तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा समारोप

खुशि's picture
खुशि in भटकंती
26 Sep 2012 - 7:41 pm

लवकर्च उठलो स्नानपुजा आटपुन ओम्कारेश्वर दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती, शान्तपणे भगवन्तासमोर उभे राहुन मानसपुजा स्तोत्र म्हणून मानसपुजा केली.भगवान शिवजी माझ्या मोरयाचे पिताजी,नर्मदामैय्याचेही पिताजी त्यान्च्याच कॄपेने परिक्रमा पुर्ण झाली. तब्येत बिघडणे हे आमचे प्राक्तन.पण त्यामुळेच यन्दा पुन्हा पायी परिक्रमा करण्याची उमेद बाळगुन आहे.
ओम्कार पर्वताची परिक्रमा करण्यास निघालो.उत्तम बान्धीव परिक्रमामार्ग आहे.वाटेत पान्डवकालीन छोटे शिवकेदारेश्वर मन्दिरात दर्शन घेउन पुढे नर्मदा-कावेरी सन्गमावर गेलो,पर्वताच्या उजव्या बाजुने कावेरी आणि डाव्या बाजुने नर्मदा सन्थपणे वाहात एकमेकीन्च्या गळ्यातगळा घालुन भेटतात. निळसर रन्गाची नर्मदा आणि हिरव्या रन्गाची झाक असलेली कावेरी ही भगिनीभेट तासन्तास बघत रहावे अशी.पण कितिही वाटले तरी परत फिरणे भागच होते.
ॠणमुक्तेशवरदर्शन करुन पुढे निघालो. या मन्दिरात चण्याची डाळ अर्पण करतात. आता थोडा चढाचा मार्ग आहे. जन्गलही बर्‍यापैकी आहे.सारा परिसर राजा मान्धाता यान्च्या राजधानीचा आहे. सर्व पडझड झालेला. असे म्हणतात की फार पुर्वी भुकम्प झाला होता. जागोजाग उत्खननात मिळालेल्या भग्न मुर्ती ठेवलेल्या आहेत. आदिवासी,काही साधुसन्त याच्या चन्द्रमौळी झोपड्या,काही चहा नास्ता मिळणार्‍या टपर्‍या आणि मार्गाच्या दोन्ही बाजुना भग्वतगीता लिहिलेले स्तम्भ सारे पहात गौरीशन्कर मन्दिरात आलो. समोर मोठा सुन्दर नन्दी मन्डप आहे. नन्दी खुप सुन्दर आहे.गळ्यातल्या माळा,घन्टा उत्कॄष्ट शिल्प. गौरीशन्कर मन्दीरही पुराणकालिन आहे. सुन्दर कोरीव काम आहे. पिन्डी प्रचन्ड आकाराची आहे. पुर्वी पिन्डीला मिठी मारुन आपले दोन्ही हात जर एकमेकाना मिळाले तर आपल्यला मोक्ष मिळेल असे म्हणत,पण आता पिन्डीभोवती कठडा उभारला आहे व मिठी मारण्यास परवानगी नाही. या पिन्डीत निरखुन बघितले तर ओम आणि शिवमुख दिसते.
दर्शन घेतले.बाजुला असलेल्या झोपलेल्या अवस्थेतील लम्बे हनुमान यान्चेही दर्शन घेतले.
पुढे राजराजेश्वरीदेवीचे दर्शन घेउन गायत्रीपीठ सन्स्कॄतपाठशाला पाहिली,येथेच जितेन्द्रशास्त्रीनी वेदपाठाचे शिक्षण घेतले आहे.त्यान्चे वडील सुधाकरशास्त्री काशीविद्यापिठात शिकलेले होते.जितेन्द्रशास्त्री{बालाशास्त्री} यान्च्या घराण्याकडे ओम्कारेश्वराचा माध्यान्ह नैवेद्याचा मान आहे.आमचे हेच सन्कल्पदाते आहेत. बहुतान्शी महाराष्ट्रीय भक्त त्यान्च्याकडेच जातात कारण ते मुळचे महाराष्ट्रीयन आहेत.
पुढे चान्द-सुरज द्वार,दक्षीणद्वार मार्गे सिद्धेश्वर मन्दिरात आलो. हे पुराणकालीन मन्दीरही भग्नावस्थेत आहे पण सभामन्डप आणि गाभारा चान्गला आहे. हे स्वयम्भू शिवलिन्ग आहे.मन्दिराच्या प्रान्गणातुन ओम्कारेश्वर धरण दिसते.
