आर्बीटेज

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in काथ्याकूट
3 Sep 2012 - 7:21 pm
गाभा: 

आर्बीटेज

आर्बीटेजर म्हणजे अशा व्यक्ती ज्या अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पोसिशन घेतात कि ज्यामुळे कोणतीही जोखीम न स्विकारता फायदा मिळवता येतो. जेव्हा बाजारात अनियमीतता असते अशा वेळी हे एका मार्केटमधून खरेदी करतात व दुस-या मार्केटमध्ये त्याचवेळी विक्री करतात. म्हणून आर्बीटेजर बाजारातील अशा संधीची नेहमीच वाट पहात असतात.

फ्युचर्समध्ये (वायदे बाजारात) कमी किंमतीत स्टॉक/शेअर्स किंवा इंडेक्स विकत घेऊन भविष्यातील जास्त किमतीला विकून तुम्ही आर्बीटेज संधीचा फायदा उठवू शकता. यासाठी इंडेक्सची स्पॉट प्राइज व फ्युचर प्राईजमध्ये व्याजापेक्षा जास्त फरक असताना हा फायदा मिळवता येतो. आता हि गोष्ट समजण्यासाठी एक उदाहरण पाहुया.

· समजा आत्ता निफ्टी ४८०० आहे व ३ महिन्यानंतरच्या निफ्टी फ्युचरची प्राईज ५२०० आहे.
· निफ्टीची भविष्यातील (फ्युचर) किंमत (प्राईज) हि ३ महिन्याचे व्याज विचारात घेऊन काढता येते.
· आता फ्युचर प्राईज हि व्याजापेक्षाही जास्त असल्यास येथे आर्बीटेज संधी निर्माण होते.
हि गोष्ट जास्त सुलभपणे समजण्यासाठी आता आपण एखाद्या शेअरबाबत हे उदाहरण पाहुया. समजा स्पॉट मार्केटमध्ये अॅक्सीस बँकेच्या एका शेअरची किंमत रु.१००० आहे व ३ महिन्यानंतर संपणा-या अॅक्सीस बँकेचा फ्युचर रु.१०७० आहे. आता जर का एखाद्याने १२% वार्षीक व्याज दराने रु.१००० तीन महिन्यासाठी घेऊन अॅक्सीस बँकेचा एक शेअर स्पॉट मार्केटमध्ये खरेदी केला व त्याच वेळी तो ३ महिन्याचा फ्युचर रु.१०७० ला विकला तर काय होते ते पहा:

· विक्री किंमत रु.१०७०
· वजा- व्याजासह खरेदी किंमत (१००० + ३०) रु.१०३०
· आर्बीटेज फायदा रु.४०/-

बाजारात अशा संधी अनेकवेळा उपलब्ध होत असतात यासाठी तुम्ही अलर्ट असणे मात्र गरजेचे असते कारण या संधी लगेचच हुषार लोकं उचलत असतात.

याचप्रमाणे ऑपशन्समध्ये दर महिन्याला जेव्हा एक महिन्यानंतर संपणा-या कॉन्ट्रॅक्टमध्ये बाजाराचा सुरुवातीचा कल पाहून लांबचा (लॉंग) पुट किंवा कॉल शॉर्ट करुन नंतर २ ते ३ दिवसानी परत बाजाराचा कल पाहून विरुध्द बाजूचा पुट किंवा कॉल शॉर्ट केला असता (दोन्हीत अंतर + - ४००/५००) दर महा साधारणपणे आपल्या गुंतवणूकीवर रिस्क फ्रि २ ते ३% फायदा नियमीतपणे मिळवता येतो. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल एका ठरावीक (टक्केवारीच्या) रेंजमध्येच मार्केट प्रत्येक महिन्यात वर किंवा खाली जात असते. यासाठी मार्केट पुढील एक महिन्यात किती पॉईंट खाली अथवा वर जाऊ शकेल हे विचारात घेतले जाते, दुरच्या ऑपशनमध्ये जोखीम जवळपास नसतेच याची माहिती मी ऑपशन विभागातील लेखात देणार आहे. हि पध्दत मी गेले ३ वर्षे वापरत असून फक्त एकदा मार्केट मी ठरवलेल्या रेंजच्या बाहेर गेले होते तेव्हा एका बाजूला फायदा व दुस-या बाजूला नुकसान झाले होते, जे अत्यंत किरकोळ होते.

