फोटो स्वच्छ आणि पाहावेसे असे आहेत. पण फोटो कुठले आहेत, दोस्त मंडळी कोण कोण आहेत ? एकत्र कसे जमलो ? कसा प्लॅन केला, ऐनवेळी कोणी दांडी मारली, थोड्सं प्रास्ताविक, थोडं वर्णन, थोड्या थापा आणि हळवा, आठवणीत रमणारा, वगैरे समारोप. मग मजा येते अशी भटकंती वाचायला..!
थापा म्हणजे असं का की होटेलातील भरल्या डिशचा फोटो काढायचा व तो " तेथील" प्रेपरेशन म्हणून ड्कवायचा व वाहवा
म्हण्जे मस्तच रे , तोंडाला पाणी सुटले , जळलो , इनो घेतले आहे असे चान चान प्रतिसाद मिळवायचे ?
अहो, आता तुम्हा मोठ्या माणसांना थापांचं स्पष्टीकरण कसं देऊ ! पण तुम्ही म्हणता तसं थोडं थोडं पेरायचं. :)
उदा.किल्ला चढण लागण्यापूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी एक भजे आणि मिसळ विकणारा होता. स्वच्छ हातांनी मिसळ सर्व्ह केल्यानंतर मिसळीचं काय वर्णन करु. केवळ अप्रतिम. आत्तापर्यंत इतक्या ठिकाणी मिसळी खाल्ल्यात पण यासम हीच. मिसळीत चांगले लांब लांब मोड फुटलेले मटकी, मस्त पैकी बारीक आणि जाड शेव, मिसळीत अधुन-मधुन लागलेले भजे. चिरलेला सुबक कांदा, जळजळीत तर्री आणि वरती पाव. खल्लास...... यातलं किती खरं आणि किती खोटं प्रवाशाला आणि देवालाच माहिती. :)
अहो, आता तुम्हा मोठ्या माणसांना थापांचं स्पष्टीकरण कसं देऊ
आमी मोठी मान्सं म्ह्ण्जी आवरंगाबादेत आमच्या कपाळावरच्या अगणित सुरकुत्या चानलव्रर दिसत्यात की काय ?
अगदी हेच आणि हेच टंकायला आलो होतो.. ओलेते, खेळतांनाचे फोटोज टाकून "वॉव,ऑसम, यु हॅड अ ब्लास्ट ड्युड" वगैरे नाही मिळवता येत इथे राव भालेराव.. भटकंतीत आम्ही भेट दिलेल्या जागेचे वर्णन, झालंच तर भुगोल-इतिहास वाचायला मिळेल, ही अपेक्षा ठेवतो..त्या पुर्ण करण्याची सक्ती नाही, पण पन्नासरावांचे वाक्य लक्षात ठेवावे ही विनंती..
तेथे कोण असतात टाकलेले फोटो आणि प्रतिक्रिया उडवायला? :P
ता. क. : सरकार अशी व्यवस्था सुरु करण्याच्या विचारात आहे असे ऐकले. तसे झाल्यास सरकारच्या नावाने फोडू!
फोटो क्र. २, ३ व ७ मधे दिसणार्या चिमण्या ईतर फोटोत कुठे गायब झाल्या ते समजत नाही.
फोटो क्र. ४ व फोटो क्र. ११ एकच असावा असा संशय घेण्यास भरपुर जागा आहे.
फोटो क्र. ९ आणि १० मधे दिसणारा कुत्रा हाच फोटो क्र. ३ मधे पण आहे का?
फोटो क्र.८ मधे हातात चेंडु घेउन ओरडणारा इसम आनंदाने ओरडतो आहे कि काही दुखते आहे म्हणुन? ते समजत नाही.
या फोटोंमधिल पुरुष एकाच प्रकारच्या रोगाने पिडीत झालेल्या दिसतात. त्यांच्या बोटांची ठेवण पहा. अंगठ्या शेजारचे बोट आणि करंगळी सरळ आणि यांच्या मधली दोन बोटे वाकडी अशीच सगळ्यांची ठेवण दिसते.
