पिशव्या लुटू लागले , हे तेच " रक्त जमा केंद्र " होते जिथे इतर मच्छरांनी अनेक वर्षापासून माणसाचे रक्त पिऊन पिऊन जमा केले होते .भाई टाईप चे मच्छर सर्वसाधारण मच्छरांकडून आत्ता हफ्ता वासूली करायला लागले .
तसेच भेसळखोर मच्छर रक्तात पाणी मिसळून दुकानावर विकत होते , ह्या मुले मच्छरांचे स्वास्थ्य खराब व्हायला लागले आणि पूर्वीपेक्षा आत्ता मच्छर निर्बल आणि अशक्त झाले होते , आत्ता पूर्वी सारखे ते माणसाच्या डोक्यावर भिनणभिण करत न्हवते , कोणीही मरियल माणूस येऊन त्यांना मारत होता . ह्याच अशक्तपणामुळे पूर्वी जे मच्छर रोगराई पसरवत होते आत्ता स्वतहाच आजारी पडत होते . माणसाचे रक्त पिण्या ऐवजी आत्ता ते बाटलीतले रक्त प्यायला लागले . बाटलीतले रक्त कमी दर्जाचे असल्यामुळे आत्ता मच्छर मधुमेहाचे शिकार होऊ लागले , आणि ह्यामुळे भ्रष्ट डॉ.मच्छरांचे दवाखाने एकदम जोरात चालायला लागले होते .
तरूण मच्छरांची तर काय चांदीच होती ,तरून मादा मच्छरांनी जेव्हा पासून करीना कपूरचे रक्त प्यायले , त्या पण फिगर सांभाळण्याच्या नादात अडकल्या . त्या पण आत्ता एकदम सलीम-ट्रीम होण्यात मग्न झाल्या. तरूण युवा मच्छर तर सलमान आणि हृतिक चे रक्त पिऊन आले होते, ते पण बस बॉडी बनवण्यात मग्न झाले , जेणेकरून मादा मच्छर ना कसे आकर्षित करता येईल ह्या विचारात . एक वयोवृद्ध मच्छर बाजूला एका कोपऱ्यात बसून हे सगळं बघत होता , ह्या म्हाताऱ्या मच्छर ने माणसाचे रक्त न पिण्याचा ध्यास उचलला होता , त्यामुळे त्याच्या अंगी माणसाचे गुण ( अवगुण ) आले न्हवते . इतर मच्छरांचा हा नाद बघून त्याने पण आपला प्रण मोडला आणि एका अश्या म्हाताऱ्या माणसाचे रिक्त पिऊन आला ज्याच्या अंगात ८० व्या मध्ये पण जवानी कुटून कुटून भरली होती . आत्ता त्याला पण ह्या उतार वयात लग्न करण्याचे वेध लागले . त्याने पण मेट्रीमोनी साईट वर आपले नाव नोंदवले आणि शोध चालू केला .
हे सगळं बघून इतर जनावरे गाय,बैल,बकरी कोंबड्या दचकून गेली, त्यांनी मच्छरांची झालेली हि दुर्दशा पहिली , आणि विचार केला, आपण ह्या माणसापासून लांबच राहूया नाहीतर उद्या आपले पण हेच हाल होतील , आपण माणसाचे गुण ( गुण ) कधीच न घेण्याचा इतर प्राण्यांच्या पंचायतींनी कडक निर्णय घेतला , जो कोणी माणसाचे गुण ( दुर्गुण ) घेऊन येईल त्याला २४ तासाच्या आत फाशी , असा एक न्याय जाहीर केला .
प्रतिक्रिया
25 Oct 2012 - 2:21 pm | बॅटमॅन
लेख रोचक आहे पण हिंदाळलेले मराठी शक्यतोवर टाळावे, उदा.
"तरुन मादा मच्छर" - डिस्कव्हरी च्यानेल ;)
"कुटून कुटून भरलेली जवानी"
"मरियल माणूस"
सर्वांत महत्वाचे - मराठीत मच्छरला "डास" असा एक साधा सरळ शब्द आहे :)
असो, हरकत नाही. तुम्ही मध्यप्रदेशकडचे असाल तर हे माफ आहे, नाहीतर नाही.
25 Oct 2012 - 10:52 pm | आशु जोग
नागपूरकडचे लोक हिंदाळलेले मराठी बोलतात
पण
त्यांचे हिंदी मात्र दिव्य असते असा अनुभव असते
31 Oct 2012 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत. :)
25 Oct 2012 - 10:01 pm | मदनबाण
मच्छर पुराण आवडले !
बाकी नको त्या ठिकाणी चावायला डासांना फार आवडत असावे असे मला उगाच वाटते !;)
जाता जाता जालावर सापडलेली मच्छर चालीसा देउन जातो... ;)
25 Oct 2012 - 10:53 pm | आशु जोग
ढेकूण की डास श्रेष्ठ असाही एक वाद आहे
25 Oct 2012 - 11:02 pm | जेनी...
एक मच्छर आदमी को टिंब टिंब बना देता हय |
28 Oct 2012 - 10:25 pm | मंदार कात्रे
लय भारी तुषार भाऊ