गाभा:
दैनिक पुढारीवर विश्वसंचारात ही माहिती मिळाली.
हे बॉलिवूडमधले पहिले पडूकोण.(इथे पहा.)
आणि
या दुसर्या पडूकोण. (इथे पहा.)
आपल्यापैकी ज्यांनी दोघांनाही रुपेरी पडद्यावर पाहिले आहे त्यांना दोघांच्या अभिनयात अथवा चेहर्यात
काही साम्य आहे असे वाटले काय?
गुरुदत्त यांच्या उपनावाला साजेल अशी आदाकारी दीपिका करू शकल्या आहेत काय?/ पुढे करू शकतील असे
वाटते काय?
प्रतिक्रिया
14 Nov 2007 - 5:54 pm | विसोबा खेचर
गुरुदत्त यांच्या उपनावाला साजेल अशी आदाकारी दीपिका करू शकल्या आहेत काय?/ पुढे करू शकतील असे वाटते काय?
कल्पना नाही, पण दिपिका बाकी छान दिसते हो! :)
तात्या.
14 Nov 2007 - 6:46 pm | धनंजय
मस्त आहेत. कथा सांगणारे, व्यक्तिच्या चित्रापेक्षा अधिक व्यक्तिचित्रण करणारे (या बाबतीत पात्राची कथा सांगणारे) असे ते फोटो आहेत. (त्यातल्या त्यात गुरुदत्तचा फोटो जास्त गुंतागुंतीची कथा सांगतो म्हणून उजवा!)
15 Nov 2007 - 12:05 am | सर्किट (not verified)
दीपिका प्रकाश पडुकोण ची मुलगी.
जर तिला शष्प बॅडमिंटन येत नाही, तर फक्त तिचे आणि गुरुदत्तचे एकच आडनाव आहे, म्हणून अभिनय तरी का यावा ?
-सर्किट
15 Nov 2007 - 12:27 am | प्राजु
सुरूवातीला शोभेची बाहुली म्हणून येण-या नंतर चांगला अभिनय करू शकतात.. अशीच बॉलिवुडची ख्याती आहे.
तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने.
करिष्मा कपूर, रानी मुखर्जी... यांचंही असच झालं...
दिपिका याला अपवाद ठरेल असे नाही...
ती ही काळानुरूप अभिनय करू शकेल..
प्राजु.
15 Nov 2007 - 1:47 am | प्रियाली
तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने.
हाहाहा!!! सहमत आहे. काय "सशक्त" वर्णन केलं आहेस प्राजू. :)))))))))))))))