डिसक्लेमर: वरील उदाहरणे तुम्ही या बाबत पुर्ण अभ्यास करुनच तुमच्यासाठी वापरावीत, पुरेसा अभ्यास केल्या शिवाय हे केले असता नुकसान होऊ शकते. कारण रेंज ठरवणे, प्रिमीयम विचारात घेणे या गोष्टी महत्वाच्या असतात. पुरेशा भांडवलाचीसुध्दा गरज असते. तसेच या प्रकारात एखाद्या वर्षी जर का बाजार १००% जरी वर गेला तरी तुमचा होणारा फायदा हा वार्षीक २४ ते ३०% एवढाच होतो. जर का तुम्ही फिअर (भीती) व ग्रीड (हाव/लोभ) याना दुर ठेवू शकलात तरच शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात.

प्रतिक्रिया

गोंधळी's picture

3 Sep 2012 - 9:06 pm | गोंधळी

अर्बीट्रेज म्हणजे NSE चे शेर्स BSE मधे विकणे व BSE चे NSE मार्केट मधे विकणे असे ऐकले होते.

सदानंद ठाकूर's picture

6 Sep 2012 - 6:30 pm | सदानंद ठाकूर

पुर्वी दोन्ही एक्सचेजवर जेव्हा दरात फरक असे तेव्हा अशा संधी मिळत असत, आता जवळपास दोन्हिकडे दर समान असतात.

रघुपती.राज's picture

3 Sep 2012 - 9:10 pm | रघुपती.राज

रस्त्यात पडलेली १० ची नोट कुणालाही न सान्गता उचलतो.

सदानंद ठाकूर's picture

6 Sep 2012 - 6:31 pm | सदानंद ठाकूर

असो.

मदनबाण's picture

3 Sep 2012 - 9:53 pm | मदनबाण

वाचतोय...

सदानंद ठाकूर साहेब. अतिशय सुंदर माहीती.
तुमची मराठी साइट हि अतिशय वाचनीय आहे
सर मला हेजिंग म्हंजे काय ? हे आपण असाच लेख लिहुन सांगाल काय? बर्‍याच वेळा शेअर बाजारात असणार्‍यान कडून हेजिंग व हेज फंड असे शब्द बोलले जातात.
म्हणून सर तुम्ही हेजिंग म्हंजे काय ते सांगाल का कृपा करुन.

सदानंद ठाकूर's picture

6 Sep 2012 - 6:37 pm | सदानंद ठाकूर

धन्यवाद.
हेजींगवरचा लेख लवकरच येथे लिहीण्याचा विचार आहे, तुर्त हेजींग म्हणजे थोडक्यात इंशुरन्स, आपल्या पोर्टफोलीओतील समभांची किंमत कमी झाल्यास संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हेजींगचा वापर केला जातो.

सुधीर's picture

4 Sep 2012 - 11:09 pm | सुधीर

काही शंका आहेत.

१. आर्बीट्राज (विना जोखीम परताव्याची) संधी एफिशिअंट मार्केट मध्ये अल्प काळासाठीच उपलब्ध असतात आणि जरी असल्या तरी त्या ट्रान्झॅक्शन कॉस्टमुळे आकर्षक नसतात असं वाचून माहीतआहे. तरी पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वा पुट-कॉल पॅरीटी इक्वेशनवरून अशा संधी शोधता येऊ शकतील. पण त्यासाठी विदा कुठून डाउलोड करावा लागेल? (सिव्हीएस विदा सतत उपलब्ध होत असल्यास एक्सेल वा जास्तीत जास्त मॅक्रो लिहून शोधता येऊ शकेल असे वाटते)

२. शेवटचा पॅरा प्रत्यक्षातले उदाहरण देऊन (शक्य झाल्यास गुगल डॉकवर एक्सेल शेअर करून) अधिक स्पष्ट करता येईल का?

सदानंद ठाकूर's picture

6 Sep 2012 - 7:02 pm | सदानंद ठाकूर

बाजारात अनियमीतता असताना अशा संधी उपलब्ध होतात.

ऑपशन्समध्ये जवळच्या स्ट्राईक प्राईजला नेहमीच जास्त प्रिमियम मिळतो पण यात जोखीम जास्त असते, तर दुरच्या स्ट्राईक प्राईजला (दोन्ही बाजूच्या) प्रिमियम कमी मिळतो कारण कमी पैशात जास्त नफा मिळावा असे वाटणारे ग्रीडी लोकं बाजारात असतात याचाच फायदा आपण घ्यावयाचा असतो. मी आपणास गेल्या २ वर्षातील हि उदा. देऊ शकतो. मात्र येथे प्रत्यक्ष उदा. देणे योग्य वाटत नाही. क्षमस्व. एवढेच सांगतो कि हि स्ट्रॅटिजी वापरताना कॉल व पुट शॉर्ट करणेच योग्य होते, यात भांडवल थोडे जास्त लागते पण नफा थोडा पण निश्चित होतो. थोडे अवलोकन केलेत तर पटकन लक्षात येईल.