गाभा:
एक दुर्दैवी घटना. वर्षा भोसले ह्या प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले ह्यांच्या कन्या. त्यांनी डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली.
एक उत्तम स्तंभलेखिका म्हणून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. पण गेले अनेक वर्षे त्यांनी ते लेखनही बंद केले होते. त्यांनी काही मोजकीच पण चांगली गाणी गायली आहेत.
आशाबाईंना सिंगापूरमधे मिफ्टाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या तेव्हा त्यांच्या लेकीने हे भयंकर कृत्य केले. बहुधा आत्यंतिक नैराश्यामुळे हे झाले असावे. एका गुणी व्यक्तीचा असा अंत व्हायला नको होता. आशाबाईंसारखे उत्साही, चैतन्यवान व्यक्तीमत्व असताना त्यांच्या कन्येला इतके डिप्रेशन का यावे हे एक कोडेच आहे. असो.
माझी त्यांना श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
9 Oct 2012 - 7:30 am | विकास
वास्तवीक आता वर्षा भोसलेचा कॉलम वाचूनही ९ वर्षे होऊन गेली. मधल्या काळात एकदाच आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या संदर्भातील काळजी करायला लावणारी बातमी सोडल्यास कधी नाव देखील ऐकले नाही. तरी देखील आज सकाळी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हा खूप वाईट वाटले. कोणीतरी जवळची ओळखिची व्यक्ती गेली असे वाटले. रिडीफ.कॉमच्या सुरवातीच्या काळापासून ते २००३ पर्यंत त्यांचे लेखन हळूहळू वाढत गेले आणि नंतर अकस्मात थांबले. त्यावेळेस ऐकल्याप्रमाणे, इंटरनेटवरील (किमान) भारतीय स्तंभलेखीकेचा (लेखकाचा देखील) फॅन क्लब असण्याचा आगळावेगळापहीला प्रकार हा वर्षा भोसलेंच्या बाबतीत झाला होता.
प्रचंड अँटीकाँग्रेस आणि अँटी सोनीया असलेल्या वर्षाने सत्तेत आलेल्या भाजपाला अथव सत्तेत नसलेल्या विहिंप/बजरंगदलास देखील झोडपायला कमी केले नव्हते. पी-सेक हा शब्दप्रयोग (अर्थात सुडोसेक्यूलरसाठीचा) मला वाटते मी प्रथम वर्षाच्या लेखनामुळेच वाचला होता. टाईम्स मधे वाचल्याप्रमाणे, त्यांच्यात आजोबा दिनानाथांच्या (कणखर) वृत्तीच्या "जीन्स" होत्या आणि मामा हृदयनाथच्या शिकवणीचा प्रभाव होता... त्यांचे लेखन वाचत असताना, त्यांचा मनस्वी स्वभाव जाणवायचा. आशा भोसल्यांना खायला लागलेल्या खचता लहान वयात पहायला लागल्यामुळे झालेले त्यावे़ळचे परीणाम त्यांनी एकदा लिहीला ओझरतेच पण लिहीले होते.
मराठीत एखाद्या कठीण प्रसंगाचे वर्णन करताना, "असे प्रसंग वैर्यावरही येऊ नयेत" असे म्हणले जाते. त्यामुळे असा प्रसंग आशा आणि मंगेशकर कुटुंबियांवर येईल असे स्वप्नात देखील वाटले नसते. वर्षाला श्रद्धांजली अर्पण करतानाच, आशा भोसले आणि मंगेशकर कुटूंबियांना या आघातातून लवकर बाहेर पडता येवोत ही प्रार्थना.
9 Oct 2012 - 7:37 pm | प्रदीप
लिहावयास आलो होतो.
नव्वदीच्या शेवटी रिडीफमधून वर्षा भोसले लिहू लागल्या, तेव्हा त्या कोण आहेत हे ठाऊक नव्हते, ते नंतर कधीतरी समजले. पण त्यांचा कॉलम अत्यंत रोखठोक असे, माहितीपूर्ण असे, व त्यात साधार टीका असे. त्या भारतीय राजकारणावर इतके टोकदार व बरेचसे पटण्यासारखे लिहीत की मी आतुरतेने त्यांच्या कॉलमची वाट पहात असे. रीडीफमधीलच साईसुरेश स्वामी वगैरे, पी-सेक भोंगळ स्तंभलेखक त्यांच्या टीकेचे साधार लक्ष ठरले होते-- ही टीका कुणीही कधीही खोडून काढली असे मलातरी आठवत नाही. मला वाटते ह्याचा परिणाम व्हायचा तो झाला, त्यांचा तेथील कॉलम बंद झाला. केवळ वेब साईटीवरील लिखाणामुळे त्यांचा एक मोठा चाहतावर्ग अनेक वर्षे रीडीफवर होता, मीही त्यात सामिल होतो. रीडिफवरील तेव्हाच्या स्तंभलेखकांपैकी तसेच दुसरे आठवतात ते अरविंद लवकरे.
