राबर्ट्,खुर्शीद,नितिनभाऊ गडकरीजी

चिरोटा's picture
चिरोटा in काथ्याकूट
17 Oct 2012 - 6:39 pm
गाभा: 

'त्यागी' गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट नंतर खुर्शीद आणि आता नितिनभाउ गडकरींचा नंबर लागला आहे.पुढचा बॉम्ब गडकरींवर टाकणार आहोत हे Indian Against Corruption ने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे थोड्यावेळापूर्वी केजरीवाल ह्यांनी बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादीवाल्यांबरोबर हातमिळवणी करून वर्धा येथे १०० कोटी रुपयांची जमीन(NGO च्या नावाखाली) लाटल्याचा आरोप केजरीवाल ह्यांनी केला आहे.सिंचन घोटाळ्यातही पवार/तटकरेंबरोबर गडकरींनीही हात धुवून घेतले आहेत.जनसंघवाले महाराष्ट्रात पुढच्या हजार वर्षातही सत्तेवर येऊ शकणार नाहीत असे आचार्य अत्रे म्हणत.महाराष्ट्रात भाजपवाले विरोधक आहेत की सत्ताधारी हा नेहमी सतावणारा प्रश्न IACलाही पडला आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी संबंधीत व्यक्तींना ह्यात काही वावगे वाटणार नाहीं. निवडणूका जिंकायला हे सगळे करावेच लागते असे कदाचित स्पष्टीकरण दिले जाईल.
http://timesofindia.indiatimes.com/india/Arvind-Kejriwals-next-expose-ta...

प्रतिक्रिया

राजघराणं's picture

17 Oct 2012 - 7:26 pm | राजघराणं

नानाजी देशमुखांचा, अटलजींचा पक्ष मला पटतो. गडकरी व्यावसायीक राजकारणी वाटतात. त्यांची जनतेतली प्रतिमा अजिबात स्वच्छ नाही. नागपुरचे डोके ताळ्यावर असेल तर ताबडतोप गडकरींना बदलतील.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Oct 2012 - 10:45 am | श्री गावसेना प्रमुख

म्हण़जे पुण्यात अजीत पवार किंवा कलमाडी हे स्वछ कारभार करतात वाटते का?
नाही तेथे इतक्या वर्षांपासुन ते कारभार करताहेत म्हटल्यावर्,पुणेकरांचे डोके ठिकाणावरच्?आहे असेच म्हणायचे का?
राहीले बाकी काँग्रेसी मंडळी पवार्,देशमुख्,चव्हाण्,वड्रा,दर्डा,कदम.हि समाजकारण करतात का?

अर्धवटराव's picture

17 Oct 2012 - 9:22 pm | अर्धवटराव

गडकरी आज ना उद्या या वादात अडकणारच होते. चाल-चरित्र वगैरे गप्पा करणे सोपं असतं. सध्या आमच्यापुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे केजरीवाल साहेबांचा बोलावता धनी कोण असावा? मला वाटतं सम्रा़ज्ञी आणि युवराज.

अर्धवटराव

कदाचित सत्तास्थानी या प्रकारात सामील असणार्‍यांचा, हा खालील बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न असेल, पण 'अंजली दमानिया या स्वतःही धुतल्या तांदुळाइतक्या स्वच्छ प्रतिमेच्या आहेत का' या विषयी शंका निर्माण करणारं, त्यांच्या कर्जत येथील जमिनीविषयी हे वृत्त वाचलं. वस्तुस्थिती काय आहे हे अर्थात् स्थानिकच सांगू शकतील. 'RTI activist बनण्यामागे दमानिया यांचा स्वार्थ होता' या आरोपात काही तथ्य असेल तर केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार हटवण्याच्या मूळ दार्शनिक हेतूलाच (stated goal) धक्का पोहोचू शकेल. 'प्रकरणं' उघडकीस आणतांना कोणाची साथ घेतली जाते, यात खूप तारतम्य बाळगणंही गरजेचं आहे.

बाकी, येते काही दिवस आणि महिने बातम्या 'विंटरेष्टिंग' असणार हे नक्की ;-)

तर्री's picture

17 Oct 2012 - 10:20 pm | तर्री

प्रमोद महाजन आणि गडकरी ह्यानी राजकारणात राहून मैत्री जपली.
जनसंघ वाले कधीही सत्तेत येणार नाहीत असे अत्रे म्हणालेही असतील . अत्रे बरेच काही बोलले आहेत आणि ते सगळे "बरोबर " त्रिकालाबाधित सत्य " वाटण्याचे काही कारण नाही.

अटलजी आणि नानाजी च्या काळातही भा.ज.पा. / जनसंघात भ्रष्टाचारी , आत्म केंद्रित , बेशिस्त नेते होवून गेले. भार्ष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे आणि तुलनेने भा.ज.पा. मध्ये कमी भ्रष्ट नेते आहेत. एवढेच.

मात्र भा.ज.पा. ची मातृ संस्था भ्रष्टाचारी नाही आणि कोंग्रेस ची गंगोत्रीच भ्रष्ट आहे.

काही लोकांना अटलजी चे नाव घेवून भा.ज.पा. ला शिव्या देणे सुरु असते. त्यातून त्यांची वैचारिक प्रगल्भता वगैरे दिसते असे त्यांना वाटते.

कुशाभाऊ ठाकरे , केदारनाथ सहानी प्रमाणे आजही भा.ज.पा त माधव भंडारी ,निर्मला सीतारामन , विनय सहस्रबुद्धे ही मंडळी आहेत. तेच भाजपा चे बलस्थान आहे. बाकी गडकरी सोवळे राहिले तर पक्षाची स्थिती प्रजा समाज वादी पक्षा सारखी होईल.
अधमासी व्हावे अधम ह्याच न्यायाने काँग्रेस चे उच्चाटन होवू शकते.
तुम्हाला कोण व्हावेसे वाटते "गुजरात कि रेस्ट ऑफ गुजरात " ?