मन्दिराच्या प्रान्गणात झाडाखाली बसलो,नऊच वाजले होते आज शास्त्रीजीन्च्याकडे प्रसादभोजनासाठी जायचे आहे आणि साडेबारा वाजता नैवेद्य मन्दिरात जातो त्यानन्तरच आपले भोजन असते.
आसमन्त पहातापहाता विचारचक्र फिरू लागले.आम्ही परिक्रमा का करायची ठरवली? फार भाविक आहोत? नाही. उपासतापास,व्रतवैकल्ये यान्चा अतिरेक करत नाही. मोरयाची आठवण करुन हात जोडून नमस्कार करावा आणि कामाला लागावे एवढेच.मग?
आम्हाला भटकन्तीची आवड आहे,निसर्गदर्शन करणे आमची एक जीवनावश्क बाब आहे. सुन्दरसा जलप्रपात बघताना शिवजटेत अडकल्यामुळे अभिमानाचा चकनाचुर झालेली जनहिताच्या आवेगाने बेचैन होऊन मिळेल त्या मार्गाने बाहेर उडी घेणारी गन्गामैय्याच दिसते.डेरेदार वॄक्ष दिसला की स्वतः उन्हात होरपळूनही आपल्या मुलाबाळाना सुखाची सावली देण्यासाठी धडपडणारे मातापिता दिसतात तर एखादा निष्पर्ण वॄक्ष देव-मानव पॄथ्वी यान्च्या रक्षणासाठी इन्द्राला वज्र बनविण्यासाठी स्वखुशीने आपल्या अस्थी देणारे महर्षी दधिची यान्ची आठवण करुन देतो.पण परिक्रमा करण्याचा फक्त एवढाच उद्देश होता? नाही.मग? फार वर्षापुर्वी ९०/९२ साली मला माधवराव लिमयेकाका { माजी आमदार.नाशिकच्या प्रसिद्ध सर्जन डॉक्टर सौ. शोभाताई नेर्लीकर यान्चे वडील, प्रसिद्ध आर्थोपेडीक सर्जन डॉ. विनायक नेर्लीकर यान्चे सासरे} यानी एक पुस्तक दिले होते माझी वाचनाची आवड पाहुन. पुस्तक होते,सटाणा येथील निवॄत्त शिक्षक श्री. एन.व्ही. आहिरे{वियोगी नारायण} यानी लिहिलेले नर्मदे हर नर्मदा परिक्रमा.एका बैठकीत वाचुन काढले ,नन्तर पुन्हा पुन्हा वाचतच राहिले,आजतागायत वाचतेच आहे. नर्मदामैय्या,तिची लेकरे, तो मध्यप्रदेश,गुजराथ तिचे उगमस्थान सन्गमस्थान,तिच्या किनार्‍यावरील निसर्गसम्पत्ती सर्व सर्व माझ्या जीवनाचा एक भागच होऊन गेला. नर्मदा परिक्रमा हा एकच ध्यास रोज आन्घोळ करताना गन्गेच यमुने चैव म्हणताना माते नर्मदे परिक्रमा करायची आहे,लवकर योग आण अशी प्रार्थना करत असे. मुलान्ची शिक्षणे मग लग्न मग नातवन्डे लहान करता करता पन्नाशी उलटली. नोकरी व्यवसाय खाजगी जास्त रजा मिळणार नाही निवॄत्त झाल्याशिवाय काही परिक्रमेला जाता येणार नाही अशी मनाची समजुत घालत असे.माझ्याकडे असलेल्या पुस्तका शिवाय भारती ठाकुर,जगन्नाथ कुन्टे यान्ची पुस्तके घेतली,वाचली.परिक्रमा करायची हे नक्की पण कधी? आणि मोरयाने तो योग आणला. माझ्या हॉस्पिटलचे नुतनीकरण सुरु झाले माझी बदली पुण्याला झाली नन्तर मुम्बईला झाली मला तिकडे रहाणे शक्य नव्हते म्हणून मी विनावेतन रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.आता माझ्याकडे समयच समय होता परान्जपेतर सेवानिवॄत्तच आहेत. निर्णय झाला ११/११/११ चा दुर्मिळ योग साधायचा.
पुस्तकाची पारायणे केल्याने काय आणि कसे करायचे हे माहित होतेच.दरवर्षी अमरनाथ यात्रा,बद्रिकेदार यात्रा एकदा केलेली ओम्पर्वत आदिकैलास यात्रा यामुळे ट्रेकिन्गचा अनुभव होताच.पुण्याचे डॉ. फडनीस आणि कोल्हापुरचे डॉ. गुन्डे हे आमचे तन आणि मन याचे फिटनेस गुरु आहेत.त्यामुळे डायबेटिस असला तरी त्यान्ची शिकवण रोज अमलात आणून रोजचा व्यायाम,योग-प्राणायाम,मेडिटेशन असतेच .रोज सात-आठ कि.मि. चालणे,पान्डवलेणे चढणे आहेच.फक्त पाठीवर ओझे घेउन चालण्याचा सराव करायला हवा.
