गाभा:
मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?
काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का?
१५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. १९४८ ला दुसरा.
१५ ऑग. १९५८ ला बारावा.
१५ ऑग. १९६८ ला बावीसावा.
.
.
.
१५ ऑग. २००८ ला बासष्टावा.
मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?
प्रतिक्रिया
20 Aug 2008 - 12:24 am | चतुरंग
६२ वा स्वातंत्र्यदिन आणि ६१ वा वर्धापनदिन!
चतुरंग
20 Aug 2008 - 12:26 am | सर्किट ली (not verified)
समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस.
हो, मान्य आहे. पण तो त्याचा दुसरा जन्मदिन.
- सर्किट
20 Aug 2008 - 12:37 am | धनंजय
मान्य.
बब्याचा दुसरा जन्मदिवस हा त्याचा पहिला वाढदिवस (वर्धापनदिवस) आहे, हे गणित पटते.
20 Aug 2008 - 12:29 am | प्राजु
समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?
मुलगा १ वर्षाचा झाला तर त्याचा तो पहिला वाढदिवस ना.. मग
देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६१ वा च वाढदिवस ना!!
६२ वा स्वातंत्र्यदिन आणि ६१ वा वर्धापनदिन!
+१ चतुरंग..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Aug 2008 - 12:54 am | भास्कर केन्डे
हो, पण वृत्तपत्रांनी बेधडक ६१वा स्वातंत्र्यदिन छापले म्हणून म्हटले येथे चर्चा करून या चर्चेच्या अनुषंगाने त्या वृत्तपत्रांना पत्रे टाकावीत.
आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
20 Aug 2008 - 12:28 am | टारझन
काय फरक पडतो कितवा स्वातंत्र्यदिन आहे त्याने ? मला तर काही फरक पडत नाही...
न्युज वाले उगाच छापायला विषय ... दिले छापून ...
मला खरं तर एक स्पेशल दिवसच का असावा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी, असा सारखा प्रश्न पडतो ...
व्हू केयर्स इफ इट्स सिक्स्टी फर्स्ट ऑर सेकंड ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
20 Aug 2008 - 1:09 am | मुशाफिर
समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस.
कारण मराठीत आपण जन्मदिन आणि वाढदिवस असे दोन वेगळे शब्द वापरु शकतो. पण, ईन्ग्रजी भाषेत सरसकट Birthday हाच शब्द वापरला जातो. Anniversary हा शब्द माणसान्च्या जन्मदिनासम्बन्धी कधिही वाचनात आला नाही.
तसेच, ईन्ग्रजीतही 61 years of Independence आणि 62nd Independence Day असा वापर आढळतो.
याआधी ,सर्किट यानी म्हटल्याप्रमाणे बब्याचा पहिला वाढदिवस हाच त्याचा दुसरा जन्मदिन!
त्यामुळे, ६२ वा स्वातन्त्रदिन आणि ६१ वा वर्धापनदिन हेच जास्त योग्य आहे.
20 Aug 2008 - 11:46 am | मुन्नाभाई एम बी...
१५ ऑग. १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला.
१५ ऑग. १९४८ ला पहिआ स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. २००८ ला ६१ वा.
21 Aug 2008 - 12:36 am | भास्कर केन्डे
वरील प्रतिसादांत उल्लेखल्या प्रमाणे... "६२ वा स्वातन्त्रदिन आणि ६१ वा वर्धापनदिन हेच जास्त योग्य आहे. "
20 Aug 2008 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा.
सहमत
(गणितात तरी ढ नसलेली) यमी
21 Aug 2008 - 3:05 pm | लिखाळ
शिवरायांच्या राज्याभिषेकदिनाबद्दल (अथवा जन्मदिनाबद्दल) उदय सप्रे यांनी मिपावर असेच मत मांडले होते ते आठवले.
--लिखाळ.