गाभा:
मला मदत हवी आहे.
मला काही पुस्तके जालावर चढवायची आहेत. माझ्याकडे स्कॅनर नाही, पण मी प्रत्येक पानाचा फोटो काढून मग तो संगणकावर घेतला आणि मग ते जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मधून कन्व्हर्ट केले. इंग्लीश पुस्तकासाठी हे सोपं गेलं पण मराठी पुस्तकासाठी थोडी अडचण येत आहे.
तुमच्यापैकी कोणाला जर जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मराठी माहित असेल तर कृपया सांगा. मी गुगल वरून १-२ लिंक्स बघितल्या पण त्याची काही मदत झाली नाही.
कृपया मदत करावी.
धन्यवाद
प्रतिक्रिया
11 Sep 2012 - 4:28 pm | sagarpdy
कायदेशीर सल्ला :
सर्वप्रथम अशा प्रकारे पुस्तके 'चढवण्याचा' तुम्हाला अधिकार आहे का ते तपासून बघा. योग्य वकिलाकडून सल्ला घ्या.
तसा अधिकार नसल्यास आवश्यक योग्यचौप्य मिळावा.
मूळ प्रश्नाचे उत्तर :
इंग्रजी प्रकाशाक्षरोळख तंत्रज्ञान आता बरेच विकसित झाले असल्यामुळे, इंग्रजी पुस्तकांसाठी हे सोपं जातं. मराठी अक्षरे ओळखणे तेवढे सोपे नाही. सबब अशी प्रणाली सहजरीत्या सापडणे कठीण आहे. खिशात / खात्यात भरपूर पैसे असल्यास एखाद्या ऐदी .. आय मीन .. आयटी कंपनी कडून अशी प्रणाली विकत घेऊ शकता.
11 Sep 2012 - 4:50 pm | नीलकांत
अश्या प्रकारे प्रताधिकार राखीव असलेल्या पुस्तकांची प्रत बनवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसे करू नये हेच सुचवतो.
राहीला प्रश्न चित्रातील अक्षर ओळख करणार्या सॉफ्टवेअरची तर हे तंत्रज्ञान इंग्रजीत खूप पुढे गेलंय. याला OCR असे म्हणतात. मराठीसाठी सीडॅकचे सॉफ्टवेअर चांगले आहे असे ऐकले होते. वापरून पाहिलेलं नाही.
11 Sep 2012 - 4:37 pm | चेतन माने
तुमच्या नावातच उत्तर दडलंय !!!
11 Sep 2012 - 4:42 pm | चौकटराजा
माझ्याकडे विविधा नावाचे साधे एडीटर आहे त्याची डिस्क एकालाच वापरता येते. त्यात चारच फाँट आहेत.
त्याच्यात टाईप करायचे मग ते कॉपी करायचे. त्या तला फोंट विंडोज डिरेकटरीतील सब डिरेकटरी " फोन्ट्स" मधे कॉपी करायचा.फोटोशॉप मधे फाईल नवी ओपन करून त्यात टाईप ओप्शन मधे ते पेस्ट कारायचे. व लेअर मर्ज करून जेपीजी फाईल सेव्ह करायची. व ती फाईल वर्ड मधे इन्सर्ट करायची. अर्थात
ते व्हेक्टर ग्राफिक नसल्याने क्वालिटी मार खाते.
11 Sep 2012 - 4:49 pm | sagarpdy
काय मस्करी करताय का ?
11 Sep 2012 - 5:10 pm | विजुभाऊ
ओ सी आर वापरण्यासाठी पी डी एफ फाईल मधील टेक्स्ट चा फॉन्ट ओसीआर सॉफ्टच्या लायब्ररीमध्ये असावा लागतो तरच टेक्स्ट कन्वर्जन होऊ शकते.
मराठी बाबत असे करायचे झाल्यास तुम्हाला दोन गोष्टी आवश्यक असतील.
१) जे लेखन तुम्ही पीडीएफ फॉर्मॅट मध्ये घेतले आहे त्यात वापरलेला फॉन्ट ओसीआर सॉफ्टवेअर मधे आणावा लागेल.
२) ज्याची पी डी एफ बनविणार आहात ते प्रत्येक लिखाण त्याच फाँट मध्ये असायला हवे.
( मराठी बाबत हे फारच अवघड आहे. तेथे अजून स्टॅन्डर्ड कीबोर्ड बाबत बरेच मतभेद आहेत. )
11 Sep 2012 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार
कुठली हो.. कुठली पुस्तके आहेत ?
11 Sep 2012 - 9:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!!
11 Sep 2012 - 10:03 pm | शोधा म्हन्जे सापडेल
कुठलेही बेकायदेशीर काम करण्याचा माझा हेतू नाही. काही अध्यात्मिक पुस्तके आहेत, ती अश्या प्रकारे लोकांना इ-पुस्तकांसारखी मोफत वाचता यावीत, हा उद्देश आहे.
11 Sep 2012 - 10:13 pm | भडकमकर मास्तर
अध्यात्मिक पुस्तके परवानगीविना जालावर चढवली की ती बेकायदेशीर होत नाहीत , ही नवीन माहिती आहे...
दन्यवाद्स
13 Sep 2012 - 8:04 am | निनाद
प्रताधिकारीत अध्यात्मिक पुस्तके परवानगीविना जालावर चढवली की ती बेकायदेशीर होणारच.
परंतु, ज्ञानेश्वरी किंवा शिवतांडवस्तोत्र वगैरे चढवले तर ते बेकायदेशीर कोणार नाही (फक्त मजकूर).
कारण हे मजकूर प्रताधिकार कायद्याच्या कक्षेत आता येत नाहीत.
मात्र रावणाने (व त्याच्या वंशजांनी) त्याचा प्रताधिकार राखून ठेवला असल्यास ते ही (कदाचित) बेकायदेशीरच ठरेल.
पण रावणाने शिवतांडवस्तोत्र प्रताधिकार राखून ठेवल्याचे ऐकिवात नाही ;)
11 Sep 2012 - 10:22 pm | शोधा म्हन्जे सापडेल
विनापरवानगी नाही. ही पुस्तके मी मुख्य कचेरीत पाठविणार आहे आणि जर उच्चपदस्थांची परवानगी असेल तर तेच ही पुस्तके अपलोड करतील.
11 Sep 2012 - 10:33 pm | शोधा म्हन्जे सापडेल
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
13 Sep 2012 - 7:45 pm | काळा पहाड
बिंधास चढवा. हे कायदे करणारे राजकारणी, त्यांचे चमचे, लिहिणारे लेखक, प्रकाशन संस्था, त्यांचे वकील यांची बुद्धी आणि अक्कल मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरण्यापुरतीच असते. इंटरनेट वर काहीही बेकायदेशीर नाही. यांचे पुराणकालीन कायदे इंटरनेट ला लागू होत नाहीत. हे लोक कितीही बोंबलले तरीही.