गाभा:
ऑगस्ट १६ला राखी पौर्णिमा झाली. अनेकांनी ती साजरी केली असेलच. पण आत्ता म.टा. मध्ये बातमी वाचली आणि त्यातच म्हणल्याप्रमाणे कपाळावर हात लावायची वेळ आली.
भावाला बांधलेली राखी तोडा, नाहीतर भाऊ मरेल... ’ अशी मोठी अफवा आज मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पसरली होती. बहिणी आपापल्या घरी फोन करुन भावाला राखी सोडण्यास सांगत होत्या
.
थोडक्यात गोष्ट अशी की या वर्षी राखी पौर्णिमेला ग्रहण होते म्हणून राखी बांधल्यास भाऊ मरेल अशी अफवा उठली. मग तमाम बहीणी फोन करून सांगू लागल्या की राखी तोडून टाक!
आपल्या पैकी हा अनुभव कोणाला आला का? (अफवा ऐकण्याचा, तसे वागण्याचा अथवा होण्याचा नाही!)
प्रतिक्रिया
18 Aug 2008 - 5:04 pm | अनिल हटेला
अजिबात फालतु अफवा आहे !!
आणी असला अनुभव येण्याचा वगैरे प्रश्नच नाही येत !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 7:30 pm | टारझन
मटा मधे कोणी तरी संध्यानंद (बंडलानंद) नाही तर आज का आनंद चा पत्रकास शामिल झाला असावा ...
=)) =)) =))
आईची माया आटली .... कोणीतरी त्या(पत्रकाराच्या) डोक्यात घाला बाटली ... ~X( ~X( ~X(
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
18 Aug 2008 - 7:35 pm | विकास
आईची माया आटली .... कोणीतरी त्या(पत्रकाराच्या) डोक्यात घाला बाटली ...
गूड वन!
मटा मधे कोणी तरी संध्यानंद (बंडलानंद) नाही तर आज का आनंद चा पत्रकास शामिल झाला असावा ...
असं म्हणतात की कुत्रं माणसाला चावले तर बातमी होत नाही पण उलटे झाले म्हणजे माणूस कुत्र्याला चावला तर होते...
18 Aug 2008 - 5:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही बातमी आत्ताच म.टा.मधे वाचली आणि हसायला आलं. मला तर आधी राखी सावंतबद्दल बातमी असेल असं वाटलं.
मी भावाला गेली ५-६ वर्ष राखी बांधत नाही; "हमारा प्यार राखी का मोहताज नहीं है" असा तद्दन फिल्मी ड्वायलॉग मी आधीच मिपावर मारला आहे, मुद्दा एवढाच की त्यामुळे अनुभवण्याचा प्रश्नच नाही.
राखी पौर्णिमा साजरी करण्यामधे छान-छान खाणं येतं, ते केलं. भेटवस्तू देणं येतं तर आम्ही दोघांनी मॅजेस्टीकच्या दुकानात हजारावर रुपये खर्चही केले. त्यापुढे काही माहित नाही ब्वा!
18 Aug 2008 - 5:19 pm | विकास
मला तर आधी राखी सावंतबद्दल बातमी असेल असं वाटलं.
हा हा हा!!! हे बाकी मस्त!
मी आत्ताच ही बातमी दोन "बुजुर्गांना" (वयाने आणि मानाने) असलेल्यांना सांगितली आणि खालील (मजेशीर) प्रतिसाद मिळाले:
18 Aug 2008 - 5:39 pm | प्रियाली
मीही नाही.
असा डॉयलॉग मारलेला नाही पण माझे रक्षण करण्यास मी समर्थ आहे. ;;) कोणाला माझ्याकडून रक्षा करवून घ्यायची असेल तर राख्या पाठवा. बांधून मी मरणार नाही याची ग्यारंटी. ;)
म.टा.च्या बातमीत आईची माया आटली अशी बातमी देखील आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस येऊ लागले आहेत तर भाग्यश्रीला घेऊन आईची साडी असा चित्रपट काढता येईल आणि गायीला एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू हा लेख वाचायला द्यावा.
18 Aug 2008 - 5:08 pm | प्राजु
निरूद्योगी माणसांचे हे उद्योग आहेत. काम नाही करायला तर मग अफवा पसरवा. अशी मनोवृत्ती दुसरं काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Aug 2008 - 5:31 pm | विसोबा खेचर
अंमळ मजेशीर बातमी आहे! :)
आपला,
(कुठल्याच बंधनात न अडकणारा) तात्या.
18 Aug 2008 - 6:34 pm | मुक्तसुनीत
कसली पोपट बातमी आहे राव ! छ्या ! पब्लिक अजूनसुद्धा असल्या चलतूफा बातम्यांचा बडिवार माजवते ! ~X(
18 Aug 2008 - 7:31 pm | धनंजय
श्री लक्ष्मी ही श्री चंद्र देव यांची बहीण. त्यांचे वडील श्री. सागर देव यांच्या घरची शांती घुसळून ही दोघी अपत्ये घरातून चालती झाली, त्याबद्दल मागे आपण वाचलेलेच असेल. या वर्षीही पंचांगातला सल्ला न ऐकता लक्ष्मींनी भावाला राखी बांधली आणि भावावर काळोखाचे सावट आले. (श्री लक्ष्मी या "आपण फक्त पैशाची बोलतो, त्यामुळे आपल्याला म.टा. वाचता येत नाही" असे आपल्या वागण्याचे समर्थन करत आहेत आसे बातमीदारांकडून समजते.)
याच श्री लक्ष्मी यांनी मला "तुझ्या घरी कशी राहू" म्हणून खंवटपणे आपल्या भावाच्या शत्रूचे नाव घेत आम्हाला अर्धचंद्र दिला होता. त्यामुळे श्री चंद्र देव यांचे वाईट चिंतत, श्री लक्ष्मी यांनी मुद्दामून त्यांना राखी बांधली होती, अशी घरातील काही ज्येष्ठ मंडळींची शंका आहे.
