भारतात अगरवाल की --

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
3 Oct 2012 - 6:02 am
गाभा: 

भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला व त्याचे भारतातील प्रमु़ख श्री.राज जैन म्हणतात की त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होणार आहे,सर्व कंपन्या या फायद्यासाठी काढ्लेल्या असतात हे खरे,परंतु मला असे वाट्ते की त्यामुळे परदेशातील वालमार्ट भारतात आले की जैन यांच्या भारती टेलीकौम कंपनी सारखे अगरवाल मार्ट होणार व भारताचे चलन व फायदा परदेश वासियांना होणार आहे,तुमची प्रतिक्रिया यावर काय असेल--

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

3 Oct 2012 - 8:27 am | नितिन थत्ते

>>भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला

आत्ता परवानगी देण्याचा निर्णय झाला. अजून कदाचित नोटिफ़िकेशनही निघाले नसेल. इतक्यात बाजार उभा राहिला?

शकु गोवेकर's picture

3 Oct 2012 - 8:43 am | शकु गोवेकर

नितिनजी,या बद्दल माहिती येथे वाचा
www.globalpost.com/globalpost-blogs/america-thegutted

परिकथेतील राजकुमार's picture

3 Oct 2012 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

'राज जैन' हा महाहलकट माणूस आहे. मिपाचा सदस्य देखील आहे तो, म्हणजे बघा.

रमताराम's picture

3 Oct 2012 - 3:44 pm | रमताराम

ळॉळ. हल्कत.

प्रास's picture

4 Oct 2012 - 12:20 am | प्रास

'जैनाच्या कार्ट्या'बद्दल कैच बोलणार नै पण पराशेट एक नंबरचे अच्रत आहेत ब्वॉ ;-)

सहज's picture

3 Oct 2012 - 3:08 pm | सहज

मी काय म्हणतो, आपले ते चितळे आहेत ना, हो जे दुपारी दुकान बंद ठेवतात तेच. मग नॉन पुणेकरांनी उदा. गोवेकर वॉलमार्टवाल्यांना आग्रह केला पाहीजे की मॉल मधे दुपारी चितळेंचीच बाकरवडी उपलब्ध करुन द्या. यामुळे बघा चितळेंचा फायदा, नॉन पुणेकरांचा फायदा दोन्ही साध्य होईल. असाच आग्रह अन्य भारतीय बनावटीची व उपयोगी उत्पादने झंडू बाम, खरुज, गजकर्ण, नायटा बाम, इसबघोल, शिलाजीत, व्हिटा एक्स, प्रोस्टेड, संधी-सुधा, देशी फ्री वायफाय इंटरनेट इ गोष्टींबाबत धरला तर मग भारतीयांचे चलन वाचेल, तब्येत सुधारेल व फायदा एत्तदेशीयांना होईल. :-)

शकु गोवेकर's picture

3 Oct 2012 - 11:58 pm | शकु गोवेकर

श्री.सहज्,आपण वरिल ग्लोबलपोस्ट या ब्लोग(आंजा)वर(शोध)सर्च मधे Jason Overdorf - 2012-10-02 पाहिल्यास वालमार्टची माहिती मिळेल