चार पान्ढरे ड्रेस,स्वेटर ग्लोव्हज सॉक्स वगैरे सर्व चार. दोन बेडशीट शाल वजनाला हलके ब्लान्केट आणि अन्थरुणासाठी हिटलॉन शीट हवेची उशी डोक्याला उन्हाची टोपी आणि रुमाल पायात स्पोर्टशुज आणि फ्लोटर.ब्याटरी,चाकू सुईदोरा कात्री ड्रेसिन्गचे सामान{चिकटपट्टी मलम स्पिरिट डेटॉल वगैरे} काही किरकोळ आजारावरच्या गोळ्या व्हीक्स आयोडेक्स वगैरे पाण्यासाठी बाटली जेवण्यासाठी ताटली चमचा पेला पुजेसाठी निरान्जन उदबत्ती कापुर खडीसाखर नर्मदाजलासाथी दोन छोट्या बाटल्या एका बाटलितिल जलाची पुजा करायची आणि दुसर्‍याबाटलीतिल जल जेव्हा आपण मैय्याकिनार्‍यापासुन दुर असु तेव्हा स्नानाच्या पाण्यात काही थेम्ब टाकण्यासाठी.काही खाण्याचे पदार्थ .अशी तयारी केली प्रत्येकाची पाठपिशवी वेगळी केली हिटलॉनबेडमध्ये बेडशिट शाल ब्लान्केट घालुन त्याची वळकटी करुन दोरीने बान्धुन खान्द्याला अडकवायची पाठपिशवी पाठीवर एक शबनम बिस्किटे,पाण्याची बाटली मार्गदर्शक पुस्तक शिक्क्याची वही हे भरुन गळ्यात .असे सारे घेउन रोज चालण्याचा सराव केला.
श्रावणात ओम्कारेश्वरला जाऊन जितेन्द्रशास्त्रीना परिक्रमेबद्दल सान्गितले. एक नोव्हेम्बरला ब्लड चेक करुन घाडगेसराना दाखवुन फिटनेस घेतला. आमदार वसन्त गिते यान्च्याकडुन ओळखपत्र घेतले.माहेरी जाऊन मोठ्या भाऊ-वहिनी,मोठी बहिण यान्चे आशीर्वाद घेतले. ह्यान्चे मोठे भाऊ बहिण नाशिकलाच आहेत त्यान्चे आशीर्वाद घेतले.
११/११/११ ला सकाळी ११वाजुन ११ मिनिटानी ओम्कारेश्वर नगरपालिकेतुन सर्टीफिकेट घेउन परिक्रमा सुरु केली.आज २७ जानेवारी २०१२ परिक्रमा पुर्ण करुन येथे बसलो आहोत.
परिक्रमेने आम्हाला काय दिले?खुपसारे प्रेम.स्वतः अत्यन्त प्रतिकुल परिस्थितीत जगत असतानाही अतिशय ममतेने मोठ्या आदराने जेऊ-खाऊ घालणार्‍या आसरा देणार्‍या अन्नपुर्णा.लाखोवर्षान्ची परम्परा असलेली नर्मदा खोर्‍यातील सन्स्कॄती,विविधतेने नटलेली जैविक निसर्गसम्पदा,रोज आपुलकीने भेटणारे अनेक बान्धव, मैय्याचा किनारा पवित्र करणारे साधुसन्त,मैय्याच्या प्रेमात भक्तिभावात आकन्ठ बुडालेले एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ असे म्हणणारे परिक्रमावासी,रेवा तटावरील असन्ख्य तीर्थस्थाने,घाट,आणि कुठे छोटूकली तर कुठे विशाल,कुठे सन्थ तर कुठे खळाळत वाहणारी कधी उन्च पर्वतावरुन बेधडक उडी घेणारी तर कुठे असन्ख्य धारानी धावणारी सुन्दर नर्मदामैय्या . एवढे सगळे मिळाले परिक्रमेने.
कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता कसे जगावे हे शिकलो आम्ही. लखन्गिरीबाबा,दगदू महाराज,दादाधुनिवाले,गौरीशन्करमहाराज, सियारामबाबा श्रीराममहाराज या सारख्या सन्त महात्म्यान्चे महान सेवा कार्य बघुन धन्य झालो.
आधिक काय लिहू? फक्त नर्मदे हर!