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2012 - 10:56 pm | श्रीरंग_जोशी

महाराष्ट्रातील गेल्या ५ सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केल्यास नितीन गडकरींच्या साडेचार वर्षातील कामगिरीच्या जवळपासही कुणी फिरकू शकणार नाही. सलग १३ वर्षे मंत्री राहणारेसुद्धा. त्या काळात त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे व कर्तबगार अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांत आमूलाग्र क्रांती झाली.

त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या योजनांचा अभ्यास इतर राज्यांच्याच नव्हे तर इतर देशांच्याही सरकारांनी केला. १९९९ निवडणूकीत युतीच्या प्रचारात गडकरींच्या कामगिरीखेरीज सांगण्यासारखे विशेष काहीच नव्हते.

आजच्या काळात राजकारण्यांनी व्यावसायिकच असायला हवे. राज्य किंवा देश चालवायला पुरेपूर व्यावसायिक वृत्ती हवी. पोथीनिष्ठ पद्धतीने संघटना चालवता येईल पण राज्याला किंवा देशाला पुढे नेता येणार नाही.

आजच्या राजकारण्यांमध्ये अशी माणसे विरळाच. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण केले जाऊ नये. कारण त्यामुळे पुढच्या पिढीतले या प्रकारचे राजकारणी देखील हतोत्साहीत होतील.

चिरोटा's picture

17 Oct 2012 - 10:57 pm | चिरोटा

निर्मला सीतारामन ह्यांची आज गडकरींचा बचाव करताना दमछाक होत होती.

बाकी गडकरी सोवळे राहिले तर पक्षाची स्थिती प्रजा समाज वादी पक्षा सारखी होईल.

+सहमत. पण हाव सुटल्यासारखे खाणे व पोट भरेल एवढेच खाणे ह्यात फरक आहें. नरेंद्र मोदी गेले ११ वर्षे सत्तेवर आहेत्.पण जमीन लाटल्याचे वा विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी करून असले धंदे केल्याचे ऐकिवात नाही.मोदींच्या सरकारातही मंत्री काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत पण ते पचेल एवढेच खातात.
एकीकडे मराठी जनता आम्हाला कधीच निवडून देत नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे पवार्,काँग्रेसवाल्यांबरोबर सलगी करून फायदे उपटायचे हे योग्य नाही.

कापूसकोन्ड्या's picture

18 Oct 2012 - 10:52 am | कापूसकोन्ड्या

वाय पी सिन्ग काय म्हणतात पहा. केजरीवाल पुर्ण सत्य सांगत नाहीत.

चेतन माने's picture

18 Oct 2012 - 11:30 am | चेतन माने

अरविंद केजरीवाल हे त्यांच्या नव्या राजकीय पक्ष्यासाठी "राजकीय स्पेस" निर्माण करतायत. देशातील दोन्ही मोठे राजकीय पक्ष हे कसे भ्रष्टाचारी आहेत हेच दाख्वाचय त्यांना. ह्या गोष्टी जरी सत्य असल्या तरी त्या कायदेशीररित्या जर सिद्ध करता येत नसतील तर निव्वळ आरोप करून काय होणार? देशाला नवा पर्याय केज्रीवालांचा पक्ष आहे इतकंच ह्यातून साध्य होईल. बाकी भ्रष्टाचाराच्या फक्त माळाच बनतील आणि परिस्थिती जैसे थे तशीच राहील!!!

बापू मामा's picture

18 Oct 2012 - 12:37 pm | बापू मामा

गडकरींवर काल झालेले आरोप हे त्यांनी केलेल्या कार्याच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक आहेत. युती सरकारात त्यांनी केलेली
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांची बांधणी, सत्तेबाहेर असल्यावरही त्यांनी केलेला नागपूर /विदर्भाचा विकास डोळ्याआड करता येणार नाही. आज नागपूरचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला असून, पुणेकरही त्याकडे असुयेने पाहतात. मुंबई तील फ्लाय ओव्हर्स, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ह्या सर्व कामांकडे पाहीले तर त्यांच्यावर केलेले आरोप हे नगण्य आहेत.
खरे तर केजरीवालांसारख्या व्यक्तीने राजकारणात प्रत्यक्ष सहभाग न घेता, अण्णांसारखे व्रतस्थ राहून बाहेरून अंकुश ठेवला तर योग्य राहील. भारतात हे परंपरेने चालत आले आहे. सत्ताधारी भ्रष्ट असत, व त्यांवर अंकुश ठेवणारे नेहमी सत्ताबाह्य असत. वसिष्ठ्,द्रोण,आर्य चाणक्यादी राजगुरुंचे हेच कार्य होते. अपवाद फक्त छ. शिवाजी महाराजांचा. ते स्वयंभू धर्मज्ञ राजे होते.प्रसंगी धर्मसत्तेला शासन करण्याचीही त्यांची योग्यता होती.
आण्णांनी केजरीवालांशी फारकत घेऊन खरेच अत्यंत योग्य निर्णय घेतला.

विसुनाना's picture

18 Oct 2012 - 12:58 pm | विसुनाना

चुकीचे टारगेट - चुकीची बंदूक - चुकीचा खांदा - चुकीची गोळी:

देशातील अनेक (सत्तापक्ष-विरोधी पक्ष) नेत्यांचे साटेलोटे असते ही जनसामान्यांना पूर्वापार माहित असलेली परंतु फारशी चव्हाट्यावर न आलेली बाब आहे. त्यात नवीन काय आहे? आजवर या सत्याच्या पार्श्वभूमीवरच या देशात निवडणुकांचे राजकारण होत आले. पण ते साटेलोटे उघड करण्याचा प्रयत्न करताना केजरीवालांनी फार काळजीपूर्वक व्यूव्हरचना केली नाही असे वाटते.

