भारताच्या सारख्या प्रजासत्ताक राष्ट्रात अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं? नातेसंबंधांमध्ये ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाची रूपे आहेत तितकेच किंबहुना भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचे पैलू स्त्री रुपाला आहेत. अगदी कुठल्याही पुरुषासाठी जन्म देण्यापासून ते शय्यासोबत करायला देखील स्त्रीच असते. ज्या स्त्रीला हिंदू संस्कृतीने देवता रूप दिलं तिच्यावर आज अनन्वित अत्याचार होतात. नामशेष होणाऱ्या प्रजातीला वाचवण्या साठी ज्या प्रमाणे आवाहन केलं जातं त्याच सुरात “मुलगी वाचवा” असे ओरडून सांगावे लागते? जनावराचा “माणूस” व्हायला खूप काळ जावा लागला पण सद्य परिस्थिती वरून असे वाटते की उलटी गणती चालू झाली असावी …. त्यामुळे माणसांमध्ये “जनावरे” वाढायला लागली आहेत.
हरियाणा (नावात “हरी” …बाकी सगळं शिव शिव) या सार्वभौम भारताच्या एका राज्यात गेल्या एका महिन्यात १५ बलात्काराच्या घटना घडल्या. त्यात बहुतांश घटना या सामुहिक बलात्काराच्या होत्या. ज्या प्रमाणे ४-५ जनावरे श्वापादावर तुटून पडतात त्या प्रमाणे पिडीत स्त्रियांच्या मनाचे आणि शरीराचे लचके तोडले गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात पण कुचराई केली. शेवटी प्रसार माध्यमांचा वाढत्या दबावापुढे प्रशासनाला झुकावे लागले आणि चौकशीचे आदेश दिले गेले. अर्थात किती जण पकडले जातील आणि किती जणांना शिक्षा होईल ते हरीच जाणो.
या सगळ्या प्रकारावर कडी केली ते खाप पंचायत आणि माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी. यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणारी समस्त मानव जाती यांच्यावर हसत असेल. खाप पंचायत म्हणते बलात्काराचे प्रमाण कमी करायचे असेल तर मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करायला हवी. म्हणजे त्या भरकटणार नाहीत? कसला सॉलिड जावई शोध आहे या पंचायतीचा. १६व्या वर्षी मुलीचे लग्न केल्यावर बलात्कार कमी होतील?? आणि या निर्णयाला चौटाला यांनी चक्क पाठिंबा दिला. नुसताच पाठींबा देऊन ते शांत नाही बसले, त्यांनी बलात्कारांच्या घटनांच्या निषेधार्थ राज्यपालांना आवेदन पत्र पण दिले. ज्या दिवशी सोनिया गांधी हरियाणातील पिडीत मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या त्याच दिवशी बलात्काराच्या ४ घटना घडल्या.
खाप पंचायतीच्या सुचने कडे बघितल्यास खरंच हसावं का रडावं तेच कळत नाही. बलात्काराची व्याख्या यांना सांगायची वेळ आली आहे. बलात्कार कोण करतं? यात सध्यातरी मक्तेदारी पुरुषांकडे आहे. अजून तरी ऐकिवात नाही की एका स्त्रीने पुरुषावर बलात्कार केला. कुठलीही स्त्री स्वतः हून म्हणेल का … ये रे पुरुषा माझ्यावर बलात्कार कर. आणि तिची संमती असेल तर तो बलात्कार होईलच कुठे? असो तर पुरुष जर हे घृणास्पद कृत्य करत असेल तर १६व्या वर्षी लग्न करण्याचे जाच स्त्री करता का? लग्न झालेल्या स्त्रीवर बलात्कार होत नाहीत असं म्हणायचय का खाप ला? उलट कधी कधी खुद्द नवरा नामक नराकडून देखील जबरदस्ती होते आणि ती मुकाट्याने सहन करावी लागते. अशी सूचना हेच करू शकतात. बघा ना. गावातली मुलगी १६ ची झाली रे झाली की तिचं लग्न लावून दिलं. अश्या सगळ्या मुलींचे लग्न जर १६ व्यात झालं की त्या नराधमांना मुलीच मिळणार नाहीत बलात्कारासाठी. आहे की नी गंमत. खाप वाले म्हणतील कसं फसवलं त्या पुरुषांना … आता बसतील हलवत …. काय मुर्खपणा आहे हा. जो अत्याचार करतो तो मुक्त फिरत राहणार आणि जिच्यावर अत्याचार होतो तिचे वैयक्तिक सगळे हक्क डावलून त्या कोवळ्या जीवाला संसाराच्या जोखडाला रेटायच? हे म्हणजे चोर सोडून संन्याश्याला फाशी दिल्यासारखे आहे.