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Sep 2012 - 8:05 pm | प्रचेतस

प्रांजळपणे केलेले लिखाण मनापासून आवडले.

यशोधरा's picture

26 Sep 2012 - 8:12 pm | यशोधरा

>>>>परिक्रमेने आम्हाला काय दिले?खुपसारे प्रेम.स्वतः अत्यन्त प्रतिकुल परिस्थितीत जगत असतानाही अतिशय ममतेने मोठ्या आदराने जेऊ-खाऊ घालणार्‍या आसरा देणार्‍या अन्नपुर्णा.लाखोवर्षान्ची परम्परा असलेली नर्मदा खोर्‍यातील सन्स्कॄती,विविधतेने नटलेली जैविक निसर्गसम्पदा,रोज आपुलकीने भेटणारे अनेक बान्धव, मैय्याचा किनारा पवित्र करणारे साधुसन्त,मैय्याच्या प्रेमात भक्तिभावात आकन्ठ बुडालेले एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ असे म्हणणारे परिक्रमावासी,रेवा तटावरील असन्ख्य तीर्थस्थाने,घाट,आणि कुठे छोटूकली तर कुठे विशाल,कुठे सन्थ तर कुठे खळाळत वाहणारी कधी उन्च पर्वतावरुन बेधडक उडी घेणारी तर कुठे असन्ख्य धारानी धावणारी सुन्दर नर्मदामैय्या . एवढे सगळे मिळाले परिक्रमेने.
कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता कसे जगावे हे शिकलो आम्ही. >> अजून काय हवे? हेच तर शिकायचे असते. स्व विसरणे महत्वाचे. तुमची परिक्रमा पूर्ण सफल झाली म्हणायची. कधीकाळी माझ्याही आयुष्यात परिक्रमेचा योग येईल अशी आशा बाळगून आहे. मैय्याला प्रार्थना आहे. तुम्ही पुन्हा जाल तेह्वा माझ्यासाठी पार्थना कराल का? :)

विजय_आंग्रे's picture

26 Sep 2012 - 8:16 pm | विजय_आंग्रे

व्वा मनोगत छान लिहलेय, आता पर्यंत परिक्रमेचे जवळ-जवळ सर्वच भाग वाचनिय होते.

पुढील परिक्रमेसाठी शुभेच्छा..!

सगळे भाग काही वाचले नाहीत. पण एकंदर लेखमाला छान झाली.
तुम्ही चिकाटीने परिक्रमा केलीत याचे कौतुक तर आहेच पण तेवढ्याच जिद्धीने इथे लेखनही केले तेही काही प्रतिकुल प्रतिसाद येत असताना.
धन्यवाद.

कौशी's picture

26 Sep 2012 - 11:03 pm | कौशी

सर्व भाग वाचलेत. तुमच्या चिकाटीला दाद देते...
पुन्हा येकदा अभिनंदन..

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2012 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

नर्मदे हर!

कवितानागेश's picture

27 Sep 2012 - 12:29 am | कवितानागेश

तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक भागातून तुमची चिकाटी दिसतेय.
तुमचे मनोगत वाचताना आनंद मिळाला. हा परिक्रमेचा आनंद आम्हाला वाटल्याबद्दल मनापासून आभार.
तुम्हाला पुन्हा पायी परिक्रमा करण्यासाठी शुभेच्छा.

priya_d's picture

27 Sep 2012 - 5:30 am | priya_d

वंद्नाताई
परि़क्रमेच्या पूर्तीबद्दल तुम्हा उभयतांचे अभिनंदन. परिक्रमा छानच झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आलेल्या अडचणींबद्दल मु़ळीच खेद मानू नका. तसे होऊनही तुम्ही नेटाने परिक्रमा पूर्ण केलीत हे मह्त्वाचे. परिक्रमेबद्दलचे मनोगत वरती सर्वांनी म्ह्टल्याप्रमाणे ख्ररेच छान झाले आहे. तुमच्या लेखमालेद्वारे आम्हालाही परिक्रमेचा आनंद मिळाला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

लवकरच पायी परिक्रमा करण्याची तुमची ईच्छा सफल होवो व त्यासाठी तुम्हास उत्त्म प्रकृतीस्वास्थ्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

यशोंनी म्ह्टल्याप्रमाणे आम्हालाही परिक्रमेचा योग लवकरच यावा यासाठीही त्या सर्वेश्वराचरणी प्रार्थना!

दीपा माने's picture

27 Sep 2012 - 7:33 am | दीपा माने

वंदनाताई तुम्ही उभयतांनी नर्मदा परीक्रमा नेटाने पुर्ण केलीत कारण नर्मदामातेने ती तुमच्याकडून करवून घेतली. तिनेच मानवी रुपात तुम्हाला मदत केली.
आमच्याही चारधाम, काशी, नेपाळ, अष्टविनायक, बाराज्योतिर्लिंगांपैकी काही असा धार्मिक प्रवास निर्विध्नपणे झाला आहे. वेळोवेळी बिकट प्रसंग सुकर होत गेल्याचा सतत अनुभवच घेतला. त्यामुळे तुमच्या भावना मी पुर्णपणे जाणू शकते. तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासास अनेक शुभ कामना.

इरसाल's picture

27 Sep 2012 - 9:07 am | इरसाल

प्रथमपासुनच वाचत आलो आहे. कधी प्रतिसाद दिला कधी नाही.
वाचताना सतत वाटत होते की मी सुद्धा तुमच्याबरोबरच प्रदक्षिणा करत आहे.तुमच्या चिकाटीला सलाम.अडथळे हे येणारच प्रदक्षिणेत म्हणा की मिपावरील लेखनात म्हणा. पण जिद्दीने तुम्ही ते न डगमगता पुर्ण केलेत.
आभार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2012 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

पहिल्या भागा पासुन सगळे भाग काळजीपुर्वक वाचले आहेत. प्रतिसाद दिला नव्हता इतकेच. पण तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम. ज्या तळमळीने तुम्ही न कंटाळाता आमच्या साठी इथे सारे लिहिलेत त्या बद्दल मनापासुन आभार आणि अभिनंदन,

एकंदर या नर्मदा परिक्रमे बद्दल उत्सुकता आणि आकर्षण वाढायला लागले आहे.