भाजप अध्यक्ष नितिन गडकरी हे टारगेट फारच सॉफ्ट आहे. भाजपाला लोक गडकरींचा पक्ष म्हणून ओळखत नाहीत. जर काही खरी खळबळ उडवायची असेल आणि भाजपावर लोकांचा रोष व्हावा असे वाटत असेल तर यापेक्षा हाय-प्रोफाईल (जसे - सुषमा स्वराज, अरूण जेटली, लालकृष्ण आडवाणी) नेत्यांवर पुराव्यांनिशी आरोप व्हायला हवे होते. अगदी परफेक्ट निशाणा साधायचा असेल तर भाजपाचे हीरो नरेन्द्र मोदींवर पुराव्यांनिशी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला हवे होते.

महाराष्ट्रातील जलसिंचन घोटाळ्यात ७०००० करोड रुपयांचा अपहार झाल्याचे पुराव्यांसह गंभीर आरोप होत असताना त्याचा वापर केवळ सत्तापक्ष-विरोधी पक्ष यांच्यातील संगनमत दाखवण्यासाठी झाला आणि तोही विरोधी पक्षनेत्यावर टीका करण्यासाठी झाला ही पहिली चूक झाली. कारण या प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या धरणाचा उल्लेख झाला ते धरण या घोटाळ्यापूर्वीच्या काळात बांधले गेल्याने सिंचन घोटाळ्याबाबत काहीच बोलता आले नाही. फक्त एका नेत्याने दुसर्‍या विरोधी नेत्याला एक १०० एकर जमिन मागणी करताच ताबडतोब लीजने दिली आणि म्हणून विरोधी पक्षाने म्हणावा तसा आवाज सिंचन घोटाळ्याविरोधात उठवला नाही एवढा आरोप होऊ शकला. पण जसे बेनीप्रसाद म्हणाले - 'केंद्रीय मंत्री फक्त ७१ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करेल असे वाटत नाही.'- तसेच असे म्हणता येईल की गप्प बसण्यासाठी गडकरींनी फक्त १०० एकर जमिन ११ वर्षे लीजने घेतली - तेही एका धर्मादाय संस्थेसाठी- हे पटत नाही.

अंजली दमानियांच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हीसुद्धा चूक झाली. त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत - त्या स्वतःच एक लँड शार्क आहेत (म्हणजे खरेतर त्या पिढीजात शेतकरी नसल्याने शेतजमिन खरेदी करू शकत नाहीत तरीही कायद्याच्या पळवाटा वापरून तीस-चाळीस एकर शेतजमिन खरेदी केली), आपल्या जमिनीच्या बदल्यात आदिवासींच्या जमिनी पाण्याखाली गेल्या तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नाही, आपली जमिन पाण्याखाली जाऊ नये या स्वार्थी हेतूने त्यांनी आरटीआयचा वापर केला - जनकल्याणासाठी नव्हे. इ.इ.

प्रत्यक्ष गडकरींवर झालेले 'जमिनीचे लीज' आणि 'धरणाचे पाणी पळवणे' हे आरोपही चुकले. त्यापेक्षा मोठे आणि खरा संशय निर्माण करणारे आर्थिक घोटाळ्यांचे आरोप व्हायला हवे होते. गडकरींच्या संस्थांमध्ये कुणाचे पैसे गुंतलेले आहेत?, त्यातून त्यांचा काही वैयक्तिक फायदा झाला का?, हा फायदा मिळण्यामागे त्यांनी आपल्या सरकारी पदाचा गैरवापर केला का? हे मुख्य प्रश्न होते.

असो. पण निदान नेत्यांचे साटेलोटे असते ('राजा नागडा आहे') हे माहित असलेले सत्य जनतेसमोर उघडपणे बोलून दाखवण्याचे धैर्य केजरीवालांनी दाखवले याबद्दल त्यांचे कौतुक आहे. प्रश्न एवढाच आहे की हॅन्स अँडरसनच्या त्या गोष्टीत राजाची मिरवणूक तर तशीच पुढे जात राहते पण त्या मुलाचे पुढे काय झाले ते कळत नाही. तद्वत भारताची/गडकरींची/इतर पक्षातील नेत्यांची राजकीय वाटचाल तर सुरूच राहील पण केजरीवालांचे पुढे काय होईल? हा प्रश्न आहे.

चिरोटा's picture

18 Oct 2012 - 1:37 pm | चिरोटा

तसेच असे म्हणता येईल की गप्प बसण्यासाठी गडकरींनी फक्त १०० एकर जमिन ११ वर्षे लीजने घेतली - तेही एका धर्मादाय संस्थेसाठी- हे पटत नाही

जमीन घेतली हे पुराव्यानिशी बाहेर आले. आणी काही धंदे केले असतीलच पण त्याचे पुरावे उपलब्ध नसावेत्.देशात बहुतांशी काळे धंदे हे पुरावे मागे न ठेवता होतात.तसे नसते तर जयललिता,लालू,पवार्,रेड्डी,करुणानिधी,राणे,भुजबळ हे सर्व तुरुंगात खितपत पडले असते.
गडकरी हे सॉफ्ट टारगेट आहे हे खरेच पण ज्या नेत्यांच्या (गैर)व्यवहारांबद्दल चर्चा चालु असते त्यात कृपाशंकर सिंग्,नारायण राणे,तटकरे,पवार घराणे या महनिय लोकांबरोबर गडकरीही येतात्.युती सरकार ९५-९९ मध्ये सत्तेवर असताना गडकरी,शिवणकर्,सोमैया,राणे,घोलप ह्या लोकांनी 'लोकोपयोगी' कामे करण्याबरोबर बर्‍यापैकी नोटा छापल्या होत्या असे तेव्हा अनेकांचे म्हणणे होते.

अगदी परफेक्ट निशाणा साधायचा असेल तर भाजपाचे हीरो नरेन्द्र मोदींवर पुराव्यांनिशी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला हवे होते.

मोदी भ्रष्टाचारी आहेत का? काही गुजराती मित्रांशी बोलल्यावर जाणवले की मोदी फक्त पक्षासाठीच पैसे घेतात.

विकास's picture

18 Oct 2012 - 5:04 pm | विकास

राबर्ट का क्या हुआ? का आय एअ एस ऑफिसर प्रमाणे राबर्टच्या बातमीची पण ट्रान्सफर झाली?