हरियाणात अश्याच काही कन्व्हर्ट झालेल्या जनावरांनी कायद्याला फाट्यावर मारलय आणि अश्या आजूबाजूच्या व्यवस्थेमुळे त्यांच्या अतिरेकाला खतपाणीच मिळत आहे. खरे तर अश्या जनावरांना वेळीच वेसण घातली पाहिजे आणि अश्या प्रवृत्तींना वाचक दिला पाहिजे. नाहीतर उद्या सामान्य माणूस हेच म्हणेल एकीकडे मुलगी जगवा असे आवाहन करायचे आणि दुसरी कडे तिच्याच अब्रुचे धिंडवडे काढायला ही जनावरे टपलेली आहेतच. तिची अवहेलना होण्यासाठी तिला जन्म द्यायचा का असा विचार माझ्यातला “बाप” कायम करत राहील. हरियाणाला लागलेली ही नराधमांची कीड इतरत्र पसरू नये हीच इच्छा.
प्रतिक्रिया
16 Oct 2012 - 3:02 pm | कपिलमुनी
हा शारिरिक'च' मानला तर पुरुषांनी बहुतांशी वेळा केला आहे ..
बाकी खाप पंचायतीचा निषेध !!
16 Oct 2012 - 4:50 pm | सर्वसाक्षी
देशाची राजधानी तसूभरही मागे नाही.
सध्या काही कारणास्तव हरियाणा माध्यमात गाजत आहे हे खरे पण ही समस्या देशभर आहे. गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना राजाश्रय मिळाल्यावर दुसरे काय होणार? देशात सर्वत्र हेच चालु आहे. काही उजेडात येतात काही येत नाहीत. कडक कायदा आणि प्रामाणिक व तात्काळ अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत पायबंद बसणे शक्य नाही. मुळात तशी कुठल्याही राजकारण्याची इच्छा दिसत नाही, शेवटी त्यांना गुन्हेगारांची आर्थिक वा शारिरीक मदत ही लागतेच.
खाप आणि चौटाला यांच्याकडे दुर्लक्ष करणे बरे.
16 Oct 2012 - 5:00 pm | दादा कोंडके
परवाच कुणीतरी म्हणलं की मिडीयानं या बातम्या हाईप केल्या आहेत म्हणून. त्या नरपुंगवाच्या मते बहुतेक झालेले बलात्कार हे जबरदरस्ती नसून संगनमताने असलेली लैंगिक संबंध असतात आणि नंतर मग स्त्रिया बलात्काराची केस दाखल करतात म्हणून. त्याच दिवशी एका सहावर्षाच्या मुलीवर अत्याचाराची बातमी होते. :(
16 Oct 2012 - 7:24 pm | अर्धवटराव
>>एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं?
-- हाच दुटप्पीपणा हिंदुंना / भारतीयांना नडतोय. अधोगतीचं दुसरं कारण म्हणजे श्रमाला मिळणारा हीन दर्जा. इतर देश कानामागुन येऊन आपल्या पुढे निघुन गेले ... याचं कारण तिथे स्त्रियांना उगाच पुज्य वगैरे मानत नाहि व त्यांची हेळसांड देखील करत नाहि... शिवाय मनुष्याला त्याच्या कार्यकुशलतेवरुन दर्जा मिळतो, तो काय काम करतो यावरुन नाहि. वी नीड अ रॅडीकल चेंज.
अर्धवटराव
16 Oct 2012 - 8:36 pm | पैसा
http://en.wikipedia.org/wiki/Indian_states_and_territories_ranking_by_se...
इथे पहा. २०११ च्या जनगणनेनुसार हरयाणात स्त्रियाचे प्रमाण दर १००० पुरुषांमागे ८७७ स्त्रिया एवढे कमी आहे. त्यापेक्षा कमी प्रमाण फक्त दिल्ली, चंदीगड, दादरा-नगरहवेली आणि दीव-दमण या अगदी लहान राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत आहे. हेच प्रमाण केरळ मधे १०००:१०८४ आहे.
http://theonlinegk.wordpress.com/2011/04/02/literacy-rate-in-indian-stat...
साक्षरतेचे प्रमाण केरळमधे ९७% तर हरयाणात फक्त ७६% आहे. खाप पंचायतीचे एकूण विचार, त्यांचे वेडेचार या गोष्टींचा सरळ सबंध या दोन्ही गोष्टींशी लावता येतो.
17 Oct 2012 - 4:20 pm | पुण्याचे वटवाघूळ
बहुदा केरळमधले १०% पुरूष गल्फमध्ये नोकरीसाठी गेले असल्यामुळेच हे प्रमाण असे असावे असे दिसते :) (अतिशयोक्ती नाही पण दुबई-मस्कतमध्ये हॅपी इद आणि हॅपी ओणम अशी ग्रिटिंग कार्डे दिसतात. इतक्या प्रमाणावर मल्लू लोक तिथे आहेत. हॅपी दिवाली कार्डे तितक्या प्रमाणावर मला तरी बघायला मिळाली नव्हती.)