@@@@@@या फोटोंमधिल पुरुष एकाच प्रकारच्या रोगाने पिडीत झालेल्या दिसतात. त्यांच्या बोटांची ठेवण पहा. अंगठ्या शेजारचे बोट आणि करंगळी सरळ आणि यांच्या मधली दोन बोटे वाकडी अशीच सगळ्यांची ठेवण दिसते.
मिपावर लेखाच्या दुव्यावर परिनिर्देशक नेल्यास लेखाचे पूर्वदृश्य दिसेल अशी सोय करायला हवी.
च्यायला 15 Oct 2012 - 2:28 am | निनाद मुक्काम प...
च्यायला
आमचे प्रतिसाद हे मूळ लेखा हून मोठे असतात.
आणि इथे लेखाचा पत्ता नाही
.
आणि फोटोतून काही खास व्यक्त होत नाही.
ते मराठी चेपू संबंधी काय लिहिले आहे त्याच्याशी सहमत
प्रतिक्रिया
12 Oct 2012 - 8:27 am | किसन शिंदे
व्वा!! फोटो छान आहेत पण याच्या जोडीने थोडेसे लिखान आणि गडावरील बुरूजांचे १-२ फोटो टाकले असते तर आणखी मजा आली असती.
12 Oct 2012 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो स्वच्छ आणि पाहावेसे असे आहेत. पण फोटो कुठले आहेत, दोस्त मंडळी कोण कोण आहेत ? एकत्र कसे जमलो ? कसा प्लॅन केला, ऐनवेळी कोणी दांडी मारली, थोड्सं प्रास्ताविक, थोडं वर्णन, थोड्या थापा आणि हळवा, आठवणीत रमणारा, वगैरे समारोप. मग मजा येते अशी भटकंती वाचायला..!
-दिलीप बिरुटे
12 Oct 2012 - 10:24 am | चौकटराजा
थापा म्हणजे असं का की होटेलातील भरल्या डिशचा फोटो काढायचा व तो " तेथील" प्रेपरेशन म्हणून ड्कवायचा व वाहवा
म्हण्जे मस्तच रे , तोंडाला पाणी सुटले , जळलो , इनो घेतले आहे असे चान चान प्रतिसाद मिळवायचे ?
12 Oct 2012 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, आता तुम्हा मोठ्या माणसांना थापांचं स्पष्टीकरण कसं देऊ ! पण तुम्ही म्हणता तसं थोडं थोडं पेरायचं. :)
उदा.किल्ला चढण लागण्यापूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी एक भजे आणि मिसळ विकणारा होता. स्वच्छ हातांनी मिसळ सर्व्ह केल्यानंतर मिसळीचं काय वर्णन करु. केवळ अप्रतिम. आत्तापर्यंत इतक्या ठिकाणी मिसळी खाल्ल्यात पण यासम हीच. मिसळीत चांगले लांब लांब मोड फुटलेले मटकी, मस्त पैकी बारीक आणि जाड शेव, मिसळीत अधुन-मधुन लागलेले भजे. चिरलेला सुबक कांदा, जळजळीत तर्री आणि वरती पाव. खल्लास...... यातलं किती खरं आणि किती खोटं प्रवाशाला आणि देवालाच माहिती. :)
-दिलीप बिरुटे
(थापाड्या)
12 Oct 2012 - 7:55 pm | चौकटराजा
अहो, आता तुम्हा मोठ्या माणसांना थापांचं स्पष्टीकरण कसं देऊ
आमी मोठी मान्सं म्ह्ण्जी आवरंगाबादेत आमच्या कपाळावरच्या अगणित सुरकुत्या चानलव्रर दिसत्यात की काय ?
12 Oct 2012 - 8:42 am | प्रचेतस
किल्ला कुठेच दिसला नाही म्हणून निराशा झाली.
12 Oct 2012 - 9:53 pm | गणपा
काय हे वल्लीशेट उद्या कुणी बोरीबंदरचा फटु टाकला तर म्हणाल 'हॅ यात काय मज्जा? यात बंदरच नाही.' ;)
12 Oct 2012 - 9:56 pm | सूड
एक संपादक दुसर्या संपादकाला प्रतिप्रश्न करत नाही म्हणे !!
13 Oct 2012 - 1:11 pm | इरसाल
माझ्या कंपुतल्याचा प्रतिसाद का उडवला म्हणुन.