असं दिसतय आता तेच गडकरींबाबत होणार - कारण आता म्हणे साहेबांवर आरोप ठेवणार आहेत!

चिरोटा's picture

18 Oct 2012 - 5:38 pm | चिरोटा

मिडिया साहेबांविरुद्ध कधीच लिहित नाही.वरिष्ठ पत्रकारांना सेटिंग करून चॅनेलवर आणले जाईल व केजरीवाल ह्यांना वेडे ठरवण्याचा प्रयत्न होईल.अशा प्रकारचे आरोप्-प्रत्यारोप लोकशाहीस कसे विघातक आहेत ह्यावर चर्चा रंगेल.महाराष्ट्रापुरते बोलायचे तर केजरीवालांवर दोन्ही सेना सोडल्या जातील.

राबर्ट हा जणु देशाचाच जावई असल्याचे समजुन अख्खा कॉग्रेस पक्ष आणि त्यांच्या पक्षातील "विद्वान" मंडळी रॉबची वकिली करायला सरसावले ! आहाहा काय ते रॉबर्ट प्रेम...
या रॉबर्टची आणि त्याची बाजु घेणार्‍या कॉग्रेसची या खेमकांनी चांगली पाचर मारली आहे,यांनी रॉबर्ट वढेरा व डीएलएफ कंपनीतला व्यवहारच रद्द केला.
याचे फळ म्हणजे या "प्रामाणिक"अधिकार्‍याची तडकाफडकी बदली करण्यात आली,अर्थात त्यांच्यासाठी ही गोष्ट नवी नाही कारण २१ वर्षात त्यांची ४३ वेळा बदली झाली.( या वरुन तुम्हाला अंदाज येईल की देशात भ्रष्टाचाराची व्याप्ती किती आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्याला कसे पिचवले जाते.)
हा रॉबर्ट जर सोनिया गांधीचा जावई नसता तर त्याला इतकी कमाई इतक्या सहज आणि पटकन करता आली असती ?
ज्या पद्धतीने डीएलएफ ने रॉबर्ट बरोबर व्यवहार केला त्याच प्रमाणे त्यांनी देशातील इतर कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार केला असता का ?
देशातले हे सर्व भ्रष्ट नेता मंडळी जनतेला नागवुन स्वतःच्या तुंबड्या भरत आहेत्,आम आदमी चे सरकार म्हणुन जाहिरता करणारे कॉग्रेसचे सरकार आम आदमीच्या मरणावर टिपुन बसली आहे.सामान्य गरिब जनतेने अश्या परिस्थीतीत जगायचे कसे ? सगळीकडे भ्रष्टाचार ! तेल माफिया,वाळू माफिया,टोल माफिया ( राज ठाकरेंच टोल आंदोलन कुठे गेलं बरं ?),राशन माफिया,भू-माफिया अश्या आणि अनेक माफियांनी देशात हैदोस घातला आहे,पण फरक कोणाला पडतो !
आता परत लवासाचे भूत प्रकट झाले आहे... बघुया काय नाट्य घडतयं ते !

तर्री's picture

18 Oct 2012 - 8:28 pm | तर्री

गोवा , गुजरात, म.प्रदेश , छ. गड ही भा.ज.पा. शासित राज्ये उत्तम , लोकाभिमुख आहेत. एक कर्नाटक सोडले तर भा.ज.पा. राज्यांचा कारभार नक्कीच समाधान कारक आहे.
कर्नाटक चा लांच्छनास्पद कारभार नसता तर भा.ज.पा.चा पर्याय जनतेने नक्की स्वीकारला असता. पण एका राज्यामुळे "सगळेच" चोर मध्ये भा.ज.पा.ची जिम्मा झाली.

खास पुरोगामी साठी : भा.ज.पा. शासित राज्यांचा जी.डी.पी. इतर देशाच्या सरासरी पेक्षा जास्त आहे. ( अटलजी नसतानाही )

नितिन थत्ते's picture

19 Oct 2012 - 12:16 am | नितिन थत्ते

>>भा.ज.पा. शासित राज्यांचा जी.डी.पी. इतर देशाच्या सरासरी पेक्षा जास्त आहे.

ही माहिती बहुधा फक्त फेसबुकवर उपलब्ध आहे. ;)

इतर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? इतर राज्यांच्या मानाने?

एकूण जीडीपीत (२०११-१२) महाराष्ट्र- आंध्र- उत्तर प्रदेश- तामीळनाडू - गुजरात - बंगाल - कर्नाटक - केरळ - राजस्थान असा क्रम आहे.

दरडोई जीडीपी मध्ये गोवा - दिल्ली - हरियाणा - तामीळ नाडू - केरळ - महाराष्ट्र - सिक्कीम - पंजाब - उत्तराखंड - गुजरात असा क्रम आहे.

दरडोई जीडीपी मध्ये गोवा सर्वोच्च आहे असे असले तरी दोन्ही याद्यांमध्ये पुढे असलेली बहुतेक राज्ये भाजप शासित नाहीत.
ग्रोथ रेटचे २०१२ चे सर्व राज्यांचे आकडे जालावर सापडले नाहीत. त्यामुळे तुलना करता आली नाही. २०१०-११ च्या उपलब्ध आकड्यांनुसार बिहार - तामीळनाडू - महाराष्ट्र - राजस्थान - गुजरात - आंध्र - केरळ - मध्यप्रदेश असा क्रम आहे.

फेसबुकावर गाजवले जात असलेले गुजरात कुठल्याच यादीत अग्रस्थानी नाही. :(

नितिन थत्ते's picture

19 Oct 2012 - 12:28 am | नितिन थत्ते

फेसबुकावर गाजवले जात असलेले गुजरात कुठल्याच यादीत अग्रस्थानी नाही

अर्थात श्रद्धेवर कुठलाच उपाय काम करत नाही हे खरेच.

अवांतर : प्रतिसाद संपादनाची सोय कधी परत येणार?