स्पा's picture

27 Sep 2012 - 9:41 am | स्पा

तुमच्या जिद्दीला सलाम..
नर्मदे हर्र

मूकवाचक's picture

27 Sep 2012 - 11:24 am | मूकवाचक

नर्मदे हर!

सविता००१'s picture

27 Sep 2012 - 12:10 pm | सविता००१

वंदनाताई, खूप साधं आणि तरीही मनाला भिडणारं असं सुंदर लिहिलंय तुम्ही. सगळे भाग वाचले आणि आमचीही केवळ तुमच्यामुळे मनातल्या मनात का होईना, पण परिक्रमा झाली असंच वाट्तंय! अनेकानेक धन्यवाद!!

सातबारा's picture

27 Sep 2012 - 9:50 pm | सातबारा

पहिल्यापासूनच सर्व भाग मनापासून वाचले. हे सर्व लिहिण्याच्या चिकाटीला सलाम ! पायी परिक्रमेस शुभेच्छा !
आमचाही योग लवकरच येवो ही नर्मदामैय्याच्या चरणी प्रार्थना !

पैसा's picture

28 Sep 2012 - 8:12 am | पैसा

आणि पुढच्या परिक्रमेसाठी शुभेच्छा!

सस्नेह's picture

28 Sep 2012 - 12:18 pm | सस्नेह

वंदनाताई, हा शेवटचा लेख म्हणजे खरोखरच लेखमालेचा कळस आहे.
अत्यंत हृदयस्पर्शी जिवंत लिखाण.
प्रणाम त्या नर्मदामैयाला, तुमच्या जिद्दीला अन परिक्रमेला !

चांगली लेखमाला. वेगळाच अनुभव घेतलात आणि इथे सर्वांसोबत शेअर केलात. धन्यवाद....

आम्हाला परिक्रमा घडवली ते पुण्य तुम्हालाच आहे. खूप छान आणि सोप्या भाषेत लिहिलेली ही परिक्रमा प्रत्यक्षात तुमची चिकाटी आणि श्रध्दाच आहे. खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या परिक्रमेसाठी शुभेच्छापण.

विलासराव's picture

30 Sep 2012 - 1:12 pm | विलासराव

हर हर नर्मदे माई हर हर नर्मदे!!!!!!!!!!!!!!!!

स्पंदना's picture

1 Oct 2012 - 1:40 pm | स्पंदना

खुशीताई तुमच्या अगदी पहिल्या भागापासुन ते या शेवटच्या भागापर्यंत अगदी व्यवस्थित वाचल. भावना एकच होती. तुम्ही आमच्या सारख्या आहात अन तरीही ही परिक्रमा तुम्ही पार पाडली. मनात एक सुक्ष्मशी आशा...आपल्यालाही जमेल. इतक डयबेटीस सांभाळुन या करतात तर आपल्यालाही जमु शकेल. अर्थात बाहेर पडायच तर पयात तुम्ही वर्णलेली प्रपंचाची दोरी आहे. अन तुम्ही जश्या सार्‍या जबाबदार्‍या पार पाडुन मगच स्वतःच्या इच्छेचा विचार केलात तीच एका गृहिणीची, एका मातेची भावनाही आहे. पण इतके दिवस या गोष्टी आप्ल्यासाठी नाहीत ही जी भावना होती ती तुमच परिक्रमेच वर्णन वाचुन कमी झाली. या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडुन आपण अस काही अलौकिक करु शकु असा आत्मविश्वास वाटत्तो आहे.
आता तुमच्या लेखन शैलीबद्दल.
आपल वाटणार लिखाण, आलेले कडु गोड अनुभव जसेच्या तसे, फारसा स्वतःच्या मतांचा बाउ न करता लिहिलेले. खर सांगायच तर त्यामुळेच 'अन्करप्ट'. आपल्या चष्म्यातुन पहात लिखाण केल असतात तर नस आवडल वाचायला. तुमचा प्रांजळपणा ही एक फार मोठी देणगी आहे तुमची. जपा ती. सारा कडवटपणा निघुन जाईल इतरांच्या आयुष्यातला त्यामुळे.
तुम्ही लिखाणात जागोजागच्या स्थळांच वर्णन करताना ज्या तेथे प्रचलित असलेल्या दंतकथा, पुराणकथा सांगत गेलात त्यामुळे आमच्या ज्ञानात तर भर पडलीच, पण त्यामुळे लेखण रसभरीत झाल. कोणताही मोठेपणा न बाळगता आमच्या साधारणपणाला धिर देत तुमच लिखाण झालय अन ते एकमेव असाव.
शेवटी देव काय हो! आपण शोधु तेथे मिळतो. अन पावतो देखील, पण अस स्वतःचा कोष सोडुन, नेहमीचा परिसर सोडुन, इतरांवर भरोसा ठेवत पायी फिरण हे एक माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. अश्यावेळी सारा हवाला खरोखर देवावरच नाही का? अन मग तो दिसत असेल कदाचित आप्ल्या भाबड्या मनाला, जसा तुम्ही 'नर्मदे हर' म्हंटल्यावर शेताच्या बांधाव्र तो एका कृषक कन्येच्या स्वरुपात अवतिर्ण झाला. मॉ जी बाबुजी म्हणुन तुमची तहान भागवुन तुम्हाला म्र्गस्थ करुन गेला. वेळोवेळी तुमच्या थकलेल्या अवस्थेत एखाद दुसर चुकार वाहन पाठवत गेला. तुमच्या पायाच्या जखमा पाहुन आज मुक्काम करा असा प्रेमळ धाकाचा आग्रह करुन गेला.
आज हे सार लिहिताना तुमच्या लिखाणातला प्रत्येक प्रसंग मनासमोर उभा आहे. जसाच्या तसा. इतर वेळी फारस लिहिण मला पटल नाही. ती तुमची हक्काची जागा होती कथेकर्‍याची. तेंव्हा आम्ही फक्त मान डोलावुन 'हं!' म्हणायच होत. कोणताही व्यत्यय न आणता. पण आज समारोपाला मात्र तुअम्ची खणानारळान ओटी भरल्याशिवाय कस पाठवता येइल? आपली परंपरा नव्हे ती, नाही का?
तुमच्या लिखाणान बळ आलय हे मात्र जरुर नमुद करेन खुशीताई.