18 Aug 2008 - 7:38 pm | विकास
=)) =)) =))
गंभिर विडंबन आवडले! :D
18 Aug 2008 - 7:41 pm | मुक्तसुनीत
श्री लक्ष्मी या ..."आपण फक्त पैशाची बोलतो, त्यामुळे आपल्याला म.टा. वाचता येत नाही" ....
=)) =))
च्यामारी "रिचर्स " =)) करता का हे असले धंदे करता ! वैराग्यभावना काय , लक्ष्मी आणि चंद्र काय ... आम्हाला आम्हा टॅक्स्पेयर्स चा पैसा "असल्या" संशोधनाकरता चालला आहे याची काळजी वाटू लागली आहे !
हघ्याहेसांनल !
18 Aug 2008 - 11:23 pm | सर्किट ली (not verified)
आम्हाला आम्हा टॅक्स्पेयर्स चा पैसा "असल्या" संशोधनाकरता चालला आहे याची काळजी वाटू लागली आहे !
आमचा पुढचा टॅक्स रिफंड धनंजय यांच्या कडून घ्यावा का काय असे वाटू लागले आहे. एन आय एच चे फंडिंग कमी करणे आवश्यक आहे.
ह. घ्या.
- सर्किट
18 Aug 2008 - 11:32 pm | विकास
आमचा पुढचा टॅक्स रिफंड धनंजय यांच्या कडून घ्यावा का काय असे वाटू लागले आहे. एन आय एच चे फंडिंग कमी करणे आवश्यक आहे.
हेच नाही म्हणत. मला वाटते एन आय एच चे फंडींग वाढवावे ... नाहीतर त्यांना रीसर्चचे वैराग्य येयचे आणि मग भिती वाटते की ते इथे (अजून) जास्त लिहायला लागले तर? म्हणून म्हणतो की आपण सर्वजण मिळून त्याला राखी बांधूया! ;) :D
अर्थात धनंजया - ह. घ्या... :-)
18 Aug 2008 - 7:59 pm | सुनील
"गणपती दूध पितो" प्रकरणापासून आम्ही काहीच बोध घेतला नाही, हाच याचा अर्थ.
खरे म्हणजे, इतक्या बिनडोक अफवा इतक्या सहजपणे जर पसरवता येत असतील तर ती आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटाच आहे. कारण ह्या असल्या निरुपयोगी अफवांनी फारसे नुकसान होत नाही पण असल्या समाजमनाचा गैरफायदा घेऊन धोकादायक अफवादेखिल सहजपणे पसरविता येतात हा सिग्नल जात नाही का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Aug 2008 - 10:35 pm | विकास
"गणपती दूध पितो" प्रकरणापासून आम्ही काहीच बोध घेतला नाही, हाच याचा अर्थ.
मला याच प्रसंगाची आठवण झाली... माझ्या ओळखीच्या एका दाक्षिणात्य मुलाने तेंव्हा त्याच्या नातेवाईकांनी गणपती नव्हता तर कुठल्यातरी देवीला कॅनडामध्ये दुध पाजता आल्याचे सांगीतले होते :-)
18 Aug 2008 - 10:30 pm | रेवती
फारच हसू आले. बहिणी खरंच वेड्या दिसतायत. मी तर भावांना फोन करायला विसरून गेले, म्हणजे मीही वेडीच की!!
साडीचा विचार करायचा तर आमच्याकडे उलटे आहे. आईला साडी द्याल तर प्रेम कमी होतेय (फार झाल्या साड्या).
अवांतरः अजून एक वेडेपणा म्हणजे दारावर आलेल्या चोरांना दागिने पॉलीश करायला देणे.
रेवती
18 Aug 2008 - 11:39 pm | ऋषिकेश
:) मजेशीर बातमी आहे....
मटाचा दर्जा खालावतो आहे याची झलक वेळोवेळी मिळतच होती. गेल्याच आठवड्यात घरी येणारा "मटा" (नामक संध्यानंदचा होऊ पाहणारा भाऊ) बंद केला.. चला ही बातमी वाचल्यावर हा निर्णय बरोबर होता म्हणायचे झाले. :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Aug 2008 - 7:21 am | पक्या
=)) अशा अफवा नेहमी मुंबईत कशा काय पसरतात? मागे ही गणपती दूध पितो ही अफवा उठली होती.
19 Aug 2008 - 4:06 pm | नोहिद सागलीकर
( सा..) जो कोनी आसेल तो (गा....) त्याला काय आण्णा नाना ची (शे..) कळतयकाय.....
24 Aug 2008 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकासराव,
आम्ही नवीमुंबईत हा अनुभव घेतला. मुरबाडला दहा भावांचा ( एकाच घरात दहा भाऊ :) ) राखी बांधल्यानंतर ते मरण पावले. अशी अफवा पोहचली. बहीणीने आमच्या राख्या सोडून घेतल्या. ( त्यांच्या अख्य्या सोसायटीतील बहिणींनी आपापल्या भावांना राख्या सोडायच्या सांगितल्या- पाहा ही सोसायटी ) नंतर अंधश्रद्धेच भूत हा झीवरील कार्यक्रम पाहिला...जरा संवाद झाला. तेव्हा दुस-या दिवशी सोडलेल्या राख्या बांधल्यात. पण आम्ही औरंगाबादला घरी पोहचेपर्यंत आम्ही सुखरुप पोह्चलो की नाही याच काळजीत बहीण होती. :)
-दिलीप बिरुटे
(वेड्या बहिणीचा वेडा भाऊ )