आणि निष्ठावंत काँग्रेसींचे राजकारण हे फक्त सोय या एका गोष्टीवरच चालते.
सोयीच्या ठिकाणी पूर्ण गप्प बसणे. ज्या चांगल्या वाटतील त्याच बातम्या, तेच मुद्दे चघळणे.
जे अडचणीत आणतात असे मुद्दे सरसकट बाजूला सारणे किंवा चक्क सपशेल नाकारणे.
दिशाभूल करणे, एकदम वेगळे आणि संबंध नसलेले नवीन विषय उपस्थित करून मुळ मुद्द्याला बगल देणे.
अशा अनेक राजकीय गुणांच्या समुच्चयाच्या जोरावर गेली इतकी दशके राज्य चालू आहे.
राज्यशास्त्र आणि राजकारण यात फरक करण्याचीही त्यांना इच्छा होत नाही. आणि नियंत्रण इतकं कमालिचं आहे की अर्थाअर्थी काही संबंध नसलेले निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा या तालमीत झकास तयार होतात आणि तिरकस तलवारी पाजळत राह्तात..

असो.. हा इकॉनॉमिस्टचा नवीन दुवा, दुवा.
आकडे या वर्षीचे आहेत. एकूण जीडीपी मध्ये महाराष्ट्र- उत्तर प्रदेश- आंध्र- तामीळनाडू - बंगाल - गुजरात - कर्नाटक - राजस्थान -- केरळ असा क्रम आहे.
पण ग्रोथ रेट च्या यादीत सिक्कीम - उत्तराखंड - दिल्ली या तीन लहान राज्यांनंतर गुजरात - हरयाणा - महाराष्ट्र - बिहार - ओडीशा - तमिळनाडू- छत्तीसगड - आंध्र - केरळ - कर्नाटक- मध्य प्रदेश असा क्रम आहे.

Denial Mode (मराठी?) मध्ये गेलं की सगळंच नाकारता येतं किंवा नाकारावंसंच वाटतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Oct 2012 - 5:01 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. देशाची कितीही वाट लागली, देश विकून खाल्ला तरी चालेल पण या तथाकथित लिबरल लोकांना काँग्रेसच पाहीजे ? का? देशापेक्षा यांचे लिबरल जास्तं मोठं आहे का?

नितिन थत्ते's picture

19 Oct 2012 - 5:18 pm | नितिन थत्ते

>>Denial Mode (मराठी?) मध्ये गेलं की सगळंच नाकारता येतं किंवा नाकारावंसंच वाटतं

आणि श्रद्धा असली की सगळं फक्त छानच दिसतं. आणि नाकारावंसं वाटण्याचं कारण त्या राज्यात सुमारे दोन वर्षे राहिल्यावर खरं काय ते जवळून दिसतं. :) वीजपुरवठा सोडला तर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये काही फरक दिसला नाही.

दिलेला इकॉनॉमिस्टचा दुवा पाहिला. त्यात पुन्हा गुजरात आणि मिझोरामचे ग्रोथ आकडे २०११ पर्यंतचे आहेत असे म्हटलेच आहे. आणि नकाशातली ग्रोथ २००३-११/१२ अशी लाँग टर्म आहे. त्या लाँगटर्म मध्ये (किंवा शॉर्ट टर्ममध्येही) गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. पुभा उत्तराखंड, दिल्ली आणि सिक्कीम लहान म्हणून आउटलायर धरायचे (असं तुम्हीच म्हणत आहात) तर गुजरात आणि (आकाराने गुजरातच्या दीडपट असलेल्या) महाराष्ट्राची सुद्धा अशी तुलना करायला नको. किंवा मग कुणाचीच कुणाशी तुलना नको. त्यातही लाँगटर्म ग्रोथ रेटमध्ये (अल्टिमेट बेष्ट राज्यकर्ता लाभलेले) गुजरात १०% आणि (मठ्ठ आणि भ्रष्टशिरोमणी काँग्रेस राष्ट्रवादी राज्यकर्ते लाभलेले) महाराष्ट्र ९% म्हणजे शेवटी फारसा फरक नाहीच.

माझ्या मूळ प्रतिसादाचा उद्देश भाजपशासित राज्ये इतरांपेक्षा पुढे आहेत या दाव्यातला फोलपणा दाखवणे हा होता.

मैत्र's picture

20 Oct 2012 - 3:51 am | मैत्र

हा आहे की भाजपशासित राज्ये जीडीपी मध्ये पुढे आहेत हे खोडून काढण्यासाठी
"फेसबुकावर गाजवले जात असलेले गुजरात कुठल्याच यादीत अग्रस्थानी नाही." हे सोयीचे विधान आहे.
जसं मूळ विधानाला आधार नाही तसाच नंतर त्याला निरुत्तर करण्यासाठी उगाच टोकाची भूमिका घेण्यातही अर्थ नाही.

मी दिलेल्या दुव्यावर इकॉनॉमिस्टने राज्यांच्या बाबतीत "Size Does Matter" असा विचार मांडला आहे. महाराष्ट्र कायम आघाडिवर राहिला आहे. विशेषतः एकूण जीडीपी मध्ये. गुजरात त्याच्या आकाराप्रमाणे रांगेत आहे.
त्यामुळे आकाराने गुजरातच्या दीडपट असलेल्या महाराष्ट्राची तुलना नको हे खरंच आहे. मग त्याचबरोबर अतिशय लहान असे आता सिक्कीम आणि उत्तराखंड हे गुजरातच्या पुढे आहेत म्हणून गुजरात आघाडीवर नाही हे उगाच ताणून धरणे म्हणावे लागेल. इकॉनॉमिस्ट चे विश्लेषण हे जास्त अर्थशास्त्रीय आहे. बरेचदा इकॉनॉमिस्ट राजकीय ध्येयधोरणे, परिस्थिती, बदल यावर भाष्य करताना दिसते. पण तसा भाव इथे दिसत नाही.
अल्टिमेट बेष्ट राज्यकर्ता इ. विचारसरणीचा मी नाही. २००४ मध्ये मनमोहन सिंग यांना मतदान करावं अशा विचाराचा होतो काँग्रेस समर्थक नसूनही.