इरसाल's picture

1 Oct 2012 - 1:46 pm | इरसाल

ह्या प्रतिसादाला टाळ्याच झाल्या पाहिजेत.

खुशि's picture

2 Oct 2012 - 5:06 pm | खुशि

नमस्कार अपर्णा.
खणानारळाची ओटी पावली. आपणही आपल्या जबाबदार्‍या पुर्ण झाल्यावर आपल्या मनाप्रमाणे करु शकाल नक्की. धन्यवाद.

सुजित पवार's picture

2 Oct 2012 - 4:39 pm | सुजित पवार

सुन्दर प्रतिसाद :)

सुजित पवार's picture

2 Oct 2012 - 4:46 pm | सुजित पवार

आधि पासुन वाचत आलो. मधे प्रतिसाद देने जमले नाहि. खुप सुन्दर समरोप केलात तुम्हि. मधे मधे विनाकरन खोचक प्रतिक्रिया मिलाल्या, त्याकदे लक्श दिले नाहित ते खुपच चान.
याच रविवारि कराड ला कुन्ते आले होते. त्यान्चे अनुभव कथन ऐकले नि आता तुम्चा समारोप, खुपच चान योग जुलुन आला. तुम्च्या पुढच्या परिक्रमेसाठी शुभेच्छा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Oct 2012 - 11:50 pm | निनाद मुक्काम प...

तुमच्याकडून भविष्यात सुद्धा असे चांगले संकल्प पार पडावे अशी आशा करतो.
आपल्या आयुष्याचा आपण कसा वापर करावा व ते कसे व्यतीत करावे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.
तुम्ही उत्तमरीत्या ते व्यतीत करत आहात हे नक्की.

सर्व भाग वाचायला मिळाले नाहीत, पण परिक्रमा पूर्ण केलीत त्याबद्दल अभिनंदन,,,,,सुरवातीचे भाग दिसत नाहीयेत
बाकी पुन्हा एकवार अभिनंदन
Hats off

मीउमेश's picture

1 Nov 2012 - 9:49 pm | मीउमेश

खुशि ताइ, तुमचे खुप खुप आभार.
मला खुप दिवसानपासुन नर्मदा परिक्रमा या विशयि वाचन (मराठितुन) करावेसे वाटत होते.
खुप खुप शोधले गूगल तेव्हा मिसळ्पाव.कोम सापडले.
तुमच्या मुळे मला खुप मोलाचा धागा मिळाला आणि नर्मदा परिक्रमा या बद्दलचा तुमचा प्रवास खुप काहि देउन गेला,
अस वाटतय माझि पण परिक्रमा पुर्ण झालि.
खुप खुप धन्यवाद

मीउमेश's picture

1 Nov 2012 - 9:50 pm | मीउमेश

खुशि ताइ, तुमचे खुप खुप आभार.
मला खुप दिवसानपासुन नर्मदा परिक्रमा या विशयि वाचन (मराठितुन) करावेसे वाटत होते.
खुप खुप शोधले गूगल तेव्हा मिसळ्पाव.कोम सापडले.
तुमच्या मुळे मला खुप मोलाचा धागा मिळाला आणि नर्मदा परिक्रमा या बद्दलचा तुमचा प्रवास खुप काहि देउन गेला,
अस वाटतय माझि पण परिक्रमा पुर्ण झालि.
खुप खुप धन्यवाद

भडकमकर मास्तर's picture

2 Nov 2012 - 2:20 pm | भडकमकर मास्तर

हुर्रे .. झाली परिक्रमा

पैसा's picture

15 Apr 2013 - 9:21 pm | पैसा

नुकताच खुशीताईंचा संदेश आला होता. २५ ऑक्टोबर ते २५ मार्च या काळात त्यांनी पायी चालून परिक्रमा पूर्ण केली आहे. खुशीताईंचे यासाठी खास अभिनंदन!!