12 Oct 2012 - 10:07 pm | प्रचेतस
:) :) :)
12 Oct 2012 - 2:29 pm | ५० फक्त
मिसळपाव म्हणजे मराठी फेसबुक नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
12 Oct 2012 - 6:52 pm | गणामास्तर
हेचं टंकायला आलो होतो.
बाकी, थोडं वर्णन,किल्ल्याचा इतिहास (अर्थात माहित असेल तर) वैग्रे सांगितल असतं तरी चाललं असतं.
13 Oct 2012 - 8:41 am | ५० फक्त
गेला बाजार जे फोटोत आहेत त्यांचं वर्णन्,इतिहास भुगोल लिहिला असता तरी चालवुन घेतलं असतं, तेवढे दयाळु आहेत मिपाकर.
14 Oct 2012 - 1:16 pm | चिगो
अगदी हेच आणि हेच टंकायला आलो होतो.. ओलेते, खेळतांनाचे फोटोज टाकून "वॉव,ऑसम, यु हॅड अ ब्लास्ट ड्युड" वगैरे नाही मिळवता येत इथे राव भालेराव.. भटकंतीत आम्ही भेट दिलेल्या जागेचे वर्णन, झालंच तर भुगोल-इतिहास वाचायला मिळेल, ही अपेक्षा ठेवतो..त्या पुर्ण करण्याची सक्ती नाही, पण पन्नासरावांचे वाक्य लक्षात ठेवावे ही विनंती..
(फेसबुकी अॅटीट्युड विरोधी) चिगो
12 Oct 2012 - 2:48 pm | इरसाल
मिसळ्पाव चालेल असे वाट्टे कधी कधी.
12 Oct 2012 - 2:55 pm | सूड
मराठी फेस्बुक म्हणुन मिसळ्पाव चालेल असे वाट्टे कधी कधी.
+१
12 Oct 2012 - 3:54 pm | पैसा
मिसळपाववर तुम्ही संपादकांच्या नावाने खडे फोडता, फेसबुकावर कोणाच्या नावाने फोडणार? ;)
12 Oct 2012 - 7:08 pm | sagarpdy
तेथे कोण असतात टाकलेले फोटो आणि प्रतिक्रिया उडवायला? :P
ता. क. : सरकार अशी व्यवस्था सुरु करण्याच्या विचारात आहे असे ऐकले. तसे झाल्यास सरकारच्या नावाने फोडू!
15 Oct 2012 - 9:27 am | इरसाल
बोलायचे काम नाय. आमी खडे फोडुन फोडुन तर म्हाराष्ट्रातले अर्दे रस्ते बांधले गेले हायेत.
12 Oct 2012 - 9:38 pm | मराठे
फोटो जरा कमीच आहेत नै?
12 Oct 2012 - 9:52 pm | सूड
तुम्ही टाकलेल्या फोटोंमुळे कोरीगडावर समुद्रही आहे हे कळलं.
12 Oct 2012 - 10:29 pm | सुहास..
अरे सुड्या , खानदेशी मोड >> हे ईतल बोल लावण्यापेक्षा, त्वी कोरीगड ची मागल्ली लिंक टाकस ना ?? <<< पिनिश ( मी तर अजिबात नाय ! )
13 Oct 2012 - 1:15 pm | इरसाल
सुहासा सुहासा काय हे खान्देशी मोड चुकवला ना.
खानदेशी मोड: आठे इतला बोल लावापेक्षा तु ती कोरीगड्नी मांघली लिंक काब्र टाकत नइ ? >>
13 Oct 2012 - 9:36 am | ज्ञानराम
शेवटून दुसरा फोटो चांगला आलाय ( अर्थात " भू भू चा")

तुम्ही टाकलेल्या फोटोंमुळे कोरीगडावर समुद्रही आहे हे कळलं..... >>>>>>>> १११ % सहमत...

13 Oct 2012 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार
फोटो क्र. २, ३ व ७ मधे दिसणार्या चिमण्या ईतर फोटोत कुठे गायब झाल्या ते समजत नाही.
फोटो क्र. ४ व फोटो क्र. ११ एकच असावा असा संशय घेण्यास भरपुर जागा आहे.