असो, एकूणात एका दाव्यातला फोलपणा दाखवण्यासाठी त्याचे रॅशनल देताना सरसकटीकरणाची प्रतिक्रिया ही सिब्बल धर्तीची वाटली. पण कदाचित माझी अपेक्षा करण्याची जागा चुकली असावी.

मैत्र's picture

20 Oct 2012 - 4:07 am | मैत्र

मी स्वतः गुजरात मध्ये राहिलो नाही.
फक्त माझे सख्खे नातेवाईक गुजरात मध्ये गेली सुमारे ३०-४० वर्षे स्थायिक आहेत. तुलना करून पाहता थोडी परिस्थिती चांगली वाटते. अतिउत्तमही नाही आणि महाराष्ट्राला वाईट म्हणावे असेही नाही.
पण सुधारणा उत्तम आहेत हे मात्र अनेकांनी स्वत: सांगितले आहे.

नितिन थत्ते's picture

20 Oct 2012 - 10:05 am | नितिन थत्ते

>>मी स्वतः गुजरात मध्ये राहिलो नाही
तो एक मुद्दा आहे.

मूळ प्रतिसादात "भाजपशासित राज्ये पुढे" असा मुद्दा होता. त्याला मी खोडले होते. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी जे काही दुवे/माहिती पुढे आली त्यात गुजरात सोडून काहीच नाही. आणि शेवटी "तुलना करून पाहता थोडी परिस्थिती चांगली वाटते. अतिउत्तमही नाही आणि महाराष्ट्राला वाईट म्हणावे असेही नाही" एवढेच कन्क्लूजन निघाले. :(

मैत्र's picture

20 Oct 2012 - 3:01 pm | मैत्र

मी कुठे म्हणतोय गुजरात अति महान आहे. तुम्ही तो कसा लहान आहे हे सिद्ध करताय.
मी स्वतः इकॉनॉमिस्ट चा "आकाराप्रमाणे जीडीपी" हा मुद्दा मांडत असतानासुद्धा असला भावनिक मुद्दा - " भाजप प्रणीत राज्ये पुढे आहेत" याचं समर्थन करतोय हे मांडणं हा पुन्हा एकदा सोयीचा वाद आहे.
मी फक्त गुजरात कुठल्या यादीत पुढे नाही फक्त फेसबुकावर आहे या विचारसरणीचं खंडन करत होतो.
आकडे न पाहता फक्त भाजपची भलावण करणं जितकं चू़क आहे तितकंच किंवा त्याहून जास्त आकडे पाहून आणि स्वतः मांडून फक्त एखाद्या राज्यात भाजपची सत्ता आहे म्हणून त्या राज्याचे आकडे नाकारणं हे चूकीचं आहे.
केवळ एक पक्ष या आधारावर एक बाजू घेतली जात असेल तर दोन्ही पक्षांचे समर्थक या विचारसरणीने एकाच पारड्यात येतात.. फरक काही नाही.. हा माझा मुद्दा होता आणि आहे.
याचं उदाहरण उलट द्यायचं तर भाजप वाले सिक्कीम आणि महाराष्ट्राच्या ग्रोथ रेट ची तुलना करून आघाडी सरकार वर प्रगती होत नसल्याची टीका करतील. ते जितकं पायाहीन आहे. तितकंच बळंच गुजरातमध्ये काही नाही आहे म्हणणं सुद्धा.

नितिन थत्ते's picture

20 Oct 2012 - 4:45 pm | नितिन थत्ते

सहमत आहे. पक्षनिहाय दृष्टीकोनाने नुसत्या दोन्ही बाजूच्या भूनिका घट्ट होतात. भाजपशासित राज्ये पुढे आहेत या तर्रॉ यांच्या भूमिकेचे खंडन मी करत होतो. तेव्हा त्यावर काही आकडे देऊन (गुजरात पुढे आहे असे दाखवत) तुम्ही त्यात सहभाग घेतला. म्हणून गुजरातचा मुद्दा अधिक चालवावा लागला.

महाराष्ट्राचा आकार व लोकसंख्या जास्त असल्याने जीडीपी अधिक असणार यात काहीच शंका नाही. म्हणूनच माझ्या आकडेवारीत पर कॅपिटा जीडीपी आणि ग्रोथ रेट हे सुद्धा मुद्दे घेतले होते.

"फेसबुकवर गाजत असलेले गुजरात" हा पासिंग रिमार्क मारला कारण गेली कित्येक वर्षे मोदींनी गुजरातमध्ये स्वर्ग उभा केला आहे किंवा करत आहेत अशी हवा पद्धतशीरपणे निर्माण केली गेली आहे. आकडेवारीतून (आणि प्रत्यक्ष जमिनीवरच्या परिस्थितीतून) मात्र तसे दिसत नाही असे म्हणणे म्हणजे सत्य नाकारणे असे विधान तुम्ही केला. म्हणून वाद अधिक चालला.

जाऊ द्या. तुम्हाला दसर्‍याच्या शुभेच्छा.

नितिन थत्ते's picture

19 Oct 2012 - 5:35 pm | नितिन थत्ते

या दुव्यावर २००० ते २०१२ पर्यंतचे एफडीआयचे आकडे दिसतील. (रि़अर्व बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांतून आलेले आकडे)

महाराष्ट्रात ३४% आणि गुजरात मध्ये ५% विदेशी गुंतवणूक आली. अगदी अलिकडच्या काळातले आकडे घेतले तरी दोन्ही राज्ये तुलना करण्यासारखी सुद्धा दिसत नाहीत.

पण जौंद्या. आता आवरते घेतो.

विकास's picture

19 Oct 2012 - 6:29 pm | विकास

(बारामतीच्या नाही, लंडनच्या वोरीजीनल) साहेबांना सांगत होतो की गुजरात मध्ये जाऊ नका. पण ऐकायलाच तयार नाहीत!