पण ह्या जहाल कॉलमबरोबरच मधेच कधीतरी त्या इतरही काही छान लिहून जात. एकदा एका लेखात त्यांना 'एका पार्श्वगायिकेची मुलगी' म्हणून कायकाय सहन करावे लागले, ह्याची त्यांनी थोडी झलक दाखवली होती. एलफिस्टनच्या एका सीनियर पधाधिकारी व्यक्तिकडून 'तुला ग काय करायचे आहे, शिक्षण घेऊन?' असे ऐकून घेतल्याचे त्यांनी त्या लेखात नमूद केले होते. पण इतके झाले तरी त्यांच्या त्या लेखात, तसेच इतरस्त्रही कुठल्या लेखात समाजाविषयी कटूता आली नाही. काही माणसे सदैव chip on shoulder घेऊन वावरत असतात. वर्षा त्यांतल्या अजिबात नव्हत्या. त्यांचा देव आनंदवरील एक अत्यंत लाजवाब लेखही स्मरणात आहे.
गेली अनेक वर्षे त्या निराशेच्या गर्तेत असल्याचे मध्यंतरी वाचनात आले होते. इतक्या उमद्या व्यक्तिमत्वाचे असे व्हावे ह्याचे वाईट वाटले होते. आतातर त्या सर्व सुखदु:खाच्या पलिकडे गेलेल्या आहेत.
ह्या आपत्तीस धैर्याने तोंड द्यायची शक्ति विधात्याकडून त्यांच्या आप्तस्वकियांस मिळो, ही प्रार्थना.
9 Oct 2012 - 9:13 pm | विकास
>>>तेव्हा त्या कोण आहेत हे ठाऊक नव्हते, ते नंतर कधीतरी समजले. <<<
अगदी अगदी! आणि जेंव्हा समजले तेंव्हा अगदी आश्चर्य वाटले. २००३ नंतर देखील कधी कधी गुगलून वगैरे माहिती काढायचा प्रयत्न केला की ही बाई अजून कुठे लिहीत असेल का म्हणून. पण कधीच काही मिळाले नाही. किंबहूना काल बातमी वाचे पर्यंत तीचा फोटो देखील पाहीला नव्हता आणि आजचा टाईम्स वाचे पर्यंत "हस तू हरदम खुशीया या गम" हे गाणे तिने म्हणल्याचे देखील माहीत नव्हते. अर्थात त्याच लेखात म्हणल्याप्रमाणे, तीने गाण्याचे करीअर केले नाही, कारण: "If you can't take the heat of the chulha then it's best not to enter the kitchen to cook."...
असो... वर प्रदीप यांनी म्हणल्याप्रमाणे अनेक पी-सेक भोंगळ स्तंभलेखक झाले. पण वर्षाप्रमाणेच तिच्या विरोधातला कडवा ("सुडो का नाही" ते माहीत नाही, पण) सेक्यूलर स्तंभलेखक झाला तो म्हणजे "दिलीप डिसुजा". त्याची प्रत्येक मते पटतीलच असे नाही पण अभ्यासपूर्ण लेखन असायचे. (भूज च्या भूकंपनंतरचा त्याचा मनुष्यहानीवरून चिडचिड करणारा पण अभ्यासू लेख मला कायम आठवत असतो.) त्याचे आणि वर्षाचे, टोकाचे वैचारीक विरोधक असल्याने कायम खटके उडायचे. आज रिडीफवर वर्षाप्रमाणेच लिहीणे थांबलेल्या दिलीपचा Dear Varsha, I'm So Damned Sad लेख वाचताना दोघांचेही माहीत नसलेले पैलू कळले, सगळ्यात महत्वाचा - वैचारीक विरोधक असणे म्हणजे द्वेष्टे असावे असे नाही...
9 Oct 2012 - 10:03 am | अमोल खरे
वर्षा भोसलेंबद्दल विशेष ऐकले नव्हते, ते विकास ह्यांच्या प्रतिसादातुन समजले. पण खुप पुर्वी एकदा आशा भोसले एका मुलाखतीत आता ह्या वयात आणखी दु:खे पाहायला लागु नयेत ही इच्छा आहे असं म्हणाल्या होत्या. त्या वेळेस काही क्लिक झाले नव्हते पण एक दोन महिन्यातच वर्षा भोसलेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी आली होती. त्या वेळी सुदैवाने त्या वाचल्या पण काल ती वेळ आलीच. आशाताईंना ह्या वयात दु:खात लोटले गेले. त्या लवकरात लवकर ह्यातुन सावरोत हीच प्रार्थना.