फोटो क्र. ९ आणि १० मधे दिसणारा कुत्रा हाच फोटो क्र. ३ मधे पण आहे का?
फोटो क्र.८ मधे हातात चेंडु घेउन ओरडणारा इसम आनंदाने ओरडतो आहे कि काही दुखते आहे म्हणुन? ते समजत नाही.
या फोटोंमधिल पुरुष एकाच प्रकारच्या रोगाने पिडीत झालेल्या दिसतात. त्यांच्या बोटांची ठेवण पहा. अंगठ्या शेजारचे बोट आणि करंगळी सरळ आणि यांच्या मधली दोन बोटे वाकडी अशीच सगळ्यांची ठेवण दिसते.
13 Oct 2012 - 11:22 am | स्पा
@@@@@@या फोटोंमधिल पुरुष एकाच प्रकारच्या रोगाने पिडीत झालेल्या दिसतात. त्यांच्या बोटांची ठेवण पहा. अंगठ्या शेजारचे बोट आणि करंगळी सरळ आणि यांच्या मधली दोन बोटे वाकडी अशीच सगळ्यांची ठेवण दिसते.
__/\__
14 Oct 2012 - 1:03 am | एस
मिपावर लेखाच्या दुव्यावर परिनिर्देशक नेल्यास लेखाचे पूर्वदृश्य दिसेल अशी सोय करायला हवी.
15 Oct 2012 - 2:28 am | निनाद मुक्काम प...
च्यायला
आमचे प्रतिसाद हे मूळ लेखा हून मोठे असतात.
आणि इथे लेखाचा पत्ता नाही
.
आणि फोटोतून काही खास व्यक्त होत नाही.
ते मराठी चेपू संबंधी काय लिहिले आहे त्याच्याशी सहमत
15 Oct 2012 - 6:50 am | सचिन भालेकर
खरच विसरलो हो... मि पुढ्च्या वेळेस नक्किच माहिती टाकिल हो.....
कोरीगड लोणावळ्या पासुन जवळ्च आहे.... भुशी धरनाच्या पुढे.... गडावर चार बुरुज व पाण्याची तळी व महादेवाचे देउळ आहे.... खुप कमी लोकाना माहित आहे.......
15 Oct 2012 - 9:35 am | मोदक
कोरीगडावर आजही छोट्या आकाराच्या ३ / ४ तोफा आहेत.
कोरीगडावर कोराईमाता (किंवा अशाच नावाच्या देवीचे) नावाचे मंदीर आहे.
कोरीगडावर जाणारे एकूण ३ रस्ते आहेत
कोरीगडावर एका बुरूजाखाली भुयारी मार्ग अस्तित्वात आहेत (चोरमार्ग)
कोरीगडावरून दूर लोणावच्याच्या दिशेने नागफणीचे आणि हवामान व्यवस्थीत असेल तर तुंग, तिकोणा अशा किल्ल्यांचे ही दर्शन होवू शकते.
लोणावला ते कोरीगड हा रस्ता (अँबी व्हॅलीच्या कृपेने) एकदम व्यवस्थीत आहे.
(अधिक माहितीसाठी कॉलींग वल्ली / जातीवंत भटका / झेलेश.)
16 Oct 2012 - 4:49 pm | शैलेन्द्र
" खुप कमी लोकाना माहित आहे......." :)
अहो म्हनुन तर थोडे कोरीगडाचे फोटो टाकायचे ना? तसे तुम्हीही कमीच लोकांना माहीत आहात, त्यामुळे तुमचे फोटो टाकणेही चुकीचे नाहिच म्हणा.. ( ह घे)
25 Oct 2012 - 7:37 pm | मुकुन्द_कुलकणी
ओके .
29 Oct 2012 - 12:15 am | सावकार स्वप्निल
मित्रा छायाचित्रे उत्तम आहेत.
पण सध्या कोराईगडवरुन सुब्रतो रोय यांचेचं वैभव प्रतित होते..
29 Oct 2012 - 9:25 am | नितिन काळदेवकर
फोटो छान आहेत..पण निव्वळ फोटो बघून कोरीगडाची माहिती मिळत नाही. उगाचच क्लिक केल्या सारखे वाटते.