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Oct 2012 - 6:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

आणि रतन टाटा, अंबानी सुध्दा गुजरातचीच (विशेषतः मुख्यमंत्र्यांचीच) तारिफ करतात. अशी तारिफ कोणा उद्योगपतीने इतर कोणत्या मुख्यमंत्र्याची केलेली ऐकिवात नाही. फक्त मोदी गुजरातमध्ये नव्या गोष्टी आणत आहेत त्यात एक प्रॉब्लेम आहे.आणि तो म्हणजे ते कोणताही सिस्टॅमिक बदल करत नाही आहेत आणि मोदी या नावाभोवतीच सगळे फिरत आहे. काही कारणाने भविष्यात मोदी (केंद्रात गेल्यामुळे किंवा अन्य कारणाने) गुजरातपासून दूर गेले तर मात्र हे मोमेन्टम टिकणार नाही अशी भिती वाटते.

मी मोदी समर्थक म्हणवत नाही.पण जर सर्वोच्च न्यायालयाच्या तिस्ता सेटलवाड एट ऑल च्या मागणीवरून नेमलेल्या एस.आय.टी ने मोदींना क्लिन चीट दिली असेल तर त्यांना बेनेफिट ऑफ डाऊट द्यायला हवा असे जरूर वाटते.

विकास's picture

19 Oct 2012 - 1:07 am | विकास

त्यामुळे तुलना करता आली नाही. २०१०-११ च्या उपलब्ध आकड्यांनुसार

या मुद्यावर प्रतिसाद देण्या आधी, मी पण माहिती शोधत होतो. पण आपण दुवा दिल्याने सोपे झाले असे वाटले. पण, काय योगायोग आहे... मी, आपण दिलेल्या दुव्यावर टिचकी मारली तर ब्राउजर मध्ये असे आले:

This Connection is Untrusted
maharashtra.gov.in uses an invalid security certificate.
The certificate is only valid for *.maharashtra.gov.in
(Error code: ssl_error_bad_cert_domain)

=))

पण विकीवरील दुव्यातील माहिती, आपण दिलेल्या दुव्याशी साधर्म्य दाखवत आहे. :-)

याच संदर्भात इकॉनॉमिस्टमधील हा इंटरअ‍ॅक्टीव्ह रिपोर्ट बघण्यासारखा आहे. (आकडे २००९ चे आहेत)

An Indian summary
Which countries match the GDP and population of India's states and territories?

Error: Embedded data could not be displayed.

विकास's picture

18 Oct 2012 - 11:43 pm | विकास

शेतक-यांची गडकरींना 'क्लीन चिट'

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींविरोधात आरोपांचा डंका पिटणा-या आणि विदर्भातील शेतक-यांचे मसिहा व्हायला निघालेल्या अरविंद केजरीवाल अँड कंपनीला त्याच शेतक-यांनी तोंडावर पाडलंय. गडकरींविरोधात आमची कुठलीही तक्रार नाही, उलट त्यांच्यामुळे आमचा फायदाच झालाय, असा खुलासा खुर्सापूरमधील दोन शेतक-यांनी केल्यानं केजरीवालांनी फेकलेला बॉम्ब ' फुस्स्स ' झालाय.

शेतक-यांनी गडकरींना क्लीन चिट दिली असली तरी, आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं केजरीवाल कंपनीचं म्हणणं आहे. राजकीय दबावामुळे शेतकरी गडकरींविरोधात बोलत नसल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या डॉ. अंजली दमानिया यांनी केला आहे.
...

केजरीवालांनी गडकरींवर केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी एका मराठी वृत्तवाहिनीनं थेट या दोन शेतक-यांचं घर गाठलं. तेव्हा, त्यांची गडकरींविरोधात कुठलीच तक्रार नसल्याचं समोर आलं आहे. जलसंपदा खात्याकडे आम्ही आमची उर्वरित जमीन परत मागितली होती, पण या जमिनीची मालकी आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्याशी आमचा वाद आहे, गडकरींशी नाही. त्यांनी आम्हाला कधीही धमकावलेलं नाही. उलट, गडकरींमुळे आमचा फायदाच झालाय, असं या दोन्ही शेतक-यांनी नमूद केलं. गडकरींवर केजरीवालांनी केलेले आरोप हा निव्वळ मूर्खपणा असल्याचंही त्यांनी सुनावलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला आपल्याकडे काही मंडळी आली होती. पण त्यांना आपण गडकरींच्या विरोधात काहीच सांगितलं नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या या जमिनीची मालकी या आमच्याकडे नसली, तरी तिथे आम्हीच शेती करतोय, असं स्वतः शेतक-यांनीच सांगितल्यानं केजरीवाल यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न निर्माण झालाय.

नितिन थत्ते's picture

19 Oct 2012 - 12:20 am | नितिन थत्ते

(केजरीवाल/दमानिया यांचे म्हणणे खरे मानले तरीसुद्धा) केजरीवाल यांचा गडकरी बाँब तसाही फुसकाच होता. :)

चिंतामणी's picture

19 Oct 2012 - 1:16 am | चिंतामणी

असो.

पण "जावईबापू" , त्यांच्यावरील आरोप आणि त्याबद्दल चौकशी करणा-या I A S ऑफीसरची बदली याबद्दल आपले विचार वाचायला आवडतील.

विकास's picture

19 Oct 2012 - 6:21 am | विकास

तुम्हाला काय म्हणायचे आहे, "जावईबापूं"वरील आरोप खरे आहेत? आणि आय ए एस ऑफिसरची काय उगाच बदली झाली? आता परत नाही विचार करणार वाकड्या नजरेने बघायचा! :-) अहो जावई, धुतल्या तांदळासारखे आणि आयएएस अधिकारी तांदूळ धुऊन झाल्यावर राहीलेल्या अस्वच्छ पाण्यासारखे. ;)

आशु जोग's picture

20 Oct 2012 - 12:46 am | आशु जोग

अनुमोदन !

गडकरी बॉम्ब फुसका निघाला.