18 Oct 2012 - 1:14 am | धनंजय
म्हणून स्त्री:पुरुष प्रमाण हे जन्माच्या वेळी, आणि बालपणातही ठरवतात.
जन्माच्या वेळी :
केरळ : १००० पु : ९६४ स्त्री
हरियाणा : १००० पु : ८४७ स्त्री
(या प्रमाणावरून स्त्रीगर्भाचा गर्भपात जोखता येतो.)
५ वर्षांखालील मुलांमध्ये प्रमाण :
केरळ : १००० पु : ९७० स्त्री
हरियाणा : १००० पु : ८२४ स्त्री
(या लहान वयात हयगयीमुळे बालके मरू शकतात. या वयातल्या बालकांचे स्त्री:पु प्रमाण जन्माच्या वेळच्यापेक्षा घसरले, तर दुर्लक्षामुळे अधिक मुली मरत असल्याचा संकेत मिळतो.)
17 Oct 2012 - 3:52 pm | बॅटमॅन
आज अजून एक भयानक बातमी आलेली आहे...६३ वर्षांच्या म्हातार्याने १३ वर्षांच्या मुलीवरती ४ महिने बलात्कार केला, बरं केला तो केला त्याला वाळीत टाकायचे सोडून पंचायत त्याला पाठीशी घालतेय :( काय कमेंट देऊ तेदेखील नै कळत.
http://newspolitan.com/world/india/2012/10/17/ndtv-Haryana-panchayat-shi...
17 Oct 2012 - 4:12 pm | मदनबाण
६३ वर्षांच्या म्हातार्याने १३ वर्षांच्या मुलीवरती ४ महिने बलात्कार
वटवाघुळ मानवा अरे रानटीपणा करणारे हे असे अनेक नराधम समाजात मोकाट हिंडत आहेत. देशभरात बलात्कारांच्या संख्येत आणि बातमीत रोज भर पडत आहे !
या वरील घटनेतील मुलीला आता शाळेतुन देखील काढुन टाकण्यात आले आहे ! :( गेल्या ५ आठवड्यात हरियाणात जळपास १९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत !
समाजतला विकॄतपणा दिवसेनदिवस वाढताना दिसुन येत आहे,ज्यात मध्यंतरी एका विकॄत हैवानाने १३ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता ! :(
सामान्य जनतेचे जिणे भयावह झाले असुन कायद्याचा धाक उरलेला दिसत नाही,शेवटी नागरिकांचा उद्रेक होतो आणि त्याचा परिणाम गुंडांना ठेचुन मारण्यात होत आहे.
17 Oct 2012 - 6:18 pm | बॅटमॅन
:( ..........
17 Oct 2012 - 9:23 pm | शिल्पा ब
असे किळसवाणे विकृत प्रकार का वाढत असावेत?
18 Oct 2012 - 1:34 am | अर्धवटराव
आजकाल ते लोकांसमोर जास्त प्रमाणात यायला लागलेत. यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण होऊन सरकारने, समाजाने काहि गंभीर अॅक्शन घेतली तरच काहि सुधारणा होण्याची शक्यता आहे.
अर्धवटराव
18 Oct 2012 - 4:25 pm | बॅटमॅन
+१.
लोकांसमोर येण्याचे प्रमाण वाढलेय, निव्वळ संख्या नाही.
18 Oct 2012 - 7:33 pm | मदनबाण
लोकांसमोर येण्याचे प्रमाण वाढलेय, निव्वळ संख्या नाही.
अहं,असं नाही ! नॅशनल क्राईम रिपोर्टच्या अहवालानुसार का वाढणारा ट्रेंड आहे, दिल्ली बहुधा या बाबतीत आघाडीवर असावी.देशातील स्त्रीयांवर बलात्कार होतात,त्याच प्रमाणे विदेशी महिला पर्यटकांवर देखील बलात्कार होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही गोष्टींमुळे देशाचे नाव जागतिक पातळीवर खाली जात आहे,महिला आपल्या देशात सुरक्षित नाही हा संदेश सर्वदूर पसरत आहे.
संदर्भः- Rape, the fastest growing crime in India
Rape biggest crime trend in India: National Crime Record Bureau
The rapes will go on
18 Oct 2012 - 7:51 pm | मदनबाण
असे किळसवाणे विकृत प्रकार का वाढत असावेत?
जर तुमचा युग प्रभावावर विश्वास असेल तर मग.. युद्धिष्ठीर आणि मार्कडेय मुनी यांचातला संवाद वाचला होता,तो इथे देतो.
Vana Parva: Markandeya-Samasya Parva