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2013 - 9:24 pm | श्रीरंग_जोशी

हो, गूगल+ वर त्यांनी काही दिवसांपूर्वी हे स्टेटस अपडेट केले होते.

एका मिपाकराने अवघड असे निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले, अभिमान वाटला!!

अरे वा! अभिनंदन खुशीताईंचे.

मोदक's picture

15 Apr 2013 - 9:38 pm | मोदक

+१ हेच बोल्तो...

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2013 - 12:32 am | प्रसाद गोडबोले

वाह !!
आमच्या नशीबात कधी येणार असा योग ?
असों .

खुशी ताईना आमचे अभिनंदन अन साष्टांग दंडवत कळवा _/\_

अन्या दातार's picture

15 Apr 2013 - 10:35 pm | अन्या दातार

अभिनंदन.

कवितानागेश's picture

15 Apr 2013 - 11:32 pm | कवितानागेश

ग्रेट आहेत या बाई. मला आता थोड्याश्या अंतरासाठी रिक्शा करताना लाज वाटेल! :( ;)

विटेकर's picture

10 Dec 2013 - 4:04 pm | विटेकर

आज पुन्हा एकदा सगळे भाग वाचून काढले ! जरा आत्मविश्वास आला आहे. अर्थात ८ दिवसाचीच परिक्रमा करणार आहे पण तयारी मात्र खूप करावी लागत आहे !
मैय्याचे इच्छा जशी असेल तसे होईल....

राही's picture

10 Dec 2013 - 5:59 pm | राही

परिक्रमेस शुभेच्छा.

खुशि's picture

19 Aug 2014 - 11:13 am | खुशि

नमस्कार,आपली परिक्रमा झाली का?मी गेल्या डिसेम्बरमध्ये भालॉद ते निलकन्ठेश्वर चालले काही बन्धू-भगिनी बरोबर.नन्तर जानेवारीत गाडीने केली परिक्रमा,१५दिवस लागले होते.आता ५ऑक्टोबर पासुन महाराजपुर ते ओम्कारेश्वर चालणार आहे परिक्रमा बन्धुबरोबर.नर्मदे हर.

परिंदा's picture

10 Dec 2013 - 5:21 pm | परिंदा

विटेकर,
परिक्रमा केल्यानंतर नक्कीच एक लेख येऊ द्या.

११/११/११ ला सकाळी ११वाजुन ११ मिनिटानी ओम्कारेश्वर नगरपालिकेतुन सर्टीफिकेट घेउन परिक्रमा सुरु केली.आज २७ जानेवारी २०१२ परिक्रमा पुर्ण करुन येथे बसलो आहोत.

छान लेख. आधीच्या लेखाच्या लिंकस द्या न . एकच प्रश्न आहे . एवढ्या लवकर परिक्रमा पूर्ण झाली?
म्हणजे बस ने केली होती का?

अंशतः बसने, रिक्शाने, ट्रेनने केली होती. परिक्रमा करताना खुशीताईंची तब्येत बिघडली होती, म्हणून नाईलाजाने त्यांनी वाहनाने परिक्रमा पूर्ण केली.

या परिक्रमेनंतर दुसरी परिक्रमा पायीच केली. वर पैसाताईंनी याबद्दल माहिती दिली आहे.

संपादक मंडळाने जमल्यास या सर्व लेखांची लेखमाला केली तर वाचकांसाठी सोयीस्कर होईल.

संतोषएकांडे's picture

13 Dec 2013 - 7:47 pm | संतोषएकांडे

अभिनंदन....

नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे
वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 7:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

नर्मदा परिक्रमेविषयी माहीती हवी आहे. म्हणजे करायची झाल्यास साधारण काय काय तयारी लागेल, कितपत खर्च येईल,किती दिवस लागतील. विटेकर,खुशी किंवा अन्य जाणकार लोकांना विनंती की यावर माहीती द्यावी.

