भरलेली भेंडी....

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
5 Sep 2012 - 11:28 am

प्रथम बाजारात प्रसन्न मनाने जाऊन अर्धा किलो ताज्या ताज्या कोवळ्या अन लहान भेंड्या आणाव्यात.
घरी आल्यावर त्याच प्रसन्न मुडमधे स्वच्छ पुसुन घेउन त्याचे देठ आणि शेपटी काढुन टाकावी. भेंडी मधे उभी चिर मारुन घ्यावी की त्यात मसाला नीट भरता येइल.

मसाल्यासाठी साहित्य :- ५ ते ६ टेबलस्पुन हरबर्‍याच्या डाळीचे पीठ थोड्या तेलावर भाजुन घ्यावे, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, ओले खोबरे १.५ वाटी, शेंगदाण्याचे कुट १ वाटी, मीठ, मिरची अथवा तिखट, कोथिंबीर.

कृती :- भेंडी चिरताना आलेला कंटाळा एफ़ एम अथवा मोबाईलवरील आवडती गाणी ऐकुन घालवावा. वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवरुन काढावे.
या मिश्रणाचा साधारण घट्ट गोळा व्हावयास हवा. तर हे सारण गाणी ऐकतच भेंडीमधे भरावे जसे वांग्यात भरतो. या भेंड्या भरता भरता माइक्रोवेवच्या काचेच्या पसरट भांड्यात ठेवाव्यात. माइक्रोवर साधारण ५ मिनीटे या भरलेल्या भेंड्या वाफ़वुन घ्याव्यात. ज्याम्च्याकडे मायकोवेव्ह नाहीय त्यांनी चाळणीवर ठेवुन वाफ़वुन घ्याव्यात. वफ़वलेल्या भेंड्या थोड्याशा तेलावर फ़ोडणीला टाकुन खरपुस होईपर्यंत परतुन घ्याव्यात...


नुसत्या खाल्ल्या तर छान लागतातच पण मग बायको/ आई ओरडेल ना म्हणुन चपातीबरोबरच खायला घ्याव्यात...

प्रतिक्रिया

लीलाधर's picture

5 Sep 2012 - 11:36 am | लीलाधर

लई म्हणजे लई आवडीची है बगा आमची :) येक नंबर ओ श्रद्धा तै पाव किलो भरली भेंडी द्या पाठवून डब्यातून :) म्हणजे पोळी = खायला लई मज्जा येईल ओ.......

श्रद्धा.'s picture

5 Sep 2012 - 11:43 am | श्रद्धा.

:) नक्की पाठवुन देइन हो.... पण असे किती दिस ताईन पाठवत र्‍हायचं?????

जोपर्यंत आमच्या लीलाबाई घरात येत न्हाईत ना तोपर्यंत ;)

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 12:02 pm | प्रचेतस

कोण ह्या ली-ला बै?

लीलाधर, आपले घोडे आवर..!!

धीर नाही धरलास तर लीला कशी धरणार?.

रमताराम's picture

5 Sep 2012 - 6:28 pm | रमताराम

=)) . च्यामारी इथे लोळायची स्मायली पायजे राव.

(लक्ष्मीधर) रमताराम

लीलाबाई

चचा लैच उतावीळ झालायेस लेका.. :D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2012 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

@भेंडी चिरताना आलेला कंटाळा एफ़ एम अथवा मोबाईलवरील आवडती गाणी ऐकुन घालवावा.
http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवरुन काढावे.>>>

@या मिश्रणाचा साधारण घट्ट गोळा व्हावयास हवा.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

@ तर हे सारण गाणी ऐकतच भेंडीमधे भरावे जसे वांग्यात भरतो. या भेंड्या भरता भरता माइक्रोवेवच्या काचेच्या पसरट भांड्यात ठेवाव्यात. माइक्रोवर साधारण ५ मिनीटे या भरलेल्या भेंड्या वाफ़वुन घ्याव्यात. ज्याम्च्याकडे मायकोवेव्ह नाहीय त्यांनी चाळणीवर ठेवुन वाफ़वुन घ्याव्यात. वफ़वलेल्या भेंड्या थोड्याशा तेलावर फ़ोडणीला टाकुन खरपुस होईपर्यंत परतुन घ्याव्यात... नुसत्या खाल्ल्या तर छान लागतातच पण मग बायको/ आई ओरडेल ना म्हणुन चपातीबरोबरच खायला घ्याव्यात...>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif
=============================================================
बाप...रे...काय ती म-हान लेखनशैली...! भेंडी....,,,फ्राय झालो राव आपण...!

५० फक्त's picture

5 Sep 2012 - 2:29 pm | ५० फक्त

कशी येउ मी नांदायला बाई, ************** ही लावणी ऐकली आहे का ?

चिंतामणी's picture

6 Sep 2012 - 11:17 am | चिंतामणी

मस्त.

भेंडीप्रिय असलेले पराशेट कुठे आहेत??

ज्योति प्रकाश's picture

6 Sep 2012 - 3:39 pm | ज्योति प्रकाश

आजच करुन बघितली.छान झाली.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2012 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार

आवडेश एकदम.

कुंदन's picture

7 Sep 2012 - 8:16 pm | कुंदन

असेच म्हणतो.

मदनबाण's picture

7 Sep 2012 - 7:52 pm | मदनबाण

मस्त ! :)