9 Oct 2012 - 1:39 pm | तर्री
वर्षातैना श्रद्धांजली.
9 Oct 2012 - 2:46 pm | चौकटराजा
मी १९७० साली म्हणजे सुमारे ४२ वर्षापूर्वी आशाबाईना एक पत्र लिहिले होते त्यात वर्षालाही माझा नमस्कार एवढे शेवटी लिहिल्याचे स्मरते. एक दोन वेळा तिचे कॉलम वाचले असतील एवढेच.निराशा ही मधुमेहाच्या वाईट अवस्थेत येऊ शकते.
ही कदाचित तशी केसही असू शकते. श्रीमंती व समाधान सुख यांची परास्पर संबंध असतोच असे नाही. आपण श्रीमंतीने
ऐष विकत घेउ शकतो त्रुप्ती नाही. ते काही असो आशाबाईं ना तशी दु:खांची संवय आहे.त्याना धीर आपण कोण देणार ?
मृताच्या आत्म्यास शांती मिळो.
9 Oct 2012 - 3:52 pm | स्पंदना
एक आई म्हणुन आशा ताईंच्या दु:खात सहभागी. अशी वेळ कोणत्याही पालकांवर न येवो. मुलांच्या खांद्यावरुन जायची स्वप्न पहाताना मुलांना खांदा द्यायची वेळ येण या सारख दुर्दैव नाही!
10 Oct 2012 - 7:22 pm | Pearl
:-(
वर्षा भोसले यांना श्रद्धांजली.
10 Oct 2012 - 8:12 pm | मदनबाण
ही बातमी समजली तेव्हा फार वाईट वाटले... :(
आशा ताईंना या वयात इतक्या कठीण समयाला सामोरे जावे लागत आहे.
परमेश्वर त्यांना बळ देवो हीच प्रार्थना करतो.
जरासे अवांतर :---
नैराश्य (डिप्रेशन) ही एक जागतिक समस्या बनली असुन डब्लुएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन)च्या अहवाला नुसार २०२० पर्यंत नैराश्य हे जगातले दुसरे कारण ठरणार आहे की ज्यामुळे जगभरातील माणसे आजारांचा /विकारांचा बळी ठरतील्,तर २०३० पर्यंत हे जगातले पहिले कारण ठरेल ज्यामुळे माणसाच्या शारिरिक व्याधीचे आजार उद्भवतील !
हिंदूस्थानी लोकांमधे नैराश्य येण्याचे सरासरी वयोमान हे ३१.९ वर्ष आहे,आणि या मुळे आत्महत्या करणार्यांचे प्रमाण दिवसेन दिवस वाढतच जात आहे.स्त्रियांमधे याच नैराश्याचे प्रमाण हे पुरुषां पेक्षा दुप्पट असल्याचे आढळुन आले आहे.
आपल्या देशात शेतकरी आत्महत्या करण्यात पुढे आहेत हे आपल्याला माहित असेलच, पण विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्यांचे प्रमाण सर्वात मोठा असुन मराठवाड्यात ४३५ तर विदर्भात २७६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.(सन २०११)
साल २०११ मधे झालेल्या ३३३७ आत्म्हत्यांपैकी ३१४१ हे शेतकरी होते. :(
अगदी आकडेवारी द्यायची झाली तर जानेवारी पासुन मराठवाड्यातील ५६५ शेतकर्यांनी आत्महत्या केली असुन सप्टेंबर अखेरीस पर्यंत विदर्भातीलच ५९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत !
सध्य परिस्थीती पाहता प्रत्येकानेच नैराश्याचा सामना करावयास शिकले पाहिजे...कारण हा आता सामाजिक तसेच जागतिक प्रश्न बनला आहे.
संदर्भः---
नराश्य: एक सार्वत्रिक समस्या..
Indians most depressed in world: WHO
Women more prone to depression than men
Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list
Seven more farmers commit suicide in Vidarbha
29 Sep 2015 - 6:56 am | मदनबाण
आशा ताईंना आता पुत्रशोकास सामोरे जावे लागले आहे ! :(
परमेश्वर त्यांना बळ देवो हीच प्रार्थना पुन्हा करतो.
संदर्भ :- गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक
आशा भोसले यांना पुत्रशोक, हेमंत भोसले यांचं निधन