खुशि's picture

19 Aug 2014 - 11:53 am | खुशि

नर्मदामैय्या काळजी घेते, त्यामुळे निघायचे परिक्रमेला. चातुर्मास सम्पला की कार्तिकी एकादशीला किन्वा नन्तर परिक्रमा सुरु करतात,दसर्यानन्तर,कोजागिरीपोर्णिमेला काहीजण सुरु करतात.बरोबर पाठपिशवी घ्यावी.दोन-तीन ड्रेस,अन्थरायला सतरन्जि किन्वा हिटलॉनशीट,चादर्,शाल,हवेची उशी,हलकेब्लान्केट, पाण्याची बाटली,नर्मदामैय्या ठेवण्यासाठी घट्टझाकणाची छोटी बाटली,प्रसादखडीसाखर काही पेन्किलर गोळ्या,मुव्ह वगैरे बरोबर ठेवावे.नर्मदा नित्यपाठपुस्तक ठेवावे.काठी घ्यावी.थन्डीसाठी स्वेटर हवा.परिक्रमेला साधारणपणे१४०दिवस लागतात रोज ३०कि.मि.चाललेतर.खर्च म्हणाल तर फारसा येत नाही आपल्या गावापसुन ओम्कारेश्वरला जाण्याचे तिकीट,सन्कल्पपुजा दक्षिणा.१०००/-२०००/-रुपये पुरतात.बाकी साबण वगैरेसाठी थोडेफार,भोजन-निवासाची सोय गावोगावी असलेल्या मन्दिर,आश्रमात विनामुल्य होते,गावोगावीचे नागरीक मोठ्या आस्थेने,श्रद्धेने आपली सेवा देतात.रोज डायरी लिहावी,नर्मदापरिक्रमा मार्गदर्शिका पुस्तक जवळ असावे.पुरुष लुन्गी वापरतात पण पायजमा शर्ट वापरला तरी चालतो फक्त पान्ढरे कपडे हवेत.मग यन्दा निघापरिक्रमेसाठी, रेवामैय्या नक्की पुर्ण करवुन घेईल आपली परिक्रमा.शुभास्ते पन्थाना: सन्तु.

जेपी's picture

18 Dec 2013 - 7:12 pm | जेपी

खुशीताईंच्या नर्मदा परिक्रमेचे सर्व लेखांची लिंक देत आहे जरुर वाचा .
http://www.misalpav.com/user/17536/authored

भटकंतीचे लेख शोधतांना हा समारोपाचा धागा वाचला .त्याअगोदरचा भाग ४६ हा अंक पाहून खडबडून जागा झालो .
लगेच सर्व भाग शोधून प्रथम मोबाईलमध्ये साठवले आणि आज ते एकादमात अ पासून ज्ञपर्यंत प्रतिसाद आणि खुशीताई तुम्ही न चिडता दिलेली उत्तरेही वाचून काढली .

यानंतर २०११ची परिक्रमा ताप आल्यामुळे नीट झाली नाही ती पुन्हा २०१२-१३ ला पूर्ण केलीत .अभिनंदन .

मला अभिप्राय द्यायला शब्द सुचत नाहित अशी अवस्था झाली आहे .

लिखाणातून तुमचे व्यक्तिचित्र पूर्णपणे डोळयांसमोर उभे राहिले .मिपाकटट्यांवर एकमेकांना भेटून जे साध्य होणार नाही ते काम तुमच्या लेखणीने केले आहे .

मध्यप्रदेशातील आदरातिथ्याचा अनुभव आम्हीही घेतला आहे .

भारतातल्या नर्मदा आणि कावेरी या दोन नद्या धार्मिक संदर्भाँत गंगेपेक्षा भाव खाऊन आहेत .कृष्णा ही दक्षिण भारतातील गंगा आहे .

तुम्हाला ,कुटुंबियांना ,हितेच्छुकांना सर्वाँना वर्षोँवर्षे शुभेच्छा !

खुशि's picture

19 Aug 2014 - 11:57 am | खुशि

धन्यवाद,कन्जुसजी,नाव कन्जुस पण अभिप्राय अगदी दिलदारपणे दिला आहेत.फार आवडला.

म्हैस's picture

3 Jan 2014 - 12:28 pm | म्हैस

@तथास्तु
धन्यवाद. लिंक्स दिल्याबद्दल. वाचतेय.

भारतातल्या नर्मदा आणि कावेरी या दोन नद्या धार्मिक संदर्भाँत गंगेपेक्षा भाव खाऊन आहेत .कृष्णा ही दक्षिण भारतातील गंगा आहे .

एकदम सहमत . नर्मदा हि भगवान शंकरांच्या तापोसामार्थ्याने निर्माण झाली असल्यामुळे ती शिवकन्या आहे. एक कथा वाचलेली आठवते . एकदा नारद नर्मदेच्या काठाने फिरत चाललेले असताना त्यांना १ काळी गाय नर्मदेच्या पाण्यात उतरताना दिसते. आणि बाहेर येते तेव्हा ती पांढरी शुब्र झालेली असते. त्यांना आश्चर्य वाटते आणि ते जेव्हा चौकशी करतात तेव्हा कळतं कि ती गाय म्हणजे गंगा आहे. वर्षातून एकदा ती स्वताला पवित्र करून घेण्यासाठी नर्मदेत डुबकी मारते. हि दंतकथा असू शकते पण नर्मदेच महत्व अधोरेखित करते.
क्रिष्णा तर प्रभू दत्तात्रेयांच्या सानिध्यामुळे आणि त्यांच्या स्पर्शामुळे पावन झाली आहे.