बादवे

गडकरी यांनी केलेली कामे वाखाणण्याजोगी आहेत.

असो

गडकरी नि केजरीवाल दोघांबद्दल आदर कायमच आहे

विसुनाना's picture

19 Oct 2012 - 1:08 pm | विसुनाना

उलट, गडकरींमुळे आमचा फायदाच झालाय, असं या दोन्ही शेतक-यांनी नमूद केलं.

-हॅ,हॅ,हॅ. पांढरपेशा लोकांना गावरान लोकांचा हिसका माहित नसतो. त्यात दमानिया बाई तर पक्क्या शहरी. थोडे ग्रामिण मराठी चित्रपट पाहिले असते तरी त्यांना थोडाफार अंदाज आला असता.

स्वतःचा स्वार्थ आधी पहावा आणि मग आंदोलन,मोर्चेबिर्चे - हे त्यांना पक्के माहित असते. कॉलंग मोडकसाहेब!

अच्छा म्हणजे शहरी वि. खेडवळ असा वाद आहे काय ?
ही नवीन माहीती आहे

(खेडवळ) जोग

विसुनाना's picture

20 Oct 2012 - 11:43 am | विसुनाना

'खेडवळ' हा शब्द मी वापरलेला नाहीए.
मराठी आंतरजालवरील एका प्रसिद्ध लेखकाने शहरी लोकांचा खेड्यातील वातावरणाबद्दल आणि लोकांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. शहरी लोकांना असे वाटते की खेड्यातली जनता अश्राप, पापबिचारी असते. तिला कोणीही फसवू शकते. शहरी ( म्हणजे व्हाईट कॉलर्ड म्हणजे केजरीवाल टाईप म्हणजे फेसबुकी ) अ‍ॅक्टिव्हिजमने या जनतेची होणारी तथाकथित गळचेपी थांबवता येईल आणि या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिजमची त्यांना गरज आहे. पण तसे काही नाही. आपले भले कशात आहे ते त्यांना चांगले समजते आणि त्याप्रमाणेच ते वागतात. त्यामुळे शहरी अ‍ॅक्टिव्हिस्टना त्यांचे वागणे कधीकधी अनपेक्षित वाटले तरी ती त्या अ‍ॅक्टिव्हिस्टच्या अनुभवाची मर्यादा असते. असाच एक नवा अनुभव दमानिया बाईंना आला. इतकेच!
यात शहरी वि. 'खेडवळ' (?) असा मुद्दा नाही.

चिरोटा's picture

19 Oct 2012 - 12:26 am | चिरोटा

हम्म. बातमीदाराने आपण कुठल्या पक्षासाठी काम करतोय ते पहिल्या वाक्यातच दाखवून दिलय.

चौकटराजा's picture

19 Oct 2012 - 4:29 pm | चौकटराजा

खरे तर या देशातील सर्वात हिडीस गोष्ट कुठली असेल तर " न्यायव्यवस्था" ( मी न्यायाधीश म्हणत नाही). न्याय व्यवस्थेतील तुंबलेले काम इतके प्रचंड आहे तीन शिफ्टस मधे न्यायालये चालविणे गरजेचे आहे. हे होणारच नाही. हे ज्याना माहीत आहे असे लोक गुन्हेगारी करायला पुढे सरसावतात मग तो आपल्या सोसायटीचा सचिव असो वा पंतप्रधान. पोलीस खात्यास निवडणूक आयोगाप्रमाणे " स्वतंत्र " कायदेशीर अस्तित्व दिल्यास ही स्थिती सुधारू शकेल
न्यायव्यवस्थे प्रमाणेच पोलेसांची सुटका लोकप्रतिनिधीच्या तावडीतून झाल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.मुळात सर्व समस्यांचे निराकरण एक तर घटना करू शकते किंवा संसद हा गोड गैरसमज निदान नव्या पिढीने तरी मनातून काढला पाहिजे. संसदेचे काम कायदे करण्याचे असले पाहिजे न्यायदानाचे किंवा अन्वेषणाचे नव्हे. नव्या भारताची न्रिर्मिती करायची असल्यास किमान दहा ठिकाणी सत्ता वाटली गेली पाहिजे. केजरीवाल व अण्णा हजारे याना रोगाचे मूळ समजले आहे. पण हे दोघेही गावठी सर्जन आहेत. त्याना भारतातील चांगले निवृत्त अधिकारी,वकील अशानी साथ दिली पाहिजे. तर
केजरीवालांची तगमग कमी होईल.

विनायक प्रभू's picture

20 Oct 2012 - 10:32 am | विनायक प्रभू

अजित च्या असिस्टंट चे नाव काय हो?
तो लिक्विड आकसिजन वाल हो.

आशु जोग's picture

20 Oct 2012 - 10:51 pm | आशु जोग

देखो रॉबर्ट
--

बादवे वद्राच्या पोराला सोनियामाता 'अजित' म्हणतात

हुप्प्या's picture

21 Oct 2012 - 6:32 pm | हुप्प्या

नुकतेच राष्ट्रजामात वद्राजींनी खाजगीत असे कबूल केले की त्यांच्या नावातील टी ह्या अक्षराचा उच्चार होत नाही. टी सायलेण्ट आहे.
त्यामुळे ह्या सर्व आरोपांचे आपोआपच खंडन होते असे म्हटले जाते.

तुम्ही काय खाजगी मैफल केलीत वाटते त्यांच्याबरोबर
भाग्यवान आहात

चिरोटा's picture

21 Oct 2012 - 11:53 pm | चिरोटा

आशुजी, गडकरींचे काय करायचे ? त्यांना आरोप झाल्या झाल्याच राजीनामा द्यायला सांगितला असता तर भाजपाच्या प्रतिमेत बराच फरक पडला असता असे नाही वाटत ? केजरीवाल कसेही असोत , सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त क्रेडिबिलिटी त्यांना आहे असे मला वाटते.

आशु जोग's picture

22 Oct 2012 - 1:49 am | आशु जोग

>> गडकरी नि केजरीवाल दोघांबद्दल आदर कायमच आहे